आरोग्य पाठ भाग दोन
हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा
सुर्या सम जीणे
उदयास्त पाळणे
गजर न वाजणे
राम प्रहरी
दोन भाकरी
चारी ठाव करी
पंढरीची वारी ( morning walk)
नेम धर्म
चंद्रोदया माजी
अस्तासं पावणे
निद्रा समाधिस्त
नित्य होय
नको ते दिक्षीतं
नको जुवेकरी
का उगा छळशी
जठराग्नी
जिव्हेंचे चोचले
नाही मोह माया
न शीणवी काया
आणी मन
हेची नित्य कर्म
आरोग्याचे मर्म
मनुष्य जन्म दुर्लभ
हेची जाण
हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा
💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद
Tue, 10/12/2021 - 14:07
नवीन
हरी हरी
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Wed, 10/13/2021 - 07:00
नवीन
आवडली :=)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 10/13/2021 - 14:57
नवीन
समजला नाही.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
गुरुवार, 10/21/2021 - 07:10
नवीन
स्वस्थ स्वास्थ याचा घ्या धडा
नका वाढवू पोटाचा घडा
सर्व काही खाण्यासाठी
सकाळी उठोनी व्यायाम करा....
सर्वांचे धन्यवाद
- Log in or register to post comments