Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मुखवटे

प — पाषाणभेद, Tue, 09/21/2021 - 01:23
खरे चेहरे झाकण्या चढवूनी खोटे मुखवटे खरेच आहे भासवतात मग ते चेहरे खोटे ||१|| मनात कटूता असूनी वाहवा करती हसूनी खोटे वार करती पाठीवरती ||२|| तोंडदेखला आदर देवूनी स्वागत होई पाठ वळता निंदा करण्याची करती घाई ||३|| स्वार्थ साधण्या स्तूती करती तोंडभरूनी कार्यभाग संपला, टिकेची झोड वदनी ||४|| खोटे चेहरे वागवीत खोटे जीवन का जगावे? मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे ||५|| - पाषाणभेद २१/०९/२०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2037 views

💬 प्रतिसाद
ग
गॉडजिला Tue, 09/21/2021 - 05:58 नवीन
मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे संपूर्ण जग जिथं मुखवटा पांघरून जगते तिथे खरा चेहरा ठेऊन वागायला सुरुवात केली तर तुम्हाला वेड लागलं आहे असे ठरवायला देखील जग हटणार नाही... त्यापेक्षा आपल्यातील केमिकल लोच्या लोकांपासुन लपवून मी फलाना फलाना मानसशास्त्रातील पुस्तकात ढीमका अमुक तमुक गोष्ट सांगतो अशा पुड्या सोडत जगा अनेक लोक नुसती वाहवाच करतील असे न्हवे तर तुमच्याकडे राहूनही जातील.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 09/21/2021 - 06:02 नवीन
__/\__.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा