Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 08/19/2021 - 16:44
🗣 160 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. तालिबानने बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर सलीमा मझारीला ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानात तीन जिल्ह्यांच्या स्त्री गव्हर्नर आहेत/होत्या. त्यापैकी सलीमा एक आहे. तिने तालिबानविरोधात हातात बंदूकही घेतली होती. तीच तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिची ते हरामखोर काय अवस्था करतील ही काळजी वाटतेच. त्याबरोबरच एक स्ट्रॅटेजी म्हणून तालिबानी तिला सुखरूप सोडतील का? कारण मग जगभरातले सगळे जमात-ए-पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो की हे तालिबान २.० आहे' असे दावे करायला लागतील. तेव्हा त्या कारणाने तालिबानी तिला सोडतील ही पण शक्यता अगदी नाकारण्याजोगी नसावी. बघू पुढे काय होते ते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 43540 views

🗣 चर्चा (160)
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 08/19/2021 - 16:54 नवीन
आताचा तालिबान २००१ सारखा नाही तेव्हा भारताने त्याला खुल्या दिलाने सामोरे जावे असे यशवंत सिन्हा म्हणाले आहेत. आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मोदी या एका माणसाचा पराकोटीचा द्वेष एखाद्या मुळातल्या चांगल्या माणसाला किती बिघडवू शकतो याचे यशवंत सिन्हा हे उत्तम उदाहरण आहे. राफेल प्रकरणावर स्वतः राहुल गांधी नुसते हवेतले गोळीबार करत होते पण बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना बनून कोर्टात स्वतःचे नाक कापून घ्यायला कोण गेले होते? तर ते होते यशवंत सिन्हा आणि अरूण शोरी. देशाच्या सर्वोत्तम अर्थमंत्र्यांपैकी एक असलेल्या यशवंत सिन्हांची अवस्था पाहून खरोखरच वाईट वाटते. https://maharashtratimes.com/india-news/india-should-be-open-minded-about-dealing-with-the-taliban-yashwant-sinha/articleshow/85458473.cms
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Mon, 08/23/2021 - 18:22 नवीन
पराकोटीचा द्वेष एखाद्या मुळातल्या चांगल्या माणसाला किती बिघडवू शकतो
.. ह्या महाशयान्ना भाजप अध्यक्ष व्ह्यायच होता.. २०१० साली.. वैयक्तिक स्वार्थ ...बाकी काही नाही..
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/19/2021 - 17:25 नवीन
Cooking Gas Price Hiked By Rs 25 Per Cylinder. Here Is How Much You Pay - NDTV https://www.ndtv.com/business/lpg-cylinder-price-increased-by-rs-25-non-subsidised-cylinder-in-delhi-to-cost-rs-859-5-news-agency-ani-2513070?amp=1&akamai-rum=off घरगूती गॅस सिलेंडर ची किंमत २५ रूपयाने वाढली. बहुतेक तालीबानींची कंबर मोडण्याचा हा मास्ट्ररस्ट्रोक असावा ;) पण हे विरोधकाना कळनार नाही. ;) रच्याकने पेट्रोल च्या किमती नी ह्या वर्षी १०० रूपये ओलांडले आणी ह्या वर्षी सर्वात जास्त काळे धन स्विस बॅंकेत जमा झाले काय योगायोग?? गॅस चा किंमत ही वाढलीय पुढल्या वर्षी ह्या वर्षीचा रेकाॅर्ड मोडू. बोला हर हर.....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/19/2021 - 18:34 नवीन
या मुद्द्यावर सहमत. एक दीड महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाची किंमत ५६०० रूपये प्रति बॅरल असताना (म्हणजे ३५ रूपये प्रति लिटर) पुण्यात पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०७ रूपयांहून अधिक होती. आज कच्च्या तेलाची किंमत ४७१४ रूपये (२९. ४६ रूपये प्रति लिटर आहे (म्हणजे १६% ने कमी). परंतु पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०७ रूपयांहून अधिक आहे. मूळ किंमतीच्या जवळपास चौपट किंमतीत पेट्रोल विकले जात आहे. यात केंद्र सरकारच्या भरमसाट करांच्या बरोबरीने राज्य सरकारच्या भरमसाट करांचाही वाटा आहे. करांचे उत्पन्न सरकारने मिळविणे समजू शकते. परंतु खरेदी किंमतीच्या जवळपास चौपट किंमतीला इंधन विकणे ही शुद्ध लबाडी आहे. हा वाढीव महसूल इतर प्रकल्पांंसाठी वापरला जातो, संपुआ सरकारने विकलेल्या ऑईल बॉन्ड्समुळे किंमत वाढवावी लागते अशी कारणे आता जनता ऐकणार नाही. स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान सरकारने केव्हाच बंद केले. आता एका सिलिंडरची किंमत ८६० रूपयांहून अधिक आहे व सरकार त्यात एक पैसा सुद्धा कमी करण्यास तयार नाही. उलट दर महिन्याला २०-२५ रूपये वाढवित आहेत. केंद्र सरकार तुटेपर्यंत ताणत आहे. दोन दिवसांपूर्वी इंडिया टुडेच्या राष्ट्रीय सर्वेक्षणाचे अंदाज आले आहेत. आता निवडणुक झाली तर २०१९ च्या तुलनेत लोआ जवळपास ६० जागा गमावेल व भाजपचा आकडा २६९ असेल असा अंदाज आहे. इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमती हे जनतेच्या नाराजीचे एक प्रमुख कारण आहे. इंधनांच्या प्रचंड वाढलेल्या किंमतीकडे केंद्र सरकार संपूर्ण दुर्लक्ष करून सातत्याने किंमत वाढवित आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये ५ राज्यांची विधानसभा निवडणुक आहे. त्यात पंजाबमध्ये भाजपचे फार तर १-२ आमदार निवडून येतील. उत्तराखंड व हिमाचल प्रदेश बदलाच्या परंपरेनुसार भाजपला गमवावा लागेल. इंधनाच्या किंमतीकडे असेच दुर्लक्ष सुरू ठेवले तर भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा फटका बसू शकेल व तसा बसावा अशी माझी इच्छा आहे व याचा परीणाम थेट राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होऊ शकतो. जनतेला गृहीत धरण्याचा फटका बसलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/19/2021 - 18:44 नवीन
+१ चुकीच्या गोष्टीला चुकीचे म्हणतात ह्यामुळ् तुमचा आदर वाटतो बाकी काही समर्थकानी हद्द ओलांडलीय.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/19/2021 - 18:50 नवीन
इंधनाच्या किंमतीकडे असेच दुर्लक्ष सुरू ठेवले तर भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा फटका बसू शकेल व तसा बसावा अशी माझी इच्छा आहे >>>> +१ युपी त भाजप म्हणजे जंगलराज २ आहे. ह्यावेळेला भाजपला युपी ने झटका दाखवायला हवा.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 08/19/2021 - 19:06 नवीन
जेंव्हा पेट्रोल भरताना प्रति लिटर 100 पेक्षा जास्त रुपये द्यावे लागतात तेंव्हा खरोखरच फसवले गेल्याची भावना मनात येते. अर्थमंत्र्यांनी ह्याला मनमोहन सिंग सरकारच्या कर्ज रोख्याना जबाबदार धरले आहे. आदींच्या सरकार ला दोष देणे हे एकवेळ पहिल्या टर्म मध्ये ठीक होते परंतु प्रत्येक वेळेला हे कारण पटणारे नाही. लोकसत्ताच्या आजच्या अग्रलेखाच्या आकडेवारीनुसार सरकार ने पेट्रोल वरील अबकारी कर वाढवून कर्ज रोक्याची मुद्दल आणि व्याजा पेक्षा जास्त रक्कम कमीवली आहे. फडणवीस सरकारने पण दुष्काळ पडल्यावर पेट्रोल वरती जास्तीचा कर लावला होता आणि दुष्काळ संपला तरीही कित्येक महिने तो तसाच चालू ठेवला होता.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/19/2021 - 20:19 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 08/19/2021 - 20:13 नवीन
+१ पेट्रोल भाववाढ कमी करणे म्हणजे टूथपेस्ट पुन्हा ट्यूब मध्ये भरण्याइतकी अशक्य गोष्ट आहे. भक्तमंडळी फॉर्वर्डस निर्माण करण्यात बीसी आहेत तर म्हणे अफगाणिस्तान ला पहा. इथले पेट्रोल स्वस्त आहे पण त्यांची सेना पळून गेली. भारतांत पेट्रोल महाग आहे कारण सुप्रीम लीडर म्हणे ते पैसे वापरून आम्हाला तालिबान पासून वाचवत आहे. > भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा फटका बसू शकेल व तसा बसावा अशी माझी इच्छा आहे इथे असहमत आहे. सर्वत्र भाजपाला फटका बसो पण प्रदेश मध्ये योगी महाराज पुन्हा आले पाहिजेत. त्यांचा धसका सुप्रीम लीडर ला आहे. सुप्रीम लीडर नि हल्ली काही अत्यंत वादग्रस्त आणि जातीयवादी निर्णय घेतले. कदाचित प्रदेश मध्ये योगी ना अंडरमयीन करणे हाच त्या जातीयवादी निर्णयांचा प्रमुख उद्धेश्य होता असे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 08/19/2021 - 20:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 08/20/2021 - 13:43 नवीन
मूळ किंमतीच्या जवळपास चौपट किंमतीत पेट्रोल विकले जात आहे. ??? हे म्हणजे दूध ५० रु लिटर पण खवा त्याहून खूप महाग का असे म्हण्यासारखे आहे कच्चे तेल पासून पेट्रोल करण्यासाठी खर्च येत नाही ? + त्याची ने आन, धंद्यातील नफा + कर
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 08/20/2021 - 14:20 नवीन
कच्च्या तेलाच्या मूळ किंमतीच्या १०-१२% खर्च Refinery Processing + Refinery Margins + OMC Margin + Freight Cost and Logistics यासाठी येतो. कच्च्या तेलाची किंमत २९.१४ रूपये असेल तर जास्तीत जास्त ३ ते ३.५० रूपये Refinery Processing + Refinery Margins + OMC Margin + Freight Cost and Logistics यासाठी येतो. हे खर्च धरून शुद्धीकरण केलेल्या तेलाची किंमत जास्तीत जास्त ३३ रूपये होईल. यात अंदाजे साडेतीन रूपये पंपचालक शुल्क वाढविले तर पेट्रोलची अंतिम विक्री किंमत जास्तीत जास्त ३७ रूपये होईल. परंतु पेट्रोलचा दर १०७ रूपयांहून अधिक आहे. म्हणजे १०७ रूपयांमधील किमान ७० रूपये केंद्र व राज्य सरकारला करासाठी द्यावे लागतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 08/21/2021 - 03:45 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद. १ लिटर कच्य्या तेलातून किती % पेट्रोल निघते हे हि बघावे लागेल .. मग अशी नफा धरून किंमत जर ३३ आहे तर ग्राहकाला किंमत १०७ का असे म्हणणे आह ना आपले पण आहो जगात सर्वत्र हे आहे सिंगापोर १००% तेल आयुक्त करते तेथिल दर बघा ऑस्ट्रेल्या पण बहुतेक तेल आयात करते थेतील दर बघा हे १०० जर सरकार ने नाही कमवले तर मग महामार्ग, आरोग्य , शिक्षण यावरील खर्च कसे काढायचे? रेल्वे तोट्यात , एअर इंडिया तोट्यात हे सर्व सुधारायला पाहिजे हे खरे असले तरी कुठेतरी फटका हा बसणारच हेच कोणी बघायला तयार नाही सरकारने सगळे सगळे स्वस्त दिले पाहिजे, आम्ही मात्र नागरिक म्हणून कर टाळनार पळवाटा काढणार, साधे गृह विकिरिचे घ्या काळे पांढर हे जनताच करते,, सर्व पांढरे केले आणि योग्य तो कर भरला तर करेल कि सरकार पेट्रोल स्वस्त
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 08/21/2021 - 04:04 नवीन
अपेक्षेप्रमाणे पेट्रोल दरवाढीच्या समर्थनाचीच नेहमीचीच फुसकी कारणे पुढे आली. महामार्ग, आरोग्य, शिक्षण व इतर सर्व सेवांसाठी वसेक, टोल, शिक्षण अधिभार अशा अनेक मार्गाने प्रचंड करवसुली केली जाते. एवढी प्रचंड वसुली करूनही पेट्रोल विक्रीतून अक्षरशः राक्षसी नफा वसुली सुरू आहे आणि त्याचे समर्थन काय तर म्हणे महामार्ग, आरोग्य, शिक्षण वगैरे सेवांसाठी.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/21/2021 - 08:25 नवीन
+१, मध्येच फडणवासने दुष्काळी कर लावला होता पेट्रोल वर, स्वच्छता कर म्हणून मोदी सरकारने लूट चालवलीय, नगरपालीका, , नळपट्टी, घरपट्टी अनेक कर जनता भरते. टोल नावाची राक्शसी लूट तर सर्वानाच माहीतीय. तरी सुध्दा पेट्रोल च्या नावाआड राक्शसी लूट सुरूय.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/21/2021 - 04:14 नवीन
देशातील सर्व विकास काम,देशातील सर्व सुविधा ह्या फक्त पेट्रोल वरील करा मधूनच केल्या जातात.बाकी gst ,पासून,service tax, इन्कम टॅक्स,आयात कर,विविध शुल्क,टोल नाक्यावर जी वसुली होते ते पैसे हे कुठे उधळले जातात. सर्व नागरिक कोणत्या कोणत्या स्वरूपात सरकार ल टॅक्स भरतोच. फक्त ती इन्कम टॅक्स ची अगरबत्ती सारखी कशाला ओवाळत असता. बाकी देशात असेच पेट्रोल चे भाव वाढतात म्हणून आपल्या देशात पण वाढले म्हणून सहन करायचे . पण त्या देशात जी सुविधा ,सवलती सरकार देते ते भारत सरकार देत नाही ना. सरकार जे कर स्वरूपात पैसे वसूल करते ते पैसे कोण हडप करते हे काही लोकांना माहीत नाही काय. कागदावर,रस्ते,रेल्वे लाईन ,पुल सर्व असते जागेवर काहीच नसते.दोन रुपयाच्या वस्तू साठी हजार रुपये सरकार देते.काय काय उद्योग करून सरकारी खजिना खाली केला जातो हे जनतेला माहीत आहे. आता पुरावे मागू नका. सर्व जगजाहीर आहे बच्चा बच्चा जाणता हैं.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Mon, 08/23/2021 - 19:00 नवीन
वेगवेगळ्या देशातील पेट्रोलचे दर सिन्गापूर दर- आज २३ ऑगस्ट - २.४१३ SGD = २.४१३ * ५४.६३ = १३१.८२ भारतीय रुपये चीन दर - आज २३ ऑगस्ट - १०.२७ RMB = १०.२७ * ११.४४ = ११७.८८ भारतीय रुपये ऑस्ट्रेलिया - आज २३ ऑगस्ट - १.५३४ AUD = १.५३४ * ५३.४६ = ८२ भारतीय रुपये ब्रिटन - आज २३ ऑगस्ट - १.३५३ GBP = १.३५३ * १०१.७३ = १३७.६४ भारतीय रुपये फ्रान्स - आज २३ ऑगस्ट - १.६० EUR = १.६० * ८७.०४ = १३९.२६ भारतीय रुपये अमेरिका - आज २३ ऑगस्ट - १.६० USD = ०.९३४ * ७४.१४ = ६९.२४ भारतीय रुपये कॅनडा - आज २३ ऑगस्ट - १.५९५ USD = १.५९५ * ५८.५५ = ९३.३८ भारतीय रुपये जपान - आज २३ ऑगस्ट - १७३.३७ JPY = १७३.३७ * ०.६८ = ११७.८९ भारतीय रुपये यातील अमेरिका सोडून बाकी सगळे .. आयात करणारे देश आहेत..
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Mon, 08/23/2021 - 19:01 नवीन
कॅनडा - आज २३ ऑगस्ट - १.५९५ CAD = १.५९५ * ५८.५५ = ९३.३८ भारतीय रुपये
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 08/19/2021 - 18:04 नवीन
भारताला आज ना उद्या तालिबान बरोबर लपूनछपून का होईना चर्चा ही करावीच लागेल, थोडंफार जमवून ही घ्यावे लागेल. पण तालिबान 2 चांगले आहे म्हणून नाही तर पुढे माघे गरज लागली तर चर्चा उपयोगी येईन म्हणून. ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाच्या सदस्यांनी आणि मुंणवर राणा या सारक्यांनी तर उघड उघड तालिबानींचे गोडवे गायला सुरवात केली आहे. म्हणजे आपल्या धर्मा साठी कोणाचेही समर्थन करायला काही लोक तयार असतात. मग थेट भारताच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घायला लागली तरी ह्यांना काहीही फरक पडत नाही. तर स्वरा भास्कर सारख्यानी तालिबानींच्या अडुन हिंदू विरुद्ध गरळ ओकायला चालु केली आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 08/20/2021 - 13:39 नवीन
म्हणजे आपल्या धर्मा साठी कोणाचेही समर्थन करायला काही लोक तयार असतात. मग थेट भारताच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घायला लागली तरी ह्यांना काहीही फरक पडत नाही. हेच अनि हेच सत्य आहे . दिन,उम्मा , खिलाफत या मागे हेच आहे पण काही लोकांना या सत्याला सामोरे जायचे नाहीये... विंग्रजीत यास्नी "विलिंग फूल्स " असे म्हणतात
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 08/19/2021 - 18:12 नवीन
ह्या वर्षी सर्वात जास्त काळे धन स्विस बॅंकेत जमा झाले>>> लोल ... भुजबळ सर, तुम्हाला कसे कळाले? असो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/20/2021 - 06:00 नवीन
स्विस बँकेत जमा होणारा पैसा हा काळाच असतो असंच एकदा गृहीत धरले कि झालं. जास्त विचार करायचाच नाही ( किंवा करण्याची कुवत नसली) म्हटल्यावर प्रश्न उद्भवत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/20/2021 - 07:54 नवीन
+१ २०१४ नंतर जमा झालेला पैसा हा पांढरा पैसा आहे. राष्ट्रहीतासाठी तो जमा झाला वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/20/2021 - 08:55 नवीन
मी मागेच दुव्यासकट लिहिला होतं कि अनेक कंपन्यांचा उद्योजकांचा औरस/ स्वच्छ पैसा सुद्धा स्विस बँकेत ठेवलेला आहे. जर आयातीसाठी बँक गॅरंटी बॉण्ड साठी चे पैसे युरोपातील एखाद्या बँकेत ठेवावे लागत असतील (यात स्विस बँक सुद्धा येते) तरी त्याला तुम्हाला काळा पैसाच म्हणायचं आहे. तुम्ही द्वेषाची झापडंच बान्धलेली आहेत त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. तेंव्हा हे वैचारिक बद्धकोष्ठ कुणीही बरं करू शकत नाही. चालू द्या तुमचं कुंथन
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/20/2021 - 08:02 नवीन
माणसाने घेतलेल्या निर्णयांचे मा येनकेन प्रकारे समर्थन करेन आणी समर्थन करायला मुद्दे नसतील तर ईतरांची कुवत वगैरे काढेन. चालूद्या. रच्याकने पुण्यातलं मंदीर हटवल्या गेलंय. ही चांगली संधीय मंदीर बांधण्याची बांधून टाका डाॅक ;)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/20/2021 - 08:56 नवीन
आपलं वैचारिक बद्धकोष्ठ कुणीही बरं करू शकत नाही. भद्रं ते भवतु
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/19/2021 - 18:14 नवीन
तालिबान हे अमेरिकेचा छुपा पाठिंबा असलेले पाकप्रशिक्षित सैनिक आहेत. भारताने सतत प्रयत्न केल्याने पाकिस्तानला FATF वा तत्सम तरतुदींमुळे जागतिक मदत मिळंत नाहीये. शिवाय ३७० व ३५ अ ही कलमे उडवून भारताने काश्मिरातील आतंक खातं करण्याच्या दिशेने ठाम पावलं टाकली आहेत. अशा वेळेस अमेरिका तिचं महत्व अबाधित ठेवण्यासाठी अफगाण मदतीच्या नावाखाली पाकी अतिरेक्यांना मदत पुरवू शकते. तालिबान जर पाकी सैनिक असतील तर भारताचा फायदाच फायदा आहे. पाकिस्तान्यांना धुवून काढायला भारतीय सैन्यास फारसा वेळ लागणार नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments
U
Ujjwal गुरुवार, 08/19/2021 - 20:46 नवीन
#अफगाणीस्थानचे_बनावट_नाट्य गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्या की एक वेगळीच थंड डोक्याने व पूर्णपणे धर्मांधपणे आचरण्यात आणणारी योजना समोर येतेय. #सिरीया या इस्लाम बहुल देश या देशात ISIS या आतंकी संघटनेने प्रचंड आतंक माजवला लाखो सिरीयन नागरीक युरोपात पळाले #निर्वासीत म्हणुन दाखल झाले. #ब्रह्मदेशातुन लाखो रोहिंगे भारतात #निर्वासीत म्हणून आलेत #बांगलादेशातुन रोजगाराच्या निमित्ताने लाखो बांगलादेशी भारतात घुसले आता #अफगाणीस्तानातुन असेच लोंढे बाहेर पडताहेत.हेही निर्वासित म्हणून येणार मग अनेक राष्ट्रे मानवतेचा कळवळा आणुन यांना आश्रय देणार त्या करता त्या त्या देशातील प्रांतातील त्यांचे धर्मबांधव त्यांना आश्रय द्या या करता मागणी करणार हिंसक आंदोलन करणार (मुंबईतली रझा अकादमीची दंगल आठवा ती रोहिंग्या समर्थनार्थ झालेली होती)सेव्ह गाझा आंदोलन आठवा काही वर्षांनी हे त्या राष्ट्रात हळुहळु आपले पाय पसरतात . आम्हाला तुमचे हे कायदे मान्य नाहीत.आमचा धार्मिक #कायदा असे सांगतो असले प्रकार सुरू करतात निदर्शने करतात.मग हिंसक आंदोलने करतात. आता गंमत पाहा आयसीस ,बोको हराम,जैश ,सिमी,तेहरिक ए तालिबान,लष्कर ए तोयबा, तालिबान टोळ्या,अल कायदा या सर्वांचे ध्येय एकच आहे जगभरात आपला धर्मप्रचार व प्रसार करणे इस्लाम चे राज्य जगावर आणणे मग आता तालिबान वेगळे काय करतंय ? ते कुराण व हदीस या पुस्तकात लिहिलेले शरीयत कायदे तिथे लागु करतय मग आता तिथुन अफगाणी नागरिक का पळताहेत? तिथे बहुपत्नीत्व,हलाला,तोंडी तलाक,बुरखा,दाढी, स्त्री पुरुष वर्तन सगळे त्यांच्याच ग्रंथामध्ये लिहिलेले नियम पाळा सांगताहेत ना ?मग यांची भिती का वाटतेय त्यांना? या अफगाणी लोकांना नक्की भिती कसली आहे? आपल्या धर्मबांधवाची? आपल्या धर्मग्रंथांच्या नियमांची? हे एक सुनियोजित षडयंत्र आहे? आधी आसरा मागायचा मग बोट दिले कि हात धरायचा‌ असा डाव तर त्यात नाही ना? जेव्हा कौम बढाओ मोहिम भारतात सुरू झाली तेव्हा असंच दुर्लक्ष झालं आता त्यांची जनसंख्या वाढल्या नंतर दादागिरी सुरु झालीय (केरळ, काश्मीर,प.बंगाल आसाम इथल्या घडामोडी पाहता आपल्या लक्षात येईलच), आतंकीस्लिपर सेल मधे यांची भूमिका मोठी आहे #बांगलादेशी असेच झोल करुन नेत्यांना हाती धरुन सरकारी बाबुंना चिरीमिरी देवुन भारतीय नागरिक झालेत.आता इथे ते दादागिरी करताहेत.रोहिंगे तर केरळात वसु लागले आहेत. ब्रह्मदेश सीमा कुठे ? केरळ कुठे? तेव्हा या षडयंत्रास बळी न पडता फुकटची माणुसकी दाखवु नका .हिंदु,शिख मंडळीना सुरक्षित बाहेर काढा व सुखरूप आता व बाकिच्या मंडळी करता जवळपास त्यांच्याच बांधवांचे ५६ देश आहेत ते त्यांचे पाहतील नजीब असाच मल्हारराव होळकरांच्या आश्रयास आला व त्याने पानिपत घडवलं हे विसरु नका. फेसबुक वरुन साभार
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 08/20/2021 - 00:26 नवीन
मुस्लिम लोकांसाठी भारताने प्रचंड मोठे क्षेत्रफळ दान म्हणून दिले आहे. ह्या घेट्टो ला पाकिस्तान असे म्हणतात. पाकिस्तान ने सर्व अफगाणी निर्वासितांना घेतले पाहीजे. त्यांचे कर्तव्यच आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/20/2021 - 06:05 नवीन
पाकिस्तानात १४ लाख अफगाण निर्वासित आहेत तर भारतात १५ हजार. सर्वात जास्त इराण मध्ये ३४ लाख. निर्वासितांद्वारे गजवा ए हिंद करण्याची कल्पना हास्यास्पद आहे . बाकी इस्लाम धर्मप्रसार, दार ए सलाम, जिहाद इ त्यांच्या पवित्र पुस्तकातच लिहिलेले आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/20/2021 - 06:07 नवीन
भारत आलेल्या १५ हजार अफगाण निर्वासितांपैकी ९० % हिंदू आणि शीख आहेत. त्यांना आपण नाही तर कुणी आश्रय द्यायचा? CAA त्याचसाठी आणला आहे ना?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/20/2021 - 06:15 नवीन
पाकिस्तान ने सर्व अफगाणी निर्वासितांना घेतले पाहीजे. त्यांचे कर्तव्यच आहे. त्यांना अफगाण निर्वासितांना थांबवणे अशक्य आहे. कारण २६७० किमी डुरंन्ड रेषेवर -- पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यामधील(काल्पनिक) सीमारेषा-- कुंपण घालणे आणि त्याची कायम राखण करणे हे पाकिस्तानला अशक्य आहे. त्यातून त्या रेषेच्या इकडे आणि तिकडे भरपूर पठाण राहतात ज्यांचा आपसात रोटी बेटी व्यवहार आहे. मुळात हि रेषाच पठाणांच्या पश्तुनिस्तानात मध्येच घालून पश्तुन विभागाचे दोन तुकडे केलेले आहेत जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात राहणाऱ्या पठाण जमातीला मान्य नाही. त्यातून बलुचिस्तानातसुद्धा पठाणांची संख्या आता ३५ % पर्यंत पोहोचली आहे. तेंव्हा पाकिस्तानी लष्कर मधून मधून हि सीमा रेषा बंद करते आणि मग मांडवली झाली कि परत उघडते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/20/2021 - 09:50 नवीन
काही दूवा?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/20/2021 - 17:51 नवीन
तुम्ही डोक्याला त्रास करून घेऊ नका.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/20/2021 - 18:03 नवीन
पुढल्या वेळी दहवेत गोळीबार करण्या आधी दुवे शोधून ठेवा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/21/2021 - 06:07 नवीन
जालावर कुठेही मिळेल डुरंन्ड लाईन असं विकिपीडियात सुद्धा आहे. आपल्याला हवं तर शोधून पहा पण आपण ते करणार नाही कारण आपलं वैचारिक बद्धकोष्ठ कुणीही बरं करू शकत नाही. भद्रं ते भवतु
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/21/2021 - 08:34 नवीन
भारत आलेल्या १५ हजार अफगाण निर्वासितांपैकी ९० % हिंदू आणि शीख आहेत. >>>> ह्याचा काही दुवा?? की हवेत गोळीबार?? रच्याकने असेच विसा देवून अफगाणी काॅंग्रेस ने आणले असते तर डाॅ आपण मनसोक्त तोंडसूख घेतले असते. पण मोदीनी अफगाणी आणले तर ते चांगले झाले. देशापेक्शा मोदी किंवा भाजप महत्वाची नाही हे आपल्याला कळेल तो सुदीन.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/21/2021 - 16:50 नवीन
Manmeet is one among the 9,000-odd Afghan refugees in India, 90 percent of whom belong to Hindu or Sikh faiths - religious minorities in Afghanistan. https://www.thenewhumanitarian.org/fr/node/229012 https://thediplomat.com/2016/08/longing-to-belong-afghan-sikhs-and-hindus-in-india/ After a long wait for Indian citizenship, Hindu and Sikh refugees have a ray of hope Read more At: https://www.aninews.in/news/national/general-news/after-a-long-wait-for-indian-citizenship-hindu-and-sikh-refugees-have-a-ray-of-hope201901090939190001/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 08/21/2021 - 17:48 नवीन
डॉक, असल्यांच्या तद्दन अज्ञानी प्रतिसादांंना उत्तर देण्यात का वेळ व्यर्थ घालवित आहात? आपल्याला काहीही समजत नाही हेच यांना समजत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/21/2021 - 18:03 नवीन
दुवा मागणे हा अद्न्यानी प्रतिसाद?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 08/21/2021 - 18:28 नवीन
स्वत:स शून्य माहिती असणे किंवा पूर्ण चुकीची माहिती असणे, स्वतः माहिती न शोधता दुसऱ्यांंवर दोषारोप करीत राहणे यातून फक्त अज्ञान दृग्गोचर होत असते.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Mon, 08/23/2021 - 20:35 नवीन
++++१०००
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 08/20/2021 - 05:35 नवीन
इम्रान नावाच्या आरोपीने भर दिवसा धारदार शस्त्राने आपल्या पुर्वीच्या हिंदु असलेल्या पत्नीचा गळा चिरला. पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांनी जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पीडित अतिमा सिंग या मुलीने ११ वर्षांपूर्वी तिच्या आई -वडिलांच्या इच्छेविरुद्ध इम्रानशी लग्न केले. त्यानंतर त्याने तिला तिच्या मना विरुद्ध आणि इस्लाम स्वीकारायला नंतर तिचे नाव बदलून रिझवाना ठेवले. काही काळात इम्रानने अतिमा सिंगला तिहेरी तलाक दिला. तिने या काळात तिच्या पतीवर छळ आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप करत त्याच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. तिच्या बहिणीने माहिती दिली आहे की त्यांच्या लग्नाच्या नंतरच्या काही वर्षांत, इम्रानने तिच्या बहिणीलाही शिवीगाळ आणि शारीरिक मारहाण करण्यास सुरुवात केली होती. इम्रान व त्याच्या आईने अतिमा सिंगला दोन महिन्या पुर्वी बॅट ने इतके मारले होते की तिला १७ टाके पडले होते. अनिता म्हणाली की, इम्रानने लग्नानंतर आपल्या पत्नीला गोव्यात कुणाला विकलेही होते. अतिमा सिंग सुदैवाने गोव्यातून पळून जाण्यात यशस्वी झाली. परत आल्यानंतर अतिमा सिंग उर्फ रिझवानाने इम्रानला माफ करण्याचा निर्णय घेतला आणि परत त्याच्यासोबत राहायला गेली. त्यांना तिन मुले आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/20/2021 - 09:50 नवीन
गॅस महागल्याने सरपनातची मागणी वाढली, अशी बातमी आलीय आजच्या वर्तमान पत्रात. चुलीवरून गॅस कडे वळलेला देश पुन्हा चुलीकडे वळतोय. विरोधक ह्यावर पण टिका करनार, प्रत्येकाला चविष्ट भोजन मिळावे हा मोदीजींचा हेतू आहे. ही दूरदृष्टी विरोधकाना काय दिसनार?? धन्यवाद मोदीजी. एक कायप्पा फोरवर्ड Life of a Modi Bhakt: 2014: India will be a SUPERPOWER 2015: India will overtake USA 2016: India will overtake China 2017: India will overtake EU 2018: India will overtake Africa 2019: If not Modi then who? 2020: Tu Kaagaz dhund le.. 2021: At least we're better than Afghanistan!
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 08/20/2021 - 11:12 नवीन
पेट्रोल आणि lpg गॅस ची दरवाढ सरकार का करत आहे ह्याचे कोणतेच कारण सरकार कडे . मुळ भावा पेक्षा किती जास्त पट दर जनते कडून घेतला जात आहे एक तर कोविड मुळे जनता आर्थिक बाबतीत अतिशय कमजोर झालेली आहे दोन वेळचे जेवण मिळणे पण कोट्यवधी लोकांना अशक्य झाले आहे. आणि त्या मध्ये ही दरवाढ. जनता हैराण आहे. आणि सर्वात मोठे आश्चर्य हे आहे bjp चे नेते ,पाठी राखे भाव वधी चे समर्थन करतात बकवास कारण देवून तेव्हा संताप येतो. आणि तोच संताप निवडणुकीत दिसेल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/20/2021 - 11:27 नवीन
भारतीय जनतेवर भाजपची सर्जीकल स्ट्राईक चाललीय. जनतेची रसद पुरवठालतोडला जातोय पेट्रोल, डिझेल आता गॅस
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 08/20/2021 - 11:52 नवीन
Rajesh188 आणि अमरेंद्र बाहुबली तुमच्या दोघांच्यामते भारतातला कोणता पक्ष "पेट्रोल, डिझेल आता गॅस" यांची किंमत वाढवणार नाही? :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/20/2021 - 11:56 नवीन
सर आपण युपीए काळातील आंतरराष्ट्रीय दर व देशातील दर विरूध्द आताचे दर पहावेत.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 08/20/2021 - 12:42 नवीन
मी विचारलेले....कोणता पक्ष गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती
"आत्ता आहेत त्यापेक्षा"
जास्त नाही वाढवणार. या आधीच्या
"सगळ्याच"
सरकारांनी हेच केलेय
आणि यापुढेही असेच होत रहाणार
.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 08/20/2021 - 12:53 नवीन
स्वस्त इंधन देशात असावे आणि त्या साठी सर्व ताकत , आयडिया , नवीन इंधन प्रकार सरकार नी शोधणे अपेक्षित आहे. इंधन दर वाढणारच आहेत असेल उपदेश ऐकण्यासाठी लोक मत देत नाहीत. लोकांचा कर रुपी,इंधन रुपी,कमी करणे आणि स्वस्तात ते पुरवणे हे त्यांचे काम च नाही. तेवढे कर्तुत्व नसेल तर सत्ता मिळवण्याची हाव सोडावी. भ्रष्टाचार तसाच राहणार,सरकारी यंत्रणा तशीच सुस्त राहणार,गैर कायदेशीर काम तसेच जोरात चालू राहणार,न्याय मिळवण्यासाठी तसाच उशीर होणार ,लोकांना आरोग्य सुविधा स्वस्तात मिळणार नाही लुबाडणूक तशीच होणार. मग सरकार बदलून काय फायदा .. काँग्रेस बदलून bjp ल सत्ता देवून लोक महा मूर्ख बनली . बदल काहीच नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा