Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१

च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 08/05/2021 - 11:21
🗣 163 प्रतिसाद
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सरचिटणीस आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या कन्या आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वाद्रा यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. एक तर राहुल किंवा प्रियांकांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करा हा आग्रह प्रशांत किशोरने २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेसही धरला होता. तो त्यावेळी पूर्ण केला गेला नव्हता पण यावेळी तसे होत आहे असे दिसते. प्रियांकांनी २०१७ पर्यंत केवळ आपल्या आईच्या रायबरेली आणि भावाच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भागातच प्रचार केला होता. २०१७ मध्येही या लोकसभा मतदारसंघांच्या भागात असलेल्या १० पैकी अवघ्या २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रियांकांवर राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघांमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. मागच्या वर्षी लॉक डाऊनच्या दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे इतर राज्यात अडकलेल्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मजुरांना राज्यात परत आणायला म्हणून शेकडो बस आणल्या पण त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सरकारने राज्याच्या सीमेवर अडवून ठेवल्या असा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. त्या तथाकथित बसपैकी अनेक अस्तित्वात नव्हत्या तर अनेक नंबर प्लेट दुचाकींचे होते हे नंतर स्पष्ट झाले. असल्या नौटंकीवर पक्षाच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंग यांनी प्रियांकांवर टीका केली. त्यानंतर अदिती सिंगना पक्षाने काढून टाकले. आता कदाचित २०२४ मध्ये अदिती सिंग भाजपकडून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात स्वतः सोनिया गांधींची रायबरेली वगळता एकही दुसरी जागा मिळाली नव्हती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे २७ मे २०१९ रोजी नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त लखनौच्या प्रदेश पक्ष कार्यालयात कार्यक्रम झाला होता त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण द्विवेदी यांनी राहुल-प्रियांकांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर रामकृष्ण द्विवेदींना तडकाफडकी पक्षातून काढून टाकले गेले. रामकृष्ण द्विवेदी हे हाडाचे काँग्रेसवाले होते. जानेवारी १९७१ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्याविरोधात गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांपेक्षा दुप्पट मते मिळवून मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आणि खळबळ उडवली. त्यांनी कधीही पदाचा लोभ ठेवला नाही आणि केवळ पक्षाचेच काम केले. जवळपास ८८ वय असलेल्या रामकृष्ण द्विवेदींना प्रियांका-राहुलच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला हे महान पातक केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यातच रामकृष्ण द्विवेदींना कॅन्सरचे निदान झाले. पूर्ण जन्म काँग्रेसमध्ये घालवलेल्या द्विवेदींना आयुष्याच्या शेवटी पक्षातून काढून टाकले गेलेले जिव्हारी लागले. शेवटी मरताना तरी मला काँग्रेसवाला म्हणूनच मरू द्या अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांना पक्षात घेण्यात आले पण त्यांना काढले ही चूक झाली याविषयी चकार शब्द न बोलता त्यांना दुर्धर आजार झालेला असल्याने दया दाखवायला पक्षात घेतले गेले आहे अशाप्रकारचे स्टेटमेन्ट पक्षाकडून काढले गेले होते असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर काही दिवसातच- २०२० मधील लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी चार दिवस रामकृष्ण द्विवेदींचे निधन झाले. तर अशा आहेत प्रियांका वाद्रा. त्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशात काय होते हे बघायचे. Priyanka

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 51627 views

🗣 चर्चा (163)
श
श्रीगुरुजी Mon, 08/09/2021 - 18:14 नवीन
बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न देण्यासाठी गांधी घराण्याची तळी उचलणाऱ्या काँग्रेसला वेळ झाला नाही तो निर्णय श्री चंद्रशेखर यांच्या औटघटकेच्या सरकारला घ्यावा लागला आणि तो सुद्धा त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ३४ वर्षांनी. माझ्या आठवणीप्रमाणे आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार वि. प्र. सिंह सरकारने दिला होता.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 08/09/2021 - 19:03 नवीन
डॉ. आंबेडकर हयात असतानाही काँग्रेसने त्यांना कोणती वागणूक दिली होती? १९४७ मध्ये पहिल्या मंत्रीमंडळात नेहरूंनी काँग्रेससोडून इतर विचारांच्या लोकांनाही सामावून घेतले होते. त्यात अर्थमंत्री षण्मुखम चेट्टी, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी होतेच पण त्याबरोबरच कायदामंत्री डॉ.आंबेडकर पण होते. पण हिंदू कोड बिलाच्या प्रश्नावरून डॉ.आंबेडकरांनी राजीनामा दिला त्यानंतर काँग्रेसनी त्यांना दिलेली वागणूक खूपच वेगळी होती. १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने त्यांच्याविरोधात नारायण सदाशिव काजरोळकर हा फारसा कोणाला परिचित नसलेला उमेदवार दिला होता आणि त्याने डॉ. आंबेडकरांना पराभूत केले होते. काँग्रेसच्या नावावर कोणीही निवडून यायचा तो काळ होता. त्यानंतर त्यांना त्यांच्या पक्षाने- शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने राज्यसभेवर पाठवले. या दोन्ही वेळी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही असे काही काँग्रेसने म्हटले नाही. इतकेच नाही तर १९५४ मध्ये डॉ.आंबेडकरांनी भंडारा मतदारसंघातून लोकसभेची पोटनिवडणुक लढवली होती. त्यावेळी प्रजा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्याविरोधात उमेदवार दिले होते. अन्यथा दलितांसाठी तोंडपाटीलकी या दोन्ही पक्षांनी भरपूर केली पण डॉ. आंबेडकरांना लोकसभेवर निवडून जाऊ दे- त्यांच्यासारखा सदस्य लोकसभेच्या सभागृहात असला तर तो सभागृहाचाच नाही तर पूर्ण देशाचा गौरव होईल असे काही दोन्ही पक्षांनी म्हटले नाही. १९५६ मध्ये डॉ.आंबेडकरांची राज्यसभेची मुदत संपली (१९५२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांपैकी एक-तृतियांश सदस्य १९५४ आणि १९५६ मध्ये निवृत्त होणार होते. ते निवृत्त होणारे सदस्य कोण असतील हे चिठ्ठ्या टाकून ठरवले गेले होते). त्यानंतरही त्यांना परत त्यांच्याच पक्षाने एस.सी.एफने राज्यसभेवर निवडून दिले. काँग्रेसने मात्र त्यांच्याविरोधात उमेदवार न देणे किंवा त्यांना राज्यसभेवर नियुक्त करणे यापैकी काहीही केले नाही. मग डॉ. आंबेडकरांचे त्यानंतर काही महिन्यातच निधन झाले. थोडे अवांतर- १९४८ मध्ये जयप्रकाश नारायणांबरोबर आचार्य नरेंद्र देव काँग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९४६ मध्ये नरेंद्र देव काँग्रेसचे उमेदवार म्हणून फैजाबादमधून उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. आपण काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून गेलो तेव्हा आपण पक्षाबाहेर पडत असू तर तो आपल्याला निवडून देणार्‍या मतदारांशी प्रतारणा ठरेल म्हणून आचार्य नरेंद्र देव आणि इतर ११ जणांनी आमदारपदाचे राजीनामे दिले आणि पोटनिवडणुक लढवली होती. त्यावेळी नरेंद्र देवांविरूध्द काँग्रेसने बाबा राघवदास या संन्याशाला उमेदवारी दिली होती. आचार्य नरेंद्र देव हे डाव्या विचारांचे आणि नास्तिक होते. असा नास्तिक माणूस अयोध्येतून निवडून देणार का अशाप्रकारचा प्रचार बाबा राघवदासांनी त्यांच्याविरोधात केला होता. तसेच उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनीही बाबा राघवदासांच्या बरोबरीने नरेंद्र देवांविरोधात धर्माच्या आधारावर प्रचार केला होता. स्वतः नेहरूंना हा प्रकार मान्य नव्हता असे वाचले होते. नरेंद्र देवांसारखा सदस्य विधानसभेत असू दे त्यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उभा करू नये असे नेहरूंचे म्हणणे होते पण त्यांचा तो आग्रह उत्तर प्रदेश काँग्रेस समितीने झुगारून दिला. उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये एकाहून एक जातीय लोक भरले आहेत असे नेहरूंचे मत होते. शेवटी त्या समाजवादी पक्षाच्या १२ च्या १२ उमेदवारांचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाला. तेव्हा सांगायचा मुद्दा- आचार्य नरेंद्र देवांविरोधात उमेदवार देऊ नये असे नेहरूंना निदान वाटत तरी होते. पण डॉ.आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये असे नेहरूंना वाटत असल्याचे निदान मी तरी कुठे वाचलेले नाही. त्याप्रमाणेच जे.बी.कृपलानी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविरोधातही काँग्रेसने उमेदवार दिला होता. तेव्हा १९४७ मध्ये सर्वसमावेशक मंत्रीमंडळ बनवावे हा नेहरूंचा आग्रह तेवढ्यापुरता होता का? अर्थात त्यांनी कायमच सगळ्यांना मंत्रीमंडळात घ्यायला हवे होते असे नाही पण ज्यांना आपण अशा उत्युंग व्यक्तीमत्वांना एकेकाळी मानाने मंत्रीमंडळात बोलावून घेतले होते त्यांचा लोकसभा प्रवेशाचा मार्ग सुकर केला असता तर तो एक चांगला पायंडा नक्कीच पडला असता हे नक्की.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/09/2021 - 13:25 नवीन
सरकारने खरीप किंवा रब्बी हंगामात एमएसपीवर शेतकऱ्यांकडून आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली आहे. यासह, सुमारे १ लाख ७० हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात आणि सुमारे ८५ हजार कोटी रुपये गहू उत्पादकांच्या खात्यात पोहोचले आहेत.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/09/2021 - 13:41 नवीन
भारताच्या इतिहासात प्रथमच भारतीय पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद UNSC च्या बैठकीचे अध्यक्ष असतील. पहिल्या आठवड्यात यूएनएससीच्या अध्यक्षपदाच्या भारताने अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी यूएनएससीच्या सर्व सदस्यांची तातडीची बैठक बोलावली. विशेष म्हणजे शुक्रवारी झालेल्या बैठकीला भारताने पाकिस्तानला आमंत्रित करण्याची तसदी घेतली नाही आणि त्याऐवजी अफगाणिस्तानमधील वातावरण बिघडवण्यासाठी दहशतवाद पुरस्कृत राज्यावर हल्ला करण्याचा मुद्दा मांडला. अध्यक्षपदाच्या दुसऱ्या आठवड्यात भारत सागरी सुरक्षेवर एक बैठक घेईल. या मुळे चीनवर दबाव तयार होत आहे. पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद बैठकीचे अध्यक्ष - या निमित्ताने भाराताला मोठी राजकीय भुमिका प्राप्त झाली आहे असे दिसून येते आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनला कायमस्वरूपी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची जागा देण्याची धोरणात्मक चूक केली नसती तर गेल्या ७० वर्षांत भारताने जागतिक राजकारणात किती महत्त्वाची जागा घेतली असती याची आपण या निमित्ताने कल्पना करू शकतो.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 08/10/2021 - 10:20 नवीन
जवाहरलाल नेहरू यांनी चीनला कायमस्वरूपी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची जागा देण्याची धोरणात्मक चूक केली
असल्या थापा मारणे बंद करा. वाचन वाढवा. इथेच इतर धाग्यांवर याची चर्चा झाली आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/10/2021 - 10:53 नवीन
थापा तुमच्याच सुरू आहेत. भारताला १९५० च्या दशकात सुरक्षा परीषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळत असताना नेहरूंनी ते नाकारून भारताऐवजी चीनचे नाव पुढे केले, यासंबंधीचे पुरावे मी २-३ महिन्यांपूर्वीच एका धाग्यात दिले होते. "Letters to Chief Ministers 1947-1964, Vol 4" या ७०४ पानांच्या पुस्तकात नेहरूंनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह दिला आहे. या खंडाचे संपादन १९८८ मध्ये जी. पार्थसारथी या माजी राजदूतांनी केले असून प्रकाशन Oxford Press या नामवंत प्रकाशन संस्थेने केले आहे. या नेहरूंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने हा खंड प्रकाशित केला आला होता व त्यास राजीव गांधींंनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यामुळे या खंडाच्या सत्यतेविषयी तिळमात्र शंका नाही. त्यातील पान क्रमांक २३७ वर नेहरूंनी २ ऑगस्ट १९५५ या दिनांकास लिहिलेले पत्र दिले आहे. त्यात खालील वाक्ये आहेत. " Informally, suggestions have been made by the United States that China should be taken into the United Nations but not in the Security Counal, and that India should take her place in the Security Council." "We cannot of course accept this as it means falling out with China and it would be very unfair for a grrat country like China not to be in the Secunty Council. We have, therefore, made it clear to those who suggested this that we cannot agree to this suggestion. We have even gone a little further and said that India is not anxious to enter the Security Counal at this stage, even though as a great country she ought to be there. The first step to be taken is for China to take her rightful place and then the question of India might be considered separately." या वाक्यांवरून असे स्पष्टपणे दिसते की भारताला चीनऐवजी सुरक्षा परीषदेचे स्थायी सदस्यत्व देण्याचे अमेरिकेने सुचविले होते. परंतु भारताने चीनच्या प्रेमात ही सूचना नाकारली. नेहरूंच्या अनेक निर्णयात अजिबात दूरदृष्टी नव्हती व निर्णय घेताना ते बऱ्याचदा भाबडेपणाने निर्णय घ्यायचे, हे अनेकदा दिसले होते. त्यामुळे त्यांनी सुरक्षा परीषदेचे स्थायी सदस्यत्व मिळत असूनही नाकारणे अगदी स्वाभाविक होते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/10/2021 - 11:05 नवीन
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://ia801606.us.archive.org/20/items/in.ernet.dli.2015.54646/2015.54646.Letters-To-Chief-Ministers-1947-1964-Vol-4_text.pdf&ved=2ahUKEwi_0J2B6NLwAhXa3jgGHZFCDawQFjADegQIBRAC&usg=AOvVaw0hEIN0iIIkZw7Ud7FMyOjM&cshid=1621326772148 या पीडीएफमधील पृष्ठ क्र. २६४ (म्हणजे खंडाचे पृष्ठ क्रमांक २३७. हा क्रमांक २३७ वर उजव्या कोपऱ्यात छापला आहे) वरील २ ऑगस्ट १९५५ या दिवशी लिहिलेल्या पत्रात वरील परिच्छेद आहेत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 08/10/2021 - 11:06 नवीन
सिक्युरिटी कौन्सिल किति साली अस्तित्वात आली ते वाचा . यू एन चा इतिहास वाचा. वाचन वाढवा
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/10/2021 - 11:12 नवीन
म्हणजे नेहरू खोटे सांगत होते का? इथे नेहरू स्वत:हून सांगताहेत आणि नेहरूंचे अंधभक्त त्यांनाच खोटे ठरवताहेत. घोर कलियुग, दुसरं काय!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/10/2021 - 11:21 नवीन
बादवे, आपले वाचन शून्य असून सर्व प्रतिसाद केवळ पूर्वग्रहातून खरडले जातात हे आज पुन्हा एकदा दृग्गोचर झालंय. At the UN's founding in 1945, the five permanent members of the Security Council were the French Republic, the Republic of China, the Soviet Union, the United Kingdom, and the United States. There have been two seat changes since then, although these have not been reflected in Article 23 of the United Nations Charter, as it has not been accordingly amended: China's seat was originally held by the Nationalist government of the Republic of China (ROC). However, it lost the Chinese Civil War and retreated to the island of Taiwan in 1949. The Chinese Communist Party won control of mainland China and established the People's Republic of China (PRC). In 1971, UN General Assembly Resolution 2758 recognised the PRC as the legal representative of China in the UN, and gave it the seat on the Security Council that had been held by the ROC, which was expelled from the UN altogether. Both the ROC and the PRC continue to claim de jure sovereignty over the entirety of China (including Taiwan). However, only 15 states continue to officially recognise the ROC as the sole legitimate government of China. https://en.m.wikipedia.org/wiki/Permanent_members_of_the_United_Nations_Security_Council
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 08/10/2021 - 11:28 नवीन
Informally, suggestions have been made by the United States that China should be taken into the United Nations but not in the Security Counal, and that India should take her place in the Security Council.
हे वाचून काही वाचकांचा गोंधळ उडू शकतो. चीन जर संयुक्त राष्ट्राचाच सदस्य नसेल तर सुरक्षा परिषदेत तरी कुठून येणार आणि सुरक्षा परिषदेतील चीनची जागा भारताने घ्यायचा प्रश्न कुठे येतो? चीन मधील चिअँग कै शैकच्या सरकारला अमेरिकेची मान्यता होती. त्या सरकारने दुसर्‍या महायुध्दात जपानविरूध्द लढाईत भागही घेतला होता. त्यामुळे दुसर्‍या महायुध्दातील दोस्त राष्ट्रांना सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळाले होते त्यात अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि फ्रान्सबरोबर चीनलाही ते मिळाले होते तसेच चीन हा संयुक्त राष्ट्रांच्या संस्थापक सदस्यांमध्ये एक होता. दुसर्‍या महायुध्दानंतर चीनमधील यादवी युध्द परत सुरू झाले आणि त्या युध्दात माओने चिअँग कै शैकचा पराभव केला आणि चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले. त्यामुळे चिअँगला तैवानला पळून जावे लागले. माओ १९४९ मध्ये चीनमध्ये सत्तेत आला. माओच्या नेतृत्वाखाली चीनच्या मुख्य भूमीला 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' तर चिअँग कै शैकच्या नेतृत्वाखालील तैवानला 'रिपब्लिक ऑफ चायना' असे म्हटले गेले. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानात तालीबान सत्ताधारी असले तरी जगाची मान्यता बुर्‍हानुद्दिन रब्बानींच्या तालिबान पूर्वी सत्तेत असलेल्या सरकारला होती आणि तालीबानने अफगाणिस्तान बेकायदेशीरपणे कबजात घेतला आहे असे म्हटले जात होते. तसाच काहीसा प्रकार चीनच्या बाबतीतही होता. सत्तेत माओ असला तरी त्याने बेकायदेशीरपणे सत्ता ताब्यात घेतली आहे आणि चीनचा खरे सरकार हे चिअँग कै शैकचे सरकार आहे असे अमेरिकेचे म्हणणे होते. त्यामुळे चीनची संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषद या दोन्हींमधली जागा चिअँग कै शैकच्या सरकारकडे होती. ती सुरक्षा परिषदेतील जागा भारताला द्यावी असा प्रस्ताव होता. १९७१ मध्ये सुरवातीला हेनरी किसिंजर आणि १९७२ मध्ये रिचर्ड निक्सन यांनी चीनचा दौरा केल्यावर चीनचा विजनवास संपला आणि माओच्या चीनला संयुक्त राष्ट्रात घेण्यात आले. इतकेच नाही तर चिअँग कै शैकच्या सरकारकडे असलेली सुरक्षा परिषदेची जागाही माओच्या सरकारला देण्यात आली आणि तैवानची सुरक्षा परिषदेतूनच नाही तर संयुक्त राष्ट्रांमधूनही हकालपट्टी करण्यात आली.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 08/10/2021 - 12:05 नवीन
मे महिन्यात ह्याच विषयावर अगदी सविस्तर चर्चा झाली होती. त्या दरम्यान, हाच उल्लेख आल्यावर तुम्ही हे अगदी असेच म्हणाले होतात. त्यावरून श्रीगुरुजी व चंद्रसूर्यकुमार ह्यांच्यात मिळून जी चर्चा झाली (व जिच्यात तुम्ही काहीच सहभाग घेतला नाहीत) त्यांत अगदी तपशिलासकट व दुव्यांसह बरीच माहिती देण्यात आली होती. ती इथून पुढे पहावी. आणि आता शक्य झाल्यास त्याचा प्रतिवाद करावा. (जोंवर चर्चा सुसंकृतरीत्या सुरू राहील, तोंवर, मिपा संचालकांचा त्यावर काही आक्षेप नसावा. तेव्हा ती भीति नको).
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/11/2021 - 14:38 नवीन
अत्यंत बिनबुडाचे द्वेषी आरोप करून Hit and run करणारा हा सदस्य असल्याने प्रतिवाद येणार नाही. मे महिन्यातील चर्चेत बिनतोड पुरावे समोर आणल्यानंतर या सदस्याने प्रतिवाद न करता धाग्यावरून काढता पाय घेतला होता. या धाग्यावरूनही पलायन करण्यात आले आहे. धागा कोणताही असला तरी बिनबुडाचे आरोप करणे आणि तडाखा मिळाल्यानंतर धूम ठोकणे हे या सदस्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/11/2021 - 15:33 नवीन
तुमच्या पैकी कोणीही सुरक्षा परीषदेचे कायम सदस्यत्व रद्द करायला काय प्रोव्हिजन आहे हे वाचले नाहिये . इन्फोर्मल म्हणणे आणि फोर्मल ओफर यात फरक कळत नसेल तर धन्य आहे. कोणी मला तू या जॉब साठी फिट आहेस , जॉईन करशील का आणि हातात ओफर लेटर असणे यात जेवढा फरक आहे तो समजून मग बोला. बाकी हिट अँड रन वगैरे वैयक्तिक टीका झाल्यास इथून पुढे तशाच स्वरुपात उत्तर दिले जाइल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 08/11/2021 - 15:52 नवीन
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.thehindu.com/news/national/jawaharlal-nehru-on-permanent-unsc-membership-no-question-of-a-seat-being-offered-and-india-declining-it/article26536197.ece/amp/&ved=2ahUKEwjV4sSJjanyAhUwzDgGHZa3DmMQFnoECCEQAQ&usg=AOvVaw0Jd6Pzjyho8-CXbqNv2i7c&ampcf=1 हे पण वाचा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/11/2021 - 15:54 नवीन
कोणत्याही ऑफरची सुरूवात नेहमीच अनौपचारिक पद्धतीने असते. सुरूवातीपासून कोणी वकील, कायदेशीर करारनामा वगैरे बरोबर घेऊन ऑफर देत नाही. दोन कंपन्या एकत्र येणे, एखाद्या मोठ्या पोस्टसाठी एखाद्या अनुभवी माणसाची चाछपणी करणे, नवीन बिझनेस डील वगैरे अनौपचारिक चर्चेतूनच सुरू होतात. एकमेकांचे हेतू, त्यातून कोणते फायदेतोटे होऊ शकतात याची चाचपणी केली जाते. जर दोन्ही बाजूंकडून अनुकुलता दिसत असेल तर मग शेवटी औपचारिक कायदेशीर प्रक्रिया सुरू होते. अर्थात हे ज्ञान असण्याची शक्यता नाहीच.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/11/2021 - 16:46 नवीन
सुरक्षा परीषदेचे कायम सदस्यत्व रद्द करायला काय प्रोव्हिजन आहे याबाबत वाचा
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/11/2021 - 17:11 नवीन
अजून आहेच का? ROFL. चालू दे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 08/11/2021 - 19:24 नवीन
संयुक्त राष्ट्र समिती,सुरक्षा परिषद ह्यांचे दरवाजे काही आता बंद झालेले नाहीत. साठ सत्तर वर्षा पूर्वी झालेल्या घटनेचे (ते पण काल्पनिक) आता काय भांडवल करत आहात. स्वतःच्या हिम्मती वर,कर्तुत्व वा वर संयुक्त राष्ट्र परिषद आणि सुरक्षा समिती ह्या मध्ये स्थान मिळवा आणि ५६ इंची छाती कधी कामाला येणार. आमच्या पण बापाने आमच्या साठी संपत्ती सोडली नव्हती आम्ही त्यांना दोष देत बसलो नाही स्वतःच्या हिंमती वर संपत्ती कमावली.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/09/2021 - 13:47 नवीन
भारत लडाखमध्ये ४ विमानतळ आणि ३७ नवीन हेलिपॅड बांधत आहे. हे हेलिपॅड जड चिनूक सीएच ४७ हेलिकॉप्टर हाताळण्यास सक्षम असतील. चार नवीन विमानतळांसाठी जमीन बनवणे आदि तयारी वाइड-बॉडी विमानांच्या लँडिंगसाठी योग्य पूर्ण झाली आहे. सरकार लेह शहरासाठी पर्यायी हवाई क्षेत्र आणि झांस्कर व्हॅलीला थेट जोडण्याची योजना आखत आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/09/2021 - 13:57 नवीन
नरेंद्र मोदी सरकार नागरी आणि लष्करी सागरी क्षेत्रामध्ये संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक नियुक्त करणार. बहुदा भारतीय नौदलाचे सेवारत किंवा नुकतेच निवृत्त व्हाइस एडमिरल यांची नोकरीच्या पदावर नियुक्ती केली जाईल. राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक , भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अधीन काम करेल आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात सरकारचे मुख्य सल्लागार असतील. पुर्ण अभ्यासा अंती राष्ट्रीय सागरी आयोगाची (एनएमसी) संघटनात्मक रचना ही आंतर-मंत्रालयीन सल्लामसलतीनंतर तयार केली गेली आहे. यामुळे आता केंद्रीय मंत्रालये आणि विभाग (गृह, शिपिंग, मत्स्यव्यवसाय इ.) आणि राज्य सरकारांपासून नौदल, तटरक्षक दल, सीमाशुल्क, गुप्तचर संस्था आणि बंदर प्राधिकरणांपर्यंत विविध भागधारकांमध्ये समन्वय साधला जाईल. मोदी सरकारने आता ‘एनएमएससी’ची स्थापना करून नौदलाच्या मजबुतीकरणाचे कामही हाती घेण्यात आल्याचे यावरून दिसून येते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/10/2021 - 09:31 नवीन
वादग्रस्त इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्सने नवी दिल्लीतील विंडसर प्लेस येथील सरकारी जागेचे भाड्याचे पैसेच भरलेले नाहीत असे उघडकील आले आहे. त्यामुळे प्रेस कॉर्प्सला (IWPC) सरकारने दिलेले निवासस्थान वाटप रद्द केल्याची नोटीस दिली. या जागेची मुदत या वर्षी जानेवारीत संपली असल्याने निवासस्थान रद्द करण्यात आले आहे. सरकारने इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्सला थकबाकी त्वरित भरण्यास सांगितले. इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स ने पाकिस्तानी राजदूत मुत्सद्द्यांना या पुर्वी पार्ट्या दिल्या आहेत. आणि नंतर हेच मुत्सद्दी आणि राजदूत नंतर भारतात आयएसआय साठी काम करतांना पकडले गेले होते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/10/2021 - 09:46 नवीन
गाझियाबादमधील दासना मंदिराचे पुजारी स्वामी नरशानंद सरस्वती यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोरांनी घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास मंदिराची भिंत तोडून आवारात प्रवेश केला. या पुर्वी महंत याच मंदिराचे यती नरसिंहानंद सरस्वती यांना यापूर्वी अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. हा हल्ला त्यांच्यासाठीच असावा पण स्वामी नरशानंद सरस्वती यांच्यात हल्ले खोरांना फरक करता आला नसावा. महत्त्वाचे म्हणजे यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळले आहेत. याआधी मे महिन्यात दिल्ली पोलिसांनी पहाडगंज भागातून २४ वर्षीय मोहम्मद दार उर्फ ​​जहांगीरला नावाच्या दहशतवाद्याला अटक करून दासना देवी मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरोधात हत्येचा कट उघडकीस आणला होता. ​​जहांगीरला दासना देवी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला मारण्यासाठी देण्यासाठी रुपये देण्यात आले होते. भारतात हिंदु साधूसंतांवर चिंताजनक प्रमाणात हल्ले होत आहेत. या आधी पालघर येथे साधूंची हत्या झाली आहे आणि नंतर त्यांची केस लढवणार्‍या वकीलाचा ही मृत्यु झाला आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 08/10/2021 - 15:12 नवीन
महंत नरसिंहानंद यांची एक मुलाखत काही काळा पूर्वी मी इथे दिली होती. त्यांनी हे वारंवार सांगितले आहे आणि होते की त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मंदिराच्या आधिच्या महंतांची देखील बहुतेक हत्या झालेली आहे. जयपुर डायलॉग्सवर यांच्या २ मुलाखती आहेत. त्या इथे देत आहे. जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 08/10/2021 - 15:18 नवीन
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे आज वयाच्या ८१ वर्षी निधन झाले. ऋषीतुल्य व्यक्तीमत्व असणार्‍या बालाजी तांबे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/\_ अगदी २ दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडियो पाहिला होता, तो इथे देतो.

मदनबाण.....

  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 08/11/2021 - 06:44 नवीन
केंद्र सरकार नी राज्य घटनेत बदल करून कोणत्या जातींना कोणत्या वर्गात टाकायचे ह्याचे अधिकार राज्य सरकार ना दिले आहेत. ह्या निर्णय मुळे राज्याराज्यांत जातीचे राजकारण जोर धरेल असे मला वाटत. जाती जाती मधील भेद कमी होणे गरजेचे आहे पण ह्या निर्णय मुळे जाती अजून मजबुत होतील.आणि नेहमी संघर्ष वाढेल. आणि ही हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट नाही.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/11/2021 - 08:25 नवीन
बिहार मध्ये सुदर्शन न्यूजच्या पत्रकाराची हत्या, अरसद आलम ला अटक करण्यात आली आहे. देशात पत्रकाराची हत्या झाली असूनही कोणत्याही पत्रकार संघटनेने याची दखल घेतलेली नाही. मनीषला सातत्याने धमक्या येत होत्या. त्याने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मनीष बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी हरसिध्दी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस तपास करत असताना त्यांना स्थानिकांना एक अज्ञात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. असे म्हणतात की खुन्यांनी मनीषचे डोळे काढले होते, आणि त्याच्या चेहऱ्यावर जखमा आहेत.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/11/2021 - 08:49 नवीन
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी सरकार निवडून आल्यापासून सरकारच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री बोगन राजेंद्रनाथ यांनी इमाम आणि ख्रिश्चन धर्मगुरूंसाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक पैशांचे वाटप केले. सरकारने अर्थसंकल्पात अल्पसंख्याक कल्याण योजनांसाठी एकूण २१०६ कोटी रुपये आता पर्यंत दिले आहेत. आंध्र प्रदेशचे मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मगुरूंचा पगार किमान रु. २०,००० करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. वायएस जगनमोहन रेड्डी एका ख्रिश्चन कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी हे ही ख्रिश्चन होते. ते काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनीही अशाच धर्तीवर अल्पसंख्यांक तुष्टीकरण स्वीकारले . रामनवमी सारख्या प्रमुख सणाच्या राज्य सरकारने मंजूर केलेल्या सुट्ट्या काढून टाकण्यात आल्या आहेत. आणि त्याच वेळी सर्व ख्रिश्चन सणांच्याच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच तिरुमाला मंदिराचा कारभार राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने तेथे ही वायएसआरने ख्रिश्चन धर्मातील ख्रिश्चन धर्मियांना मंदिरांच्या प्रशासनात नियुक्त केले. आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी हजारो कोटी सरकारी रुपये धर्मांतरावर खर्च केले असाही आरोप केला जात आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/11/2021 - 09:21 नवीन
महा भकास आघाडी सरकार आता म्हणे महाराष्ट्रात राजीव गांधींच्या नावाने नवीन पुरस्कार देणार. ३ दिवसांपूर्वी मोदींनी खेलरत्न पुरस्काराला ध्यानचंदांचे नाव दिल्यानंतर दोन्ही तळव्यांना चुना लावून संजय राऊत मोदींच्या नावाने ठणाणा करीत होता व पुरस्कारासाठी खाशाबा जाधवांचे नाव का दिले नाही, मोदी मराठीविरोधी आहेत अश्या शिव्या घालत होता. मग आता या पुरस्काराला खाशाबा जाधवांचे नाव न देता राजीव गांधींचे नाव का दिले? https://www.loksatta.com/maharashtra-news/award-in-the-name-of-rajiv-gandhi-announcement-by-satej-patil-rmt-84-2559095/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/11/2021 - 09:21 नवीन
महा भकास आघाडी सरकार आता म्हणे महाराष्ट्रात राजीव गांधींच्या नावाने नवीन पुरस्कार देणार. ३ दिवसांपूर्वी मोदींनी खेलरत्न पुरस्काराला ध्यानचंदांचे नाव दिल्यानंतर दोन्ही तळव्यांना चुना लावून संजय राऊत मोदींच्या नावाने ठणाणा करीत होता व पुरस्कारासाठी खाशाबा जाधवांचे नाव का दिले नाही, मोदी मराठीविरोधी आहेत अश्या शिव्या घालत होता. मग आता या पुरस्काराला खाशाबा जाधवांचे नाव न देता राजीव गांधींचे नाव का दिले? https://www.loksatta.com/maharashtra-news/award-in-the-name-of-rajiv-gandhi-announcement-by-satej-patil-rmt-84-2559095/
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 08/11/2021 - 10:50 नवीन
जेव्हा पासून महाराष्ट्रात ह्यांची सत्ता गेली आहे तेव्हा पासून हे मानसिक रोगी झाले आहेत. ह्यांच्या तोंडात नेहमी शिवराळ भाषा असते. राणे,त्यांचे पुत्र हे नमुने काय आहेत पूर्ण राज्य बघत च आहे. समर्थक पण त्याच दर्जा चे आहेत. सेने मुळे हे सत्तेत होते तेव्हा सेना चांगली होती आणि आता ह्यांना सत्ता मिळाली नाही म्हणून सेना वाईट झाली. स्वार्थी कुठले.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/11/2021 - 15:38 नवीन
देशातील सर्व मदरसे RTE अंतर्गत यायला हवेत – NCPCR सर्व्हेतील निष्कर्ष! हे व्हायलाच हवे ! भाजपाला जर त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचे रक्षण करता येणार नव्हते तर त्यांनी या कार्यकर्त्यांना बंगाल मध्ये मृत्युच्या खाईत का लोटले ? आता या कार्यकर्त्यांच्या बायकाही तृणमुल कॉग्रेसच्या गुंडांच्या तावडीतुन सुटल्या नाहीत ! धक्कादायक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार आरोपी सगळे अशांती दुत आहेत :- शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक व रहमत अली आणि महबूल तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सहा वर्षांच्या नातवासमोर सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव आपल्या देशात आता इतके बलात्कार होउ लागले आहेत की या परिस्थीतीत देशात स्त्रियांना अभय असे उरलेले नाही असे दिसते ! कोणीही यावे आणि कोणत्याही वयोगटाच्या स्त्रियांवर बलात्कार करुन जावे ! लहान मुलीं पासुन १०० वर्ष वृद्ध महिलेवर देखील बलात्काराच्या घटना वाचायला मिळत आहेत. हा देश आता स्त्रियांसाठी सुरक्षित राहिलेला नसुन, बहुतेक देशातील बंगाल राज्य हिंदू स्त्रियांसाठी तर अजिबात राहण्याच्या लायकीचे उरलेले नाही. बलात्कारी पुरुषांचे हात पाय छाटुन त्यांना लाचारीत जिवंत ठेवणे ही शिक्षा आता आपल्या देशात दिली गेली पाहिजे, फाशीची भिती उरलेली नाही... निदान चौरंगा झालेले पुरुष पाहुन इतर नराधम असले घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाहीत असे गृहित धरुया. पीआर मिडियाचा रोजचा हैदोस... पीआरवाले कराचीवुड वाल्यांकडुन कोट्यावधी रुपये घेतात आणि न्युजपेपर वाल्यांच्या भिकार झोळीत टाकतात... यामुळे रोज आपल्याला तैमूरसत्ता मध्ये त्याच्या व त्याच्या अब्बा आणि अम्मीच्या कथा दिसतात. असेच इतर पेपर मिडिया देखील आहेत. हा नेक्सस करोडो रुपयांचा... स्वतःला रोज प्रसिद्धीत ठेवायचे मग जाहिरातवाले यांच्याच बरोबर कोट्यावधीचे करार करणार, मग त्याच कोट्यावधी मधले काही कोटी पीआर मिडियाच्या खिशात टाकणार आणि ते न्युज पेपर आणि इतर मिडियांच्या खिशात थोडेसे टाकणार आणि आपल्याला मनोरंजन या सदराखाली तैमूर ने शी केली असे वाचायला मिळणार. किळस वाटते हल्ली इतपत ही व्यवस्था लयाला गेली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - MISERLOU - William Joseph & Caroline Campbell (feat Tina Guo) EXPLOSIVE cover from Pulp Fiction
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 08/11/2021 - 17:56 नवीन
देशात होणाऱ्या बलात्कार च्या केस मध्ये अर्ध्या खूप पेक्षा जास्त केसेस ह्या खोट्या असतात. त्या मुळे कोणतेच कायदे भावनेच्या आहारी जावून केले जावू नयेत. बलात्कारी व्यक्ती ला फाशी ही मागणी जशी केली जाते तशी मागणी खोटी केस केली आणि तसे सिद्ध झाले तर आरोप करणाऱ्या व्यक्ती ल सुद्धा फाशी च झाली पाहिजेत
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/11/2021 - 19:18 नवीन
खूप पेक्षा जास्त केसेस ह्या खोट्या असतात. काय संगाता ? मग इतक्या बलात्कराच्या बातम्या रोज येतात त्या पण खोट्याच का ? सगळ्यात जास्त बलात्कार होणार्‍या देशांच्या यादीत आपले स्थान बहुतेक ३ किंवा ४ थे आहे. --- -- - थोड्या वेळा पूर्वी हा लेख वाचला :- ‘या’ सरकारचे डोके ठिकाणावर असल्याची ‘चिन्हे’ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जी नेमकी भूमिका मांडली आणि कळीच्या प्रश्नांना हात घातला, ते पाहताना लोकमान्य टिळकांच्या ‘त्या’ प्रश्नाची आठवण झाली आणि असे वाटले, की या सरकारचे डोके ठिकाणावर असल्याचे दिसते आहे! आता अजुन अजुन काही बातम्या :- 'त्या' ५६ हजार जणांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली; पण सरकारकडे त्यांची यादीच नाही मुंबई लोकलसाठी पास मिळण्यास सुरुवात; तुम्ही पात्र आहात का? कोणती कागदपत्रं हवीत? मोठी बातमी! हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास ठाकरे सरकारची परवानगी दोन लस घेतलेल्या लोकांना परत करोना होत नाही का ? तर होतो... मग सरकारने कुठलं डोकं वापरुन ही अट ठेवली ? भाजी मार्केट इतर दुकाने सुरु आहेत मग तिथे दोन लशींच्या पात्रतेची अट का नाही ? मुंबईची रेल्वे या आर्थिक राजधानाची धमनी समजली जाते, लाखो लोक या सेवेवर फार मोठ्या प्रमाणात अवलंबुन आहेत. रेल्वेत बॉम्ब स्फोट घडवुन झाल्यावर देखील ती सेवा सुरळीत केली होती हे आपल्याला माहितच आहे. लोकांचा संयम आता सुटला आहे, आज व्हॉटअ‍ॅपवर मुंबईतील एका स्त्रीचा व्हायरल झालेला व्हिडियो पाहिला तीला ५०० रु दंड आकारल्यावर तिच्या असंतोषाचा भडकाच उडाला ! मा. मुख्यंत्र्यांचे तीने तोंड भरुन कौतुक केले आहे. जो पर्यंत लोक आणि व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरुन हिंसक होत नाही तो पर्यंत या सरकारचे डोके ठिकाणावर येणार नाही असंच दिसतय ! जाता जाता :- मनोरंजन » “तैमूरच्या जन्मानंतर स्तनपान करताना…”; करीना कपूरने केला ‘या’ गोष्टीचा खुलासा प्रेग्नंसीदरम्यान; सेक्स लाइफविषयी पहिल्यांदाच उघडपणे बोलली करिना
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 08/11/2021 - 23:05 नवीन
> देशातील सर्व मदरसे RTE अंतर्गत यायला हवेत – NCPCR सर्व्हेतील निष्कर्ष! > हे व्हायलाच हवे ! मज्जा आहे. करून दाखवावेच सुप्रीम लीडर नी, > धक्कादायक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार फक्त तृणमूल ला दोष देऊन फायदा नाही. ३०३ चे बहुमत असलेले केंद्र सरकार ह्या महिलेचा नंतर शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करील आणि ट्विटर वरून बंगाली हिंदूंना शिव्या देईल. शेफाली वैद्य ह्यांनी तर ह्याचे खापर हिंदूवरच फोडले आहे. म्हणे भाजपाला मत दिले नाही म्हणून असे होत आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/12/2021 - 16:24 नवीन
मज्जा आहे. करून दाखवावेच सुप्रीम लीडर नी, खरंय... आता सत्तेत आहेत तर कोणते बहाणे करतात तेच पहायचे आहे. शेफाली वैद्य ह्यांनी तर ह्याचे खापर हिंदूवरच फोडले आहे. म्हणे भाजपाला मत दिले नाही म्हणून असे होत आहे. वैद्य बाईंना कोणत्या तरी वैद्याला दाखवायला हवे ! :))) मदरश्यांमध्ये काय शिकवले जाते ? Do you know that this book is compulsory teaching in all madarsas of Indian sub-continent? This is Fatawa Alamgiri. It was commissioned by a Sufi - Aurangzeb. Head and deputy of the project were also Sufis - Sheikh Burhanpuri and Shah Abdul Rahim. Some excerpts :- Image removed. Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Little Mix - Black Magic (Official Video)
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 08/12/2021 - 11:44 नवीन
ट्विटरने राहुल गांधींबरोबर अजय माकन, रणदीप सुरजेवाला वगैरे काँग्रेस नेत्यांची खाती काही काळासाठी बंद केली. आता तर ट्विटरने काँग्रेस पक्षाचे अधिकृत खातेही 'लॉक' केले आहे अशा बातम्या आहेत. दोनेक महिन्यांपूर्वी ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात चकमक चालू असताना सगळे विचारवंत हिरीरीने ट्विटरच्या बाजूने उभे होते आणि ट्विटर करत आहे ते योग्यच आहे असे उच्चरवाने बोलत होते. त्यांची मात्र या प्रकाराने गोची झाली आहे.
  • Log in or register to post comments
स
सुरिया गुरुवार, 08/12/2021 - 12:01 नवीन
त्यावेळी ट्विटरचा उच्च रवाने विरोध करणारे आणि ऑफिसवर धाडी टाकणारे ह्यांची नाही का गोची होणार? का आता ट्विटर सुधारले एकदम
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 08/12/2021 - 13:41 नवीन
यामुळे ट्विटरविषयी पहिल्यापासून वाईट मत असलेल्यांना चांगले वाटेल त्यापेक्षा ट्विटरविषयी सुरवातीपासून चांगले मत असलेल्यांना नक्कीच अधिक वाईट वाटेल. रस्त्यावरच्या गुंडाने क्वचितप्रसंगी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यामुळे जितके चांगले वाटेल त्यापेक्षा एखाद्या सज्जन आणि प्रामाणिक माणसाने खून केल्यानंतर अधिक वाईट वाटेल त्याप्रमाणेच. आमच्यासाठी ट्विटर पहिल्यापासूनच हलकट होते (रस्त्यावरच्या त्या गुंडासारखे) पण विचारवंतांसाठी ते खूप खूप चांगले होते (त्या सज्जन आणि प्रामाणिक माणसासारखे). आणि विचारवंतांची एखाद्याला चांगले म्हणायची व्याख्या एकदम साधीसरळ असते. आणि ती म्हणजे मोदी सरकारविरोधात असणे. तेव्हा इतके दिवस ट्विटर मोदी सरकारविरोधात होते म्हणून चांगले होते पण आता काँग्रेसवरच कारवाईचा बडगा उगारला आहे म्हणून त्याला वाईट ठरवावे की नाही ही गोची नक्कीच या विचारवंतांची होणार. अर्थात विचारवंतांकडे सगळ्या गोष्टींकडे उत्तर असतेच. आता ट्विटरने मोदी सरकारच्या दबावाखाली ही कारवाई केली आहे असा प्रचार ते करायला लागले आहेत. काही का असेना- पूर्वी मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात बाणेदारपणे उभे राहिलेल्या ट्विटरने शेपूट घातलीच हे तरी विचारवंतांना कबूल करावेच लागेल.
  • Log in or register to post comments
स
सुरिया गुरुवार, 08/12/2021 - 20:01 नवीन
ट्विटरविषयी पहिल्यापासून वाईट मत असलेल्यांना चांगले वाटेल त्यापेक्षा ट्विटरविषयी सुरवातीपासून चांगले मत असलेल्यांना नक्कीच अधिक वाईट वाटेल. रस्त्यावरच्या गुंडाने क्वचितप्रसंगी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यामुळे जितके चांगले वाटेल त्यापेक्षा एखाद्या सज्जन आणि प्रामाणिक माणसाने खून केल्यानंतर अधिक वाईट वाटेल त्याप्रमाणेच...
अरेरे, फुरोगामी विचारवंतांना नावे ठेवत तुम्हीही त्यांचीच भाषा बोलायला लागलात की. विरोधी भक्ती म्हणावी की अनुकरण?
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर गुरुवार, 08/12/2021 - 16:19 नवीन
ट्विटर ने काँग्रेस ची खाती लॉक केल्याने आनंद नक्कीच झाला नाही, फक्त गंमत वाटली. बाकी ज्या अतिरेक्यांचे समर्थन काँग्रेस पक्ष करतो त्यांच्याकडून एखाद्या पुरोगाम्याला यमसदनाला धाडले जाते तेव्हा आनंद नक्कीच होत नाही. फक्त त्या फुरोगाम्याची दया येते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/12/2021 - 12:03 नवीन
विरोधकांची अजिबात गोची झालेली नसावी. चीवचीवाट सरकारच्या एकुण डिझेल-पेट्रोलच्या विरोधात होत होता, पॅगसीस काय म्हणतात म्हणे ते सरकार जी हेरगिरी करत होते त्यामुळे सरकारविरुद्ध चिवचिवाट होता होता. मोदी सरकारने जो जो मिडिया सरकार विरोधात बोलेल तिथे तिथे कायद्याचा बडगा दाखवून तो आवाज दाबला, दाबण्याचा प्रयत्न केला. आता मुख्यविषय ट्वीटरकडे वळु, ट्वीटरने राहुल गांधीचं खातं काही काळासाठी रद्द केलं, काही वेळासाठी बंद केलं, वगैरे बातम्या येत होत्या पण ट्वीटरने राहुल गांधी यांचं खातं बंद केलं नाही, पण एका पिडितेचं छायाचित्र टाकलेलं होतं ते चित्र ट्वीटरने हट्वले होतं. इतकीच माहिती आहे. (संदर्भासाठी हेही पाहावे) आपण तर पहिल्यापासून कोणत्याही माध्यमाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने आहोतच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 08/12/2021 - 13:34 नवीन
मास्तर, तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये तर लिहिलेय की अकाउंट काही काळासाठी बंद केले होते म्हणून.. आणि तुम्ही तर गोषवारा म्हणून काहीतरी वेगळेच लिहिलेय. स्वातंत्र्य मला पण आवडते, पण इतके?
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 08/13/2021 - 14:22 नवीन
इस लिये मेरेकु कळ्या नै - द्विपदवीधर
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/12/2021 - 14:44 नवीन
ट्वीटरने राहुल गांधी यांचं खातं बंद केलं नाही, पण एका पिडितेचं छायाचित्र टाकलेलं होतं ते चित्र ट्वीटरने हट्वले होतं. इतकीच माहिती आहे. स्वत:चे गलिच्छ राजकारण चालविण्यासाठी बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांची प्रकाशचित्रे प्रसिद्ध करून त्यांची ओळख जाहीर करणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य असून हा फौजदारी गुन्हा आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी ओरपणे, बलात्कार पीडितांचा राजकारणासाठी वापर करणे, मतांसाठी अत्यंत खालची पातळी गाठणे हे कॉंग्रेससाठी नेहमीचीच गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/13/2021 - 04:42 नवीन
भारतीय राजकारणात गलिच्छ राजकारण आणि त्याची सुरुवात मोदी आणि भाजपांनी २०१४ पूर्वी आणि नंतर इतकी केली की त्याची काही लिमिट राहीली नाही. आता तो गलिच्छपणा सांगून आणि लिहूनही काही उपयोग नाही. आत्ताही काही भाजपाच्या बाजार बुनग्यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोकडे तक्रार करायला लावून सरकारच्या माध्यमातून दबाव आणून काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती बंद करायला लावली असा आरोप सरकारवर केला जात आहे. लोक बदल करायला आणि फेकाफेकूवर विश्वास ठेवायला एकच वेळ झाली आणि नवे पंतप्रधान म्हणून मोदींना भारतीयांना झेलावे लागले, सहन करावे लागले आहेत. मोदी आणि त्यांचे सहकारी धुतल्या तांदळाचे नाहीत हे सर्व भारतियांना माहिती आहे. मतांसाठी उत्तरप्रदेशच्या सभा असो की देशातल्या सभा असो भाजपाने राजकारणासाठी काय काय केले ते सांगून उपयोग नाही. आज सत्ता आहे म्हणून असंख्य गलिच्छ गोष्टी मोदी आणि सरकारी यंत्रणेचा उपयोग करून दाबल्या जातात. एकदा सत्ता गेली की सर्व बाहेर येईलच. काळ हेच औषध. भारतीय जनतेला सोसणे आणि वाट पाहणे आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 08/13/2021 - 05:13 नवीन
सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी विद्यावाचस्पती प्राध्यापकांची केविलवाणी अवस्था झाली आहे. त्यातून थोडासा दिलासा मिळण्यासाठी ईनो, जेलुसिल इ.चे सेवन करा.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 08/13/2021 - 06:39 नवीन
सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था खरी तर बिजेपी भक्तांची झाली आहे. पेट्रोल दरवाढ, महागाई त्यांनाही सोसावी लागतेय. केंद्र सरकारच्या लस धोरणाचा फटका भक्तांनाही बसतोय,पण केंद्र सरकारवरील आंधळ्या प्रेमामुळे सहन करत आहेत बिच्चारे! केंद्राचे गप्पबसिंग धोरण निमूटपणे पाळत आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/12/2021 - 19:19 नवीन
*पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला अटक; योगी सरकारच्या कारवाईने देशात संताप* उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या राज्यभरात दौरे करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. असे असताना आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कौशल किशोर रावत यांची पत्नी ममता रावत यांना रविवारी मुख्यमंत्र्यांना भेटून दिले नाही. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, अद्याप त्यांना जमीन वाटप झालेली नाही. तसेच मोफत वीज जोडणी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मिळालेला नाही. यामुळे त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायचे होते. दोन वर्षांपूर्वी जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. आतापर्यंत सरकारने दिलेल्या आश्वासनांची अनेक आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. यासंदर्भात कुटुंबही धरणेवर बसले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री डॉ दिनेश शर्मा यांनी त्यांच्याशी फोनवर बोलून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु आतापर्यंत फक्त शाळेचे नाव हुतात्म्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे. https://mulukhmaidan.com/wife-soldier-killed-pulwama-attack-arrested-yogi/
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/12/2021 - 19:23 नवीन
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्याला न्याय मिळत नाही तर सामान्य माणसाला काय न्याय मिळत असावा ऊत्तर प्रदेशात?? ऊत्तर प्रदेशची जनता आगीतून फूफाट्यात पडलीय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा