Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: ९४वे साहित्य संमेलन

प
प्रसाद गोडबोले
Fri, 12/03/2021 - 06:36
🗣 61 प्रतिसाद
१. मिपावर साहित्य संमेलनावर धागा नाही हे पाहुन आश्चर्य वाटले ! म्हणजे धागा कदाचित आलाही असेल पण मला तरी दिसला नाही ! २. ह्यावेळी काही अध्यक्षपदाची निवडणुक वगैरे नाही , शिवाय दिब्रिटो, सबनीस सारखा कोणी विवादास्पद अध्यक्ष नाही , जयंत नारळीकरांच्या सारखा अगदीच सर्वसामान्य साहित्यिक अध्यक्ष झाल्यामुळे सगळी मजा गेली राव . ३. मुळात साहित्यसंमेलनाचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग काय ? तिथे सामान्य वाचकांचे मुद्दे चर्चेला घेतले जातात का काही ? ४. साहित्यसंमेलनाला काही सरकारी फंडिंग बिंडिंग असते का ? स्वागताध्यक्ष म्हणुन भुजबळ साहेब दिसले म्हणुन विचार आला की संमेलनाच्या पैशाचे गणित काय ? ५. मिपाच्या धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात , किमान आमचे तरी उडवले जातात म्हणुन ही एक्ष्ट्रा लाईन विनाकारण अ‍ॅड केली आहे !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17591 views

🗣 चर्चा (61)
स
सुबोध खरे Tue, 12/07/2021 - 05:25 नवीन
एकंदर सा सं जेमतेमच झाले, गर्दी म्हणण्याइतकी गर्दी नव्हती असे तेथे जाऊन आलेल्या माझ्या मित्राचे म्हणणे आहे. बरेचसे साहित्यिक आणि कवी (स्वप्रसिद्ध- सुप्रसिद्ध नव्हेत) लोकांना माहिती सुद्धा नाहीत. कविसंमेलन एकंदरीत धन्यवाद होते. बहुसंख्य लोक नुसती पुस्तके चाळून पाहतात असे एका पुस्तक विक्रेत्याने निराशेने त्याला सांगितले. अर्थात जालावर आणि किंडल वर पुस्तके उपलब्ध आहेत आणि पी डी एफ वर बरीच पुस्तके फुकट मिळत असल्याने लोकांची विकत घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. विकत घेऊन वाचायची आणि वाचून झाल्यावर ठेवायची कुठे असे प्रश्न असल्यामुळे असे होत असावे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/07/2021 - 06:22 नवीन
>>>एकंदर सा सं जेमतेमच झाले. असे काही नाही. उत्तम झाले. >>>गर्दी म्हणण्याइतकी गर्दी नव्हती असे तेथे जाऊन आलेल्या माझ्या मित्राचे म्हणणे आहे. गर्दी तुडुंब होती. लशीचे दोन्ही डोसेस झालेले असतील तर त्यांना सोडत होते. अनेक रसिक प्रमाणपत्र न दाखवता आल्याने परत गेले. मुख्य सभा मंडप भरलेला नव्हता. लोक एका जाग्यावर बसत नव्हते. 'कविकट्टा' यात गर्दी होत नव्हती. हा मंच प्रत्येक संमेलनात गर्दी खेचत असतो. विद्यार्थी विद्यार्थिनी खुप दिसत होते. >>>>बरेचसे साहित्यिक आणि कवी (स्वप्रसिद्ध- सुप्रसिद्ध नव्हेत) लोकांना माहिती सुद्धा नाहीत. साहित्य संमेलन त्याला काय करू शकते. >>>>बहुसंख्य लोक नुसती पुस्तके चाळून पाहतात असे एका पुस्तक विक्रेत्याने निराशेने त्याला सांगितले. डॉ. साहेब, पुस्तके चाळण्यात शप्पथ लै आनंद मिळतो. बाकी, या साहित्य संमेलनात रेकॉर्डब्रेक पुस्तकांची खरेदी झाल्याच्या बातम्या आहेत. दोन कोटी रुपयांची पुस्तके विकल्या गेली आहेत. (संदर्भ : ६ डिसेंबर २०२१ मटा. पृ.क्र.२) >>>विकत घेऊन वाचायची आणि वाचून झाल्यावर ठेवायची कुठे असे प्रश्न असल्यामुळे असे होत असावे. हं... मुद्दा चर्चेचा आहे. डॉक्टर साहेब काल एक व्यक्ती मला वाट्सपवर भेटली.आपल्याकडील संग्रहित पुस्तके तो ज्याला आवडतील त्याला विकतो.ही आयडिया मस्त होती. मला आवडली. -दिलीप बिरुटे ( अभासासं उपस्थित रसिक)
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 12/07/2021 - 06:35 नवीन
'कविकट्टा' यात गर्दी होत नव्हती. हा मंच प्रत्येक संमेलनात गर्दी खेचत असतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/07/2021 - 06:45 नवीन
हे राम....! =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 12/07/2021 - 07:19 नवीन
पुढच्या वेळेस "बाप्पू" नाही तर "चिच्चा जान" चे नाव देऊन पहा तुडुंब गर्दी होईल. हा का ना का
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 12/07/2021 - 07:24 नवीन
काय हे !
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 12/07/2021 - 08:13 नवीन
ह्याचा अर्थ सावरकर प्रेम हे बेगडीच होतं तर?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 12/10/2021 - 03:31 नवीन
गर्दी तुडुंब होती. मुख्य सभा मंडप भरलेला नव्हता. लोक एका जाग्यावर बसत नव्हते. 'कविकट्टा' यात गर्दी होत नव्हती. हा मंच प्रत्येक संमेलनात गर्दी खेचत असतो. विद्यार्थी विद्यार्थिनी खुप दिसत होते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 12/07/2021 - 07:34 नवीन
किंवा इतर जिल्ह्यांतील काही नामचीन लेखकांच्या नावे?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 12/07/2021 - 08:31 नवीन
लुनावाले ब्रह्मे मंडप असतो का?

😀

लुनावाल्यांना टाळून पुढे जाणे हे आखिल मराठी साहित्याचे मोठे नुकसान असेल !
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 12/07/2021 - 09:06 नवीन
गर्दी म्हणण्याइतकी गर्दी नव्हती असे तेथे जाऊन आलेल्या माझ्या मित्राचे म्हणणे आहे.
मित्र &#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा