Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आईच तर आहे..!

प
पाटिल
Sat, 06/05/2021 - 05:49
💬 4 प्रतिसाद
कुत्र्याचं पिल्लू त्याच्या आईकडं दुडूदुडू धावत येतं आणि पिल्लाची आई त्याच्यावर पाखर घालते, असं काही दिसलं की त्याच्या पोटात तुटतं..! आपल्यालाही आई आहेे, हे त्याला आठवतं.. आणि काही दिवस तो विस्कटून जातो..! मग त्याला सांगावं लागतं की असं करू नये अरे... एवढं तोडू नये..बोलावं अधूनमधून घरी.. विचारपूस करावी सगळ्यांची... स्वतःबद्दल काही सांगण्यासारखं नाही, असं वाटत असेल, तरीही ठीक आहे.. पण किमान एवढं तरी सांगू शकतोसच की बरा आहे मी... काळजी करू नकोस.. होईल माझं सगळं व्यवस्थित...! एवढंही खूप असतं आयांना..!! फोन केलेलं तुला आवडत नाही, म्हणून मग तिला माहित असलेल्या तुझ्या जुन्या मित्रांना फोन करत राहते ती.. विचारत राहते तुझ्याबद्दल.. ते तरी काय सांगणार..! आणि ती तरी असे इकडं तिकडं फोन करत राहण्याशिवाय, काळजी करत राहण्याशिवाय दुसरं काय करू शकते सांग बरं.. हे असं वर्षानुवर्षे दूर दूर राहणं, फोनला उत्तरं न देणं, स्वतःबद्दल काहीही न कळू देणं, हे जरा जास्ती होतंय, असं वाटत नाही का तुला ? वयही झालंय आता तिचं आणि ह्या वयात कुणाच्या जीवाला असा घोर लावू नये.. शिवाय कधीतरी एके दिवशी हे फोन येणंही बंद होऊन जाईल कायमचं, हे ही लक्षात असू दे.. स्वतःवर नाराज असण्याचा एक काळ असतो.. त्या दिवसांत आपण जन्मदात्यांशी कसं वागतो, हे जाणवत नाही.. नंतर जेव्हा जाणवतं, तेव्हा मग आयुष्यभर स्वत:ला कुरतडत राहण्याशिवाय हातात काही राहत नाही, हे तुला आत्ता समजणार नाही... असो.. चल ऊठ आता..खूप झालं.. तोंड धुवून घे... आणि कॉल कर तिला... शब्द सापडतात रे आपोआप... आणि नाही सापडले तरी काय बिघडणार आहे..!! आईच तर आहे..!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2454 views

💬 प्रतिसाद (4)
श
शित्रेउमेश Mon, 10/25/2021 - 04:58 नवीन
:(
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 10/25/2021 - 05:23 नवीन
.......
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Mon, 10/25/2021 - 07:41 नवीन
>>शिवाय कधीतरी एके दिवशी हे फोन येणंही बंद होऊन जाईल कायमचं, हे ही लक्षात असू दे.. :( >>स्वतःवर नाराज असण्याचा एक काळ असतो.. >>त्या दिवसांत आपण जन्मदात्यांशी कसं वागतो, हे जाणवत नाही.. अगदी खरं !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 10/25/2021 - 08:30 नवीन
वाह, सुंदरच ! +१
शब्द सापडतात रे आपोआप... आणि नाही सापडले तरी काय बिघडणार आहे..!! आईच तर आहे..!!
क्या बात हैं !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा