Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

चांदणी अन प्रियकर

प — पाषाणभेद, गुरुवार, 10/14/2021 - 19:55
कुणी एक चांदणी नवथर खाली आली धरणीवर काय कसले तिला ना ठावे इकडे तिकडे कोठे जावे भूकेलेली रडवेली रडून कोमेजलेली तशात भेटला तिजला प्रियकर अशाच चांदणीसाठी होता आतूर कोण कुठली तू आलीस कशी आपूलकीने त्याने केली चौकशी लांब असते दूरदेशी येथे परदेशी कोण मज पाठवील पुन्हा मजदेशी प्रियकर उदार उमदा चांदणीस आवडला परी स्वगृहाच्या ओढीने जीव खंतावला मी तर तुझा आताचा प्रियकर घर तुझे कधीचे सुखकर नको तू गृह विरह सहू तू अन मी वेगळे होवू प्रियकर त्वरीत निर्णय घेई प्रियेस त्याच्या पोहचवून देई हा राहीला पुन्हा एकला रोज रात्री पाही तिजला चांदणीही विरहात तळपे अंधारअंगणी रात्रीस झळके दोन जिवांची अशी ताटातुट झाली प्रियकरास चांदणी कधी न मिळाली पाभे १४/१०/२०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1240 views

💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन गुरुवार, 10/14/2021 - 21:41 नवीन
कुणी एक चांदणी पोवथर अस वाचल होतं. भंकस जाऊनदे, करुण कवीता आवल्डली :=) पोवथर = ‘कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती’ इती. ह. भ. प. रावले महाराज.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा