Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अनुवादित पुस्तकं

प
पाटिल
Sun, 07/11/2021 - 19:22
💬 59 प्रतिसाद
वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे. हा उद्योग करण्याचा हेतू असा की फार पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..‌ पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा आपल्याला झेपतेय की नाही वगैरे.. कारण त्यापूर्वी एकदा असंच चुकून दोस्तोव्हस्कीला इंग्रजीतून हात घालून, होता नव्हता तेवढा आत्मविश्वास खच्ची करून घेतलेला होता, हे एक बॅकमाईंडला होतं... तर मग तडजोड म्हणून अनुवादित पुस्तकांकडं सरकत गेलो.. पण दुर्दैवानं त्याच सुमारास झालं असं की.. डिटेक्टीव्ह/थ्रिलर टाईपच्या कादंबऱ्या ज्यातले नायक हमखास तैलबुद्धीचे वकील, पत्रकार वगैरे असतात आणि एफबीआय-सीआयएवाले एकजात बिनकामाचे, फुकटपगारखाऊ वगैरे असतात.. आणि जगभरातील भाबड्या मानवजातीला, अटळ विनाशापासून वाचवण्याची जबाबदारी, लेखकाने शेवटी एखाद्या अज्ञात जागी राहणाऱ्या नायकांवरच नेऊन टाकलेली असते वगैरे.. हे कमी म्हणून की काय, पाच-सहाशे वर्षांपूर्वींची मढी उकरत, उदाहरणार्थ रोम वगैरे शहरांतली भुयारे धुंडाळत कुठलीतरी गूढ कोडी सोडवत बसणाऱ्या.. तसेच भरल्या पोटी जगभर उंडारत उंडारत हरप्रकारची मजा मारणाऱ्या आणि पुन्हा तो सगळा सेक्शुअल मसाला 'आत्मशोधा'च्या नावाखाली दणकावून छापणाऱ्या वगैरे.. असल्या इंग्रजीतल्या कादंबऱ्यांचा उकिरडा उपसून, तो मराठीत आणून फेकायची जबरदस्त लाट आली होती, तिच्या तडाख्यात मी आपसूकच सापडलो होतो..! पण नंतर मग असंच कधीतरी गटांगळ्या खात खात किनाऱ्याला लागल्यावर लक्षात आलं की आपल्याला 'गि-हाईक' बनवण्यात आलेलं आहे, त्याचंही दु:ख समजा एक वेळ सहन केलं तरीही, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये फुकटचा वेळ जाऊन पैशांचीही बरबादी झालेली, हे त्याहून वाईट.. आणि म्हणून विचार केला की, त्यावेळी माझा जो प्रॉब्लेम होता, सेम तशाच प्रॉब्लेममधून कुणी जात असेल, आणि शोधाशोध करत असेल, तर त्यांच्यासाठी आपल्याकडच्या शहाण्या लोकांनी, जगभरातल्या काही दर्जेदार पुस्तकांचे मराठीमध्ये सुंदर अनुवाद करून ठेवलेले आहेत... ज्यातलं एखादं वाचून समजा एखाद्या वाचकाला, काहीतरी सणसणीत वाचल्याचा आनंद वैयक्तिक पातळीवर मिळाला तर चांगलंच आहे की.. म्हणून ही यादी; वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड- गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (अनु.केशव सद्रे) सीन्स फ्रॉम प्रोव्हिन्शियल लाईफ- जे. एम कोएत्झी (अनु. 'गावातील जीवनदृश्ये',अवधूत डोंगरे) मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर (अनु. जयंत धुपकर) द सेन्स ऑफ ॲन एंडींग- ज्यूलियन बार्न्स (अनु. विलास साळुंखे) कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा- गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (अनु. रंगनाथ पठारे) व्हेन वुई वेअर ऑरफन्स- काझुऒ इशिगुरो (अनु.सुश्रुत कुलकर्णी) रिमेन्स ऑफ द डे- काझुऒ इशिगुरो (अनु. आश्लेषा गोरे) क्रॉक ऑफ गोल्ड —जेम्स स्टीफन्स (अनु.- 'सोन्याचे मडके'—जी ए कुलकर्णी) द लॉर्ड ऑफ फ्लाईज-- विल्यम गोल्डींग (अनु. जी ए कुलकर्णी) शेविंग ऑफ शॅगपट- जॉर्ज मेरेडीथ (अनु. 'एक अरबी कहाणी', जी ए कुलकर्णी) द लाईट इन द फॉरेस्ट- कॉनराड रिक्टर (अनु. 'रानातील प्रकाश, जी ए कुलकर्णी) 'गाव', 'शिवार'- कॉनराड रिक्टर (अनु. जी ए कुलकर्णी) द फांऊटनहेड- आयन रॅंड (अनु. मुग्धा कर्णिक) ॲटलास श्रग्ड- आयन रॅंड (अनु. मुग्धा कर्णिक) द सेकंड सेक्स- सिमॉन द बोव्हुआर (अनु. करुणा गोखले) शब्द- जॉं पॉल सार्त्र (अनु. वा.द.दिवेकर) द चिप्स आर डाऊन - जॉं पॉल सार्त्र (अनु. 'तेथे चल राणी', वसंत कानेटकर) मेटॅमॉर्फोसिस-- फ्रांझ काफ्का (अनु. 'पिसुक', जयंत कुलकर्णी) द ट्रायल- फ्रांझ काफ्का (अनु. 'महाभियोग', जयंत कुलकर्णी) निवडक काफ्का- अनु./संपादन नीती बडवे ॲनिमल फार्म- जॉर्ज ऑरवेल (अनु. तुषार बापट) नाईंटीन एटी फोर- जॉर्ज ऑरवेल (अनु. अशोक पाध्ये) डार्कनेस ॲट नून-ऑर्थर कोसलर (अनु.- 'भरदुपारच्या अंधारात'- वसंतराव नारगोलकर) द ग्रेप्स ऑफ रॅथ- जॉन स्टाईनबेक (अनु. मिलिंद चंपानेरकर) मून इज डाऊन-- जॉन स्टाईनबेक (अनु. गणेश जोशी) अ टेल ऑफ टू सिटीज- चार्ल्स डिकन्स (अनु. सुशील परभृत) ब्लाईंडनेस-- जुझे सारामागु (अनु. भास्कर भोळे) माय नेम इज रेड-- ओरहान पामुक (अनु. गणेश विसपुते) द टाईम्स ऑफ असासीन्स - हेन्री मिलर (अनु-'विनाशवेळा'- महेश एलकुंचवार) द बुक थीफ - मार्कस झुसॅक (अनु.'पुस्तकचोर', विनीता कुलकर्णी) मॅन्स सर्च फॉर मिनींग- डॉ. व्हिक्टर फ्रॅंकल (अनु.-'अर्थाच्या शोधात', डॉ. विजया बापट) शांताराम- ग्रेगरी रॉबर्ट्स (अनु. अपर्णा वेलणकर) सोल मांउटेन- गाओ झिंगजियान (अनु. मधु साबणे) द प्रॉफेट- खलील जिब्रान (अनु. जे के जाधव) रिल्केची दहा पत्रे - अनिल कुसुरकर २१ व्या शतकासाठी २१ धडे- युवाल नोआ हरारी (अनु. सुनील तांबे) अ न्यू अर्थ - एकहार्ट टॉल (अनु. 'एक अवनी नवी', नीलिमा जोशी) द कॅचर इन द राय- जे डी सॅलिंजर (अनु. संजय जोशी) कॉन्वेक्स्ट ऑफ हॅपिनेस- बर्ट्रांड रसेल (अनु. करुणा गोखले, 'सुखी माणसाचा सदरा') अनपॉप्युलर एस्सेज- बर्ट्रांड रसेल (अनु. करुणा गोखले, 'नाही लोकप्रिय तरीही') रीयुनियन- फ्रेड उल्मान (अनु. मुग्धा कर्णिक) आफ्टर दि क्वेक- हारुकी मुराकामी (अनु. निशिकांत ठकार) कथासंग्रह लस्ट फॉर लाईफ- आयर्विंग स्टोन (अनु. माधवी पुरंदरे) रावण आणि एडी, दि एक्स्ट्राज- किरण नगरकर (अनु. रेखा सबनीस) ककल्ड- किरण नगरकर (अनु.- 'प्रतिस्पर्धी', रेखा सबनीस) द ब्लाइंड लेडी'ज डिसेंडंट्स-अनीस सलीम ('आंधळ्या बाईचे वंशज', अनु. श्यामल चितळे) व्हॅनिटी बाग- अनीस सलीम (अनु. योगिनी वेंगुर्लेकर) गुंटेरचा हिवाळा- ख्वान मॅन्युएल मार्कोस (अनु. मनोज पाठक) द ब्लाइंड असॅसिन- मार्गारेट ॲटवूड (अनु. चारुता नानिवडेकर) वॉल्डन- हेन्री डेव्हिड थोरो (अनु.जयंत कुलकर्णी) द व्हाईट फॅन्ग- जॅक लंडन ('लांडगा', अनु. अनंत सामंत) रिबेल सुलतान्स- मनु पिल्लई (अनु.तृप्ती कुलकर्णी) रसेलचे निवडक लेख- भा. ज. कविमंडन द स्टोरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी- विल ड्युरांट (अनु. 'पाश्चात्य तत्वज्ञानाची कहाणी' अनु. साने गुरुजी) डॉन क्विझोट(भाग १,२)- सरव्हॅंटीस (अनु. दा. न. शिखरे) आणि खालच्या मूळच्या रशियन कादंबऱ्या, ज्या दीडशे वर्षे मुरलेल्या व्होडक्यासारख्या जालीम असल्यामुळे, हळूहळू बेताबेतानं, निवांतपणे एकेक घोट रिचवत रिचवत वाचण्यासाठी आहेत... उदाहरणार्थ.. ॲना कॅरेनिना- लिओ टॉलस्टॉय (अनु. कवली ललितागौरी) ब्रदर्स करमाझोव- दोस्तोव्हस्की (अनु.- करमाझफ बंधु', खंड १,२, भाऊ धर्माधिकारी') द गॅंबलर - दोस्तोव्हस्की ('जुगारी'-अनु. जयंत दिक्षित) नोट्स फ्रॉम अंडरग्राऊंड - दोस्तोव्हस्की (अनु.अनिल आंबीकर 'भूमिगताची टिपणे') क्राइम ॲंड पनिशमेंट- दोस्तोव्हस्की ('गुन्हा आणि प्रायश्चित्त', अनु.- काशिनाथ कोनकर) द हाऊस ऑफ डेड्स- दोस्तोव्हस्की(अनु. 'मेलेल्यांची गढी',अनु.- विश्राम गुप्ते) डॉ. झिवागो- बोरिस पास्तरनाक (अनु. आशा कर्दळे) ॲंड क्वाएट फ्लोज द डॉन- मिखाईल शोलोखोव्ह ('डॉन संथ वाहतेच आहे',भाग१,२- अनु. नरेंद्र सिंदकर) आणि शेवटी जाताजाता, हिंदीतून मराठीच्या अंगणात आलेली उदाहरणादाखल दोन : हाक आणि प्रतिसाद- निदा फाझली (अनु. इब्राहिम अफगाण) राग दरबारी— श्रीलाल शुक्ल (अनु. श्रीपाद जोशी)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26762 views

💬 प्रतिसाद (59)
ग
गॉडजिला Tue, 07/13/2021 - 14:24 नवीन
Even I was heartbroken
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/13/2021 - 14:32 नवीन
ओह.. :-( त्याचा पुढला भागही त्यानं लिहिला होता बहुदा.. नाव आठवत नाहीये.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 07/13/2021 - 14:40 नवीन
अनुवादकाची त्यात पपी बदल्याचा विचार सोडून दे फलाना फलाना तुला स्त्री खूप सुखी ठेवेल इथेच रहा अशी काही वाक्यरचना वाचल्याचे स्मरते. मला काहींच त्या वाक्याचा अर्थ समजायचा नाही... तसही बदल्यासाठी इतकी साहसे पळापळ केल्यावर पपी त्याच्या अन्यायाचा बदला न घेताच सेटल होतो हे जाणून कपाळावर हात ठेवला होता...
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sat, 08/07/2021 - 16:21 नवीन
पुस्तक वाचल्याबरोबर लक्षात येतं, चार आनेकी मुरगी, बार आनेका मसाला..
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 07/13/2021 - 09:28 नवीन
वा हे खुप उपयोगी पडेल. सध्या मी स्टोरी टेल अ‌ॅप वरुन पुस्तके वाचत असते. किचनची कामे उरकताना ते बर पडत. चारचौघी मी अधी वाचल आहे. मला आवडलेल. छानच आहे.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/13/2021 - 14:31 नवीन
माझीही थोडीशी भरः "दु:ख पर्वताएवढे": भा रा भागवतांनी केलेला विक्टर ह्युगोच्या ला मिझरेबल्सचा अनुवाद. "मला निसटलंच पाहिजे!": श्रीकांत लागू यांनी केलेला स्लावोमीर राविझच्या द लाँग वॉक चा अनुवाद
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/19/2021 - 11:19 नवीन
अनुवादित पुस्तकांच्या यादीत एस भैरप्पा यांच्या उमा कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेल्या पुस्तकांचा उल्लेख जरुर असला पाहिजे यादीत सगळ्यात पहिले आणि महत्वाचे पुस्तक म्हणजे "आवरण" त्या नंतर या यादीत त्यांच्या "पर्व", "तंतू", "मंद्र", "वंशवृक्ष ", "सार्थ" या कादंबर्‍या येतात. वर उल्लेख झालेल्या पुस्तकांशिवाय मॅक्स्झिम गॉर्की यांचे "आई" , चार्लस डिकिन्स यांचे "टेल ऑफ टू सिटीज" पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 07/19/2021 - 12:14 नवीन
दोन्ही एकदम भारी. विशेष म्हणजे उमा.कुलकर्णी यांनीदेखील भाषांतर असल्याचं जाणवू न देता लिहिलंय.
  • Log in or register to post comments
स
साबु Sun, 08/01/2021 - 16:13 नवीन
वल्लि उर्फ प्रचेतसशी सहमत. मल आवडलेले अनुवाद : पपिलोन, डेझर्टेर, कोमा, सेवेन्थ सिक्रेट, फिस्ट ओफ गौड, सेकन्ड लेडि,कन्टेजन.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा