आणीबाणीची चाहूल- भाग १
नमस्कार मंडळी,
२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लादली. देशात आणीबाणी आणायच्या निर्णयाची कारणे शोधायला गेल्यास त्यासाठी आपल्याला १९७१ पर्यंत मागे जायला लागेल. या सगळ्या कारणांचा उहापोह या लेखमालेत करणार नसून आणीबाणी लादण्यासाठी तात्कालिक कारण असलेल्या घटनेवर लक्ष केंद्रीत करणार आहोत. आणि ती घटना होती १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींची १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर झालेली निवड रद्दबादल ठरवली. वेळ मिळाल्यास १२ जूनपासून २५ जूनपर्यंत आणीबाणी लादेपर्यंत घडलेल्या घटनांचाही परामर्श घेईन.
१९७१ च्या लोकसभा निवडणुका
२७ डिसेंबर १९७० रोजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सरकारने केलेल्या शिफारशीवरून राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरींना चौथी लोकसभा बरखास्त केली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. वास्तविक चौथ्या लोकसभेची मुदत मार्च १९७२ पर्यंत होती. मात्र १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर इंदिरा गांधींच्या सरकारला बहुमतासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि द्रमुक यांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे स्बबळावर बहुमत असावे आणि इतरांवर अवलंबून राहायची वेळ येऊ नये असे इंदिरा गांधींना वाटत होते. तसेच डिसेंबर १९७० च्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सरकारच्या एका महत्वाच्या निर्णयाला- संस्थानिकांचे भत्ते रद्द करायच्या निर्णयाला घटनाबाह्य ठरवून रद्दबादल केले. त्यामुळे आपल्या बळावर घटनादुरूस्ती करून तो निर्णय अंमलात आणण्याइतके बहुमत असायची गरज इंदिरांना वाटू लागली. नोव्हेंबर-डिसेंबर १९७० मध्ये देशात विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही काँग्रेसचा विजय झाला होता. तसेच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उत्तर प्रदेशात त्रिभुवन नारायण सिंग यांना मुख्यमंत्री बनविले असले तरी त्या कडबोळ्याच्या आघाडीत सगळे काही आलबेल होते असे नक्कीच नाही. त्यामुळे एक वर्ष लवकर लोकसभा निवडणुक झाल्यास आपल्याला पाहिजे तितका मोठा विजय मिळू शकेल असे इंदिरांना वाटले त्यामुळे हा लवकर निवडणुक घ्यायचा निर्णय इंदिरांनी घेतला.
इंदिरा १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. २९ डिसेंबर १९७० रोजी इंदिरांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत एकाने प्रश्न विचारला की विरोधी पक्षांनी एक विधान केले आहे की इंदिरा त्यांचा मतदारसंघ बदलून हरियाणातील गुरगावमधून निवडणुक लढविणार आहेत. त्यावर इंदिरांनी म्हटले- नाही. मी तसे करणार नाही (No. I am not). या उत्तराचे निवडणुक आव्हानाच्या खटल्यासंबंधात महत्व नंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत इंदिरा गांधींनी हे पत्रकार परिषदेत दिलेले उत्तर ध्यानात ठेवा ही विनंती.
१९ जानेवारी १९७१ रोजी पाच विरोधी पक्षांच्या आघाडीने (मोरारजी देसाईंची संघटना काँग्रेस, संयुक्त समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, जनसंघ आणि स्वतंत्र पक्ष) इंदिरा गांधींविरूध्द संयुक्त समाजवादी पक्षाच्या राजनारायण यांना रायबरेलीमधून उमेदवारी जाहीर केली. चौधरी चरणसिंगांचा भारतीय क्रांती दल हा पक्ष या विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील नव्हता तरीही त्या पक्षाने राजनारायण यांच्या विरोधात उमेदवार द्यायचे नाकारले. राजनारायण हे एक बर्यापैकी विक्षिप्त नेते होते. सतत कोणती ना कोणती आंदोलने करत राहणे हा त्यांचा स्थायीभाव होता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळपास अर्धा काळ कोणत्या ना कोणत्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांनी तुरूंगवास भोगला होता.
इंदिरा गांधी आणि राजनारायण
(संदर्भ: https://im.indiatimes.in/media/content/2019/May/former_pm_indira_gandhi_and_raj_narain_1556798609_725x725.jpg)
२५ जानेवारी १९७१ रोजी निवडणुक आयोगाने इंदिरा गांधींच्या काँग्रेस (आर) पक्षाला गाय आणि वासरू हे निवडणुक चिन्ह दिले. २७ जानेवारीला लोकसभा निवडणुकांसाठी अधिसूचना जारी झाली. त्यानंतर चक्रवर्ती राजगोपालाचारींनी काँग्रेस (संघटना) चे नेते आणि देशातील आघाडीचे वकील शांतीभूषण (प्रशांत भूषण यांचे वडील) यांना तार पाठवून गाय आणि वासरू हे चिन्ह धार्मिक असल्याने इंदिरांच्या पक्षाला हे चिन्ह मिळाल्याला आव्हान द्यायची विनंती केली. शांतीभूषण यांनी राजगोपालाचारींना उत्तर पाठविले की आता निवडणुक प्रक्रीया सुरू झाली असल्याने त्याविषयी काहीही करता येणार नाही.
काँग्रेस(आर) चे निवडणुक चिन्ह
(संदर्भ: http://guruprasad.net/wp-content/uploads/2014/03/indira_cow_calf_symbol.jpg)
निवडणुकांसाठी मतदान ३, ५ आणि ७ मार्चला होणार होते. इंदिरा गांधींच्या रायबरेली मतदारसंघात ७ मार्चला मतदान होणार होते आणि उमेदवारी अर्ज भरायची मुदत ३ फेब्रुवारी पर्यंत होती. पूर्ण देशात मतमोजणी ९ मार्चला सुरू होणार होती. २५ जानेवारीला इंदिरा गांधींच्या कार्यालयातून त्यांचा निवडणुकविषयक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्याप्रमाणे इंदिरा गांधी १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता रायबरेलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला निवडणुक अर्ज भरणार होत्या.
इंदिरा गांधींनी यशपाल कपूर (काँग्रेस नेते आर.के.धवन यांचे मामा) यांना रायबरेली मतदारसंघात आपले निवडणुक एजंट म्हणून नेमले. या खटल्यासंदर्भात यशपाल कपूर हे नाव खूप महत्वाचे आहे. त्यांच्याविषयी थोडे अधिक लिहितो. रावलपिंडीमध्ये १९२९ मध्ये जन्मलेले यशपाल कपूर फाळणीनंतर एक निर्वासित म्हणून दिल्लीला आले. नंतरच्या काळात त्यांना परराष्ट्रमंत्रालयात स्टेनोग्राफरची नोकरी मिळाली. काही वर्षे तिथे काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पंतप्रधान कार्यालयात स्टेनोग्राफर आणि टायपिस्ट म्हणून झाली. तेव्हापासूनच ते नेहरू आणि मग इंदिरा गांधींच्या मर्जीतले झाले. यशपाल कपूर १९६७ च्या लोकसभा निवडणुकांसाठीही इंदिरा गांधींचे रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी एजंट होते. नियमांप्रमाणे सरकारी कर्मचार्यांना निवडणुक प्रचारात भाग घेता येत नाही. त्यामुळे हे काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. निवडणुकांनंतर इंदिरा गांधी परत एकदा पंतप्रधान झाल्या. त्यानंतर त्यांनी यशपाल कपूरांना पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) म्हणून नियुक्त केले. १९७१ च्या निवडणुकांमध्ये परत एकदा इंदिरा गांधींचे निवडणुक एजंट म्हणून काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला.
यशपाल कपूर
(संदर्भ: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/7/79/Yash_Pal_Kapoor_with_Smt._Indira_Gandhi.png)
राजनारायण यांना विजयाची खात्री होती. ९ मार्चला मतमोजणी सुरू होण्यापूर्वी एक दिवस म्हणजे ८ मार्चला त्यांनी रायबरेलीत विजययात्रा पण काढली. पण १० तारखेला मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा राजनारायण यांचा पूर्ण भ्रमनिरास झाला. इंदिरा गांधींना १,८३,३०९ तर राजनारायण यांना ७१,४९९ मते मिळाली. इंदिरांनी राजनारायण यांचा १,११,८१० मतांनी पराभव केला. अन्य दोन उमेदवारांनीही निवडणुक लढवली होती. त्यापैकी अपक्ष उमेदवार स्वामी अद्वैतानंद यांना १६,६२७ तर रासप (मार्क्सवादी-लेनिनवादी) च्या रामेश्वरदत्त मानव यांना ४,८३९ मते मिळाली. यापैकी स्वामी अद्वैतानंद हे नावही ध्यानात ठेवा ही विनंती कारण नंतर या नावाचा उल्लेख येणार आहे.
आपण जिंकणार हा अगदी प्रचंड विश्वास राजनारायण यांना होता त्यामुळे झालेल्या दणदणीत पराभवामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला. तसेच १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेस (आर) चा ५२० पैकी ३५१ जागा इतका मोठा विजय होईल याची पण कोणाला अपेक्षा नव्हती. सध्याच्या काळात सत्ताधारी पक्षाचा असा मोठा विजय झाल्यावर सत्ताधारी पक्षाने मतदानयंत्रांमध्ये गडबड केल्याने असा निकाल लागला असा आरोप अगदी सर्रास होतो. त्या आरोपाची तेव्हाची आवृत्ती म्हणजे सत्ताधारी पक्षाने मतपत्रिकेत गडबड केली असे आरोप विरोधी पक्षांनी केले. या मतदानासाठी सत्ताधारी पक्षाने मुद्दामून रशियातून खास शाई मागवली असून मतपत्रिकांवर रासायनिक प्रक्रीया करण्यात आली आहे अशाप्रकारचे आरोप झाले. या रासायनिक प्रक्रीया केलेल्या मतपत्रिकांमुळे मतदानाने मतपत्रिकेवर कोणत्याही चिन्हापुढे शिक्का मारला तरी तो शिक्का थोड्या वेळात आपोआप पुसला जातो आणि काँग्रेस (आर) च्या गाय-वासरू या चिन्हापुढे मतपत्रिकेची छपाई करतानाच आधीच मारून ठेवलेला पण पूर्वी दिसत नसलेला शिक्का दिसायला लागतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पण इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा १९७१ चा विजय बाईचा (इंदिरा गांधी स्वतः) किंवा गाईचा (पक्षाचे चिन्ह) नसून शाईचा आहे असा आरोप केला होता. भाऊ तोरसेकरांनी जून २०१८ मध्ये त्यांच्या जागता पहारा या ब्लॉगवर लिहिलेल्या http://jagatapahara.blogspot.com/2018/06/blog-post_4.html या लेखात त्याचा उल्लेख आहे.
अशाप्रकारे मतपत्रिकांमध्ये फेरफार झाले आहेत यावर राजनारायण यांचा गाढा विश्वास होता. हे सिध्द करायचे असेल तर मतपत्रिकांवर काँग्रेसच्या चिन्हापुढे मारलेले शिक्के अगदी एकाच ठिकाणी आहेत याची खात्री करायची गरज होती. अर्थातच हे इंदिरांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिल्याशिवाय करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे राजनारायण यांनी हे आव्हान द्यायचे ठरविले. त्यावेळी इंदिरा गांधींनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला वगैरे मुद्दे राजनारायण यांनी दुय्यम मानले होते.
इंदिरा गांधींच्या निवडीला आव्हानः शांतीभूषण यांचा प्रवेश
१९५१ च्या जनप्रतिनिधी कायद्याप्रमाणे अशा निवडीला आव्हान द्यायचे असेल तर ते निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ४५ दिवसात करणे गरजेचे असते. त्याप्रमाणे २४ एप्रिल १९७१ हा आव्हान द्यायचा शेवटचा दिवस होता. अलाहाबादचे रमेशचंद्र श्रीवास्तव हे वकील राजनारायण यांच्या परिचयाचे होते. त्यांच्याबरोबरच या खटल्यासाठी वरीष्ठ वकील म्हणून शांतीभूषण यांनाही नेमायचे राजनारायण यांनी ठरविले. राजनारायण स्वतः शांतीभूषणना ओळखत नव्हते. पण ते काँग्रेस(ओ) चे नेते होते आणि देशातील एक आघाडीचे वकील होते आणि असे राजकीय खटले ते कोणतीही फी न आकारता लढायचे. न्यायालयात सादर करायच्या याचिकेचा पहिला मसुदा राजनारायणांनी कनिष्ठ वकीलांकडून बनवून घेतला आणि २२ एप्रिलला ते शांतीभूषणना भेटले.
शांतीभूषण
(संदर्भः https://twitter.com/indiahistorypic/status/1313478545843290120)
या पहिल्या मसुद्यात पुढील मुद्द्यांचा समावेश होता--
१. मतपत्रिका रासायनिक प्रक्रीया केलेल्या होत्या.
२. स्वामी अद्वैतानंद यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवावी यासाठी (निवडणुक लढवून विरोधी मते फोडावीत याउद्देशाने) इंदिरा गांधींचे निवडणुक एजंट यशपाल कपूर यांनी त्यांना ५० हजार रूपयांची लाच दिली.
३. मतदारांनी इंदिरा गांधींना मते द्यावीत या उद्देशाने यशपाल कपूर यांनी मतदारांना गोधड्या, ब्लँकेट, धोतरे आणि दारू यांचे वाटप केले.
४. यशपाल कपूर यांनी वाहनातून अनेक मतदारांची मतदानकेंद्रावर ने-आण करायची व्यवस्था केली.
५. इंदिरा गांधींनी कायद्याने परवानगी दिलेल्या ३५ हजार रूपये या मर्यादेपेक्षा बराच जास्त खर्च आपल्या प्रचारासाठी केला.
६. यशपाल कपूर हे सरकारी नोकरीत असतानाच इंदिरा गांधींनी त्यांची निवडणुक एजंट म्हणून मदत घेतली.
जनप्रतिनिधी कायद्यात यापैकी २ ते ६ हे मुद्दे भ्रष्ट मार्गाचा अवलंब या सदराखाली नमूद केले आहेत. कोणा उमेदवाराने अशा भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्यास त्याची निवड रद्द होण्याबरोबरच सहा वर्षांपर्यंत कोणतेही पद भूषविण्यास बंदी घातली जाऊ शकते.
ही याचिका म्हणजे एक (अप)प्रचाराचा भाग आहे असे शांतीभूषण यांचे पहिले मत झाले. राजनारायण यांनी मतपत्रिकांवर रासायनिक प्रक्रीया केली आहे हा मुद्दा सोडायला मान्यता दिली तरच आपण ही याचिका न्यायालयात लढवू अशी अट शांतीभूषण यांनी घातली. राजनारायण यांनी त्याला मोठ्या अनिच्छेनेच मान्यता दिली. त्याव्यतिरिक्त शांतीभूषण यांनी आणखी तीन मुद्द्यांचा याचिकेत समावेश केला--
१. इंदिरा गांधींनी आपल्या सभांसाठी बॅरिकेड उभारणे आणि व्यासपीठाचे बांधकाम करून घेणे यासाठी पोलिस खात्यातील आणि बांधकाम विभागातील सरकारी कर्मचार्यांचा वापर केला. तसेच इंदिरा गांधींच्या सभांसाठी लाऊडस्पीकर्सची आणि त्या लाऊडस्पीकर्ससाठी वीजेची व्यवस्था राज्य सरकारी यंत्रणेकडून करून घेतली होती. अशाप्रकारे सरकारी यंत्रणेचा वापर करून त्यातून आपली विजयाची शक्यता वाढवायचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला.
२. इंदिरा गांधींनी हवाई दलाच्या विमानातून प्रवास केला. अशाप्रकारे सशस्त्र दलाची मदत घेऊन आपल्या विजयाची शक्यता वाढवायचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला.
३. इंदिरा गांधींनी वापरलेले निवडणुक चिन्ह 'गाय आणि वासरू' हे धार्मिक चिन्ह आहे.
स्वतः शांतीभूषण यांची या याचिकेला यश येईल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. त्याचे कारण म्हणजे आपले मुद्दे तितके बळकट आहेत यावर त्यांचा तितका विश्वास नव्हता. आणि दुसरे म्हणजे कोणीही न्यायाधीश विद्यमान पंतप्रधानांचा पदभ्रष्ट करेल असा निर्णय द्यायचे धाडस करेल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. तरीही यश यायची थोडी तरी शक्यता असेल तर लढायचे असे त्यांनी ठरविले.

🗣 चर्चा
(52)
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 06/04/2021 - 06:53
नवीन
श्रीगुरुजी आणि गिरिश खरे पुन्ह आक्टिव्ह झाले आहेत. वॉटरगेट आणि आणीबाणी दोन्हिबद्द्ल वाचाय्ला मजा येत आहे. प्रतिसाद सुद्धा सुपर्ब आहेत. क्रुपया असेच सुरु राहू द्या. गेल्या आठव्ड्यापासून वाचनमात्र आहे पण मजा येत आहे. शुभेच्छा.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Fri, 06/04/2021 - 07:02
नवीन
+1
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2