Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

विठ्ठल नाम

B — Bhakti, Tue, 07/20/2021 - 06:16
अभंगाची गोडी चिपळाची जोडी विठ्ठल नाम माळी भक्ती फुले भाबडी... अगम्य भिंती तोडी शरीर झोला सांडी चराचर चैतन्य बहू मना सुख जोडी... वेल वाढती वाकडी शोधे आधार बापुडी नाही बांडगुळ हे जाण तू बांध नामाची झोपडी... वाट पाहून थकली येईल मोक्ष कावडी रोज रोज का मग डोळ्यांत सूर्य बुडी... -भक्ती

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5447 views

💬 प्रतिसाद
ग
गॉडजिला Tue, 07/20/2021 - 10:37 नवीन
वाट पाहून थकली येईल मोक्ष कावडी रोज रोज का मग डोळ्यांत सूर्य बुडी... याचा अर्थ काय ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 07/20/2021 - 10:55 नवीन
मोक्ष मिळेल म्हणून वाट पाहून जीव थकलाय पण अजूनही तो मिळाला नाहीये. रोज रोजच सूर्यास्त पाहावा लागतोय म्हणजे अजूनही हे दैनंदिन जीवन चालूच आहे. मोक्षाची वाट बघणे सुरुच आहे असे काहीसे म्हणावयाचे आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 07/20/2021 - 11:34 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 07/20/2021 - 14:04 नवीन
जिलाजी धन्यवाद धन्यवाद प्रचेतस! थोडासा वेगळा अर्थ , मोक्ष हा आहे पण तीचे रूप अजूनही साजिरे झाले नाही असे रोजच्या दिनक्रमात वाटते,ऐहिक जीवन सोडून आपल्या​लाही मोक्षाची आस आहे..त्याने जीव थकतो.पण सायंकाळी सुंदर सूर्य बुडताना वाटतं ना कधी कधी आज दिवस खरोखर सुंदर होता,असाच उद्याही सुंदर दिवस व्हावा आणि असाच रोज रोज सूर्य बुडताना पाहावा...हाही ऐहिक जीवनातला त्या दिवसातला मोक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/22/2021 - 10:41 नवीन
हाही अर्थ वेगळाच, आवडला.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 07/22/2021 - 10:57 नवीन
एकदम छान!
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 07/22/2021 - 11:13 नवीन
वाट पाहून थकली येईल मोक्ष कावडी रोज रोज का मग(?) डोळ्यांत सूर्य बुडी... इथे का मग (?) वाक्याने गोंधळ उडतो इतके सगळे व्यवस्थित काव्य शेवटी प्रश्न कसा पाडून संपले ते काही झेपले न्हवते. अगदी प्रत्यक्ष प्राच्यविद्या संशोधक संस्थेकडून जरी सकारात्मक स्पष्टीकरण आले होते तरीही... पण शेवटच्या ओळी प्रश्न न्हवे तर समाधान दाखवत आहेत हा उलगडा आपण केल्याने. अब सब ठीक..._/\_
  • Log in or register to post comments
प
पुष्कर गुरुवार, 07/22/2021 - 11:27 नवीन
अन्वय लावायचा झाला तर, सूर्य रोज रोज डोळ्यात का बुडे - असा होईल. सूर्य बुडे असं पाहिजे ना? सूर्य बुडी असं क्रियापद होणार नाही. सूर्याने बुडी मारली - इथे बुडी हा शब्द बरोबर आहे, पण तो इथे क्रियापद नाही. फक्त 'डे' तुमच्या वरच्या डीकारान्त वाक्यांशी यमक साधणार नाही ही समस्या आहे खरी!
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 07/22/2021 - 14:46 नवीन
पण एवढा विचार नाही केला मी, तरीही तो शब्द समर्पक वाटला आणि लिहीला.
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Fri, 07/23/2021 - 01:31 नवीन
हरकत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/22/2021 - 11:14 नवीन
रचना आवडली. लिहिते राहा. संत नामदेवांची सहज आठवण आली- मुख्य मातृकांची संख्या | सोळा अक्षरे नेटक्या समचरणी अभंग | नव्हे ताळ छंदो भंग || -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 07/22/2021 - 14:46 नवीन
विठ्ठल विठ्ठल सर्वांना _/\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा