Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रंजन आणि कल्पनाविस्तार (६)

ह
हेमंतकुमार
Wed, 06/30/2021 - 08:26
🗣 16 प्रतिसाद
भाग ५ इथे .................................................... मागील दोन भागांमध्ये चित्रावरून कल्पनाविस्तार झालेला आहे. आता यावेळेस शब्दांवरून करूया... कल्पना लढवा ! खाली एका मराठी लेखामधले काही निवडक शब्द देत आहे. ते नीट वाचल्यानंतर काही प्रश्न विचारतो. त्यांची कल्पनेने उत्तरे द्यावीत. शब्द : तडफडणारे, स्त्री, परेशान, भकास, जीवनात, वाट, चव, अभागी प्रश्न : १. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा. २. त्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा ३. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (१० वर्षांचा टप्पा) काय असावा ? ………………….. प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही. शक्यतो प्रश्न विचारू नका. आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा. मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही. धन्यवाद ! ……………………………

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6271 views

🗣 चर्चा (16)
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/01/2021 - 04:09 नवीन
मुदत 24 तासांनी वाढवली आहे...
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 07/01/2021 - 07:20 नवीन
१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा. >> ग्रामीण भागातील स्त्रीचे खडतर आयुष्य. २. त्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा >> शहरी लेखक. पुरुष. मुंबई किंवा विदर्भ ३. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (१० वर्षांचा टप्पा) काय असावा ? >> २००५-२०१५
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 07/01/2021 - 08:43 नवीन
लेखकाने परेशान हा शब्द वापरला आहे म्हणजे लेखक विदर्भ मराठवाडा भागातला आहे. तडफडणारे म्हणजे दुष्काळाशी काहीतरी संबंध आहे. माझ्यामते दुष्काळ, विशेषतः विदर्भातल्या दुष्काळावर हा लेख असावा. आता इतका तीव्र दुष्काळ कधी होता, तर साधारण 2010 ते 2017 या काळात हे दुष्काळ तीव्र होते.., त्यामुळे हा या लेखाचा कालावधी असावा. एखाद्या NGO च्या कार्याबद्दल पण लेख असू शकेल. लेखाचा सहानुभूती मिळवण्याचा हेतू तर दिसतोच आहे मला. अजून एक गोष्ट, ज्याअर्थी लेखक शब्द *ओततोय* त्याअर्थी वय 40च्या आसपास. पुरुष लेखक.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 07/01/2021 - 09:00 नवीन
"मर्दा तुझी ही कहाणी :- अर्थात जागा हो रे ढाण्या वाघा तू काही जन्मजात उंदीर नाहियेस " हे आमचे आगामी पुस्तक कुमार सरांच्या हाती लागलेले दिसते आहे. पाने ८९,६७,८९,३६७ किम्मत :- पुरुषोध्दारक समितीस कमीत कमी देणगी रु १०० त्यातल्याच एका पानावरच्या एका उतार्‍यातले शब्द सरांनी निवडलेले आहेत. सरांच्या या धाडसाचे मनमोकळेपणाने कौतुक करत तो उतारा इथे समस्त पुरुष मित्रांसाठी देत आहे :- लग्नानंतरच्या आयुष्यात कधीतरी एकदा क्षणभर सुख मिळावे म्हणून आयुष्यभर तडफडणारे पुरुष पाहिले की मनाची नुसती तगमग होते. क्षणीक मोहा पायी एखाद्या स्त्री च्या हाती आपले सर्व आयुष्य सोपवून देणारे पुरुष नंतर आयुष्यभर आपल्या निर्णयावर परेशान असतात. त्यांची ती केविलवाणी अवस्था बघवत नाही आणि मग अशा अभागी, पतीत, दुर्दैवी जीवांकरता काहितरी करण्याची इच्छा प्रबळ होउ लागते. स्त्रीयांचा उध्दार करण्यासाठी अनेक पुरुष समाजसेवक पुढे झाल्याचा इतिहास तर सर्वज्ञात आहे. ती परंपरा आजही अखंडीत आहे. पण पुरुषांच्या भकास जीवनात सुखाचा थोडातरी शिडकावा करण्यासाठी समोर आलेली एकतरी स्त्री आपल्याला ज्ञात आहे का? स्त्रीया सोडा पण पतीत पुरुषांचाही उध्दार करावा असे कोणत्याही समाजसेवकाला आजपर्यंत का बरे वाटले नसेल? घरकी मुर्गी दाल बराबर असे म्हणतात ते काही खोटे नाही. लग्न होण्या आधि उत्साही, खेळकर, हौशी आणि सदैव हसतमुख असलेल्या पुरुषांची लग्ना नंतर अशी का बरे वाट लागते? आयुष्याची चवच हरवलेले हे अभागी जीव उर्वरीत आयुष्य बायकोच्या ताटाखालचे मांजर बनून मान खाली घालून लाचारीने का बरे जगत असतील? यांना यांच्या स्वत्वाची जाणीव कोण बरे करुन देणार? कुमार सरांना नम्र सुचना :- पुस्तक जर घरी नेउन वाचत असाल तर तुम्हाला अतिशय सावध रहावे लागेल. न जाणो तुमच्यावर हे पुस्तक बाळगले म्हणून एखादा दूर्धर प्रसंग ओढवलाच तर पुस्तकाच्या पान क्र. ७३,५६,२७,२३४ वर जो भ्रमणध्वनी क्र दिला आहे तेथे नि:संकोच पणे संपर्क करा. प्रथमोपचाराचे साहित्य घेऊन स्वयंसेवक ताबडतोब हजर होतील. इश्र्वर तुमचे कल्याण करो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 07/04/2021 - 12:29 नवीन
शालेय अभ्यासक्रमात "दिलेल्या मुद्द्यांवरून गोष्ट लिहा" असा एक प्रश्न असायचा. आपण तो कसा सोडवत असाल व त्या "सोडवणुकीचा" तपासणार्‍या गुरुजनांवर किती खोल परिणाम होत असावा ....
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 07/06/2021 - 15:54 नवीन
पैजारबुवा, साष्टांग दंडवत स्वीकारा... कुमार साहेब, हा खेळ बराच रंजक आहे आधीचेही सर्व भाग वाचतो आता... 😀
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 07/06/2021 - 16:43 नवीन
टर्मि भाऊ, फारा दिसांनी आलात राव तुमचे आगमन चैतन्यदायी असते धन्यवाद !
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 07/07/2021 - 03:50 नवीन
का कोण जाणे, पण पुस्तकाचे नाव वाचून उगाचच मर्चीडिज आठवली..
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/01/2021 - 10:55 नवीन
तु का, आनंदा, ज्ञा पै , वरील तिन्ही प्रतिसादांनी सुरेख हॅट्रिक केलेली आहे ! कल्पनाविस्तारातील अशा विविधतेमुळेच खेळाचा हेतू साध्य होत आहे. बुवांच्या सूचनेची दखल घेत आहे !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/02/2021 - 05:47 नवीन
३ तासांनी समारोप...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/02/2021 - 08:33 नवीन
सर्व सहभागी मंडळींचे मनापासून आभार ! मूळ लेख 1967 मधला असून त्याचे शीर्षक ‘एक हजार अन्याय’ असे आहे. त्यात फ्रान्सजवळील एका पर्वतीय भागांमध्ये एक हजार पुरुष, स्त्रिया न मिळाल्यामुळे बिनलग्नाचे राहिलेले आहेत, असा विषय आहे. मोठा खुमासदार लेख आहे. तो विजय तेंडुलकरांनी त्यांच्या चाळिशीत लिहिलेला आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 07/02/2021 - 12:57 नवीन
खेळ रोचक कसे बनवायचे याचे एक शास्त्र आहे म्हणुन लोक तासंतास खेळतात अन्यथा खेळ निरस होइल व फ्लोप होइल.... त्या शास्त्रामधे एक नियम असतो ते म्हणजे खेळाडुला टारगेट द्या व तिथे पोहोचण्याच्या मधे अडथळे निर्माण करा... तरच खेळाडुच्या कृतीला अर्थ प्राप्त येइल. आपणही हा कल्पनाविस्ताराचा जो खेळ मांडला आहे तो गेम थिअरीच्या अनेक पातळ्यांवर विसंगत आहे... पण सुरुवात वरील नियमाने करता येइल. आपण खेळाडुला अडथळा देत आहात पण त्याचे कोणतेच डेस्टिनेशन / टारगेट व्यवस्थित स्पश्ट नाही परीणामी पर्टिसिपंटला नेमके करायचे का व काय हे दोन प्रश्न सतत गोंधळात टाकत आहेत... आपण डेस्टिनेशन म्हणुन वरील शब्द वापरुन एखादे विनोदी लिखाण करा जो जास्त विनोदी लिहिल तो विजेता वगैरेवगैरे टारगेट देणे आवश्यक अर्थात बर्‍याच गोश्टी टारगेट मधे कंवर्ट होउ शकतात मी फक्त एक उदा दिले.... पण टार्गेट नसेल तर खेळायचे काही प्रयोजनच उरत नाही...अजुन बरेच मुद्दे आहेत पण सुरुवात इथुन होउ शकते
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/02/2021 - 13:05 नवीन
सूचनेबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 07/02/2021 - 13:14 नवीन
प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे !
मजा हे कृतीचे बाय प्रॉडक्ट आहे ते कृतीचे टारगेट असु शकत नाही... कृतीचे टार्गेट सेट करावे लागेल ते अ‍ॅचिव कराय्च्या प्रयत्नातुन मजा निर्माण होइल...
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 07/05/2021 - 09:28 नवीन
आपण अस करु. मजा हेच टार्गेट ठेवू. विधायक झाले तर बायप्रॉडक्ट.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 07/05/2021 - 10:24 नवीन
मजा हेच टार्गेट ठेवू.
मग टार्गेट एचिव करायच्या प्रयत्नात मजा असेलच असे नाही एचिव न होणे ही बाबही मजेशीर असेलच असे नाही... त्यापेक्षा टार्गेट चुकताना त्यातून मजा निर्माण होईल असं नियमन हवं...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा