Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

इंद्रधनू....

J — Jayagandha Bhatkhande, Mon, 06/07/2021 - 10:45
इंद्रधनू... निरोप घेताना म्हणालो मी, माझी आठवण ठेव.. नशिबापुढे हतबल आपण, जोड्या ठरवतो देव.... क्षणात सारं बदललं तरी, विसरू कशी तुला..? तिचे साश्रुपूर्ण नयन, विचारत होते मला.... निशब्द शांततेत घुमला, उदास तिचा उसासा.. पण हात हाती घेऊन दिला, तिनंच मला दिलासा.... केली जरी प्रीती, पण सोडली नाही नीती.. अपराधासम खंत कशाला, सोड मनातील भीती.... शब्द असे पडता कानी, धरिले तिचे पाय.. परमहंस नाही गं मी, पण तू आहेस शारदा माय.... शेवटच्या त्या भेटीमध्ये, मनं झाली साफ.. विशाल हृदयाच्या तिनं, केलं मला माफ.... आयुष्यात आता पुढे जाईन, बाळगणार नाही तमा.. खूप समाधान देऊन गेली, तिची अनमोल क्षमा.... भांबावलो, काहीसा उध्वस्त मी, ती झाली जाणती.. अंधारलेल्या माझ्या भावविश्वातली, जणू स्थिर पणती... आता कधी एकाकी असता, ती करते आठवणींची ढाल.. संधिकाली कातरवेळी ओढते, कधी हळुवार क्षणांची शाल.... कितीही गर्दी असली तरी, बाजारात कधी ती दिसतेच.. डोळ्यांच्या कडा पाणावल्या तरी, ओळखीचं गोड हसतेच... प्रेमसरिता अविरत मात्र, त्यांच्या उरी वहाते.. दोन तीरांवर विरही जीवांना, ते आभासी इंद्रधनू सांधते....!! जयगंधा.. ६-६-२०२१.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2097 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/07/2021 - 10:55 नवीन
विरहाची कविता आवडली. थेट भिडली. लिहिते राहा. बाय द वे, ती बाजारात अधुन मधुन दिसते हे तरी बरंय. साथ भिगे बारिश मे ये तो मुमकीन नही चलो भिगते है यादो मे, तुम कही मै कही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Mon, 06/07/2021 - 11:07 नवीन
आवडली पण लय त्रास होतो आजकाल अस काही वाचलं की...:(
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Mon, 06/07/2021 - 14:03 नवीन
खुलता कळी खुलेना......
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा