Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२०

त
तुषार काळभोर
Fri, 07/23/2021 - 13:02
🗣 191 प्रतिसाद
नमस्कार, https://upload.wikimedia.org/wikipedia/en/1/1d/2020_Summer_Olympics_logo_new.svg दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात, आपण दरवर्षी एक मोठ्ठा संघ पाठवतो. आणि दोन-चार पदके कमावतो. १९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिस पुरुष एकेरी मध्ये कांस्य जिंकलं आणि खूप वर्षांचा पदकांचा आणि खूप दशकांचा वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर दरवर्षी वैयक्तिक पदके १-२-३-४ मिळत आहेत. २०१६ रियो ऑलिम्पिक : एक रजत, एक कांस्य २०१२ लंडन ऑलिम्पिक : दोन रजत, चार कांस्य २००८ बिजिंग ऑलिम्पिक : एक सुवर्ण, दोन कांस्य २००४ अथेन्स ऑलिम्पिक : एक रजत २००० सिडनी ऑलिम्पिक : एक कांस्य असा या शतकातील प्रवास आहे. यंदा देखील मोठा संघ, मोठा सपोर्ट स्टाफ, मोठ्या आशा आणि अपेक्षासह भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होत आहे. मिपाचे लोकप्रिय क्रीडा लेखक जे पी मॉर्गन यांनी गार्‍हाणं मांडून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर स्पर्धेचे अपडेट्स, विशेष बातम्या आणि अर्थातच भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांविषयी येथे चर्चा करुयात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 54899 views

🗣 चर्चा (191)
त
तुषार काळभोर Fri, 07/23/2021 - 13:18 नवीन
उद्घाटन सोहळ्यात भारतीय ध्वजवाहक बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह हे दोघे होते. आज (२३ जुलै) भारतासाठी तिरंदाजीच्या चार स्पर्धा आहेत. मिश्र सांघिक पुरुष सांघिक महिला एकेरी पुरुष एकेरी
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/23/2021 - 13:41 नवीन
आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Fri, 07/23/2021 - 14:24 नवीन
धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल तुषार. भारतीय खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 07/23/2021 - 14:52 नवीन
धन्यवाद, वाचत राहीन आणि जमेल तशी भर घालेन
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 07/23/2021 - 15:01 नवीन
२०१३ मध्ये २०२० चे ओलिंपिक्स जपानला दिले गेले पण पुढे काय होणार त्यांना काय माहीत. प्रेक्षकच नसल्याने सर्वात महागडा समारंभ आणि खेळस्पर्धा आयोजन ठरणार. आतापर्यंतच्या सोहोळ्यात बीजिंग ओलिंपिक्स सोहाळा गाजला. चीन काय आहे ते जगाला दाखवले पेपर उघडून. जपान काही तरी सुंदर दाखवेल ही अपेक्षा होती. पण महामारी आली आडवी. ---------- धावणे, रीले धावणे, पोहणे, शूटिंग इत्यादीमध्ये आपले गुण आणि जागतिक उच्चांक तुलनात्मक अगोदरच माहीत असतात. पण कुस्तीत काहीही होऊ शकते. बघू काय होते?
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 07/23/2021 - 15:35 नवीन
का कोणास ठाऊक, पण या ऑलम्पिक मध्ये नेहमीपेक्षा आपण एखाद्दुसरं जादा पदक कमावू असं मला वाटतंय (सिक्स्थ सेन्स म्हणा हवं तर )
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 07/23/2021 - 16:13 नवीन
कालच जाहीर झाले २०३२ वर्षाचे ऑलिम्पिक ऑस्ट्रेलिया मध्ये होणार आहे ... फक्त २. कोटी लोकसंख्येचं देशाने ३ ऱ्यांदा हा मान मिळवला आहे !
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 07/23/2021 - 16:20 नवीन
२०३२ वर्षाचे ऑलिम्पिक ऑस्ट्रेलिया मध्ये होणार आहे कारण बाकी कोणीच बोली लावली नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 07/23/2021 - 17:06 नवीन
बर मग? यात काही विशेष सांगण्यासारखे नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला ? तस असेल तरी पिंपरी चिंचवड नि लावयायाची होती ना बोली ! अहो का उगा खवचटपणा करताय ... मी काही भारताला नावे ठेवली नाहीत ,, फक्त ज्या देशात राहतो त्या छोट्या देशाने काहीतरी करून दाखवले त्याची निंदा केली तर ते चुकले का ... यापूढे कानाला खडा जाऊदे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 07/23/2021 - 17:07 नवीन
त्याची नोंद
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 07/23/2021 - 18:05 नवीन
खवचटपणा वाटला असल्यास माफी!
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 07/23/2021 - 22:53 नवीन
माझ्या मते भारताने यात अजुन तरी पडु नये. या आयोजनाचा खर्च आव्याढव्य असतो. त्यात जर अपेक्षित परतावा मिळाला नाही तर केलेली गुंतवनुक पांढरा हत्ती होते. स्पर्धेसाठी बनवलेली क्रीडांगणे वापराअभावी पडुन राहतात. खेळाडुंची निवासस्थाने गावाबाहेर असल्यामुळे त्याचा वापर होत नाही. त्यापेक्षा तो पैसा इथे पायाभुत सुविधा वाढवण्यावर वापरला तर दिर्घकालीन फायदा होइल. ऑलिम्पिक मधे पदके मिळण्यासाठी खुप आधीपासुन तयारी करावी लागते .. म्हणजे मुले लहान असतात तेव्हाच .. पुढे विद्यालयीन / महाविद्यालयीन शिक्षण घेताना तशी तयारी करुन घ्यावी लागते. तेव्हा कुठे हजारात एक खेळाडु तयार होतो. आपल्याकडे क्रिकेट सोडले तर इतर कुठल्याही खेळाला प्रतिष्ठा नाही .. सपोर्ट नाही .. ते आधी बदलावे लागेल. आताच ठरावीक खेळाडुंवर प्रेशर टाकुन पदकांची अपेक्षा करणे बरोबर नाही...
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 07/24/2021 - 20:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
पराग१२२६३ Sun, 07/25/2021 - 09:11 नवीन
सुक्या, तुमच्या ऑलिंपिकची तयारी आणि आयोजनासंबंधीच्या मतांशी पूर्णपणे सहमत!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 07/23/2021 - 16:33 नवीन
मुंबई गोवा रस्ता खड्डे बुजवून रूंद केलेला असेल. गेली पंचवीस वर्षे खटपट चालू आहे. कोस्टल रोडचे काही पूल बांधलेले असतील.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 07/23/2021 - 17:49 नवीन
या जोशपूर्ण गाण्यासह आमच्याही शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/24/2021 - 06:35 नवीन
कालचा दिवस (Day-0) होता. आज भारत: महिला १० मीटर एअर रायफल >> भारत बाहेर तिरंदाजी मिश्र सांघिक >> भारत विरुद्ध दक्षिण कोरिया, उपांत्यपूर्व फेरी ११.०० वाजता टेबल टेनिस महिला एकेरी पात्रता फेरी >> पाहिली फेरी मनिका बात्रा विरुद्ध इंग्लंड, 12.00 वाजता पहिली फेरी सुतीर्था मुखर्जी विरुद्ध स्वीडन 1.00 वाजता टेबल टेनिस मिश्र दुहेरी उप उपांत्यपूर्व >> पराजित विरुद्ध तैवान पुरुष १० मीटर एअर पिस्टल पात्रता फेरी >> चालू आहे. पुरुष हॉकी A ग्रुप >> भारत विजयी 3-2 विरुद्ध न्युझीलंड बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A विरुद्ध तैवान >> वेट लिफ्टींग महिला - ४९ किलो गट >> टेनिस पुरुष एकेरी पहिली फेरी>> बॅडमिंटन पुरुष एकेरी ग्रुप D - विरुद्ध इस्राईल >> रोइंग पुरुष दुहेरी >> ज्युडो महिला ४८ किलो >> भारत बाहेर. बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A >> विरुद्ध तैवान बॉक्सिंग पुरुष (63-69 किलो) >> विकास किशन विरुद्ध जपान 4.00 वाजता हॉकी महिला ग्रुप A >> विरुद्ध नेदरलँड असा आजचा कार्यक्रम आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 07/24/2021 - 08:37 नवीन
रोइंगचे चित्रण सकाळी पाहिले. मग विचार केला की हा खेळ वाढवायचा तर ते infrastructure किती महाग पडेल. पुण्याच्या बालेवाडीत आहे म्हणतात . आहे का?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 07/24/2021 - 08:47 नवीन
अभिनंदन! वेट लिफ्टींग महिला - ४९ किलो गट रजत-मीराबाई चानू
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 07/24/2021 - 03:57 नवीन
चानेलवाले ( सोनी टेन 2 )काही आठवणी दाखवत होते त्याही छान होत्या.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 07/24/2021 - 08:51 नवीन
पहिल्याच दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला रौप्यपदक मिळवून दिले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 07/24/2021 - 09:31 नवीन
सोनी टेन 2 चालूच आहे पण आपला भाग नंतर कुठे.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 07/24/2021 - 09:57 नवीन
आज चारला आपला हॉकी नेदरलॅंड सोबत आणि उद्या Australia बरोबर आहे. शिवाय उद्या सिंधू बॅडमिंटन वैयक्तिक आणि अजून काही सामने आहेत. सकाळी सहापासून टी व्ही समोर!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 07/24/2021 - 11:54 नवीन
होऊन गेल्यावर कुठे?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/24/2021 - 10:27 नवीन
यंदाचे पहिले पदक!!
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sat, 07/24/2021 - 10:35 नवीन
पहिले पदक...माहितीसाठी सर्वांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/24/2021 - 10:43 नवीन
टेबल टेनिस महिला एकेरी पात्रता फेरी >> पाहिली फेरी मनिका बात्रा विजयी विरुद्ध इंग्लंड तिरंदाजी मिश्र सांघिक >> भारत पराभूत विरुद्ध दक्षिण कोरिया, उपांत्यपूर्व फेरी पुरुष १० मीटर एअर पिस्टल पात्रता फेरी >> मिरत चा सौरभ चौधरी पात्रता फेरीत सर्वाधिक गुण मिळवून अंतिम फेरीत. बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A विरुद्ध तैवान >> विजयी वेट लिफ्टींग महिला - ४९ किलो गट >> मीराबाई चानू रजत पदक टेनिस पुरुष एकेरी पहिली फेरी>> सुमित नागल विजयी विरूद्ध उझबेकिस्तान बॅडमिंटन पुरुष एकेरी पहिली फेरी>> बाहेर रोइंग पुरुष दुहेरी >> बाहेर बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A >> सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी विजयी विरुद्ध तैवान तिरंदाजी मिश्र सांघिक >> भारत पराभूत विरुद्ध दक्षिण कोरिया
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 07/24/2021 - 10:54 नवीन
छान अपडेट दिले आहेत.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/24/2021 - 12:27 नवीन
सौरभ चौधरी पात्रता फेरीत पहिला आला होता, पण अंतिम फेरीत फारच सुमार कामगिरी झाली. आठपैकी सातव्या स्थानावर आला.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/24/2021 - 12:30 नवीन
सुतीर्था मुखर्जी हिने देखील मानिका बात्रा पाठोपाठ पहिली फेरी जिंकली. टेबल टेनिस महिला एकेरीत आता भारताच्या दोन खेळाडू दुसऱ्या फेरीत दाखल झाल्या आहेत
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 07/24/2021 - 12:56 नवीन
त्यात कसे गुण मिळतात ते कळले नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 07/24/2021 - 13:58 नवीन
पण जिथे मि मार्शल आर्ट शिकलो तिथे समोरच्याचा पंच अथवा किक व्यवस्थित ब्लॉक केली की अर्धा गुण, आपली किक समोरच्या चेहऱ्याला लागली तर दोन गुण, पंच /किक बेल्टच्यावर अन मानेच्या खाली असेल तर एक गुण आपला पंच चेहऱ्यावर लागला तर अर्धा गुण कट आपली पंच/ किक जर बेल्ट च्या खाली मारली तर अर्धा गुण कट कोणत्याही कारणाने आपला बेल्ट जमिनीला टेकला (आपण पडलो) तर पाच गुण कट असे नियम होते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 07/24/2021 - 16:17 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/24/2021 - 15:17 नवीन
बॉक्सिंग पुरुष (63-69 किलो) >> विकास किशन पराभूत विरुद्ध जपान हॉकी महिला ग्रुप A >> भारत पराभूत विरुद्ध नेदरलँड हे दोन्ही पराभव ५-० असे दारुण होते.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/24/2021 - 15:21 नवीन
चीन अपेक्षेनुसार सुरुवातीपासून आघाडीवर आहे. काही मिनिटांसाठी भारत एका रजत पदकासह दुसऱ्या स्थानी होता. (त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवलाय ;) ) सध्या भारत बाराव्या स्थानी आहे. . . एकदा का athletics मुख्य स्पर्धा (धावणे, लांब उंच उडी, पोहणे, इत्यादी) सुरू झाल्या की अमेरिका आणि युरोपची लयलूट सुरू होईल.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 07/24/2021 - 17:51 नवीन
अरे वाह स्क्रीन shot फोटो द्या. मी वाचलं की चीनने या स्पर्धेत​ल पहिल सुवर्ण मिळवले आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/24/2021 - 18:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/24/2021 - 15:46 नवीन
महिला १० मीटर पिस्तूल >> पात्रता फेरी (मनू भाकर आणि यशस्विनी सिंह देस्वाल) पुरुष स्कीट शूटिंग >> पात्रता फेरी (राज्यवर्धन राठोड यांना ज्यात रजत पदक मिळालं होतं) मैराज अहमद खान अंगद विरसिंह बाजवा रोईंग पुरुष दुहेरी >> (पुनः प्रयत्न) पात्रता फेरी अरुण लाल जाट अरविंद सिंग बॅडमिंटन महिला एकेरी ग्रुप J राऊंड >> पी व्ही सिंधू विरुद्ध इस्रायल टेनिस महिला दुहेरी >> पहिली फेरी सानिया मिर्झा+ अंकिता रैना विरुद्ध युक्रेन नौकानयन Laser Radial Women नेत्रा कुमानन Image removed. १०मीटर एअर रायफल पुरुष एकेरी >> पात्रता फेरी दीपक कुमार दिव्यांश पनवर नौकानयन Laser Radial Women >> दुसरी रेस नेत्रा कुमानन टेबल टेनिस पुरुष एकेरी >> दुसरी फेरी साथीयन G नौकानयन Laser Radial पुरुष >> पहिली + दुसरी शर्यत विष्णू सर्वानन टेबल टेनिस महिला एकेरी >> दुसरी फेरी मनिका बात्रा विरुद्ध युक्रेन बॉक्सिंग महिला फ्लाय वेट (४८-५१) >> पात्रता फेरी मेरी कोम हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग पुरुष लाईट वेट (५७-६३)>> पात्रता फेरी मनीष कौशिक जलतरण महिला १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट १ माना पटेल जलतरण पुरुष १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट ३ श्रीहरी नटराज हुश्श! भरगच्च कार्यक्रम आहे!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 07/25/2021 - 11:02 नवीन
महिला १० मीटर पिस्तूल >> पात्रता फेरी (मनू भाकर आणि यशस्विनी सिंह देस्वाल) बाहेर *** आर्टिस्टिक जिमॅस्टिक महिला>> पात्रता फेरी प्रणती नायक बाहेर मागच्या वेळी दीपा कर्माकरचं पदक थोडक्यात हुकलं होतं. नेत्रा कुमानन, दीपा कर्माकर, प्रणती नायक अशा खेळात प्रतिनिधित्व करतात ज्यांची नावे वाचल्यावर हे काय आहे, ते पाहण्यासाठी गुगल करावं लागतं. अशा परिस्थितीत त्या तिथपर्यंत पोहचल्या, हेच खूप मोठं यश आहे. अर्थात अल्पसंतुष्टपणा नाही, पण पदक न मिळताही त्यांना यशस्वी म्हणावं लागेल. *** रोईंग पुरुष दुहेरी >> (पुनः प्रयत्न) पात्रता फेरी अरुण लाल जाट अरविंद सिंग >> उपांत्य फेरीत दाखल **** बॅडमिंटन महिला एकेरी ग्रुप J राऊंड >> पी व्ही सिंधू विजयी विरुद्ध इस्रायल **** टेनिस महिला दुहेरी >> पहिली फेरी सानिया मिर्झा+ अंकिता रैना पराभूत विरुद्ध युक्रेन **** १०मीटर एअर रायफल पुरुष एकेरी >> पात्रता फेरी दीपक कुमार दिव्यांश पनवर बाहेर **
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 07/25/2021 - 07:56 नवीन
एक गोष्ट लक्षात आली आहे, इतर देशांच्या खेळाडूंच्या कपड्यांवर स्पॉन्सरचे लोगो दिसतात. भारतीय खेळाडूंच्या कपड्यांवर (अर्थात अपवाद सोडून) लोगो दिसत नाहीत. बहुतेक सगळे भारतीय खेळाडू वैयक्तिक अथवा सरकारी अर्थसाहाय्यावर अवलंबून आहेत.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 07/25/2021 - 09:30 नवीन
पी.व्ही सिंधू खेळाचे हायलाईट! भारी! https://www.facebook.com/olympics/videos/341655644164207/?app=fbl
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 07/25/2021 - 16:44 नवीन
पुरुष स्कीट शूटिंग >> पात्रता फेरी दिवस-१ : भारत बाहेर. (राज्यवर्धन राठोड यांना ज्यात रजत पदक मिळालं होतं) मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान. (टॉप सहा खेळाडू अंतिम फेरी खेळतील. ) कदाचित यात दिवस २ आहे, ज्यात रँकिंग उंचावण्याची संधी असेल. **** नौकानयन Laser Radial Women नेत्रा कुमानन सोळाव्या स्थानी आहे. पण पुढील फेरीत जाण्याचे नियम माहिती नाहीत. उद्या कदाचित कळेल. **** टेबल टेनिस पुरुष एकेरी >> दुसरी फेरी साथीयन G हाँगकाँग विरुद्ध चुरशीच्या सामन्यात पराभूत झाला. **** टेबल टेनिस महिला एकेरी >> दुसरी फेरी मनिका बात्रा विजयी विरुद्ध युक्रेन **** बॉक्सिंग महिला फ्लाय वेट (४८-५१) >> पात्रता फेरी मेरी कोम विजयी विरुद्ध डॉमिनिकन रिपब्लिक २०१२ लंडन मध्ये कांस्य विजेती, चार मुलांची आई, ३८ वर्षे वय. जिगरबाज!! **** खालील लढती आज बाकी आहेत. हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग पुरुष लाईट वेट (५७-६३)>> पात्रता फेरी मनीष कौशिक जलतरण महिला १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट १ माना पटेल जलतरण पुरुष १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट ३ श्रीहरी नटराज
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 07/25/2021 - 10:45 नवीन
भारताच्या प्रिया मलिक ला सुवर्ण
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 07/25/2021 - 11:42 नवीन
हंगेरीत. दुसरीकडे.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sun, 07/25/2021 - 12:37 नवीन
हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना विरुद्ध ऑस्ट्रेलिया ५-१ पहाणे सोडून दिले!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 07/25/2021 - 16:21 नवीन
हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना भारत पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १:७ अतिशय दारुण पराभव. भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऑलिंपिक स्पर्धेत इतका वाईट पराभव कधी झाला नसावा. **** बॉक्सिंग पुरुष लाईट वेट (५७-६३)>> पात्रता फेरी मनीष कौशिक पराभूत विरुद्ध इंग्लंड ४:१ **** जलतरण महिला १०० मीटर बॅक स्ट्रोक >> पात्रता फेरी माना पटेल बाहेर. एकूण खेळाडूंमध्ये ३९वा क्रमांक. केवळ टॉप १६ खेळाडू उपांत्य फेरीत पात्र ठरले. *** जलतरण पुरुष १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट ३ श्रीहरी नटराज बाहेर. एकूण खेळाडूंमध्ये २७ वा क्रमांक. केवळ टॉप १६ खेळाडू उपांत्य फेरीत पात्र ठरले. **** एकूण आजचा दिवस वाईटच गेला. जे पराभव झाले ते अतिशय वाईट झाले. मेरी कोम, सिंधू, मनिका बात्रा आणि अरुण लाल जाट व अरविंद सिंग अशा केवळ चार स्पर्धात पुढील फेरीत जाण्यापुरते यश मिळाले. त्यातील पहिले दोन अपेक्षित होते.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 07/25/2021 - 18:16 नवीन
आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरताना भारतीय पुरुष संघाने सात गोल स्वीकारले. 1928 ते 1956 दरम्यान च्या सर्व सहा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मिळून भारताने केवळ सात गोल स्वीकारले होते.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 07/25/2021 - 16:23 नवीन
चीन, जपान आणि अमेरिका अनुक्रमे ६, ५ व ४ सुवर्ण पदकांसह पहिल्या तीन स्थानी. भारत एक रजत पदकासह २४ वा क्रमांक.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 07/30/2021 - 03:53 नवीन
१. टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी सुमित नागल विरुद्ध रेफ्यूजी ROC संघाचा दानील मेदवेदेव *** २. तिरंदाजी पुरुष सांघिक : उपांत्यपूर्व विरुद्ध कझाकस्तान *** ३. टेबल टेनिस महिला एकेरी : तिसरी फेरी मनिका बात्रा विरुद्ध ऑस्ट्रिया *** ४. तलवारबाजी (फेन्सिंग) : Women's individual sabre पहिली फेरी भवानी देवी विरुद्ध ट्यूनीशिया *** ५. टेबल टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी शरथ कमल अचंता विरुद्ध पोर्तुगाल *** ६. बॅडमिंटन पुरुष दुहेरी : पहिली फेरी गट A सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी *** ७. नेमबाजी पुरुष एकेरी - Skeet : दिवस २ मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान. *** ८. जलतरण पुरुष एकेरी : २०० मीटर बटरफ्लाय : पात्रता फेरी साजन प्रकाश *** ९. बॉक्सिंग पुरुष मिडलवेट : पात्रता फेरी आशिष कुमार विरुद्ध चीन *** १०. हॉकी महिला : गट फेरी A विरुद्ध जर्मनी
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 07/26/2021 - 12:39 नवीन
https://www.indiatoday.in/sports/tokyo-olympics/story/tokyo-2020-china-zhihui-mirabai-chanu-gold-weightlifter-doping-test-1832734-2021-07-26 खरच कालच मला स्वप्न पडलं होते हे!पहाटे पडलं असेल तर नक्की सत्यात उतरेल :) चायनीज विजेता खेळाडू डोपींगमध्ये सदोष आढळण्याची शक्यता तेव्हा मीराबाई चानु यांना गोल्ड मिळण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 14 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 14 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 14 hours ago
  • सुंदर !!
    1 day 14 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा