आणीबाणीची चाहूल- भाग ४
यापूर्वीचे लेखन
आणीबाणीची चाहूल- भाग १
आणीबाणीची चाहूल- भाग २
आणीबाणीची चाहूल- भाग ३
आपण मागच्या भागात बघितले की विशेषाधिकाराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना न्यायमूर्ती कुबेरनाथ श्रीवास्तव निवृत्त झाले आणि त्यानंतर ही याचिका न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांच्याकडे वर्ग करण्यात आली. ही याचिका न्यायालयात दाखल करून तीन वर्षांपेक्षाही जास्त काळ लोटला होता मात्र त्यामानाने प्रगती विशेष झाली नव्हती. न्यायमूर्ती सिन्हांनी या याचिकेच्या सुनावणीला गती दिली. विशेषाधिकाराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना त्या मुद्द्याशी संबंधित नसलेल्या इतर मुद्द्यांवर युक्तीवाद करायला त्यांनी दोन्ही वकीलांना परवानगी दिली. आणखी एक मुद्दा होता प्रचारासाठी इंदिरा गांधींनी केलेल्या खर्चाचा. त्या मुद्द्यावर न्यायालयाचे कामकाज पुढे सुरू झाले. दरम्यान ३ ऑक्टोबर १९७४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाशी संबंधित दुसर्या एका याचिकेवर निर्णय दिला आणि त्या निर्णयाचा या याचिकेशी थेट संबंध असल्याने त्या याचिकेविषयी थोडे अधिक लिहिणे गरजेचे आहे.
कंवरलाल गुप्ता विरूध्द अमरनाथ चावला खटला
१९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली सदर लोकसभा मतदारसंघातून इंदिरा गांधींच्या काँग्रेस(आर) पक्षाचे उमेदवार अमरनाथ चावला यांनी जनसंघाच्या कंवरलाल गुप्ता यांचा पराभव केला. त्यानंतर कंवरलाल गुप्तांनी अमरनाथ चावला यांच्या निवडीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. जनप्रतिनिधी कायदा-१९५१ ने परवानगी दिलेल्या खर्चाच्या रकमेपेक्षा जास्त खर्च चावलांनी आपल्या प्रचारासाठी केला असा गुप्तांचा दावा होता. दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका रद्दबादल ठरवून चावलांची निवड वैध ठरवली. त्याविरूध्द कंवरलाल गुप्तांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. ३ ऑक्टोबर १९७४ रोजी न्यायमूर्ती प्रफुलचंद्र नटवरलाल भगवती (पी.एन.भगवती) यांनी या अपीलावर निकाल देताना निवडणुक प्रचारासाठी केलेल्या खर्चावर एक महत्वाचा निर्णय दिला. न्यायमूर्ती भगवतींनी त्यांच्या निकालात म्हटले की जो खर्च उमेदवाराने स्वतः केला नसेल पण दुसर्या कोणा व्यक्तीने उमेदवाराच्या परवानगीने आणि उमेदवाराला माहित असताना उमेदवाराच्या प्रचारासाठी केला असेल आणि त्या खर्चाचे उत्तरदायित्व स्वीकारायला उमेदवाराने नकार दिला नसेल (म्हणजे माझ्या परवानगीशिवाय कोणीतरी हा खर्च माझ्यासाठी केला आहे असे स्पष्टपणे म्हटले नसेल) तर तो खर्चही उमेदवाराने केलेल्या एकूण खर्चात धरण्यात यावा.
न्या.पी.एन.भगवती
(संदर्भः https://gumlet.assettype.com/barandbench%2Fimport%2F2017%2F06%2FJustice-Bhagwati-e1498133966871.jpg?auto=format%2Ccompress&fit=max&format=webp&w=768&dpr=1.3)
या निकालाचा अर्थातच इंदिरा गांधींच्या निवडणुक खटल्याशी थेट संबंध होता. या मुद्द्यावरून इंदिरा गांधींना गोवता येईल म्हणून राजनारायण काहीसे आनंदले. पण हा आनंद अल्पजीवी ठरला. हा निकाल आल्यानंतर इंदिरा गांधींच्या सरकारने जनप्रतिनिधी कायदा-१९५१ मध्ये दुरूस्ती करणारा एक वटहुकुम आणला आणि न्यायालयाचा हा निर्णय फिरवला. या वटहुकुमाप्रमाणे निवडणुक प्रचारासाठी प्रत्यक्ष उमेदवाराने आणि उमेदवाराच्या एजंटने केलेल्या खर्चाचा उमेदवाराच्या खर्चात अंतर्भाव करण्यात यावा. इतर कोणीही--उमेदवाराचा पक्ष, उमेदवाराचे मित्र, नातेवाईक, पाठीराखे किंवा समर्थक यांनी उमेदवारासाठी केलेल्या खर्चाचा उमेदवाराच्या खर्चात अंतर्भाव करण्यात येणार नाही असे या वटहुकूमात म्हटले होते. इतकेच नाही तर हा वटहुकूम पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आणण्यात आला म्हणजे सध्या सुनावणी चालू असलेल्या खटल्यांनाही तो लागू होणार होता. हा वटहुकूम आणण्यात इंदिरा गांधींच्या सरकारचा हेतू शुध्द नव्हता हे सांगायला कोणा प्रकांडपंडिताची गरज नाही. हा वटहुकूम मंजुरीसाठी संसदेत आला तेव्हा विरोधी पक्षांनी खूप निषेध केला पण लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेसला प्रचंड बहुमत असल्याने वटहुकूमाला मंजुरी मिळायला काहीच अडचण आली नाही. २१ डिसेंबर १९७४ रोजी वटहुकूमाला दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींची सही झाली आणि जनप्रतिनिधी कायदा-१९५१ मध्ये बदल करण्यात आला.
विशेषाधिकारांचा मुद्दा
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात पंतप्रधानांच्या भेटी/दौर्यादरम्यानच्या नियमावलीची निळी पुस्तिका आणि केंद्र-उत्तर प्रदेश सरकार आणि पंतप्रधान-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यातील पत्रव्यवहार हा उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारचा विशेषाधिकार असून तो गोपनीय आहे याला शांतीभूषण यांनी दिलेल्या आव्हानावर सुनावणी सुरू होती. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुरू होती. या खंडपीठात सरन्यायाधीश अजितनाथ रे (ज्यांना इतर तीन वरीष्ठ न्यायाधीशांना डावलून इंदिरा सरकारने सरन्यायाधीश केले होते), न्यायमूर्ती रणजितसिंग सरकारीया (ज्यांच्या अध्यक्षतेखाली १९८० च्या दशकात केंद्र-राज्य संबंधांवर शिफारशी करायला आयोग प्रस्थापित करण्यात आला होता), न्यायमूर्ती के.के.मॅथ्यू, न्यायमूर्ती नंदलाल उंटवालिया आणि न्यायमूर्ती ए.अलागिरीस्वामी यांचा समावेश होता. राजनारायण यांच्या बाजूने अर्थातच शांतीभूषण यांनी युक्तीवाद केला तर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने भारताचे अॅटर्नी जनरल निरेन डे यांनी युक्तीवाद केला. कुलदीप नय्यर यांनी या निरेन डे यांचा उल्लेख 'embarrassingly pro-government attorney-general' असा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पुढील दोन मुद्द्यांचा सुनावणीसाठी विचार केला--
१. मागील भागात म्हटल्याप्रमाणे विशेषाधिकाराचा दावा करण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री किंवा सचिव यांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. ते केले नसतानाही असा विशेषाधिकाराचा दावा करता येईल का.
२. सरकार कोणतेही दस्तऐवज विशेषाधिकारांचा दावा करून सादर करायला नकार देऊ शकते का की असा दावा करायला काही मर्यादा आहेत?
अॅटर्नी जनरल निरेन डे यांनी म्हटले की विशेषाधिकाराचा दावा करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर केले नसले तरी हा तांत्रिक मुद्दा झाला. हे दस्तऐवज बाहेर आणल्यास सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचेल त्यामुळे या तांत्रिक मुद्द्यावर विशेषाधिकारांचा दावा रद्द करण्यात येऊ नये. सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचेल हे ठरविणार कोण हा प्रश्न न्यायाधीशांनी विचारल्यावर त्याचे उत्तर निरेन डे यांनी 'सरकार' असे दिले. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ निरेन डे यांनी इंग्लंडमधील काही उदाहरणे दिली. त्यात मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय झाले वगैरे तपशील सरकारने न्यायालयात विशेषाधिकाराचा दावा करून सादर करायला नकार दिला.
शांतीभूषण यांनी निरेन डे यांच्या या दाव्याला विरोध केला. त्यांनी म्हटले की या खटल्यात पंतप्रधान प्रतिवादी असल्याने विशेषाधिकार आहे की नाही हे केवळ सरकारने ठरवू नये. तसेच अमेरिकेत अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना वॉटरगेट खटल्यात विशेषाधिकारांचे संरक्षण न देता न्यायालयाने टेप सादर करायचा आदेश दिला हे उदाहरण शांतीभूषण यांनी दिले. शांतीभूषण यांनी मागणी केली की कोणते दस्तऐवज सरकारचा विशेषाधिकार आहे आणि कोणते नाही हे अलाहाबाद उच्च न्यायालयाला एकेक दस्तऐवज तपासून ठरवू द्या.
सर्वोच्च न्यायालयाने शांतीभूषण यांची मागणी मान्य केली आणि हे दस्तऐवज सरकारचा विशेषाधिकार आहेत की नाही हे तपासून बघायचा अधिकार अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा जानेवारी १९७५ मध्ये निकाल दिला.
त्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारला हे दस्तऐवज न्यायालयाला द्यावे लागले. न्या.जगमोहनलाल सिन्हा यांनी त्यांचा अभ्यास करून ते सगळे दस्तऐवज सरकारचा विशेषाधिकार नाहीत असे म्हटले. या मुद्द्यावरून राजनारायण यांच्या बाजूची अडवणुक करायचा इंदिरा गांधींच्या बाजूचा डाव उधळला गेला.
पी.एन.हक्सर यांची साक्ष
१२ फेब्रुवारी १९७५ रोजी न्यायालयात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण हक्सर (पी.एन.हक्सर) साक्षीदार म्हणून आले. १९७१ च्या निवडणुकांच्या वेळेस ते पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पंतप्रधान कार्यालयात सचिव होते. यशपाल कपूर यांच्या राजीनाम्याचा मुद्दा महत्वाचा होता. हक्सर त्यावर प्रकाश पाडू शकत होते. हक्सर यांनी यशपाल कपूरांच्या राजीनाम्याविषयी वेगळाच मुद्दा मांडला. त्यांच्या मते कपूरांनी १३ जानेवारी १९७१ रोजी राजीनामा दिला होता आणि त्यांनी तो राजीनामा दुसर्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला तोंडी मंजूर केला होता. पी.एन.हक्सर यांच्या उत्तरातून बरेच प्रश्न निर्माण झाले. एक तर सरकारी कर्मचार्याचा असा राजीनामा तोंडी मंजूर करता येतो का? आणि दुसरे म्हणजे यशपाल कपूर पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी असतील (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) तर त्यांचा राजीनामा मंजूर करायचा अधिकार पंतप्रधान कार्यालयाच्या सचिवांना असतो का?
पी.एन.हक्सर
(संदर्भः https://upload.wikimedia.org/wikipedia/en/4/4f/P._N._Haksar.jpg)
शांतीभूषण यांनी नेमक्या याच मुद्द्यांवरून हक्सरना प्रश्न विचारले. तेव्हा हक्सर यांनी सांगितले की ४ जानेवारी १९७५ रोजी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती अशी तोंडी आदेशातून झाली होती आणि त्या आधारावरच त्यांनी कार्यभार स्विकारला होता. इतकेच नाही तर त्यांच्या माहितीप्रमाणे अस्थायी सरकारी कर्मचार्यांची नियुक्ती तोंडी होऊ शकते. लिखित आदेश त्यानंतर निघतो. त्याप्रमाणे राजीनामाही तोंडी स्विकारला जाऊ शकतो. तसेच आपला दर्जा भारत सरकारच्या प्रशासनातील सचिव असा असल्याने सचिवांना अशा पदावर नियुक्त्या करायचा आणि राजीनामा स्विकारायचा अधिकार असतो असा दावा त्यांनी केला. त्यावर शांतीभूषण यांनी हक्सर यांना प्रश्न विचारला की हे नक्की सरकारच्या कोणत्या नियमाप्रमाणे होते आणि तो नियम दाखवता येईल का? त्यावर हक्सर म्हणाले की असा नियम आहे की नाही हे त्यांना माहित नाही मात्र अशाप्रकारे गोष्टी चालतात हे नक्की.
पी.एन.हक्सर यांनी या साक्षीतून मोठाच गोंधळ घातला हे सहजच लक्षात येईल.त्यानंतर बचावपक्षाने यशपाल कपूरांना साक्षीदार म्हणून पाचारण करायचे ठरविले.
यशपाल कपूर यांची साक्ष
त्यानंतर इंदिरा गांधींचे वकील एस.सी.खरे यांनी स्वतः यशपाल कपूर यांना न्यायालयात साक्षीसाठी बोलावले. यशपाल कपूर हे या खटल्यासाठी अत्यंत महत्वाची व्यक्ती होते. ते त्यांच्या राजीनामा आणि इंदिरा गांधींनी नक्की किती खर्च प्रचारासाठी केला या दोन महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकू शकणार होते. त्यांची साक्ष घेणे १८ फेब्रुवारी १९७५ रोजी सुरू झाले आणि ते दुसर्या दिवशीही चालू राहिले. आपण या खटल्यातील अतिशय महत्वाचे साक्षीदार आहोत हा दंभ यशपाल कपूर यांच्या देहबोलीतून पुरेपूर दिसत होता. ही साक्ष देताना त्यांनी भरपूर चुकाही केल्या. त्या चुका नक्की कोणत्या होत्या? त्यासाठी आपल्याला पुढच्या भागाची वाट बघावी लागेल. मात्र हा भाग संपविण्यापूर्वी एक गोष्ट लिहितो. यशपाल कपूर १९७२ मध्ये उत्तर प्रदेशातून काँग्रेस उमेदवार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले.

😀