'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का?
प्रत्येकाला जीवनात लहान मोठी काहीतरी समस्या असते. सध्याची संपली की सुखी जीवन सुरु असे काही नसते. 'जब तक जीवन है तब तक संघर्ष है।' हे अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. त्यांच्यासारख्या अब्जाधीशाला संघर्ष चुकला नाही तर आपण कोण?
तर मित्रहो, 'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? 'आपल्या' असे म्हणण्याचे कारण म्हणजे एखाद्याचे सुदैव हे कदाचित दुसर्याचे दुर्दैव किंवा अटळ असा तोटा/नुकसान असू शकतं. एखाद्याला मिळालेली चांगली संधी ही दुसर्याचं मन खट्टू करु शकते.
यामुळेच ती चुटपुट मनाला लागू न देता आपल्या जीवनात सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? संधीसाधू(चांगल्या अर्थाने) कसे व्हावे? उपाय स्ट्रॅटेजिक, तार्किक किंवा अगदी विशिष्ट देवोपासना, स्त्रोत्रे, मंत्रे , वास्तुशास्त्र , फेंगशुई , रत्ने वापरणे , संत अध्यायवाचन वगैरे असले तरी चालतील. (उपाय कोणाला शारीरिक ,मानसिक इजा करणारे नसावेत) ज्यांचा विश्वास आहे ते लोक करतील.
सुचवा उपाय तसेच सामायिक करा आपले या विषय अनुषंगाने असणारे अनुभव. _/\_
🗣 चर्चा
(69)
स
साहना
Tue, 09/14/2021 - 03:41
नवीन
शेवटी दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. आजच्या काळांत गरीब मनुष्याला ज्या सोयी सुविधा उपलब्द आहेत त्या १०० वर्षे आधी श्रीमंतांना सुद्धा उपलब्ध नव्हत्या. ३०० वर्षे आधी तर मोठ्या बादशहाना सुद्धा उपलब्ध नव्हत्या.
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Tue, 09/14/2021 - 06:50
नवीन
व्यक्तिच्या जिवंत काळातिल घटना व अनुभव यांपुरता मर्यादीत असल्याने आजच्या काळातील गरीबाच्या हाताशी असलेल्या अनेक गोष्टी ३०० वर्ष आधि बादशहास उपलब्ध्द नसुनही तो बादशाहाच राहतो व गरीब गरीबच.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Tue, 09/14/2021 - 15:25
नवीन
तुमच्याकडे जे जे आहे , ते दररोज सकाळी उठल्यावर शाबूत आहे कि नाही ते बघा ... हात पाय जागेवर आहेत , नीट हलतायत .. मग त्या वर्च्याचे आभार माना आणि सुदैवी समजून कामाला लागा ... है काय आणि नाय काय .. जरुरत से ज्यादा और जरुरत से कम .. दोनो जहर होता है ,, ठाकूर ....
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 09/15/2021 - 16:01
नवीन
- Log in or register to post comments
क
कॉमी
Wed, 09/15/2021 - 16:21
नवीन
What about the two things I do regularly ?
:)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 09/16/2021 - 07:38
नवीन
बेक्कार चित्र आहे , त्या माणसाला मूळव्याध झाला असे वाटत आहे =))))
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Fri, 09/17/2021 - 04:09
नवीन
@ मार्कस ऑरेलियसः मूळव्याधीचे अगदी नेमके चित्रण बघून हहपुवाझा. अगदी नेमके पकडलेत. जियो.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Wed, 09/15/2021 - 17:24
नवीन
काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात हे नक्की .. अशा random म्हणजे अनियंत्रित गोष्टी कधी आपल्याला अनुकूल असतात तर कधी प्रतिकूल. या अनियंत्रित व random घटकांना कुणी नशिबाचे , दैवाचे फासे म्हणू शकेल, कुणी लक फॅक्टर म्हणेल. पण अर्थ बहूधा तोच.
मला वाटते हे घटक अनियंत्रित वा random असतात म्हणूनच त्यांना नशिबाच्या गोष्टी वा दैव म्हंटले जाते. मग या घटकांना नियंत्रित थोडेच करता येणार आहे ? पण या अनियंत्रित घटकांची प्रतिकुलता कमी करणे वा अनुकूलता वाढवणे याकरिता विचारपुर्वक प्रयत्न केले जावू शकतात.
आपण सोपे उदाहरण घेवू. अलिकडे मोबाईल अॅपमुळे लोकप्रिय झालेला ल्युडो हा खेळ अनेकजण खेळले असतील (मागच्या लॉकडाउनमध्ये या अॅपची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती.. असो). तर त्यात फासा फिरवल्यावर १ ते ६ पैकी कोणता अंक यावा हे आपल्या हातात नसते. आपल्याला हवा तो अंक येईलच याची खात्री नसते. पण मग आपल्या हातात काय असते ? तर आपल्याकडे ४ सोंगट्या असतात, यापैकी कोणती सोंगटी पुढे न्यायची कोणती थांबवायची, स्वतःची सोंगटी कशी सुरक्षित करता येईल ते बघायचे, इतर खेळाडूंच्या सोंगट्यांची स्थिती लक्षात घेवून जोखीम कमी करायची ई ई.. मला वाटते आपल्या जीवनाचे ही काहीसे तसेच आहे. ज्या गोष्टी नियंत्रित करणे आपल्याला शक्य नाही त्यावर नियंत्रण करण्याकरिता वृथा धडपडण्याऐवजी ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात आहेत त्यांचा यथोचित उपयोग करणे अधिक महत्वाचे.
पाऊस पडेल की नाही हे आपल्या नियंत्रणात नाही - महत्वाच्या कामाकरिता बाहेर पडताना पाऊस पडू नये म्हणून काही प्रार्थना, उपासना, जप करुन उपयोग होणार नाही. पण पावसाचा अंदाज वाचून त्याची शक्यता जोखणे, पाउस पडलाच तर भिजण्यापासून स्वतःचा बचाव करण्याकरिता छत्री वा रेनकोट सोबत बाळगणे, पावसामुळे होणारे ट्रॅफिक जॅम लक्षात घेवून लवकर घराबाहेर पडणे, योग्य ते वाहन वापरणे ई गोष्टी आपण करु शकतो.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
गुरुवार, 09/16/2021 - 14:47
नवीन
छान प्रतिसाद
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Fri, 09/17/2021 - 14:23
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Mon, 09/20/2021 - 13:53
नवीन
उपयोजक जी, शाम भागवत जी
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Fri, 09/17/2021 - 04:05
नवीन
मूळ प्रश्न असा आहे:
आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का?
उत्तरः नाही.
कारणः मुळात 'दैव' (सुदैव असो की दुर्दैव असो) या शब्दातून '...जे आपल्या प्रयत्नांच्या पलिकडले, न बदलण्यासारखे, ज्यावर आपला कहीच ताबा नसतो - असे जे काही असते ते...' असा अर्थ ध्वनित होत असल्याने त्यात करण्यासारखे काही असू शकत नाही.
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Fri, 09/17/2021 - 04:22
नवीन
आपण फक्त त्याचे परीणाम कमी जास्त करणे अथवा कसे सामोरे जावे हे ठरवु शकतो
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Mon, 09/20/2021 - 18:33
नवीन
पितृपंधरवडा सुरू होताच आहे!
- Log in or register to post comments
H
hrkorde
Wed, 09/29/2021 - 08:40
नवीन
सर्वाना ३ फळे भोगावी लागतात
क्रियमाणाचे फळ
सन्चिताचे फळ
प्रारब्धाचे फळ
फक्त पहिले फळ आपण थोडेफार बदलु शकतो, आणि क्रियमाणच चांगले करत राहिले तर भविश्यात त्याचे सण्चित फळ चांगले मिळते.
बाकी सर्व बियोन्ड आवर कंट्रोल आहे
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 09/29/2021 - 08:47
नवीन
क्रियमाणाचे फळ सन्चिताचे फळास कारणीभुत होते बरोबर ?
अन सन्चिताचे फळ प्रारब्धाचे फळास ?
मग क्रियमाणाचे फळ म्हणने पुरेसे नाही काय ?
- Log in or register to post comments
H
hrkorde
Wed, 09/29/2021 - 08:55
नवीन
प्रारब्ध हे क्रियमाण , संचित कशावरच अवलंबुन नसते,
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 09/29/2021 - 08:58
नवीन
?..
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sun, 10/17/2021 - 15:39
नवीन
असते का? काही वैज्ञानिक पुरावे? शिवाय या हिंदू अध्यात्मातल्या संज्ञा आहेत. तुम्ही यावर विश्वास ठेवता हे आश्चर्य आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2