Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

हा 'मी' नाही, आपण आहोत.

अ
अनुस्वार
Wed, 06/02/2021 - 21:50
💬 1 प्रतिसाद
'त्या' विहीरीत दगड टाकून सभोवतालाकडे दुर्लक्ष करत त्याचे कान दगड आणि पाण्याचा मिलनध्वनी ऐकण्यासाठी सज्ज झाले. तळाच्या अंधारात काय झाले कुणास ठाऊक. पण आतून आवाज आला, "विहीर का बुजवताय?" ही वाट नवी नव्हती, पण आता तो जुना 'तो' नव्हता. बदल आणि स्थिरतेच्या वजनकाट्यावर हिंदोळणारं आयुष्य त्याला नकोसं झालेलं. केवळ दोन पारड्यांत सामावतं ते आयुष्य कसलं? आणि दरवेळी वजन तोलूनच का बघायला हवं हो? जे दिसतंय त्यातच भागवून घ्यावं की. निकष बनवणारी ही माणसंच असतील ना कुणीतरी? की ते ही कुणा 'प्रेषितचा संदेश'! मला नाही फरक पडत त्याने. नशिबाचा कपाळमोक्ष करून माझी भाग्यरेषा मीच रेखाटनार.. याच मातीत. कुणा 'ब्रम्हाच्या हातून' नाही, तर माझ्याच ब्रम्हहस्ताने. हृदयाची स्पंदने हल्ली मिनिटाला ७२ तालांची कुजबुज सोडून थरथर जास्त करतात. हवा दूषित झालीच आहे पण हे वारं डोक्यात नको जायला. आणि सगळे आडोसे संपलेत हो. पैशाच्या तटबंदीवर माझा विश्वास नाही. म्हणून जरा मागे आलोय. हा प्रवास सोप्पा असतो. पुढे जायला चेंगराचेंगरी आणि मागे येताना लोक स्वत: वाट मोकळी करून देतात‌. वाटलं इथून तरी कळेल की आपण कुठे चाललो होतो. मला वाटतं तो वाळवंटाचा रस्ता आहे. लोक इतके पुढे निघून गेलेत की आता मला ते सुद्धा मृगजळाचाच एक भाग वाटतात. अशात मला ही विहीर दिसली. नाही.. उडी मारायला नाही, आसरा घ्यायला. विहीर तहान भागवते. इथे घशाला कोरड नाही पडायची. कुणीतरी मोठा 'क्रुस' टाकून ठेवलाय हिच्यात. क्षमा आणि शांती देखील इथेच असावी. क्रुसाला धरून आत उतरलो तर दगडांचा खच पडलाय इथे. प्रत्येक पत्थर बाहेर फेकावा लागेल. नव्या पाण्याचा प्रवाहच थोपावला गेलाय पार. आता मुक्काम इथेच. वर येणं झालंच तर ते नव्या पाण्यात पोहत, नाहीतर मग तळ खोदून दुसरं टोक गाठणार. पण असा दगडासारखा पडून नाही राहणार. निरूपयोगी!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1939 views

💬 प्रतिसाद (1)
ग
गॉडजिला Wed, 06/09/2021 - 10:33 नवीन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा