फलज्योतिषविद्येला जोडलेल्या धार्मिक विधी,उपासनांचा जातकाला उपयोग काय?
अस्मादिक फलज्योतिषविद्येचे हौशी अभ्यासक आहेत.
फलज्योतिष हे भारतात विकसित झाले असले तरी त्याचे मूळ भारतीय नाही. इजिप्त,बॅबिलोनिया या प्रदेशात जन्मलेली ही विद्या आहे.हिचा संबंध आकाशस्थ ग्रह, उपग्रह, छायाग्रह आणि नक्षत्रे यांच्याशी आहे. म्हणजे निर्जीव ,भटक्या आकाशस्थ वस्तूंशी फलज्योतिषविद्येचा संबंध आहे. हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह हे मानव पृथ्वीवर निर्माण होण्याआधीपासून आकाशात आहेत. याचाच अर्थ असा की विशिष्ट ग्रह, तारे यांचा पृथ्वीवरील देवी देवतांशी काहीच संबंध नाहीये. माणसाने तो ओढूनताणून लावला आहे. म्हणजे आकाशस्थ ग्रह,तारे मानवावर करत असलेले परिणाम सततच्या निरीक्षणाने तपासून पाहिले तर ग्रह, तारे बर्याच प्रमाणात मानवावर परिणाम करत असावेत,त्याच्या स्वभावाशी ग्रह,तार्यांचा संबंध असावा असे म्हणता येऊ शकते. पण मानवाला सतत सुख, पैसा, आरामदायी , आनंदी जीवन हवे असते. त्यामुळे हे मिळण्यात अडथळे फार येऊ लागले आणि बरेच प्रयत्न करुनही त्या हव्याशा गोष्टी मिळणे अवघड झाले की तो फलज्योतिषविद्या जाणणार्या अभ्यासकाची मदत घेऊन त्या गोष्टी मिळवू पाहतो. सगळेच नव्हे पण बरेच फलज्योतिषी जातकाला काही धार्मिक विधी,दैवी उपासना , अध्याय वाचन इ. सुचवतात आणि इच्छित पूर्ण होण्याची आशा दाखवतात.
वर सांगितल्याप्रमाणे ग्रह , तारे यांचे नियंत्रण पृथ्वीवरील कोणत्याच देवाकडे, देवीकडे नाही. ते माणसाने ओढूनताणून जोडले आहे. मग असे असताना या धार्मिक विधी, उपासनांचा निव्वळ जातकाचे मनोबल वाढणे यासाठीच फारच थोडा उपयोग होतो (ते सुद्धा जातक आस्तिक असेल तरच) पण मूळ समस्या तशीच राहते. विशिष्ट समस्येसाठी विशिष्ट धार्मिक विधी किंवा विशिष्ट उपासना केली तर ती विशिष्ट समस्या सुटलेली आहे असे किमान १०० जातकही मिळायचे नाहीत. केवळ आशावाद!
मग प्रश्न असा पडतो की फलज्योतिषाला जोडून ठेवलेल्या या धार्मिक विधी, उपासनांचा उपयोग काय? कारण जातकाची वैयक्तिक समस्या सुटणे किंवा ती बरीच सौम्य होणे , कुवतीपेक्षा जास्तीच्या अपेक्षा पूर्ण होणे यातले काहीच धार्मिक विधी, उपासनांमुळे बदलू शकत नसेल तर त्या फलज्योतिषविद्येशी जोडणे साफ चुकीचे आहे. फलज्योतिषविद्येत अचूकता आणण्याच्या प्रयत्नांमधली धोंड आहे असे वाटते.
याला जोडून उपप्रश्न: माझा रत्ने आणि वास्तुशास्त्र यांचा अजिबात अभ्यास नाही. पण वरील प्रकार हातात धारण करायच्या रत्नांबाबतसुद्धा लागू होतो का? विशिष्ट रत्न धारण केलं तर विशिष्ट असं चांगलं फलित मिळेल यात काही अर्थ असावा का? वास्तुरचनेत काही बदल केले तर हवे तसे चांगले परिणाम दरवेळी मिळतात का? तुमचे अनुभव काय आहेत?
🗣 चर्चा
(53)
उ
उपयोजक
Fri, 11/12/2021 - 09:30
नवीन
एखाददुसर्या अनुभवावरुन सार्वत्रिक मत बनवणे योग्य नव्हे. ज्यांची शांती केली गेली अशा किमान १ हजार माणसांना विचारुन पहा. त्यात किमान २०० सुद्धा असे मिळणार नाहीत ज्यांची समस्या शांती केल्यावर दूर झाली.
- Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं
Fri, 11/12/2021 - 07:46
नवीन
मी लग्नाच्या फोटोग्राफीसाठी एका ठिकाणी गेलो होतो. विधीमध्ये थोडा निवांत वेळ होता तेव्हा गुरुजींशी गप्पा चालू होत्या(बऱ्याचदा गुरुजी आणि फोटोग्राफर्सचे वाकडे असते, हे गुरुजी त्याला अपवाद होते). त्यांनी सहज माझा तळहात पाहून माझ्याबद्दल माहिती सांगितली होती जी तंतोतंत खरी होती.
- Log in or register to post comments
ब
बोलघेवडा
Fri, 11/12/2021 - 08:28
नवीन
माझ्या अल्प अभ्यासावरून ग्रहांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो अस म्हणण्यापेक्षा ग्रह हे आपल्या आयुष्यातील बदलांचे निदर्शक आहेत.
तुमची कुंडली म्हणजे तुमच्या जन्मवेळेला आकाशातील ग्रह कोठे होते याचा स्थिर फोटो आहे.
संतती साठी 5 वे स्थान बघितले जाते.
उदाहरण म्हणून
पाचव्या भावातील ग्रह, राशी, नक्षत्र हे तुम्हाला मुलं कधी होईल याचे निदर्शक आहेत. 5 व्या पासून 12 वे म्हणजे 4 थे स्थान. जर 4 थे स्थान बलवान असेल तर ते 5 व्या स्थानाला अडथळा निर्माण करते. असेच इतर सर्व स्थानांसाठी समजा.
म्हणजे एकतर 4 थे स्थान कमजोर करावे लागेल किंवा 5 वे स्थान 4 पेक्षा बलवान करावे लागेल. ते कमजोर करण्यासाठी मग त्या स्थानाविषयक दानकर्मे सुचविली जातात. दान म्हणजे शक्ती कमी करणे. तर पूजापाठ, जाप यांनी एखाद्या स्थानाची शक्ती वाढवणे. कुंडली बघून ह्या प्रकारे उपाय सुचवले जातात. थियरी अशी आहे.
आता लुबाडणारे लोक सर्व धंद्यात क्षेत्रात आहेत. त्यामुळे संपूर्ण शास्त्रच बोगस ठरवणे बरोबर नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2