Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

दुसरे घर (सेकंड होम) घेताय ? तेही कर्ज काढून ? एकदा हे वाचाच !

K
kvponkshe
Sun, 07/18/2021 - 13:21
🗣 106 प्रतिसाद
मला मान्य आहे की ही पोस्ट वाचून तुम्हास मी शेखचिल्ली आहे की काय अशी शंका येईल. पण जे घडलाय ते मी इथे सांगितलंय. मला तुम्ही क्रिटिसिझ करू शकता. पण ते करताना , मी या प्रकरणात खूप मनस्ताप भोगलाय हे समजून घ्या. मी घेतलेला निर्णय कदाचित तुम्हास पटणार नाही , पण मी तो घेतलाय, कारण मी त्या निर्णयाबाबत कन्व्हिन्स्ड आहे. पण मी तुमच्या मताचा सन्मान करतो. मी केलेल्या चुका दुसर्याने करू नये इतकाच माझा उद्देश आहे. कर्ज काढून फ्लॅट घेऊन तो भाड्याने देऊन काही वर्षांनी तो ३ पट किमतीस विकून मालामाल होण्याचे अनेक किस्से मी कैक वर्षे ऐकत आलेलो होतो. इतर नातेवाईक, मित्र मंडळी बिनधास्त फ्लॅट खरेदी करत असल्याचे मी पाहत होतो. स्वतःचा दुसरा एक फ्लॅट असावा, जिथे स्वतःचे कार पार्किंग असावे, गेटेड सोसायटी असावी आमची खुप वर्षांपासूनची इच्छा होती. कर्ज काढून फ्लॅट घ्यावा, तो भाड्याने देऊन काही वर्षांनी विकून आपण ही मालामाल व्हावे म्हणून मी पुण्यात धायरी येथे एका मोठ्या सोसायटीत १ BHK फ्लॅट कर्ज काढून घेतला. त्याची ही गोष्ट. एक दिवस फेसबुक वर मी संबंधित फ्लॅट ची जाहिरात पहिली. फोटो पाहून फ्लॅट आवडला. मग फ्लॅट मालकाशी संपर्क करून मी आणि कुटुंबीय तो फ्लॅट पाहून आलो. फ्लॅट चांगलाच होता. पण मालक त्या फ्लॅट चे ४३ लाख सांगत होते. फ्लॅट आम्हास इतका आवडला होता, की मी तिथेच ४० लाख रुपयास तो व्यवहार पक्का करून आलो. त्याच दिवशी त्यांना टोकन म्हणून ५०,०००/- ट्रान्सफर केले. २०१९ मध्ये खरंतर धायरीत १ BHK ५०९ स्के. फु. चा ४० लाखास घेणे हा मूर्खपणा होता. मी आजूबाजूस जरा चौकशी केली असती तर मला ४२ लाखात धायरीत २ BHK तोही नवा कोरा मिळाला असता. माझ्या बायकोच्या बहिणीस मी नंतर दुसऱ्या दिवशी तो फ्लॅट दाखवला. तिला फ्लॅट आवडला पण, मी फार महागात तो फ्लॅट घेत आहे हे तिला जाणवत होते. तिने अप्रत्यक्ष पणे मला तसे सांगून ही पहिले. पण दुर्दैवाने मला तिच्या "इन बिटवीन द लाईन्स" मधला अर्थ कळाला नाही. किंवा मी तो कळून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो म्हणा. मग तिने मला माझ्या फिनान्शियल सल्लागाराशी एकदा बोलून घ्या असे सांगितले. सल्लागाराने हा व्यवहार निव्वळ मूर्खपणाचा आहे असे मला स्पष्ट सांगीतले. पण मी फ्लॅट मालकास ५००००/- टोकन आणि शब्द देऊन बसलो होतो. आता बॅक ऑफ करणे मला योग्य वाटेना. सल्लागाराने मला ५०,०००/- अक्कलखाती गेले असे समज आणि मोठे नुकसान टाळ असे सुचवले. पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. दिलेला शद्ब मोडणे माझ्यासाठी फार लज्जास्पद होते. शेवटी मी ऐकत नाही असे पाहून माझ्या बायकोच्या बहिणीने आणि सल्लागाराने नाद सोडून दिला. मी बाकी कोणा नातेवाईकांचा सल्ला पण घेतला नाही. कारण मला त्यांना "सरप्राईझ" द्यायचे होते. आता ४० लाखाचा फ्लॅट घेण्यासाठी मला स्वतःचे भांडवल उभे करावे लागणार होते. कारण बँक कर्ज ९० टक्के देणार होती. म्हणजे ३६ रुपये मला कर्ज मिळणार होते. उरलेले ४ लाख +स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन + वकील फीज + सोसायटी ट्रान्स्फर असे मिळून जवळपास ७ लाख रुपये मला जमवायचे होते. हे पैसे मी माझी म्युच्युअल फंडातील इन्व्हेस्टमेंट मोडून, मागे मी चांदी ५६००० रु असतांना घेतलेली ती ३६००० रुपयास विकून, काही पैसे बाबांकडून घेऊन ७००००० रु उभे केले. HDFC मधून ३६,००,०००/- मला कर्ज १९ वर्षांसाठी ८.७५ टक्के व्याजाने मंजूर झाले. आणि मी तो फ्लॅट घेतला. मला ३२४४० रुपये EMI पडणार होता. असे ३२४४०/- रुपये ११० महिने न चुकता भरले आणि काही व्याज भरले की मी कर्ज मुक्त होईन असा मला मूर्खासारखा भ्रम होता. मी अमोर्टिझशन चा अभ्यास केला असता तर अशा मूर्ख भ्रमात मी राहिलो नसतो. असो. मला पहिला झटका बसला ते माझा पहिला हप्ता कट झाल्यावर. हफ्ता आणि माझे नेहमीचे SIP कट झाल्यावर फारच कमी रक्कम मला वापरायला मिळाली. त्यावर आता महिना भागवणे भाग होते. मी फटाफट माझे सगळे सिप बंद करून टाकले. निदान पुढील महिन्यात जास्त पैसे वापरायला मिळतील या उद्देशाने. पहिला हफ्ता कट झाल्यावर मी एकदा सहज माझे कर्ज अकाऊंट स्टेटमेंट पहिले. माझ्या अपेक्षेनुसार आता कर्ज रक्कम ३५,६७,५६० रुपये इतकी बाकी हवी होती. प्रत्यक्षात 3593810.08 रुपये इतका कर्ज बॅलन्स दाखवत होता. मी hdfc ला भेट देऊन हा काय प्रकार आहे ते विचारले. त्यांनी मला मी सही केलेला अमोर्टिझशन चा चार्ट दाखवला. त्या नुसार बँकेने 26250.00 रुपये व्याज कापून घेतले होते आणि 6189.92 रुपये मूळ मुद्दलातुन कापले होते. मी चुपचाप घरी आलो. गुगल करून अमोर्टिझशन चार्ट्स डाउनलोड केले. त्यात माझे संबंधित आकडे टाकून पहिले आणि मी हाललोच. पुढील १९ वर्षात मी hdfc ला व्याज + मुद्दल धरून एकूण 73,96, 300/- रुपये देणार होतो. म्हणजे सोप्या शब्दात तो फ्लॅट मला जवळपास ७४ लाखास पडणार होता. शिवाय वीज बिल, सोसायटी, वार्षिक मालमत्ता कर वगैरे इतर वेगळाच. मी काय मूर्खपणा करून बसलोय हे मला पहिल्यांदा कळले. आता १९ वर्षांनी या फ्लॅट ची किमंत जर ८० लाख जर आली तर मी फायद्यात राहणार होतो. शिवाय ही कर्ज हफ्ते फेडून मी बाकीचे काहीच इन्व्हेस्ट करू शकत नव्हतो. म्हणजे हा फ्लॅट सोडला तर माझी काहीच पुंजी नसणार होती. मी माझ्या धायरीतील काही मित्रांना फोन करून परिस्थिती बाबत चर्चा केली. (जी मी खरंतर हा व्यवहार करण्या पूर्वी करायला हवी होती.) त्यांनी पहिले तर मला शिव्या घातल्या. मी जो फ्लॅट घेतला होता, त्याची जास्तीत जास्त किमंत ३६,००,०००/- होती. तो मी ४०,००,००० ला घेतला होता. मनसोक्त शिव्या देऊन झाल्यावर मित्रांनी मला आता तो फ्लॅट भाड्याने देऊन त्यातून मासिक हप्ताचा भर कमी करण्यास सुचवले. पुढे रियल इस्टेट जोमात आल्यावर विकून टाक असे सुचवले. मग मी सोसायटीत भाडे किती मिळेल याचा अंदाज घेतला. जास्तीत जास्त ६००० रुपये इतकेच भाडे मला मिळणार होते. म्हणजे फार काही विशेष फरक पडणार नव्हता. मग मी काही मित्रांना जे रियल इस्टेट मध्ये काम करतात त्यांना फोन केला आणि धायरीत पुढे कितपत फ्लॅटला ऍप्रिसिएशन मिळेल याचा अंदाज घेतला. असा अंदाज देणे कठीण आहे असे सगळ्यांनी मला सांगितले, पण एकुणात मला कळले की १९ वर्षानी माझ्या फ्लॅटची किमंत साधारण ९० लाख येईल. हा सुद्धा अंदाजच. कदाचित धायरीत काही आमूलाग्र बदल पुढे झाला तर कदाचित अजून किंमत येईलही, पण या सगळ्या जरतर च्या गोष्टी झाल्या. आज फॅक्ट अशी होती की मी चुकीच्या ठिकाणी हात घातला होता. मी माझ्या फिनान्शियल सल्लागाराला शरण गेलो आणि आता काय करू असे विचारले. त्याने मला झाप झाप झापले आणि तो फ्लॅट आता अक्कलखाती अंगावर घेऊन बस असे सुनावले. माझ्या बायकोच्या बहिणीने पण मला झापून तो फ्लॅट भाड्याने देऊन आहे तसाच ठेऊन मग रियल इस्टेट जोमात आल्यावर विकायचा सल्ला दिला. मी खूप खजील झालेलो होतो. नातेवाईक , मित्र मंडळी जे मला पूर्वी रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक कर म्हणून मागे लागले होते ते आज मला क्रिटिसिझ करत होते. त्यांना सरप्राईझ द्यायच्या नादात मी डिसास्टर ओढवून घेतले होते. मित्रांत, नात्यात माझ्या शेखचिल्ली पणाची थट्टा चाललेली मला कळत होती. आता एकतर मला तो फ्लॅट गळ्यात घेऊन बसावे लागणार होते, किंवा विकून नुकसान सोसून त्यातून बाहेर पडावे लागणार होते. मी शांतपणे काही गणिते मांडली. जर फ्लॅट ठेवला तर वरील अंदाजानुसार साधारण पणे (९० लाख ही १९ वर्षानंतर ची फ्लॅटची किंमत - मी फेडलेले कर्ज 7४ लाख ) = १६ लाख फायदा.(बाकी येणारे भाडे + अन्य खर्च - टॅक्स फायदा हा भाग अलहिदा !) दुसऱ्या पर्यायात : आता तो फ्लॅट समजा विकला तरी जास्तीत जास्त ३६००००० ला विकला जाणार होता. म्हणजे ४ लाख + स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन + इतर खर्च + गेलेले आणि जाणारे हफ्ते असा एकूण जवळपास १० लाखाचा फटका. पण मी यातून काय मिळवणार होतो? माझ्या हफ्त्याचे जे ३२४४० रुपये होते ते मी अगदी ७ टक्के या अपेक्षित दराने योग्य फंडांत गुंतवले, तरी मला १९ वर्षांनी १ कोटी . ५३ लाख रु मिळणार होते. आता तुम्ही म्हणाल की ७ टक्के मिळतीलच असे कशावरून? कदाचित ५ टक्केच मिळतील? पण मग हा नियम वरील सिनॅरिओत पण आहे ना? ९० लाखच कशावरून मिळतील? ७० लाख च मिळाले तर? किंवा अगदी उलट बोलले तरी सुद्धा हेच लागू होते. म्हणजे ९० लाख च का धरले? १ कोटी १० लाख पण फ्लॅट विकून मिळतील. मग ७ टक्केच का धरायचे? इक्विटीत १५ टक्के पण मिळतात. असो. मी वरील गणिते माझ्या पत्नीशी, मित्रांशी, नात्यात बोललो. पण नुकसानीत फ्लॅट विकायला कोणीच मानेना. फक्त एका मैत्रिणीने माझ्या वरील कॅल्क्युलेशन्सला सपोर्ट केला. शेवटी मी निर्णय घेतला. जवळपास ६ महिने यत्न करून तो फ्लॅट मी ३६ लाख रु. ला विकला. जवळपास १० लाखाचे नुकसान झाले. पण मी लगेच माझे ३५००० चे सिप चालू केले. याला आता २ वर्षे होतील. आज माझी गुंतवणूक वाढताना दिसत आहे. आणि रियल इस्टेट मध्ये काय परिस्थिती आहे हे मी तुम्हास सांगायला नको. यातून मी खूप काही शिकलो, पण त्याची फी १० लाख आहे. मी तुम्हास मात्र ते फुकट सांगणार आहे: • मुळात हा व्यवहार करताना गुंतवणुकीच्या काही मूलभूत नियमांना मी फाटा दिला होता. त्यातील सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नये हा होय. • आपल्याला tangible (स्पर्श करता येऊ शकणारी) असेट चे फार आकर्षण असते. जसे फ्लॅट, प्लॉट, दागिने, रोख रक्कम. पण नॉन tangible मालमत्ता सुद्धा खूप फायदा करून देतात. • कर्ज काढताना अमोर्टिझशन चा अभ्यास जरूर जरूर करा. तुमचे मुद्दल किती आहे, त्यावर व्याज किती जाणार आहे हे अभ्यासा. आणि त्यातून किती परतावा मिळणार आहे हे पहा. कागदावर आकडे मांडा. • माध्यम वर्गीयानी सेकंड होम मध्ये गुंतवणूक करताना दहादा विचार करा. आणि कर्ज काढून सेकंड होम घेताना तर २० वेळा. • रियल इस्टेट हाच गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे हा मुद्दाम पसरवलेला गैर समज आहे. तसेच रिअल इस्टेट मध्ये पैसे गुंतवणे आणि त्यातून भरपूर रिटर्न मिळवणे याला रिस्क घेण्याची इच्छा, तुमची लिक्विडीटी ची गरज, patience लागतात त्याच बरोबर कुठे,कधी आणि किती इन्व्हेस्ट करायची याची correct इन्फॉर्मेशन पाहिजे. • गुंतवणूक करताना तुमच्या सल्लागाराशी मसलत करून ऑलोकेशन ठरवा. एखाद प्रकारची गुंतवणूक एखाद्यासाठी योग्य आहे म्हणून तुम्हास पण ती योग्य असेलच असे नाही. प्रत्येकाच्या गरजा आणि त्यानुसार गुंतवणुकीचे प्रकार बदलतात. • व्यवहारात भावनेस स्थान देऊ नका. आततायी पणे कोणास शब्द, टोकन देऊ नका. वेळ पडल्यास नुकसान टाळण्यासाठी शब्द मागे घ्यायला लागला तरी त्यात काही वाईट किंवा लाज वाटून घेऊ नका. • मोठे नुकसान टाळण्यासाठी थोडे नुकसान सहन करा. • तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक एखादी गोष्ट करतायत म्हणून तुम्ही पण करायला जाऊ नका. रॅट रेस तर नकोच नको. तुमची इतरांविषयी असलेली जेलसी आणि तुलना तुम्हासच गाळात घालते. • फ्लॅट, प्लॉट अशी मोठी गुंतवणूक करताना खूप चौकशी करा. हे व्यवहार म्हणजे एखादा फोन घेणे नाही की आवडला की घेतला आणि हुक्की आली कि विकला. चांगले चांगले फ्लॅट्स, प्लॉट्स २ - २ वर्षे विकले जात नाहीत. शिवाय सध्या मागणीपेक्षा उपलब्धता खूप आहे हे लक्षात घ्या. किमंत नीट घासाघीस करून कमी करून घ्या. • सेकंड होम च्या नादापायी कर्ज घेताना त्यामुळे आपली इतर महत्वाची उद्दिष्टे बाधित होणार नाही ना हे नक्की तपासा. • हव्यास आणि गरज यातील फरक नीट समजून घ्या. तसेच गुंतवणूक आणि बचत यातील फरक समजून घ्या.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 52044 views

🗣 चर्चा (106)
क
कंजूस Sun, 07/18/2021 - 13:36 नवीन
ठेच लागली. पण लेखामुळे आणखी लोक संभाळतील.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 07/18/2021 - 13:45 नवीन
आपल्या फसगतीचा अनुभव इथे मांडल्याबद्दल खरे तर आपले अभिनंदन केले पाहिजे. या लेखाचा फायदा वाचकांना होऊन ते मोठ्या खडड्ड्यत पडणे टळू शकते. माझ्याही अश्या लहान सहान फसगती झाल्या आहेत, पण आपली फसगत आपल्याला हादरवून टाकणारी आणि खुप आर्थिक नुकसान करणारी होती. आपण वेळीच फ्लॅट विकून पुढचा आर्थिक धोका टाळलात हे चांगलेच झाले ! तुमचे हे झालेले नुकसान इतरत्र कोठेतरी नक्की भरून निघेल ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sun, 07/18/2021 - 14:16 नवीन
स्वतःच्या फसगतीबद्दल अशा प्रकारचा लेख लिहीणे हे खरंच धाडसाचे काम आहे असे मला वाटते.. तुमचे नुकसान भरून यावे एवढेच नाही, तर चांगला नफाही व्हावा या सदिच्छेसह हा प्रतिसाद संपवतो.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sun, 07/18/2021 - 14:25 नवीन
सर्वप्रथम धन्यवाद. आपला अनुभव येथे दिल्याबद्दल. कर्जावर काहीच नको या मतापर्यंत आलेलो आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sun, 07/18/2021 - 14:56 नवीन
आपला अनुभव येथे दिलात त्याबद्दल आभार ... यातून लवकर बाहेर पडाल अशी अशा आहे .... पण अशा अनुभवाला सार्वत्रिक (generalize) करू नये .... माझे स्वतः दुसऱ्या घरापासून भरपूर कमावले आहेत .... अर्थात काही पथ्ये पाळणे जरुरी आहे ... उदाहरणार्थ दुसरा फ्लॅट हा नेहमी अपकमिंग भागात घ्यावा. जेथे आत्ता किंमत कमी आहे पण appreciation जास्त मिळेल. जसे मी दुसरा फ्लॅट घेताना हिंजेवाडी मध्ये घेतला (कोथरूड मध्ये नाही). (खराडी हा एक पर्याय होता) तसेच फ्लॅट घेताना अंडर कंस्ट्रक्शन घेतला. त्यामुळे माझ्या पगारातून सुरवातीचे पैसे भरत गेलो आणि बँकेचे कर्ज कमीतकमी काढावे लागले ... असे फ्लॅट साधारणत: ३-४ वर्षात विकायचे असतात. त्यामुळे कर्ज घेताना ४ वर्षानंतर किती मुद्दल शिल्लक असेल याचा पूर्ण कागदावर तयार होता . घर घेण्यापूर्वी घरची आत्ताची किंमत, चार वर्षांनंतर अपेक्षित किंमत, गृहकर्जाचे अपेक्षित मुद्दल या सर्वांचा हिशोब कागदावर लिहूनच मग प्रत्यक्ष कृती केली. यापूर्वीही मी दोन फ्लॅट असेच फायद्यात विकले आहेत. मी माझ्या जुन्या गुंतवणूक का ? कशी? कुठे? या धाग्यात लिहिल्याप्रमाणे फ्लॅट (रिअल इस्टेट) हा एक असेट क्लास आहे. त्याचे आपले काही फायदे आणि काही तोटे आहेत. त्यामुळे पूर्ण हिशेब करूनच कुठलाही गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Sun, 07/18/2021 - 18:52 नवीन
इथे अनुभव लिहिल्याबद्दल आभार. पण तुम्ही दोन गोष्टी मिक्स केल्या आहेत १. फ्लॅट घेताना त्याची किंमत तेथील परिसरातील किमतीप्रमाणे तुम्हाला वाजवी दरात मिळाला नाही. महाग पडला. तसेच त्याचे दरमहा मिळू शकणारे भाडे फार नाही हा ही एक मुद्दा. २. त्याचे कर्ज चुकवताना सुरूवातीला व्याज जास्त असणे. अ‍ॅमोर्टायझेशन श्येडूल वगैरे. यातील दुसरा भाग कोणत्याही गृहकर्जावर लागू असतोच. तुमच्या उदाहरणात जर तो फ्लॅट तुम्हाला ३६ लाखात पडला असता तरी व्याज आकारणी सुरूवातीला जास्तच होणार होती. ती कायमच तशी असणार आहे. कर्ज घेउन दुसरे घर घेण्यात चूक आहे किंवा नाही हे ढोबळपणे सांगता येणार नाही. त्याकरता खालील गोष्टी विचारात घेउन कागदावर किंवा एक्सेल मधे "नंबर्स" मांडून कॅल्क्युलेशन करावे. खरे म्हणजे अनेक रिअल इस्टेट वाल्या लोकांकडे अशा कॅल्क्युलेशनची टेम्प्लेट तयार असते. फक्त त्यात आपले नंबर्स घालायचे. - फ्लॅटची किंमत - त्या भागातील किंमत वाढीचा अंदाज (वार्षिक) - व्याजदर - यातून मिळणारा टॅक्स बेनिफिट - काही असला तर - त्यातून मिळू शकणारे भाडे - मेण्टेनन्स चा खर्च - सोसायटी, कॉर्पोरेशन वगैरेचा वार्षिक खर्च - आणि साधारण ५, १०, १५ वर्षांत विकलात तर फायदा होईल का आणि किती होईल याचे अंदाज. हे सगळे त्यात टाकून मग दरमहा तुम्हाला त्यातून उत्पन्न मिळेल, की आणखी खर्चच होईल हे काढूनच हे कळते. आर्थिक सल्लागार हे नीट समजावू शकतात. यापैकी फ्लॅट्ची किंमत त्या भागातील किमतींच्या मानाने योग्य आहे का हे, व किती भाडे मिळू शकेल हे - या दोन्ही गोष्टी रिअल इस्टेट सल्लागार सांगू शकतात. या दोघांशी चर्चा करूनच मग हे ठरवावे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 07/18/2021 - 19:48 नवीन
कर्ज काढून फ्लॅट घेऊन तो भाड्याने देऊन काही वर्षांनी तो ३ पट किमतीस विकून मालामाल होण्याचे अनेक किस्से मी कैक वर्षे ऐकत आलेलो होतो.
ही पध्दत किमान पुण्यात २०१३ नंतर बाद झाली आहे. हे शक्य नाही. फ्लॅट पहावा घेउन हे प्रकरण मी स्वतः अनुभवले आहे. मी देखील तिन जाणकार लोकांचा सल्ला न जुमानता ते माझा चांगला व्यवहार उधळुन लावायचा प्रयत्न करत आहेत असा विचार केला होता. पण आज मागे वळुन बघितल्यास याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त मीच आहे अन्य कोणी दुरुनही नाही हे मी निक्षुन सांगु शकतो. माझे सर्वस्वी सुदैव इतकेच की वेळीच माझी विनाकर्ज असलेली गुंतवणुक मला एकुण गुंतवणूकीतील सर्व खर्च व व्यवहार खर्च पकडुन १ वर्षात रुपये २०,००० नेट फायदा घेउन मोकळी करता तर आलीच त्यात त्याच्या १/३ रक्कम अजुन टाकुन मी ताकही फुंकुन प्यायचे धोरण अनुसरुन योग्य ठीकाणी ती पुन्हा गुंतवली. ही गुंतवणूक अजुन डबल झाली नाहीये कारण तो काळ आता नाही पण ७+ वर्षांचा कालावधी बघता आजही मी चांगल्या प्रॉफिटमधेच आहे. आणी उशीरा पण पध्दतशीर सर्व गोष्टी नेटाने केल्या म्हणून अनुभवसंपन्न बनुन हे जमले. मी कोणालाच कर्ज काढुन घर घ्यायचा सल्ला देत नाही आणी स्वतः त्या फंदात पडत नाही. प्रसंगी तडजोड करुन २ ऐवजी १ बीएचके घ्या पण ७०%+ रक्क्म खिशातुन घालु शकत असाल तरच घ्या हाच सल्ला देतो. जागा घेताना ती किमान ८-१० लोकांना दाखवायला अजिबात कचरु नये, सरप्राइज हा विषय पुर्णपणे टाळावा :) माझा हा व्यवहार पार पाडताना प्रंसगी सेटींग करुन गोष्टी सुरळीत कशा करायच्या याचे ज्ञानच मला लाभलेली सर्वोच्च उपलब्ध्दता मी मानतो. आजही अनेक परिचीत कागदपत्रांची एक कॉपी वकीलाला व एक कॉपी मला बघायला देतात :) मी स्वतः नीयमीतीकरणाचा कायदेशीर दाखला असुनही त्याची पावती जोडली नसल्याने दोघांना फ्लॅट घेण्यापासुन परावृत्त केल्याबद्दल ते माझे आभार मानतात. ( जुन्या घरांबाबत हे सेटींग सहज करता येते त्यात अवघड काहीही नाही). शक्यतो नावाजलेला बिल्डर, कंप्लिशन सर्टीफिकेट, सर्च रिपोर्ट अथवा सरळ एस्बीआय सारख्या बँकेकडून २० ते ३० टक्के कर्ज मंजुर करुन घेणे ही बाब सर्वात उपयोगी म्हणता येइल. टोकन देताना लेखी ड्राफ्ट करुन द्यावे त्यात साधारण पुढील व्यवहार जर झाला नाही तर १०% रक्क्म कापुन उर्वरीत परत करायची हमी घ्यावी. काही हजारांची बाब असेल तर आपले मन व्यवहाराबाबत द्विधा झाले असल्यास शांतपणे रकमेवर पाणी सोडुन व्यवहार रद्द करुन मोकळे होणे जास्त हितकारक. आपली मानसिकता उत्तरोत्तर जास्त समतोल व मन खंबीर होत जाओ याच आपल्याला माझ्याकडुन मन:पुर्वक शुभेछ्चा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 07/18/2021 - 20:41 नवीन
पुणे,मुंबई सारखी शहर आता ह्याच्या पेक्षा अधिक प्रगत होणार नाहीत.ही त्यांची सर्वोच्च पातळी आहे. फ्लॅट घेणे आणि नंतर प्रचंड फायद्यात विकणे हा काळ निघून गेला आहे. जेव्हा नवीनच बँका गृहकर्ज देत होत्या त्या पण अगदी कमी व्याजावर आणि सहज कोणाला सुद्धा तो सुरुवातीचा काळ अनुकूल होता. तेव्हा फ्लॅट च्या किमती अतिशय कमी होत्या. आणि बँका लायकी पेक्षा जास्त कर्ज घर घेण्यासाठी देवू लागल्या. जे कोणतीच जागा खरेदी करण्याचा विचार पण करू शकत नव्हते त्यांना बँका दोन तीन लाख कर्ज सहज मंजूर करत होत्या. आणि अचानक मिळालेल्या ह्या पैस्या मुळे जो स्वप्नात पण विचार करू शकत नव्हता अशा लोकांकडे कर्ज रुपी पैसा आला आणि लोक घर खरेदी करू लागले. सहज पैसा उपलब्ध झाल्या मुळे घर घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली. मागणी वाढली की किंमत वाढते ह्या तत्व नुसार फ्लॅट च्य किंमती प्रचंड वाढल्या पण बँका गृह कर्ज देत असल्या मुळे वाढलेल्या किंमती चा घर खरेदी व्यवहारा वर काहीच फरक पडला नाही. आणि घरांच्या किंमती फुगल्या. ज्या घरांची किंमत दोन लाख पण रिअल मध्ये नाही ती घर लोकांनी आठ दहा लाख रुपयांना घेतली. हा किंमतीत फुगवटा निर्माण झाल्या मुळेच ४० लाख घराचे भाडे पाच सहा हजार रुपयेच मिळते. लोकांनी हफ्ते थकवले असते तर घर विकून पण बँकाची कर्ज वसूल झाली नसती. बँका पूर्ण रसातळाला गेल्या अस्त्या. गुंतवलेले रक्कम आणि मिळणारे भाडे हे सुसंगत नसेल तर तो फुगवटा आहे असाच त्याचा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
त
तुर्रमखान Sun, 07/18/2021 - 21:51 नवीन
माझ्या माहितीनुसार त्या फ्लॅटची किंमत ३६ लाखसुद्धा खूप होते. धायरी परिसरातले जवळ जवळ सगळे प्रोजेक्ट मला माहीत आहेत. दुसरं घर भाड्याने देउन दरमहा ७-८% पेक्षा जास्त उत्पन्न कमावणे हे पुण्या-मुंबईत प्रचंड अवघड आहे. त्यातही आजुबाजुचा क्राउड बघून ती जागा भाड्याने जाण्याची शक्यता विचारात घ्यावी लागते. सिंहगडरोड परिसर आणि त्यातही धायरी म्हणजे चांगलं भाडं मिळणं खूपच अवघड आहे. दुसरं घर घ्यायचं असेल तर मोठ्या सोसायटीत दोन-तीन बिएचके शिवाय घेऊ नये. माझ्या परिचयातल्या कुणालाच दुसरं घर फायद्यात पडलं नाही. काहीजण मान्य करतात काहीजण मान्य करत नाहीत इतकाच काय तो फरक. त्यांच्या समोर सरळ कागद घेउन तेच पैसे इंडेक्स फंडात किंवा अगदी एफडी केले असते तरी परतावा जास्त मिळाला असता. तो ही काहिही न करता. फ्लॅट घ्यायचा ठरवलाच तर तो न बघता आधी कागद-पेन घेवून एक चेक लिस्ट तयार करावी. त्यात आपल्याला महत्वाचं काय आहे ते लिहावं. म्हणजे पार्क, बसस्टॉप किती लांब आहे. कोणकोणत्या बसेस आहेत. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला त्या ठिकाणाहून ऑफिसला जायला गुगल मॅपने किती वेळ लागतो? सर्व खोल्यात सूर्य प्रकाश येतो का? कितव्या मजल्यावर आहे? पार्किंग कुठे आणि केवढं आहे? हवा खेळती आहे का? गॅलरीसमोर काय आहे? जिने मोठ्ठे आहेत का? आजुबाजूला कचरा डेपो, नाले आहेत का? प्रदुषण आहे का? मोबाईल टॉवर जवळच आहे का? वगैरे. आणि जागा किती त्याच्या हिशोबाने स्केअरफूटांनी किंमत बघावी. सँपल फ्लॅट बघून निर्णय घेउ नये. तो ग्राहकांना फसवण्याच्या दृष्टीने बांधला असतो.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 07/19/2021 - 09:17 नवीन
दुसरं घर घ्यायचं असेल तर मोठ्या सोसायटीत दोन-तीन बिएचके शिवाय घेऊ नये.
अगदी बरोबर. माझ्या पाहण्यातील एकदोन जणांनी या पद्धतीने गुंतवणूक केलेली आहे (हिंजवडी आयटी पार्क जवळ) आयटीवाले लोक कॉम्पेक्स, त्यातल्या सोयी पाहून चांगलं भाडं देतात (आणि हे चढतं असतं, ते ही द्यायला तयार होतात) पण १ बीएचकेचा मात्र बाजार उठलेला आहे !
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 07/21/2021 - 14:37 नवीन
दुसरं घर भाड्याने देउन दरमहा ७-८% पेक्षा जास्त उत्पन्न कमावणे हे पुण्या-मुंबईत प्रचंड अवघड आहे.
नक्की हेच आकडे लिहायचे होते का? माझ्यामते फ्लॅट विकत घेऊन तो भाड्याने दिल्यास गुंतवणूकीच्या केवळ पाव टक्के रक्कम इतकीच दरमहा भाडे म्हणून मिळू शकते. जसे की लेखातला फ्लॅट चाळीस लाखात घेतला गेला आहे तर त्याला जास्तीत जास्त दरमहा भाडे हे रुपये दहा हजार मिळू शकेल (धागालेखक तर सहा हजारच लिहित आहेत).
  • Log in or register to post comments
त
तुर्रमखान Fri, 07/23/2021 - 21:48 नवीन
हे ७-८% म्हणजे घराच्या किमती एवढ्या गुंतवणुकीवर मिळणारा दसादशे परतावा आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 07/19/2021 - 01:16 नवीन
बरं. पण शंका आहे. कारण सेकंड होम घेण्यात भावनात्मक बाजू घुसलेली असते. सल्लागार ओळखीचा असल्यास ते ओळखून गुळमुळीत उत्तर देईल. पण टाइम्स, इंडिअन एक्सप्रेस वगैरे वृत्तपत्रांतून येणारे त्रयस्थ लेख सल्ले देत असतात. तरीसुद्धा ते वाचून आर्थिक कोनाला मागे सारून भावनांची सरशी होऊन उपयोग नाही. - कसं तर अमुक ठिकाणीच घर असावं हा विचार फार दाबणारा असतो. आता गुंतवणूकीच्या कोनातून पाहिल्यास बरेच पर्याय पुढे येतात. त्यात घर, सोने, शेअर्स, म्यु फंड इत्यादी आहेत. २००५-०६ मध्ये प्रॉपर्टी घेतल्या त्याची वाढ पाच वर्षांत खूप झाली. म्हणजे कर्ज काढल्यावर एक रुपयाचे दोन-अडीच रुपये पंधरा वर्षांत परत देतो पण एक रुपयाच्या घराची किंमत सात ते दहापट लवकर झाली. या काळा अगोदर आणि नंतर तेवढी वेगवान वाढ झाली नव्हती. (माझे मत.)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 07/19/2021 - 01:46 नवीन
आपण लिहिलेल्या सारांशातील सर्व मुद्दे यौग्य आहेत परंतु "कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नये" हे सरसकट विधान पटत नाही ( मग ते घराबद्दल असो किंवा इतर गुंतवणुकी बदल असो ) हा हे मात्र खरे कि अतिशय काळजीपूर्वक हे असे काही करावे आपण आणि इतरांनी लिहिलेली सर्व मुद्यांचा विचार करून आणि गणित मांडून "मग" हे यौग्य कीवा आयोग्य म्हणता येईल - देशातील गुंतवणूक कर्ज दर - देशातील इतर समांतर धोका असलेल्या गुंतवणुकीतील परतवा दार? ( समांतर धोका म्हणजे काय असे शकते ? कदाचित मोठ्या कंपन्यांचे बॉण्ड/ रोखे ? किंवा नवजले रिअल इस्टेट म्युच्युअल फंड ) - भाड्याचा दर - आयकर संबंधी * हे मुद्दे हिशोबात आधीच घयावे * यात एक महत्वाचा मुद्दा विचारू इच्छितो ( भारतीय आयकर नियमांनुसार ) - गुंनतवणुकीच्या विक्रीवर कॅपिटल गेन टॅक्स लागतो का? लागत असल्यास कसा? - गुंतवणूक चालू असताना कर्जावरील वय्याज व इतर खर्च हे - मिळणारे भाड्याचे उत्पन्न यातून नगद वार्षिक तोटा झाला तर तो तोटा आपलया वार्षिक इतर उत्पन्नतून वजा करता येतो का ? ( याला इतर देशात निगेटिव्ह गेअरिंग असे म्हणतात म्हणजे जर राहत्या घराशिवाय दुसरी घर गुंतवणुकी केली असले तर येथील आयकर त्यातून होणारेय वार्षिक तोट्यांची रक्कम हि आधी आपली इतर उत्पनातून कमी कमी धर्याला पर्वणी देते उदाहरण नोकरी चे उत्पन्न समजा १००,००० डॉलर वार्षिक तिवारी सरासरी ३०% आयकर बसत असेल पण जर अशी दुसरे घर गुंतवणूक असेल आणि त्यातून वार्षीक ७,००० डॉलर तोटा झालं ( भाडे - (वय्याज + इतर खर्च ) तर तुमचे उत्पन्न १००-७ = ९३,००० डॉलरचा धरले जाते आणि मग त्यावर ३०% आयकर म्हणजे ७००० वरील ३०% आयकर वाचतो अर्हताःत याबरोबर हे सुद्धा आहे कि जेवहा गर विकलं तेवहा कॅपिटल गेन टॅक्स पण लागतो तर आयकराचा हा मुद्दा भारतातात लागू होत असेल तर हिशोबात हे पण घ्यायला हवे म्हणजे "कॅश फ्लो" च्या दृष्टीने हे कळेल कि आपण जर भाडे नाही मिळाले तर किती तग धरू शकतो याचा अंदाज तयार हवा याशिवाय इतर म्हणजे जेव्हा हि जबाबदारी वाढेल तेवहा - आपला मृत्यूविमा वाढवणे
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Mon, 07/19/2021 - 05:35 नवीन
वरती अनेक जणांनी म्हटल्याप्रमाणे दुसरे घर घेऊन त्यापासून प्रॉफिट मिळवायचे दिवस आता गेले. ज्यांनी 2005 ते 2008 साली आयटी कम्पनी जवळील अपकमिंग एरिया, जसे वाकड,हिंजवडी, खराडी, विमाननगर , पाषाण, बाणेर, पिंपळे सौदागर, वगैरे याठिकाणी फ्लॅट घेतले त्यांना प्रचंड फायदा झाला. आता गुंतवणूक करून रेट खूप वाढणार नाहीत. मी मोशीला 1 बीएचके 2014 ला घेतला पण फार रेट वाढले नाहीत आणि भाडे पण यथा तथाच मिळते.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Mon, 07/19/2021 - 06:23 नवीन
दुसरे घर घेऊन फायदा कमवायचे दिवस आता गेले .. असा एक सर्वसाधारण सूर बऱ्याच कमेंट मध्ये दिसतो ... हे बरोबर नाही ... आजही प्रत्येक शहरात नव्याने विकसित होणारे विभाग आहेतच .... आता पुण्यात एकेकाळी कोथरूड होते, नंतर बाणेर / औंध // आता हिंजेवाडी / खराडी आहेत. योग विभागात फ्लॅट घेतला तर अजूनही योग्य प्रॉफिट मिळवणे शक्य आहे. विशेषतः जर आयकर सूटही घेता आली तर तसेच पुण्यात राहून सातारा / कोल्हापूर चा विचार करायलाही हरकत नाही संधी खूप आहेत ... योग्य पद्धतीने हाताळता आल्या पाहिजेत
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 07/19/2021 - 07:13 नवीन
अमर जी जर आयकर सूटही घेता आली तर याबद्दल माहिती असेल तर वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Mon, 07/19/2021 - 09:18 नवीन
काही महत्वाचे मुद्दे : जर तुमचं रहात घर वडिलांच्या / बायकोच्या नावे असेल किंवा दुसरे घर दुसऱ्या शहरात असेल तर दुसरे घर तुमची "First property" होईल आयकर वजावट खालील प्रमाणे : Income Tax Act Maximum Deductible Amount Section 24 Rs.2 lakh per annum (interest) Section 80C Rs.1.5 lakh per annum (Principle) Section 80EE Rs.50,000 (Affordable housing ) Deduction for Joint Home Loan If the housing loan is availed by two or more persons, each of them is eligible to claim a deduction on the interest paid up to Rs.2 lakh each. Tax can be deducted on the principal paid as well for an amount up to Rs.1.5 lakhs each. However, all the applicants should also be co-owners of the property in order to claim this deduction. Therefore, a joint home loan can give you greater tax benefits. Home Loan Tax Benefits of Owning a Second Property As per the current provisions, tax benefits are applicable on payable interests. You can claim the entire paid interest amount. It has been proposed that the second self-occupied home can also be claimed as a self-occupied one to help borrowers save more on taxes. https://cleartax.in/s/home-loan-tax-benefit या लिंकवर अधिक माहिती मिळेल
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Wed, 07/21/2021 - 18:38 नवीन
>> "तसेच पुण्यात राहून सातारा / कोल्हापूर चा विचार करायलाही हरकत नाही" दुसरे घर इन्वेस्ट्मेंट म्हणून घेउन नंतर फायदा होऊ शकतो आणि टॅक्स बेनिफिट ही मिळतो हे साधे सोपे कॅल्क्युलेशन झाले. त्यामुळे नुकसान काय होते बघा. दुसरे घर इन्वेस्ट्मेंट म्हणुन घेतल्यास कारण नसताना घरांच्या किंमती वाढत राहतात. त्यामुळं ज्यांना फक्त राहण्यासाठी घर घ्यायचे आहे त्यांना जास्त प्राइस मोजावी लागते. सॅच्युरेशन येत जाऊन तुम्ही म्हणता तसं कारण नसताना आपण राहत नाही तिथल्या प्राइस वाढवल्या जातात, आणि जे तिथं प्रत्यक्ष राहण्यासाठी घर शोधतायत त्यांना अ‍ॅफोर्डेबल घर चांगल्या भागात मिळत नाही कारण तिथे न राहाणार्यांनी इन्वेस्ट्मेंट म्हणून एक्स्ट्रा घर घेउन प्राइजेस वाढवलेल्या असतात. तुम्हाला फायदा होत असेल किंवा नसेल पण एकंदर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नुकसानच होत जातं बाकिच्यांना. मग ते बाकिच्यांनी आपापलं बघावं, आम्ही घेत राहाणारच असा स्टँड असेल तर मग नो कमेंट्स, पटलं तर वेरी नाईस. बादवे मी कोल्हापूर चा आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 07/22/2021 - 07:16 नवीन
त्यामुळे नुकसान काय होते बघा. हे असे होते जगभरात हे खरे आहे आणि म्हणणे अगदी १००% चुकीचे नसले तरी त्यावर उपाय काय? लोकशाही मध्ये खूप निर्बंध लादणे एवढे सोप्पे नाहीये सरकार ला दोन्हीचा समतोल राखावा लागतो एकांगी विचार करून चालत नाही तसे केले तर ती हि दंडुकशाही होईल - इन्व्हेस्टमेंट वरील कर्ज दार वाढवणे ? - इन्व्हेस्टमेंट वरील सरकारी कर ( स्टँमप ड्युटी) वाढवणे? समतोल साधन्याचे मला महिती असलेले भारताबाहेर उदाहरण सरकारची या मागे एक अजून १-२ कारेन हि असतात १) "गुंतवणूलकीचे घर" यातून त्या उद्योगातील उलाढाल वाढते म्हणजे नवीन घरे बांधली जातात जाऊ शकतात, २) रेंट अफोर्डबीलीटी चा प्रश्न ( भाड्याने परवडणारी घरे नसणे ) यावर हा उपाय असू शकतो येथे सरकार कशी मदत करते आणि कसे नियंत्रण ठेवते याची उद्धरणे मदत : - पहिले घर असेल ( राहते) तर त्यासाठी सरकार मालकाला भत्ता देते १५ ते वीस हजार डॉलर ( छोट्या घराची किंमत धरुयात ३५०,००० ते ४५०,००० डॉलर) -राहत्या घराचं विक्रीवर कॅपिटल गेन टॅक्स नाही - भाडेकरूंना जर सवलतीचं दरात तुम्ही घर देणार असाल तर अश्या भागात नवीन घर बांधणार असाल तर सरकार दरवर्षी १०,००० डॉलर असे १० वर्षे सरकार तुम्हाला देते नियंत्रण : ( तेजि येऊ नये म्हणून ) - गुंतवणुलीचं घर खरेदीवर स्टॅम्प ड्युटी जास्त - कर्जाचा दार थोडा जास्त तेवहा सरसकट "हे वाईटच" असे म्हणे योग्य वाटत नाही आणि फुगवताचा दरवेळी होईल असे हि नाही
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 09/08/2021 - 17:06 नवीन
हे असे होते जगभरात हे खरे आहे आणि म्हणणे अगदी १००% चुकीचे नसले तरी त्यावर उपाय काय? लोकशाही मध्ये खूप निर्बंध लादणे एवढे सोप्पे नाहीये
निर्बंध लादायची फारशी आवश्यकता नाही. सरकारने फक्त काही गोष्टी कराव्यात १) उद्योगांचे केंद्रिकरण टाळावे जेणेकरुन काही मोजक्या शहरांची लोकसंख्या अनैसर्गिकपणे अतिरेकी वाढणार नाही २) सर्वच शहरे, गावे ई ठिकाणी योग्य त्या पायाभूत सुविधा - चांगले रस्ते , पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ई असावे. कायदा सुव्यवस्था असावी. यामुळे लोकांचा "अमूक एका" भागातच राहण्याकडचा कल कमी होईल. ३) कोणत्याही गृहनिर्माण संस्थेत किंवा खास परवानगी घेतलेल्या संस्थात कंपन्या व्यावसायिक तत्वावर घरे खरेदी करुन भाड्याने देवू शकतात काय ? मला याबाबतचे कायदे माहित नाही पण अशा प्रकारचे व्यावसायिक कंपन्यानी भाड्याने दिलेले घर माझ्या बघण्यात / ऐकण्यात नाही. त्यामुळे ही सुविधा निर्माण होण्याकरिता कायद्यात आवश्यक ते बदल करावेत. ४) सरकारी शाळा वा आरोग्यसुविधा यांचा दर्जा व उपलब्धता सुधारावी. बाकी नियमन आणायचेच असेल तर पर्याय १) पती वा पत्नी यांच्यापेकी कुणाच्याही नावावर एक घर असेल तर दुसर्‍या घराकरिता स्टॅम्प ड्युटीचे दर हे बरेच जास्त असावेत
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/22/2021 - 08:25 नवीन
@उन्मेष दिक्षीत दुसरे घर इन्वेस्ट्मेंट म्हणुन घेतल्यास कारण नसताना घरांच्या किंमती वाढत राहतात. त्यामुळं ज्यांना फक्त राहण्यासाठी घर घ्यायचे आहे त्यांना जास्त प्राइस मोजावी लागते. हा अतिशय एकांगी प्रतिसाद आहे एवढे बोलून मी खाली बसतो. याच न्यायाने या प्रतिसादाचा अर्थ --गरजे पेक्षा जास्त कपडे शिवल्यामुळे शिंप्यांचे दर वाढतात आणि गरिबाला कपडे शिवणे परवडत नाही -- असा लावता येईल का याचा विचार व्हावा.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 07/22/2021 - 09:05 नवीन
@ उन्मेष दीक्षित साहेब ... हा जुनाच वाद आहे .... वीस वर्षांपूर्वी "मुंबईकरांनी पुण्यातील घरांच्या किमती वाढवल्या" असं म्हणण्याची फॅशन होती. दुसऱ्या घराचे फायदे (वैयक्तिक नाही तर Macro Economic आणि सामाजिकही ) - जर मी दुसरे घर घेतले तर मी त्या घराची घरपट्टी / पाणीपट्टी वगैरे तिथल्या नागरपालिकेसच देतो - मी जर ते भाड्याने दिले तर भाडेकरू कडे काम करणारे स्थानिकच असतात तसेच तो किराणा वगैरे स्थानिक दुकानदाराकडूनच घेतो - जर दुसऱ्या घर खरेदीमुळे मागणी वाढली तर त्या प्रमाणे पुरवठाही वाढतो. नवीन बिल्डर्स येतात / नवीन प्रोजेक्ट्स येतात. त्यातून राज्याला महसूल मिळतो आणि स्थानिकांना रोजगार आणि सगळ्यात महत्वाचे ... समजा जर तुमच्या थेअरी प्रमाणे जर कोणीच दुसरे घर घेतले नाही .... याचा अर्थ कोणालाही भाड्याने घर मिळणार नाही .. आता एखादा कोल्हापूरला (कुठल्याही शहरात) कामानिमित्त आला ... त्याला लगेच स्वतः चे घर घेणे शक्य नाही ... आणि कोणाकडे भाड्याने द्यायला घर नाही ... (कारण घराच्या किमती वाढू नयेत म्हणून कोणी दुसरे घर घेतले नाही आणि स्वतःचे रहाते घर कोणी भाड्याने देत नाही) मग अशा वेळी काय करायचे ? स्थलांतर बंद करायचे? थोडक्यात कुठल्याही ऍक्टिव्हिटी चे सामाजीक / इकॉनॉमिक परिणाम हे पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट नसतात ... सर्वांगाने विचार करायची गरज असते
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Sat, 07/24/2021 - 15:04 नवीन
तिकडे रेंटल अपार्ट्मेंट कॉम्प्लेक्सच असतात डाउनटऊन सोडले तर रेंट साठी. इन्वेस्टमेंट म्हणून घर घेउन मग रेंटला देणे आणि त्यामुळे उगाचच प्राइसेस वाढणे हे प्रकार किती असतील माहीत नाही ! शिवाय तुम्ही म्हणालात तसे निर्बंध आपल्याकडे नाही आहेत. दंडुकेशाही चा हा विषयच नाही, फक्त नियम किंवा निर्बंध आधिपासुनच हवे होते ! @अमर विश्वास जुनाच वाद आहे खरे आहे, पण आहे. >>समजा जर तुमच्या थेअरी प्रमाणे जर कोणीच दुसरे घर घेतले नाही .... याचा अर्थ कोणालाही भाड्याने घर मिळणार नाही .. आता एखादा कोल्हापूरला (कुठल्याही शहरात) कामानिमित्त आला ... त्याला लगेच स्वतः चे घर घेणे शक्य नाही हे ही खरे पण असा विचार करुन किंवा समाज सेवा म्हणुन कोणी सेकंड होम नक्कीच घेत नाही. ते इन्वेस्ट्मेंट म्हणुनच घेतलेले असते ! आपल्याकडे रेंटल अपार्टमेंट कॉम्प्लेक्स असा प्रकारच नाही आहे त्यामुळे असेच करावे लागते. >>नवीन बिल्डर्स येतात / नवीन प्रोजेक्ट्स येतात. त्यातून राज्याला महसूल मिळतो आणि स्थानिकांना रोजगार मुळशी पॅटर्न मधे साइड एफेक्ट्स आहेत बघा ! @सुबोध खरे कृपया अ‍ॅपल टु अ‍ॅपल कंपॅरिजन करा. कपडे-शिंपी आणि बिल्डर्स-रिअल इस्टेट इन्वेस्टमेंट यांची कशी काय तुलना होउ शकते ?
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Sat, 07/24/2021 - 16:21 नवीन
त्यानिमित्ताने एक चांगला पॉइंट काढलात. अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजा आहेत. कपड्यांमधे इन्वेस्टमेंट जशी करत नाही तशी घरांमधेही करु नये, त्याचे साइड इफेक्ट्स होतात ! घरे बांधावीत आणि एक्स्ट्रॉ स्पेस असेल तर रेंटला द्यावे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 07/25/2021 - 02:47 नवीन
उन्मेष दिक्षीत आपलं मूळ मुद्दा अगदी चुकीचा नाही पण त्यावर मग उपाय काय? पूर्ण गुंतवणुकीला बंदी? ( ( दंडुकेशाही ) कि सरकारने दोन्हीचा मध्य गाठणे ? ( ज्याची उदाहरणे मी आधी दिली आहेत ) एकाच गोष्टीचा अतिरेक ( सर्व घरे सरकारी किंवा काय वाटेल ते करा ) रेंटल अपार्टमेंट कॉम्प्लेक्स म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? आणि कोणत्या देशातील पद्धत ? येथे ऑस्ट्रेलीया . नु झीलंड तीन प्रकार असतात - १) सर्वसाधारण इमारती (फ्लॅट) किंवा टॉऊन हौस ( भारतातातील भाषेत रो हाऊस ) किंवा स्वतंत्र घरे यातील पहिल्या दोन प्रकारात समजा १०० जागा असतील त्यातील विभागणी कशीही असू शकते म्हणेज काहींत मालक राहतात , काही गुंतवणुकीचे असतात आणि भाड्यासाठी उपलब्ध केलेले असतात कधीतरी १०० जागा भाड्यासाठीअसूही शकतात २) सर्विसद अपार्टमेंट ज्या अल्प काळासाठी हॉटेल मध्ये राहण्यापेक्षा जास्त चांगली म्हणून पण दीर्घ काळासाठी महाग त्यामुळे हे असे काही वेगळे असते असे नाही आणि जरी असले तरी ती सुद्धा कोणाचीतरी गुंतवणूकच असते ना ...
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Mon, 07/26/2021 - 01:10 नवीन
त्यांना बहुधा सिंगल फॅमिली होम्स - बंगल्यासारखी घरे, किंवा टाउन हाउसेस्/कॉण्डोज जी एरव्ही लोक विकत घेउन स्वतः राहतात त्याबद्दल विचारायचे आहे. अमेरिकेत तशी घरेही गुंतवणुकीकरता विकत घेउन भाड्याने देण्याची पद्धत खूप कॉमन आहे. माझ्या ओळखीतच एकाने अशी पाच घरे भाड्याने दिलेली आहेत. ही सगळी घरे कर्जातून घेतलेली आहेत, प्रत्येक घराचे स्वतंत्र कर्ज. असे केल्याने विकत घेणार्‍यांकरता किमती वाढण्याचा प्रकार येथेही आहे. मात्र अनेक नवीन घरांच्या स्कीम्स असतात तेथे फक्त राहण्याकरताच घेण्याचे नियम असतात. गुंतवणुकीकरता देत नाहीत. सगळीकडे तसे नियम नाहीत. * टर्म्स टाउन हाउसेस - साधारण भारतातील रो हाउसेस. कॉमन भिंती, पुढचे व मागचे अंगण अनेक घरांचे सलग असते सहसा. पण लोक कुंपणही घालतात. कॉण्डोमिनियम्स्/कॉण्डोज - आपल्याकडच्या ओनरशिप फ्लॅट्स सारखे. एका बिल्डिंग मधे अनेक मजले व प्रत्येक मजल्यावर मालकीची घरे. फ्लॅट - इथे हा शब्द फारसा वापरात नाही. न्यू यॉर्क शहरात वगैरे वापरतात. बहुधा लक्झरी कॉण्डोज करता वापरत असतील. अपार्टमेण्ट - एका मोठ्या बिल्डिंग मधे किंवा एका सोसायटीसारख्या जागे मधे अनेक बिल्डिंग्ज व प्रत्येक बिल्डिंग मधे १/२/३ बेडरूम्सची पूर्णपणे भाड्यानेच वापरायची घरे. सिंगल फॅमिली होम - स्वतंत्र बंगल्यासारखे घर. पूर्ण स्वतंत्र लॉट. पण काही बाबतीत स्वातंत्र्य नसते. खाली डीटेल्स आहेत. सोसायटी हा शब्द आपल्याकडच्या अर्थाने इथे प्रचलित नाही. बहुतांश ठिकाणी असे घरमालक एकत्र येउन "होमओनर्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन" स्थापन करतात. पण ते ही करणार्‍या कंपन्या आहेत. म्हणजे आपण करायच्या ऐवजी त्यांना चालवायला द्यायचे. ते साधारण आपल्याकडच्या सोसायटीसारखे म्हणता येइल. घरांची छपरे, घरांचे बाह्य रंग, घराच्या आजूबाजूच्या लॉन चा, झाडांचा मेन्टेनन्स, कोणती झाडे लावलेली चालतात याबद्दल बरेच नियम असतात व ते सहसा या संस्था तेथील गाव/शहराच्या नियमांच्या कक्षेत चालवतात. वरच्या कोणत्याही घरांच्या बाबतीत हे लागू असू शकते. त्या त्या ठिकाणच्या नियमांप्रमाणे बदलते. काही बाबतीत स्वातंत्र्य नसते लिहीले ते याकरता, की माझ्या मालकीचे घर आहे म्हणून मी हिरवा किंवा जांभळा रंग देइन आणि दारापुढे रेडवुड चे झाड लावीन असे चालत नाही. पुन्हा मूळ मुद्द्याकडे - यापैकी कोणतीही घरे भाड्याने दिली जातात. गुंतवणूक म्हणून घेतली जातात. खरेदीची किंमत, कर्जाचा वार्षिक रेट, मेन्टेनन्स व घरभाडे याचे गणित जमले तर हे फायद्यात पडते. या कॅल्क्युलेशन मधे घरांच्या किमती ४-५% दरवर्षी वाढतील इतकेच धरलेले असते. त्याहून जास्त वाढल्या, तर तो ही फायदा होतो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 07/26/2021 - 01:42 नवीन
पुन्हा मूळ मुद्द्याकडे - यापैकी कोणतीही घरे भाड्याने दिली जातात. गुंतवणूक म्हणून घेतली जातात. हो साधारण पणे दोन्ही देशात आणि भारतात सारखे आहे असे दिसतंय , फक्त भारतात "बंगल्यनाची सोसायटी " हि भानगड मला कधी कळली नाही ! स्वतन्त्र घरे असल्यामुळे मालक आणि नगरपालिका यांचाच संबंध असतो , कॉमन प्रॉपर्टी ,जी उंचच इमारतीत किंवा रो हाऊसेस मध्ये असते तसे काही नसते त्यामुळे सोयायटी ची जरूरच नसली पोहिजे .. कारण सोयासायटी आली कि कार्यकारणी वैगरे डोक्याला ताप नुसता असो मूळ मुद्दा कि गुंतवणुकीच्या घराना प्रोहत्साहास दिल्याने " फक्त तोटाच होतो समाजाला" असे १००% नाही ... थोडा तोटा आणि थोडा फायदा दोन्ही होतो हे सत्य मला वाटते येथे बऱ्याच जणांना पटलेले दिसतंय मग जगात कुठे का असेना सिंगापुर मधील माणूस जवळचं मलेशियातील जोहोर बारू किंवा ऑस्ट्रेलियात तेवढ्याच मुद्दलात २ घरे घेऊन शकतो त्यामुळे जोहोर बहरू किंवा पर्थ मधील दार वाढतात हे खरे असले तरी त्यावर सरकारचे नियंत्रण पण असते .. स्टॅम्प ड्युटी जास्त, फक्त नवीन बान्धलेलीच घरे घेता येतील ( जेणेकरून घर बंदही वाढेल ) इत्यादी
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Mon, 07/26/2021 - 02:24 नवीन
भारतात नसावी असे दिसते. मी सोसायटी च्या जनरल अर्थाने म्हंटलो. पण आजकाल काही ठिकाणी एकाच कॉम्प्लेक्स मधे फ्लॅट्स, रो हाउसेस आणि स्वतंत्र बंगलेही असतात. तेथे एकच मोठी सोसायटी असते की त्यातून बंगल्यांना वगळतात माहीत नाही. पुण्याजवळ भूगाव चे फॉरेस्ट ट्रेल्स हे एक उदाहरण. दुसरे वेगळे उदाहरण म्हणजे पूर्वी झालेल्या बंगल्यांच्या कॉलनीज. तेथे सर्वांची एकत्र सोसायटी असते का माहीत नाही. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे- तशी नसते, असे दिसते. बाय द वे, मी वरती होमओनर्स "अ‍ॅडमिनिस्ट्रेशन" लिहीले आहे चुकून. ते "असोसिएशन" असते.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 07/26/2021 - 04:33 नवीन
भाडे तत्वावर स्थापन झालेल्या बर्‍याच बंगल्यांच्या सहकारी सोसायट्या आहेत. पानशेत पूरानंतर या सोसायट्या स्थापन झाल्या. सगळी जागा सोसायटीच्या नावे असते व भाडे करारावर सभासदांना दिली जाते. त्यामुळे संस्था जे नियम करेल ते सर्वांना पाळावे लागतात. इतकेच नव्हे तर ते नियम पाळले नाहीत तर संस्था जागा परत मागू शकते. थोडक्यात असे प्लॉट लिजहोल्ड असतात. फ्रीहोल्ड असत नाहीत.
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Mon, 07/26/2021 - 17:24 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 09/08/2021 - 17:13 नवीन
समजा जर तुमच्या थेअरी प्रमाणे जर कोणीच दुसरे घर घेतले नाही .... याचा अर्थ कोणालाही भाड्याने घर मिळणार नाही .. आता एखादा कोल्हापूरला (कुठल्याही शहरात) कामानिमित्त आला ... त्याला लगेच स्वतः चे घर घेणे शक्य नाही ... आणि कोणाकडे भाड्याने द्यायला घर नाही ... (कारण घराच्या किमती वाढू नयेत म्हणून कोणी दुसरे घर घेतले नाही आणि स्वतःचे रहाते घर कोणी भाड्याने देत नाही) मग अशा वेळी काय करायचे ? स्थलांतर बंद करायचे?
असे होणार नाही. थोडा त्रास पडेल पण घर मिळेल. जर मी पुण्याहून कोल्हापूरला थोडा काळ स्थलांतरित होत असेल तर मला अशाच कोणत्यातरी स्थलांतरामुळे वापरात नसलेले घर भाड्याने मिळू शकेल किंवा जर माझे स्थलांतर दीर्घकाळाकरिता असेल तर तेथील घरांच्या किमती आवाक्यात असल्याने (कारण अनेक लोकांनी सेकंड होम घेवून त्या वाढविल्या नाहीत) मला तिथे नवीन घर घेणेही परवडू शकेल.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 09/08/2021 - 16:51 नवीन
दुसरे घर इन्वेस्ट्मेंट म्हणुन घेतल्यास कारण नसताना घरांच्या किंमती वाढत राहतात. त्यामुळं ज्यांना फक्त राहण्यासाठी घर घ्यायचे आहे त्यांना जास्त प्राइस मोजावी लागते. सॅच्युरेशन येत जाऊन तुम्ही म्हणता तसं कारण नसताना आपण राहत नाही तिथल्या प्राइस वाढवल्या जातात, आणि जे तिथं प्रत्यक्ष राहण्यासाठी घर शोधतायत त्यांना अ‍ॅफोर्डेबल घर चांगल्या भागात मिळत नाही कारण तिथे न राहाणार्यांनी इन्वेस्ट्मेंट म्हणून एक्स्ट्रा घर घेउन प्राइजेस वाढवलेल्या असतात.
आपल्या मताशी मी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 07/19/2021 - 09:02 नवीन
पहिल्या प्रथम स्वतःचा अनुभव ईथे मांडुन ईतरांना फायदा करुन दिल्याबद्दल लेखकाचे आभार. दुसरे म्हणजे चूक झाल्यावर ती मान्य करुन, शांतपणे विचार आणि गणिते करुन, प्रसंगी नुकसानही सोसुन त्यातुन वेळेतच बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन!! तरीही मी म्हणतो की तुमची चूक फार मोठी नव्हती. पुण्यात ईंडस्ट्री/ नोकर्‍या असल्याने अजुनही फ्लॅट विकले जात आहेत ही समाधानाची बाब आहे. कित्येक लोक सांगोवांगीच्या गोष्टींवर विश्वास ठेवुन नाशिक, बदलापूर, नेरळ्,कसारा, अशी कुठे कुठे सेकंड होम घेउन बसले आहेत, जी आज ८-१० वर्षानंतरही घेतलेल्या किमतीला सुद्धा विकली जात नाहियेत. आपण स्वतः राहाणार असल्यास घराची किमत परवडते कारण तेव्हा आपण आजुबाजुला सर्व सुख सोयी बघुनच घर घेतो (वर दिलेली तुर्र्म खान यांची लिस्ट वाचावी) त्यामुळे बजेट वाढले तरी आपण कन्विस्ड असतो आणि विकताना तेच मुद्दे समोरच्या पार्टीलाही पटवुन देता येतात. तेव्हा जर स्वतः राहाणार असू किवा किमान नेहमी वापरणार असू तरच प्रॉपर्टी करावी असे माझे मत आहे. दुसरा मुद्दा रोख तरलतेचा. शेअर्स, म्युच्युअल फंड, एफ डी, सोने वगैरे मध्ये जी तरलता आहे ती ईथे नाही. त्यामुळे प्रसंगी थोडे नुकसान सोसूनही पैसे काढुन घ्यावे लागु शकतात. वेळेला पैसे मिळतीलच याची गॅरंटी नाही. तिसरा मुद्दा म्हणजे जडत्वाचा. बाकीच्या गुंतवणुकींप्रमाणे ही गुंतवणुक कुठे घेउन जाता येत नाही. शेअर्स, म्युच्युअल फंड देशा परदेशात कुठेही बसुन विकता येतात पण परदेशात किवा परगावी राहुन फ्लॅट, जमीन खरेदी विक्री करणे फार कटकटीचे होते. त्या गावी आपले नातेवाईक राहत असतील तरीही एका मर्यादेनंतर तेही मदत करायला काचकूच करु लागतात कारण त्यांची कामे सोडुन ते कशाला फिरतील. माझे काही मित्र करीअरच्या सुरुवातीला हैद्राबाद्,बँगलोर मध्ये राहुन तिथे फ्लॅट घेउन बसले आहेत आणि आता मुंबई पुण्यात राहुन किवा परदेशात राहुन ते सांभाळणे/तिकडे जाणे जमत नाही. आई वडील म्हातारे झाल्याने त्यांना पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी देउनही फायदा नाही. थोडक्यात माकडाचा हात बाटलीत अडकलाय, सोडवत नाही आणि धरवत नाही. चौथा मुद्दा कायदेशीर बाबींचा. बदलणारे कायदे (उदा. रेरा, भाडेकरुचे पोलिस रेकॉर्ड) ,सोसायटीचे नियम,सभा,मेंटेनंन्सचे वीजबिलाचे खर्च आणि न दिल्यास तगादे, एन.ए टॅक्स, अचानक लिकेज वगैरे झाल्यास होणारे खर्च आणि भांडणे(विशेष्तः मालक स्वतः राहात नसल्यास), पार्किंग बळकावणे, मीटर वरुन वीजचोरी ईत्यादी कटकटी. तर या सर्व गोष्टींचा विचार करुन घर घ्यावे, मग ते पहीले असो वा दुसरे.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Mon, 07/19/2021 - 09:23 नवीन
राजेंद्र जी घर (रिअल इस्टेट) आणि शेअर्स / गोल्ड हे वेगवेगळे ऍसेट क्लास आहेत. प्रत्येकाचे फायदे व तोटे आहेत दुसऱ्या लेखात दिलेले टेबलाच परत देतो आहे Image removed.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 09/08/2021 - 16:36 नवीन
रियल इस्टेट गुंतवणू़क संदर्भातील अनेक मुद्द्यांना तुम्ही अगदी सोप्या भाषेत स्पर्श केला. आणि हे अगदी व्याहवारिक मुद्दे आहेत. मुळात कोणतीही इन्व्हेस्टमेंट त्या विषयातली फारशी माहिती नसताना करु नये. गुंतवणूक हा फायनान्स या विषयातला मुद्दा आहे आणि रियल इस्टेटमधली गुंतवणकीवर (खरेतर कोणतीही गुंतवणूक) किती परतावा मिळेल - त्याकरिता मागणी-पुरवठा यातील बदलती स्थिती समजणेही गरजेचे आहे. म्हणजे फायनान्स व इकॉनॉमिक्स या दोन्ही विषयांचे मुलभूत ज्ञान तरी असायला हवे. पण अनेकदा तसे नसते, इतर लोकांचे पाहून , जाहिरातींना भुलून , भावनेच्या आधारे गुंतवणूक केली जाते हे धोक्याचे आहे. त्यामुळे तुम्ही उत्तम इंजिनिअर किंवा डॉक्टर जरी असाल तरी स्वतःच्या फायद्याकरिता फायनान्स व इकॉनॉमिक्स या विषयांची किमान तोंडओळख करुन घ्यावी. मी इथे काही मुलभूत मुद्दे देण्याचा प्रयत्न करतो कर्ज काढून गुंतवणूक करणे म्हणजे लिव्हरेज. त्यात चूक काही नाही पण कर्जाच्या व्याजदरापेक्षा वार्षिक परतावा दर (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) बर्‍यापैकी अधिक असायला हवा. या केसमध्ये फ्लॅटच्या किमती दरवर्षी जर १०-११ टक्क्यांनी वाढत असतील आणि कर्जाचे व्याजदर ८-९ टक्के असेल तर आपली गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. पण भविष्यात फ्लॅटचे दर कसे वाढतील याबद्दल खात्री देता येणार नाही.. अधिकाधिक अचूक उत्तर मिळवण्याकरिता जास्त अभ्यास करावा लागेल. जसे की त्या भागात /जवळ्पास होणारी उद्द्योगांची वाढ, नवीन रस्ते , फ्लाय ओव्हर ई मुळे होवू घातलेली वाहतूक सुलभता, भविष्यात येणारे मोठे गृहनिर्माण प्रकल्प ई. काही सहज दिसणार्‍या मुद्द्यांवरुन ठोकताळे बांधता येतील - त्या भागात कोणत्या नामवंत बिल्डर्सनी आतापर्यंत प्रकल्प उभारले वा उभारण्यच्या मार्गावर आहेत. गेले काही वर्षात रेडी रेकनरचे भाव कसे वाढलेत ? ई ई थोडक्यात पुर्ण SWOT analysis करुन निर्णय घ्यावा. फ्लॅट घेताना शक्यतो खात्रीशीर गुणवत्ता देणार्‍या नामवंत बिल्डरकडून घ्यावा म्हणजे फ्लॅटची बांधकाम गुणवत्ता चांगली असल्यास अगदी २०-३० वर्षानंतर पण चांगली पुर्नविक्री किंमत मिळू शकेल. पण वर एका प्रतिसादात म्ह्टल्याप्रमाणे मलाही वाटते की गरज नसताना उगाच दुसरे घर घेवू नये. मध्यम व उच्च मध्यम वर्गाच्या या प्रवृत्तीमुळे घरांच्या किमती वाढत रहातात आणि फक्त बिल्डर अधिकाधिक श्रीमंत होत जातात.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 09/09/2021 - 08:56 नवीन
बिल्डर अधिकाधिक श्रीमंत होत जातात.
प्रखर सत्य.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 09/09/2021 - 14:07 नवीन
कर्जाच्या व्याजदरापेक्षा वार्षिक परतावा दर (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) बर्‍यापैकी अधिक असायला हवा. आपण कोणता परतावा म्हणताय ? कारण दोन प्रकारचे असतात , १ ) दृश्य = म्हणजे येणारे भाडे आणि २) अदृश्य = मूळ किमतीत झालेली वाढ यातील २ हा सगळ्यात शेवटी वास्तू विकल्यावरच मिळू शकतो ( झाला असल्यास)
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 09/13/2021 - 20:21 नवीन
आपण कोणता परतावा म्हणताय ?
हे मी नमूद केले आहेच.. या केसमध्ये फ्लॅटच्या किमती दरवर्षी जर १०-११ टक्क्यांनी वाढत असतील आणि कर्जाचे व्याजदर ८-९ टक्के असेल तर आपली गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. भाडे फारसे नसतेच.. म्हणून घराची वाढती किंमत हाच खरा परतावा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 09/09/2021 - 14:14 नवीन
गरज नसताना उगाच दुसरे घर घेवू नये म्हणजे काय? जसे आपण शेअर बाजारात , किंवा निवृत्ती फडमार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करतो तसेच हा एक दुसरा पर्याय आहे त्यातही धोका/ संधी आहे कारण तुम्ही लिव्हरेज करता पण "गरज नसल्यास" कसे? तसे लिव्हरेज म्युच्युअल फंड/ शेअर मार्जिन वॉर घेताना पण करता येते .. मग ते हि गरज नसताना का ? मला वाटते तुम्हाला गरज नसताना लिव्हरेज करू नये असे म्हणायचे असे ल तर ठीक रिअल इस्टेट लिव्हरेज = २० आपले ८० बँकेचे म्हणजे १:४ शेअर लिव्हरेज = २० आपले तर २० मार्जिन लोन म्हणजे १:१ ( अमेरिकेत १:१ इतर देशात जास्त लिव्हरेज असू शकते - येथे मी शेअर घेतानाचे कशी आणि मार्जिन अकाउंट धरले आहे , फूचार / ऑप्शन नाही )
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 09/13/2021 - 20:23 नवीन
गरज नसताना उगाच दुसरे घर घेवू नये म्हणजे काय?
निवारा ही एक मुलभूत गरज आहे. जर पुढची ५-१० वर्षेही तेथे रहायचेच नसेल तर घर घेवू नये हे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 09/09/2021 - 14:31 नवीन
गरज नसताना दुसरे घर घेऊ नये ... कुणाला गरज नसताना? रिअल इस्टेट हा एक असेट क्लास आहे. त्यात इन्व्हेस्टमेंट का करू नये ? फक्त स्वतःला रहाण्यासाठीच घर हा विचार मला पटत नाही ...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/09/2021 - 15:00 नवीन
मुळात घर हे स्वतःच्या राहण्यासाठीच असावे हि विचार सरणी असती तर बहुसंख्य मराठी माणसांना मुंबईत येऊन स्थायिक होणे अशक्य झाले असते आणि आज मुंबई गुजराती मारवाड्यांची म्हणून जी बोंबाबोंब होत आहे ती मुळातूनच झाली नसती. कारण गिरगाव ग्रांट रोड किंवा लालबाग परळ गिरणगाव येथील चाळीत भाड्याने राहणारे लक्षावधी मराठी लोक आपल्या उदर निर्वाहालाच मुकले असते किंवा आज भय्ये लोक जसे झोपड्यात राहतात तसे राहिले असते. हीच स्थिती पुण्याच्या पेठांची झाली असती. एक राहते सोडून दुसरे घर घेण्यास बंदी असावी हि समाजवादी/ साम्यवादी वृत्ती आहे आणि त्यात मुळापासूनच गोची असल्याने मी अधिक लिहीत नाही.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 09/13/2021 - 21:00 नवीन
कुणाला गरज नसताना?
अर्थात स्वतःला गरज नसताना..
रिअल इस्टेट हा एक असेट क्लास आहे. त्यात इन्व्हेस्टमेंट का करू नये ?
मी माझा विचार सांगितला प्रत्येकाला तो पटेलच असे नाही. कुणाला त्यात साम्यवाद दिसेल कुणाला आणखी काही.. ज्याचा त्याचा दृष्टीकोन .. पण माझे काही मुद्दे आहेत..जे बहुधा विचारात घेता येतील १) एखादे घर बांधले जाते तेव्हा त्याच्या बांधकामाचे काही ठराविक आयुष्य असते (अगदी ५०-१०० वर्षे ही असेल पण तरी मर्यादितच) . घर बांधण्याकरिता मोठ्या प्रमाणावर वाळू ,विटा, सिमेंट, पाणी ईत्यादींचा वापर झालेला असतो. म्हणजे एका अर्थाने पर्यावरणाची हानी झालेली असते. पर्यावरणाची हानी होवू नये म्हणून जंगलात रहावे असे मी म्हणत नाही पण निदान अशी हानी होवून , नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन घर बांधले तर ते निदान वर्षानु वर्षे रिकामे तरी राहू नये. २) भाड्याने देण्याचा मार्ग आहेच पण याकरिता नेहमी चांगले भाडेकरु मिळणे, भाडे करार करणे, पोलीस पडताळणी ई ई करिता वेळ देण्याची तयारी असावी लागेल) ३) एखाद्या सोसायटीत बहुतांशी (५०% वा आसपास) भाडेकरु रहात असतील तर सोसायटी चालवण्यासही अडचणी येवू शकतात कारण भाडेकरु कमिटीचे सदस्य होवू शकत नाही तर जे मालक तिथे रहात नाहीत असे लोक कमिटीचे सदस्य होण्यात अर्थ नसतो वा बहुधा ते शक्यही नसते (बहूधा ते जवळपास रहात नसल्याने). असे मालक वार्षिक वा विशेष सर्वसाधारण सभेसही हजेरी लावत नाहीत. ४) तरी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावयाची झाल्यास निवासी जमिन विकत घ्यावी असे मी सुचवेन. अर्थात त्याकरिता त्या भागाची नीट माहीती, भविष्यात मिळणारा परताव्याचा योग्य अंदाज, कागदपत्रांची पुर्ण पडताळणी इ गोष्टी गरजेच्या आहेत ५) फ्लॅटमध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर नवीन (अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये) अगदी सुरवातीस गुंतवणूक करावी जेणेकरुन चांगले डील मिळेल. या काळात बिल्डरला खेळते भांडवल हवे असते म्हणून जास्त घासाघीस होवू शकते. आणि फ्लॅट बनल्यावर वा जवळपास बनत आल्यावर विकून टाकावे. तरी यातल्या जोखमी म्हणजे बिल्डरकडून बांधकामाला होणारी दिरंगाई, फ्लॅट दुसर्‍याला विकून हस्तांतरित करताना बिल्डरकडून काही अडवणूक वगैरे गोष्टी ध्यानात घ्याव्या. तसेच कर्जाचे पुर्ण वितरण होई पर्यंत ई एम आय चालू होत नाही तर प्री इ एम आय म्हणजे केवळ व्याज चालू होते. याचा बहूधा टॅक्समाफीलाही उपयोग नसावा (नक्की माहित नाही) .. हे टाळायचे असेल तर फक्त स्वतःकडील पैशांनी (सेल्फ मनी) होवू शकणारी गुंतवणूक केली तर जास्त बरे. असो.. हे माझे विचार आहेत.. इतरांच्या विचारांचाही आदर करतो... ...धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 09/14/2021 - 02:20 नवीन
म्हणजे एका अर्थाने पर्यावरणाची हानी झालेली असते फ्लॅटमध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर नवीन (अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये) अगदी सुरवातीस गुंतवणूक करावी हि विसंगती नाही का? अशी गुंतवणूक करणे म्हणजे परिवारणाची हानी जर असेल तर ती बांधकामाच्या आधी करणे काय आणि नंतर काय? राहते घर हि गरज आहे हे बरोबर पण ती गरज इतर ज्यांना तात्पुरते ( पण काही वर्षे) राहायचे आहे कामामुळे त्यांना हि असते आणि म्हणून गुंतवणूकदार यात गुंतवतात! त्यात काय गैर? हा असे म्हणा हवे तर कि १)यात इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त धोके आहेत .. किंवा कोणते धोके संभवतात २) त्यामुळे फुगवट होतो आणि स्तहनिकांना ना परवडणारे होते वैगरे पण मुळात हा गुंतवणुकीचा एक मार्ग / क्लास आहे हेच समजून का घेत नाही . अहो तुम्ही आम्ही प्रत्यक्ष नाही केली तरी आपले जे म्युच्युअल फंड असतात किंवा रिटायरमेंट फंड ते करतात ...
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 09/14/2021 - 08:13 नवीन
अशी गुंतवणूक करणे म्हणजे परिवारणाची हानी जर असेल तर ती बांधकामाच्या आधी करणे काय आणि नंतर काय?
बहुधा तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नसावा. "आणि फ्लॅट बनल्यावर वा जवळपास बनत आल्यावर विकून टाकावे" असे मी लिहिले होते.. घर वर्षानुवर्षे बंद राहणे आणि त्याचा कुणासही राहण्यास उपयोग होवू नये ही खरी पर्यावरणाची हानी. ते विकून टाकले आणि बहुधा कुणीतरी तिथे राहील तर ही हानी टाळली जाईल.
पण मुळात हा गुंतवणुकीचा एक मार्ग / क्लास आहे हेच समजून का घेत नाही
मी माझा विचार सांगितला. प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो. अशी गुंतवणूक करण्यावर बंदी घालावी असे मी म्हणत नाहीये.. ज्याला आहे खात्री त्याने करावी गुंतवणूक...
. अहो तुम्ही आम्ही प्रत्यक्ष नाही केली तरी आपले जे म्युच्युअल फंड असतात किंवा रिटायरमेंट फंड ते करतात ...
फंड बद्दल माहित नाही, पण वैयक्तीकरित्या गुंतवणूकदारांनी अपुर्‍या माहितीच्या आधारे , पुरेसा अभ्यास नसताना केवळ बिल्डरच्या सांगण्याला भुलून कर्ज काढून मोठी गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. त्यापेक्षा अशी जर कंपनी असेल की जी काही एखाद्या शहराचा व्यवस्थित अभ्यास करुन काही फ्लॅट विकत घेते, त्यांची देखभाल करते, काही वर्षे भाड्याने देते व योग्य वेळी विकते तर मला अशा कंपनीचे शेअर्स वा एफ डी रुपाने पैसे गुंतवण्याचा विचार मी करु शकतो. अशी कंपनी जोखमीचा , परताव्याचा नीट अभ्यास करु शकते, बिल्डरशी योग्य प्रकारे घासघीस करुन चांगला सौदा करु शकते. व्यक्तिशः मला हे सर्व करणे जमेलच असे नाही. शिवाय ही कंपनी एखाद्या भागात वा शहरात किती घरे घ्यायचीत , कधी थांबायचं कधी घर विकायची याबद्दलचे निर्णय अधिक योग्यप्रकारे घेईल त्यामुळे घरांच्या किमतीही आवाक्यात राहू शकतील.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 09/14/2021 - 02:09 नवीन
रिअल इस्टेट हा एक असेट क्लास आहे. त्यात इन्व्हेस्टमेंट का करू नये ? १००% सहमत
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/20/2021 - 09:17 नवीन
प्रांजळ कथन आवडले.तुम्ही दिलेल्या फी मधून इतर लोक धडा घेतील.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/20/2021 - 09:17 नवीन
प्रांजळ कथन आवडले.तुम्ही दिलेल्या फी मधून इतर लोक धडा घेतील.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/20/2021 - 09:18 नवीन
प्रांजळ कथन आवडले.तुम्ही दिलेल्या फी मधून इतर लोक धडा घेतील.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 14 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 14 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 14 hours ago
  • सुंदर !!
    1 day 14 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा