Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

खतरनाक रोडवरच्या प्रवासाची "डिस्कव्हरी"

न
निमिष सोनार
Mon, 11/08/2021 - 07:05
💬 2 प्रतिसाद
हिमाचल प्रदेशातील मनाली ते लेह हे अंतर तीन सेलिब्रिटीज् (संग्राम, वरुण आणि मंदिरा) एकेका अनुभवी ड्रायव्हरला सोबत घेऊन ट्रक चालवत नेतात, आणि त्यांना दिलेला सामान ठरलेल्या ठिकाणी डिलिव्हरी करतात, हे बघायला खूपच थरारक वाटते. समुद्रसपाटीपासून अंदाजे 6000 फूट, पासून ते अंदाजे 14000 फूट उंचीवर पोहोचतात. इंडियाज डेडलीएस्ट रोड्स (भारतातील खतरनाक/प्राणघातक रस्ते) सिझन एक मधील एपिसोड एक, दोन आणि तीन मध्ये आपण "डिस्कव्हरी प्लस" वर बघू शकता. बरीच भौगोलिक माहिती मिळते. ज्ञान वाढते. पर्वतावरील कडेकपारीतील खाचखळगे, चिखल, दगड, पाणी यांनी भरलेले (बहुतेक सगळे अरुंद) रस्ते, दरड कोसळण्याची भिती आणि हिमनद्यांमुळे कधीही आक्रमक होऊ शकणारे आणि मोठमोठ्या ट्रक्सला सुद्धा पाण्याच्या प्रवाहाने दरीत ढकलून देण्याची क्षमता असणारे धबधबे यांची सतत डोक्यावर टांगती तलवार, धुक्यामुळे 50 मीटरच्या पुढचे न दिसणे, उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता असे सगळे अडथळे पार करत या तिघांना आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचताना बघणे म्हणजे खूप वेगळा अनुभव ठरतो. आणि हे सगळे कॅमेरात शूट करून ते आपल्यापर्यंत क्रिस्प एडिटिंग करून पोचवणे हे खरंच रिस्की काम आहे. संपूर्ण टीमचे कौतुक वाटते. तुम्हाला रियल लाईफ मधील थरारक असे काही बघायचे असेल तर हा कार्यक्रम नक्की बघू शकता!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2288 views

💬 प्रतिसाद (2)
N
Nitin Palkar Tue, 11/09/2021 - 15:25 नवीन
चांगली माहिती.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 11/09/2021 - 16:45 नवीन
ही सिरीज २०१६ मध्ये आली होती, ती मला कशी वाटली होती वगैरे प्रश्न अप्रस्तुत आहेत पण ती येऊन आज जवळपास ५-६ वर्षे लोटली आहेत इतपत लक्षात घेतले तरी पुरे. दिवाळीचा हंगाम आहे, लोकांनी मेहनत घेऊन अंक सजवत लेखन केले आहे, एक सौजन्य म्हणून तरी किमान "टीव्ही/युट्युबवर पाच वर्षे जुन्या सिरीज पहा" धाटणीचे धागे काढणे अव्हॉइड करता आले असते असे मनापासून वाटते, बाकी आम्हाला बोलायचे अन तुम्हाला लिहायचे स्वातंत्र्य आहेच, पुढील निर्णय घेण्यास मालक संपादक मुखत्यार.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा