Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जगण्याचे कित्येक मजला अर्थही कळाले

व — विजुभाऊ, Wed, 09/01/2021 - 18:18
धन्य भाग देवा ऐसे प्रेम ही मिळाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले वार्‍यावर उडणारा, मी केर, धूळ, माती येता तू सांगाती दगडांचे झाले मोती. परीस तो जाणू कैसा ,सांग काय केले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले. गहिवरले मन माझे ,ओळखले नाही तुजला र्‍हदयात काटा रुतला , माफी दे प्रेमा मजला तालाच्या सोबतीला, बासरीचे सूर आले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले. आकाशी मेघ दाटे , पाणी हे डोळ्यावाटे डोळे गहीरे हे सांगती , प्रेमाचे हे गूज मोठे पावसाच्या सरींनी माळ हिरवे झाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले. एक दिवा मंदीरात ,अंधार संपवून गेला निरागस स्पर्ष तुझा, विश्वास जागवून गेला. रंग एक मागता , इंद्रधनू मला मिळाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले. ......चकोर शाह. ०१०९२०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2161 views

💬 प्रतिसाद
र
राघव गुरुवार, 09/02/2021 - 05:47 नवीन
चांगलं गीत आहे. थोडं मीटर अजून ठीक केलं तर आणिक बहरेल. शेवटचे कडवे विशेष आवडले.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 09/02/2021 - 06:09 नवीन
रंग एक मागता , इंद्रधनू मला मिळाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/02/2021 - 09:11 नवीन
क्या बात है विजूभौ, मस्त रचना.
आकाशी मेघ दाटे , पाणी हे डोळ्यावाटे डोळे गहीरे हे सांगती , प्रेमाचे हे गूज मोठे पावसाच्या सरींनी माळ हिरवे झाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
मस्तय...! कोणतंही प्रेम असे धडेच देता बघा. एक लक्षात ठेवायचं. कोणी कोणाचं नसतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा