Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

वडीलांना काव्यसुमनांजली

प — पाषाणभेद, Sun, 06/20/2021 - 11:34
तुमच्या जाण्याने जग सुने झाले सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे || किती आठव काढावी किती स्मृती जपावी त्या आठवांनी डोळा पाणी आले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१|| रिक्त झाली तुमची नेहमीची जागा तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२|| कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून रिक्त राहीले स्वतः केले दुसर्‍यांचे भले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३|| आयुष्यातले दु:ख कधी जाणवू दिले नाही शरीराच्या कष्टाने डोळा पाणी आणले नाही काळाने तुम्हाला असे अकाली का नेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||४|| (माझे वडील जाण्याला आज सव्वा महिना झाला. वडीलांना हाक मारण्यास मी पोरका झालो. त्यांच्या आठवणी तर येतच राहतील. आजच्या जागतिक फादर्स डे निमित्ताने ही काव्यसुमनांजली वडीलांना अर्पण.) - पाषाणभेद २०/०६/२०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5889 views

💬 प्रतिसाद
च
चित्रगुप्त Sun, 06/20/2021 - 16:58 नवीन
दिवंगत वडिलांच्या स्मृतीला सादर अभिवादन.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/20/2021 - 17:42 नवीन
वडिल्यांच्या जाण्याने जे दु:ख आपणास झाले त्याची वेदना कमी व्हावी म्हणुन मी प्रार्थना करतो... __/\__

मदनबाण.....

  • Log in or register to post comments
श
शा वि कु Mon, 06/21/2021 - 15:45 नवीन
वडिलांच्या स्मृतीला प्रणाम.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 06/23/2021 - 08:56 नवीन
आपल्या दुःखात मी सहभागी आहे . फार वाईट वाटलं , आणि तुमचं दुःख या रचनेत पूर्णतः उतरलंय असं वाटलं . महादेव त्यांच्या आत्म्यास सद्गती देओ. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Wed, 06/23/2021 - 19:57 नवीन
मोजक्या शब्दात व्यक्तिचित्र चांगले मांडलेत. तुमच्या दुःखाला उतारा मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करीन. माझ्या वडिलांचा आम्हाला लहानपणापासून कधीच आधार असा झाला नाही तरी देखील माझ्या वयाच्या ३०व्या वर्षी ते गेले आणि माझे बालपण संपले असे मला जाणवले. जोपर्यंत आपल्या डोक्यावर कोणीतरी असते तो पर्यंत आपण लहानच असतो पण ते छत्र हरपले की आपण लहान राहात नाही.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/24/2021 - 07:18 नवीन
प्रत्येकासाठी आपले वडील स्पेशलच असतात. तुम्ही त्या भावना कमीत कमी शब्दात चपखल मांडल्या आहेत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 06/24/2021 - 07:52 नवीन
श्रध्दांजली भिड्णारी कविता
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 06/24/2021 - 09:56 नवीन
हृदयस्पर्शी रचना. आम्हा भावंडांचे वडील माझ्या वयाच्या ७ व्या वर्षी गेले. वडिलांचे छत्र नसणे म्हणजे काय हे पुरेपुर अनुभवले. पण त्यांच्याच आशिर्वादाने सर्व काही सुरळीत झाले आणि आयुष्यात स्थिरस्थावर झालो. पुसटसे आठवत असलेले वडिल नेहमी सोबत असतात ही जाणीव जीवनातली दु:खं पेलण्यास बळ देते. पाभे, तुमचे वडिल देखील तुमच्या सोबत सतत असतील हे नक्की !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा