चालू घडामोडी - जुलै २०२१ (भाग २)
लंडनमधील न्यायालयाने विजय मल्ल्याला दिवाळखोर जाहीर केले आहे. मल्ल्याकडून थकीत कर्जवसुली, मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण यावर या निर्णयाचा काय परीणाम होऊ शकतो यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
https://www.indiatoday.in/india/story/uk-court-fugitive-businessman-vijay-mallya-bankrupt-1832930-2021-07-26
🗣 चर्चा
(65)
R
Rajesh188
Tue, 08/03/2021 - 16:03
नवीन
भारतासाठी चीन धोकादायक असेल,भारतासाठी अती डावी विचारसरणी धोकादायक असेल
हे मान्य केले.
कारण comuniasam हिंदू साठी पण पण धोकादायक आहे.भारतातील डावी विचारसरणी च माकड हिंदू विरोधी आहेत .ढोंगी आहेत हे स्पष्ट आहे.
पण ह्याचा अर्थ भारतातला अनियंत्रित भांडवलशाही उपयोगाची आहे असा नाही.
भारताला मिश्र विचारसरणी च हवी.
चीन ला नमवण्यादाठी अमेरिकेची मदत घेणे हे अती मूर्ख पणाचे लक्षण आहे.
भारताने स्वतः च्या हिमतीवर चीन शी मुकाबला करावा.
अमेरिका हा देश विश्वास ठेवण्यास बिलकुल पात्र नाही.
जगातील अनेक समस्या चे कारण अमेरिका आहे.
तालिबान पण त्याचेच पिल्लू आहे.उलटले ती वेगळी गोष्ट.
- Log in or register to post comments
न
निनाद
Wed, 08/04/2021 - 08:54
नवीन
लोकसभेने अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक, मंजूर केले आहे. हे विधेयक सरकारला अत्यावश्यक संरक्षण सेवांमध्ये गुंतलेल्या कारखान्यांमध्ये मध्ये संप, लॉकआउट आणि कामावर बंदी इत्यादी वर बंदी घालते. यामुळे युद्धकाळात सैन्यांना शस्त्रास्त्रांचा सतत पुरवठा सुनिश्चित राहू शकतो. सध्या बहुतेक सर्व संरक्षण विषयक कारखान्यात साम्यवादी विचारसरणीच्या युनियन्स आहेत त्या सर्वांनी याला विरोध केला होता. तथापि आता कायदा आल्याने त्यांचे हात बांधले गेले आहेत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 08/04/2021 - 14:53
नवीन
भारतात कोणती शस्त्र आणि अस्त्र चे उत्पादन होते त्याची यादी असेल तर ध्या
लढावू विमान विकत घ्यावी लागतात.अगदी ak ४७, बुलेट proof जॅकेट सुद्धा भारत उत्पादित करत नसेल.
संप करायला बंदी ही देश हितासाठी नक्कीच नाही.
जे काय सरकारी उद्योग ह्या क्षेत्रात आहेत ते विकायचा शेठ चा माणसं असेल.
कामगार वर्ग कडून विरोध होणार ह्याची जाणीव असेल म्हणून देश हिताचे पिल्लू सोडून दिले आहे.
आणि अंध भक्त ते देशप्रेम लोकांना सांगत आहेत.
- Log in or register to post comments
न
निनाद
गुरुवार, 08/05/2021 - 05:14
नवीन
भरतातर्फे चांगल्या प्रतीच्या बुलेट प्रूफ जॅकेट्सची सन २०२० पासूनच निर्यात १८ देशांमध्ये केली जात आहे. देशांतर्गत आणि निर्यातीची गरज पूर्ण करण्यासाठी वार्षिक १० लाखांपेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटच्या निर्मितीसाठी १५ कंपन्यांना औद्योगिक परवाने देण्यात आले आहेत. हे पाहा https://economictimes.indiatimes.com/news/defence/india-supplies-bullet-proof-jackets-to-18-countries/articleshow/74576242.cms?from=mdr
तीन भारतीय सरकारी मालकीच्या कंपन्या ज्या जगातील पहिल्या १०० निर्यात करणार्या कंपन्यांमध्ये मोडतात. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सरकारचे संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर्स आहेत. संरक्षण उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी पण उपलब्ध आहेत. हे पाहा https://www.investindia.gov.in/sector/defence-manufacturing
२०१७ पासून भारतातील पहिल्या खाजगी क्षेत्रातील लहान शस्त्र निर्मिती कारखान्याचे कार्य चालले आहे. भारताच्या पुंज लॉईड आणि इस्त्रायल वेपन सिस्टीम्सचा संयुक्त उपक्रम असलेल्या या कारखान्यातून X९५ कार्बाइन आणि असॉल्ट रायफल, गॅलील स्निपर रायफल, टॅवर असॉल्ट रायफल आणि एलएमजी अशी चार उत्पादने तयार होतात.
या शिवाय एल अँड टी (तोफ - निर्यात) , टाटा, महिन्द्रा (चिलखती वाहने निर्यात) आणि इतर अनेक समुह विवीध संरक्षण उत्पादने बनवत आहेत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 08/05/2021 - 06:31
नवीन
भारतात कोणती शस्त्र आणि अस्त्र चे उत्पादन होते त्याची यादी असेल तर ध्या
भारतात एक लक्ष चाळीस हजार कोटी रुपयांची संरक्षण उत्पादने तयार होतात. कधीतरी थोडे फार वाचत चला.
आपल्याला कोणत्याही विषयात काहीही माहिती नसली तरी बेताल आणि वायफळ प्रतिसाद देणे आवश्यक आहे का हा एकदा स्वतःला प्रश्न विचारून पहा.
हलकट डाव्या लोकांनी एकंदर डोकलाम आणि लडाख मध्ये आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षात चीनची टाळी वाजवण्यात जशी कोणतीही कसूर केली नाही तशी उद्या युद्ध झाले तर अग्नी पृथ्वी किंवा ब्राम्होस सारख्या क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्यात फुसक्या कारणांनी संप घडवून आणणार नाहीत याची कोणतीही खात्री देता येत नाही.
कामगार वर्ग कडून विरोध होणार ह्याची जाणीव असेल म्हणून देश हिताचे पिल्लू सोडून दिले आहे.
आणि अंध भक्त ते देशप्रेम लोकांना सांगत आहेत.
जर लष्कराला संपबंदी आहे तर लष्करी उत्पादन कारखान्यांना का नसावी इतका साधा विचार आपल्या डोक्यात शिरतच नाही का?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 08/05/2021 - 12:13
नवीन
आम्ही सोडून सर्व देशाचे शत्रू आहेत.देशप्रेमी फक्त आम्हीच बाकी विचारसरणी ची लोक देशद्रोही,सरकार विरोधी बोलणारे देश द्रोही .
अशीच वृत्ती सत्ता धारी पक्षाची पहिल्या पासून आहे.
सहा सात वर्षात त्यांच्या कडून देशाचे काहीच हित झाले नाही ही बाब वेगळी.
आता पर्यंत भारतानं तीन चार युद्ध लढली आहेत.
अशा युद्धाच्या वेळी कधी युद्ध सामुग्री निर्मिती कारखान्यात संप झाला आहे का?
माझ्या माहिती प्रमाणे नाही.
मग कशाला नसणारी भीती व्यक्त करत आहात.
असे पण अत्यावशक्य सेवा कायद्याचा दंडुका सरकार कडे आहेच .
त्या साठी वेगळा संप बंदी कायदा करायची काय गरज आहे.
विकायला अडथळा नको हेच कारण आहे..
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 08/07/2021 - 06:21
नवीन
लष्करी उत्पादन कारखान्यांना अत्यावशक्य (हा आपलाच शब्द आहे) सेवा कायदा लागू होत नाही
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 08/07/2021 - 06:22
नवीन
अती + अशक्य
ह ह पु वा
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 08/04/2021 - 09:26
नवीन
https://www.loksatta.com/agralekh-news/loksatta-editorial-kumar-mangalam-birla-offers-to-hand-over-vodafone-idea-stake-to-government-zws-70-2551184/
ह्या लेखात एका ठिकाणी असे म्हटले आहे की, अन्य टेलिकॉम कंपन्यांनी ही रक्क्म भरायलाच हवी असे जिओ चे म्हणणे आहे. हा मामला सरकार आणि अन्य टेलिकॉम कंपन्यांचा आहे, त्यात ह्याना काय देणे घेणे आहे ?
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Wed, 08/04/2021 - 14:53
नवीन
"सरकारी दाव्यानुसार संबंधित कंपन्यांकडून येणे असलेली ही रक्कम साधारण ९२ हजार कोटी रु. इतकी होते. पण व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि टाटा टेलिकॉम यांनाच ती प्रमुख्याने भरावी लागेल. जिओ कंपनीस नाही. याचे कारण ही कंपनी अस्तित्वात आली त्याच्या आधीपासूनचा हा मुद्दा आहे. जिओच्या पोटास या रकमेचा चिमटा बसणार नसल्यामुळे अन्य कंपन्यांनी ती भरायलाच हवी असा सत्यवचनी आग्रह जिओने धरला. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यावर तेथे सरकार-जिओ यांची मागणी मान्य झाली".
१. दूरसंचार कंपन्यांच्या कुठल्या कुठल्या उत्पन्नावर महसूल आकारावा, ह्याबद्दल "याचे कारण ही कंपनी अस्तित्वात आली त्याच्या आधीपासूनचा हा मुद्दा आहे" लोकसत्तेच्या अग्रलेखात केलेले हे विधान तपासून घेण्याची आवश्यकता आहे. ह्याचे एक सरळ कारण, अर्थात हे सयुक्तिक वाटत नाही. आणि दुसरे, लोकसत्तेची विश्वासार्हता आता पूर्ण रसातळाला गेली आहे. वरवर पहाता, हे तर्कपूर्ण अजिबात वाटत नाही. तेव्हा, ह्या निर्णयामागे अधिक काहीतरी आहे का, ह्याची माहिती करून घेतली पाहिजे.
२. "जिओच्या पोटास या रकमेचा चिमटा बसणार नसल्यामुळे अन्य कंपन्यांनी ती भरायलाच हवी असा सत्यवचनी आग्रह जिओने धरला" पुन्हा तेच म्हणेन-- लोकसत्तेतील अग्रलेखातील विधाने. येथे नक्की कोण कोर्टात गेले होते? जर व्होडाफोन-आयडिया गेले असतील, तर त्यात फक्त सरकार प्रतिवादी असणार. मग जिओला त्या खटल्यात स्थान काय? जिओ स्वतःहून गेले असण्याची शक्यता शून्य. सरकार गेले असले, तरी पुन्हा वरीलप्रमाणेच--- जिओ त्यात काहीही म्हणू शकत नाही.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 08/05/2021 - 10:55
नवीन
ह्या अग्रलेखावरची , काही रोचक पत्रे
https://www.loksatta.com/lokmanas-news/lokmanas-poll-opinion-reader-akp-94-52-2552620/
- Log in or register to post comments
प
प्रदीप
गुरुवार, 08/05/2021 - 11:28
नवीन
मी दर्शवलेल्या मुद्द्यांवर काही माहिती असल्यास ती कृपया द्यावी. ह्या पत्रांतून जे काही अग्रलेखांत म्हटले आहे, ते तसे संपूर्ण खरे आहे, असे समजून त्यावर टिपण्णी आहे, ह्याशिवाय बाकी काहीही नाही.
- Log in or register to post comments
न
निनाद
गुरुवार, 08/05/2021 - 04:59
नवीन
४ ऑगस्ट रोजी, स्वदेशी भारतीय बनावटीची विमानवाहू नौकेच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या आहेत. या नौकेचे नाव आयएनएस विक्रांत असेल. अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौकेची स्वदेशी रचना, बांधणी आणि समाकलित करण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे.
सध्या भारताकडे एकच विमानवाहू युद्धनौका आहे, म्हणजेच आयएनएस विक्रमादित्य.
हा भारताच्या पहिल्या आयएनएस विक्रांतचा पुनर्जन्म म्हणायला हरकत नाही. आयएनएस विक्रांत ही भारताचे पहिली विमानवाहू युद्धनौका होती. जुन्या आयएनएस विक्रांत ने १९७१ च्या युद्धात पूर्व पाकिस्तानची दाण्दाण उडवली होती. आणि आयएनएस राजपूत ने पाकिस्तानी पाणबुडी गाझी बुडवण्यासाठी आयएनएस विक्रांत चे सोंग घेतले होते.
- Log in or register to post comments
न
निनाद
गुरुवार, 08/05/2021 - 09:17
नवीन
पाकिस्तानात मंदिरांवर अनेक हल्ले होण्याचे सत्र सुरूच आहे.
पाकिस्तानी हिंसक जमावाने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात एका गणेश मंदिराची तोडफोड केली. मंदिराचे काही भाग जाळण्यात आले आणि मूर्तींची विटंबना करण्यात आली. हल्लेखोर काठ्या, दगड आणि विटा घेऊन जात होते. इस्लामी धार्मिक घोषणा देताना त्यांनी देवतांना फोडले.
जमावाने बुधवारी मंदिरावर हल्ला केला. व्हिडियो येथे पाहा https://twitter.com/i/status/1422938438966423555
या भागातील हिंदूंमध्ये दहशत पसरली आहे. हिंदूंसह इतर अल्पसंख्याक धर्मांना पाकिस्तानमध्ये संरक्षणाची गरज आहे हेच त्यातून दिसून येते.
- Log in or register to post comments
न
निनाद
गुरुवार, 08/05/2021 - 09:26
नवीन
सहारनपूर आणि मुझफ्फरनगरमध्ये असा एकही मदरसा नाही जिथे मी पैसे दिले नाहीत', व्हायरल व्हिडिओमध्ये माजी खासदार शाहिद सिद्दीकी म्हणतात की
"आप सहारनपुर चले जाओ, आपको एक भी मदरसा नहीं मिलेगा, याहाँ मुझफ्फरनगर में भी, जहां मैने रूपये नहीं दिया हो"
केंद्र सरकारच्या MPLADS योजना निधीतून बहुदा हे पैसे दिले असावेत असे दिसते आहे. योजना भारत सरकारचा निधी थेट स्वरूपात उपलब्ध करून देते. या उपक्रमाचा उद्देश संसद सदस्यांना (खासदारांना) स्थानिक पातळीवर जाणवलेल्या गरजांच्या आधारे विकास प्रकल्प राबवण्यासाठी आहे. MPLADS योजनेअंतर्गत, त्यांच्या सदस्यांच्या मतदारसंघातील जिल्हाधिकाऱ्यांना विकास कामे सुचवण्यासाठी संसद सदस्यांना एकूण ५ कोटी रुपये दिले जातात.
त्यांचा व्हिडियो येथे पाहता येईल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2