दिवाळी अंक २०२१ : शांतित्व...
शांतीत्व...
------------
मी जगत आहे वर्तमानाचा भरभरून आनंद घेत
भविष्यातील अत्याधुनिक स्वप्नांना
निद्रिस्त पापण्यांआड
रंगवत...
निदान माझं एवढं तरी खरं आहे
की, मी जपतो आहे
मीठ-मिरची-भाकरीचा
सुवर्ण
भूतकाळ...
म्हणूनच आज मी उभा आहे स्वाभिमानाने
सुखादुखाला पचवून छातीत
माती माखले पाय माझे
घट्ट रोवून
मातीत...
- सुनील दौलत खोडके
मु. पो. डोणगाव ता. मेहकर जि. बुलढाणा पिनकोड- 443303,
मोबाईल. 7057591117
💬 प्रतिसाद
(6)
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 11/02/2021 - 18:31
नवीन
शिर्षकाचा आणि कवितेचा संदर्भ नाही लागला, कदाचित परत वाचली की लक्षात येईल,पण कविता आवडली
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Tue, 11/02/2021 - 22:38
नवीन
समृद्धी आली तरी मी जूने दिवस विसरलो नाही. त्यामुळे मला शांतता लाभते आहे, असे म्हणायचे असेल.
आशादायक काव्य.
- Log in or register to post comments
क
किरण कुमार
Wed, 11/03/2021 - 07:49
नवीन
मीठ मिरचीचा सुवर्ण भूत काळ ... आवडली
- Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा
Mon, 11/15/2021 - 21:19
नवीन
भूतकाळ आवडला. धन्यवाद.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Tue, 11/16/2021 - 09:20
नवीन
आशा जागवणारी कविता !
आवडली.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 11/16/2021 - 14:33
नवीन
कविता आवडली..
तुम्ही अजून लिहिलेलं वाचायला आवडेल.
- Log in or register to post comments