Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रंजन आणि कल्पनाविस्तार (५)

ह
हेमंतकुमार
Fri, 06/18/2021 - 04:59
🗣 15 प्रतिसाद
भाग ४ इथे ..................................... कल्पना लढवा ! खाली एका मराठी लेखाच्या संदर्भातील चित्र आहे. ते प्रातिनिधिक आहे. तुम्ही कल्पनेने या चित्राला अनुरूप असे शीर्षक सुचवा आणि संबंधित विषय थोडक्यात लिहा. ok प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही. शक्यतो प्रश्न विचारू नका. आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा. मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही. धन्यवाद ! ..... चित्र सौजन्य : माझी पत्नी. साभार !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6817 views

🗣 चर्चा (15)
S
shashu Fri, 06/18/2021 - 10:16 नवीन
संसाराचा दोलायमान पुरुष एकाच बाजूस दोन्ही पाय टाकून संसार हाकण्याचा प्रयत्न करतोय. याउलट स्त्री दोन्ही बाजूस पाय टाकून समतोल साधून संसाराचा गाडा पुढे नेतेय. स्त्री कडील बाजू जास्त झुकलेली आहे याचा अर्थ असा नाही कि तिला झुकते माप दिले गेलेय तर स्त्री कडे संसाराचा भार जास्त असल्यामुळे ते झुकले गेले आहे. स्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा पुरुषापेक्षा वेगळी दिसत आहे ते का ते आत्ता मला सुचत नाही आहे.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Fri, 06/18/2021 - 10:52 नवीन
तुमचं निरीक्षण आवडलं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 06/18/2021 - 11:09 नवीन
स्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा पुरुषापेक्षा वेगळी दिसत आहे ते का ते आत्ता मला सुचत नाही आहे.
उलट पुरुषाची आसव्यवस्था अनैसर्गीक वाटत आहे... बाकि स्त्रि च्या सांसारीक वजनाने पुरुष हवेत लटकला आहे असेही अनुमान काढता येइल पण मला इथे लहान मुले दिसत आहेत स्त्रि अन पुरुष नाही त्यामुळे एकुणच त्यानुशंगे काही अनुमान काढणे अप्रस्तुत भासते
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 06/18/2021 - 10:32 नवीन
उद्याला मोठाले होउ. उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देउ...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 06/18/2021 - 10:33 नवीन
स्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा पुरुषापेक्षा वेगळी दिसत आहे ते का ते आत्ता मला सुचत नाही आहे तारेवरची कसरत .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 06/18/2021 - 12:33 नवीन
छान सुरवात ! यावेळेस shashu प्रथमच आलेत इथे. स्वागत ! नियमित सहभागींचेही अंतरिम आभार .
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 06/18/2021 - 13:08 नवीन
मुलगाच हवा ह्या अतिरेकामुळे लग्नाला मुली मिळेना झाल्यात. आणि मुला मुलींच्या संख्येत जे नैसर्गिक संतुलन असते ते मुलगा पाहिजे ह्या आग्रहामुळे बिघडले आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 06/18/2021 - 15:41 नवीन
कधी वर -चांगले, कधी खाली- १९-२० असे अनेक प्रसंग आले तरी एकमेकांना पासून दूर असले तरी मैत्रीचे हात समाधानापुरते कधी हिंमतीसाठी पुढे सरसावतात आणि त्यामुळे हसू फुलल आहे.:) (त्या दोघांचा एक हात मिळवण्यासाठी पुढे आहे, आणि गोड हसू आहे.) -भक्ती
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 06/18/2021 - 16:42 नवीन
मला यांच्यामध्ये दोन वेगळ्या शक्यता दिसत आहेत. पहिली शक्यता म्हणजे हा लेख मुलगा आणि मुलींच्या गुणोत्तरवर असेल. परंतु मुलाची बाजू हवेत आहे म्हणजे त्यातून नेमके काय सुचवायचं आहे याचा अंदाज येत नाहीये. असे काही आहे का की मुलांचे संसार असेच हवेत जातील... दुसरे एक जे मला वाटते ते, वाढत्या शहरीकरणामुळे मुलांच्या खेळायच्या जागा कमी होत आहेत, त्याबद्दल काही असेल की काय असे देखील वाटते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 06/18/2021 - 17:30 नवीन
कल्पनेच्या सुंदर भराऱ्यामुळे खेळ आता रंगू लागला आहे...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/19/2021 - 04:20 नवीन
मुदत चार तासांनी वाढवली आहे
  • Log in or register to post comments
R
ray Sat, 06/19/2021 - 04:30 नवीन
मला सोडून "तुम्ही" कशी लस घेतली?? https://m.youtube.com/watch?v=mYf2A-VlpbY
  • Log in or register to post comments
R
ray Sat, 06/19/2021 - 04:30 नवीन
मला सोडून "तुम्ही" कशी लस घेतली?? https://m.youtube.com/watch?v=mYf2A-VlpbY
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/19/2021 - 07:28 नवीन
१ तास राहिलाय...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/19/2021 - 08:31 नवीन
सर्व सहभागी मंडळींचे मनापासून आभार ! आपण सर्वांनी कल्पनेने लिहिलेला मजकूर उत्तम आहे. विविध प्रकारच्या उत्तरांनी खूप मजा आली. कल्पनांची व्याप्ती सुंदरच. मूळ लेखाबद्दल माहिती : शीर्षक : मुलगा हवाच हो ! ( उपरोधिक अर्थाने दिलेले) त्या लेखामध्ये मुलगा होण्याचा अट्टहास, लिंग-असमतोल, कुटुंबनियोजन, गर्भलिंगनिदान चाचणी, त्यावर बंदीचा कायदा, इत्यादी मुद्द्यांवर विवेचन.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा