Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मर्कट वंश

म — मका म्हणे, Wed, 09/22/2021 - 17:20
कपिकुळाला सांगणारा तोच माझा वंश आहे, माझ्यातही थोडासा त्या मर्कटाचा अंश आहे संथ पाण्या पाहूनि, मोहुनि जाई कुणी, खडे त्यात फेकण्याची का मला ही खोड आहे? विचित्र या शब्दातही , चिवित्र काही शोधतो मी, शोधल्यावरी सापडे काही , हे मात्र गूढ आहे माणसे ठेवती जपूनी धीर वा गंभीर चेहरे मुखवटयांच्या खालती त्या एक मंद स्मित आहे तेच थोड़े ओठी येण्या, करो वाटे मग खट्याळ चाळा खोल गेल्या वात्रटाला साद घालता मजा आहे भली भली माणसे असती आतून व्रात्य मुलांपरी या मुलांच्या हातावरी टाळी देण्याची खाज आहे मी नव्हे हो त्यातला अन मी नाही त्यातली हेच जन त्वरे उठती कड़ी लावण्या आतली विसंगति त्यांच्या मनीची त्यांच्या पुढे ठेवताना अंदाज खरा करण्याचा फ़क्त हां विचार आहे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2286 views

💬 प्रतिसाद
श
श्रीरंग_जोशी Wed, 09/22/2021 - 17:29 नवीन
पहिल्या दोन ओळी गदिमांच्या खालील ओळींचे विडंबन आहे. उरलेली रचना स्वतंत्र आहे असे दिसते. ”ज्ञानियाचा वा तुक्याचा,तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा,ईश्वराचा अंश आहे” स्वतंत्र रचना म्हणूनही ही कविता आवडली.
  • Log in or register to post comments
म
मका म्हणे Wed, 09/22/2021 - 17:36 नवीन
अगदी बरोबर आहे, तुमचं . गदिमा यांचे संस्कार आपल्या सर्वांवर कळत नकळत झालेले आहेतच.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 09/22/2021 - 18:27 नवीन
उत्तम रचना!
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 09/22/2021 - 20:22 नवीन
विचार चांगलेत. कविता आणिक जरा मीटरमधे बसवली तर जास्त आनंद देईल. पुलेशु.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/23/2021 - 04:35 नवीन
मी नव्हे हो त्यातला अन मी नाही त्यातली हेच जन त्वरे उठती कड़ी लावण्या आतली हे विषेश आवडले, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा