Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

|| गे आये ऑलिम्पिकामाते ||

ज
जे.पी.मॉर्गन
Fri, 07/23/2021 - 05:36
💬 11 प्रतिसाद
|| गे आये ऑलिम्पिकामाते || बा गजानना, मारोतीराया - भीमसेना.... ग्रीकांच्या क्रेटॉस देवा... अथेन्सच्या राणा झीअसा.... जापान्यांच्या सोजोबो देवा.... आज तुमां सांगणो करतंव महाराजा ! दर चार वर्षाप्रमानं आमी तुमची जी काय वेडीवाकडी सेवा केलेली हा... ती मान्य करूं घ्या... त्यात काय चूक-अपराध झालो असंल... तं लेकरांक क्षमा करा...आणि अलास्कापासून जपानपर्यंत आणि हिंदुस्तानापासून सेनेगलपर्यंत सर्वांची रखवाली करा.. सांभाल करा वो महाराजा | आजपासून टोक्योमध्ये जो ऑलिम्पिक खेलांचा घाट घातला असा... तो जगभरातली पोराटोरा, म्हातारे कोतारे, बायाबापड्या साजारो करतत. ह्या खेळांक महामारी, असुरक्षा, अपघाता पासून दूर ठेवा... आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात तं दूर करा वो महाराजा ! कोनत्यापन देशाच्या कोनापन खेळाडूनी गेली पाच वर्षं आणि आयुष्यभर जीव तोडून मेहनत केली असेल... त्यांच्या देशाचं नाव उंचावायला, त्यांच्या खेलांमध्ये सगल्यांत चांगला होऊक ज्यांनी कोनी घाम गाळला असेल.... त्यांच्या कष्टांना फळ द्या वो महाराजा ! आमचे झील बजरंग पूनिया, नीरज चोप्रा, सौरभ चौधरी... आमची हॉकी खेलनारी पोरां... सार्‍यांनी खूप मेहनत केली असा... त्यांच्या हाताला यश द्या. सिंधू, मेरी कोम, विनेश फोगाट, दीपिका कुमारी, मनू भाकर ह्या आमच्या चेडवांक सोन्या - रुप्या - काश्यात मढवा वो महाराजा ! २०६ देशांची ही खेलनारी पोरां मानवजातीचो भविष्य हत. नेमबाजांचे आणि तीरंदाजांचे नेम बसूदे, धावनार्‍यांची धाव सुसाट सुटूदे, कुस्तिगीरांची - बॉक्सरांची ताकद अफाट वाढूदे, पोवनारे मासोळीगत पोवूदे, संघांमध्ये ताळमेळ असूदे. जुने विक्रम मोडूदे, नवे पराक्रम घडूदे. आजून वेगात, आजून उंच आणि आजून ताकदवान होताना ह्या खेलांच्या निमित्तानी जगातल्या सगल्या चांगल्या - चुंगल्या लोकांना एकत्र येन्याची आणि प्रेमाने राहान्याची बुद्धी द्या वो महाराजा ! होय महाराजा!! Olympics जे.पी.मॉर्गन २३ जुलै २०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7066 views

💬 प्रतिसाद (11)
स
सुखी Fri, 07/23/2021 - 05:53 नवीन
होय महाराजा!!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 07/23/2021 - 06:17 नवीन
गाऱ्हाणे आवडले. किती ऑलिंपिक विक्रम, जागतिक विक्रम, कोणत्या देशाला किती पदके, मैदानी क्रीडाप्रकार, हॉकी, नेमबाजी यावर विशेष लक्ष्य असेल.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Fri, 07/23/2021 - 06:51 नवीन
जाणकारांनी वेळोवेळी या धाग्यावर पदकं, विक्रम याविषयी सतत माहिती पुरवावी ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 07/23/2021 - 06:59 नवीन
सांभाळून राहा रे महाराजा.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 07/23/2021 - 10:31 नवीन
व्हय म्हाराजा!! (परत कोरोनाचं सावट दिसायला लागलंय. स्पर्धा निकोप पार पडू दे. भारतीय खेळाडूंना पाच-धा गोल्ड अन धा-वीस शिल्वर-ब्रान्झ मिळू दे अशी एक प्रार्थना!)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 07/23/2021 - 11:45 नवीन
व्हय म्हाराजा!!
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 07/23/2021 - 13:28 नवीन
यावेळी आपले बहुतांश खेळाडू पदक जिंकतील अथवा सगळेच होपलेस जातील... असा होरा आहे
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Fri, 07/23/2021 - 13:28 नवीन
व्हय महाराजा
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 07/23/2021 - 20:13 नवीन
होय महाराजा!! _/\_ गाऱ्हाणे आवडले.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 08/07/2021 - 15:43 नवीन
ऑलिम्पिकामातेने मॉर्गन रावांचं अन समद्या मिपाकरांचं गाऱ्हाणं ऐकेलेलं आहे. भारताने ऑलिंपिक मध्ये वन टू का फोर करत येक सोन्याचं, दोन चांदीची अन् चार कांस्य पदकं जिंकून इतिहास घडवलेला आहे. मीराबाईच्या रुपेरी यशाने सुरू झालेल्या भारताच्या टोक्यो प्रवासाची सांगता निरजच्या सोनेरी यशाने झाली... सगळ्या पदक विजेत्यांचे, सहभागी खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे, तिथे बरोबर गेलेल्या सपोर्ट स्टाफचे, इथे सर्व सोई पुरवणाऱ्या विविध क्रीडा संस्थांचे आणि मिपाकरांचे दणदणीत अभिनंदन!! व्हय म्हाराजा!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 08/07/2021 - 15:58 नवीन
आजि सोनियाचा दिनु! (आयला, हे काहीतरी भलतंच वाटतंय! ;) ) सं - दी - प
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा