Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शहर सोडताना..

प
पाटिल
Fri, 05/28/2021 - 05:34
💬 6 प्रतिसाद
सगळ्यांत जास्त काय वाईट? सवय..! जागेची माणसांची झाडांची रस्त्यांची बारची वाईन शॉपींची पानटपऱ्यांची थिएटरांची जगण्याची.. शहर सोडताना अवघड जातं मग शहर काही वाईट नसतं.. पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला किंवा झगडायची उमेद खलास होत जाते हळूहळू आणि कळतं की आता जावं लागेल.. निरवानिरव करावी लागते मग दूधवाला गॅसवाला पेपरवाला आवराआवर बांधाबांध भांडी गाद्या चादरी पडदे कपडे बॅगा सगळंच.. बडवायजरच्या साचलेल्या कॅन्सची विल्हेवाट ॲशट्रेचा कधी नव्हे तो मोकळा श्वास रिकाम्या कपाटांच्या तळाशी कसल्याशा जीर्ण पावत्या बिलं नाही नाही म्हणता म्हणता काय काय जमवलेलं असतं ह्या डायऱ्याही संध्याकाळी नदीत सोडून दिलेल्या बऱ्या त्यांच्यासोबत ही सगळी वर्षंही वाहूनच गेलेली बरी.. त्याच लायकीची होती ती..! पुस्तकांना निरोप.. खूप दिलं बाबांनो तुम्ही.. माझ्यात आजही जे काही चांगलं असेल, शुभ असेल, ते सगळं तुमच्यामुळेच आहे.. तुमच्यापासून काय लपलंय माझं..! सगळंच माहितीय तुम्हाला.. आणि मी भिकारी.. मजबूर.. तुम्हाला सोबत नेऊ शकत नाही.. मला तुम्हाला सांभाळता येत नाही यापुढे.. ही शरम घेऊन जगता येतं का बघावं म्हणतो... शेवटी रिकामा भकास फ्लॅट.. दार बंद.. किल्ली ओनरकडे जमा.. 'चलता हूं भैय्या'.. हे वॉचमनसाठी. गाडीच्या काचांमधून शहर मागे मागे पडत जाताना दिसत राहतं.. डोळे मिटून घेतले तरीही फरक पडत नसतो.. मनाची व्हायची ती मोडतोड होतच असते.. शिवाय सोबतीला 'पुढं काय' हा रक्त काढणारा प्रश्नही...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4785 views

💬 प्रतिसाद (6)
ख
खेडूत Fri, 05/28/2021 - 06:31 नवीन
आवडलं! पण व्यवहारात ही स्थिती नेहेमी सकारात्मक असते कारण आपण काही प्रगती होत असते म्हणूनच गाव, शहर सोडतो, त्यामुळे ( बऱ्याचदा) आनंददायक असतात. (साताठ गावं सोडलेला) खेडूत.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 05/28/2021 - 08:25 नवीन
अजून दीर्घ अन सखोल असते तर मजा आली असती
  • Log in or register to post comments
स
सुहास चंद्रमणी… Sun, 05/30/2021 - 17:34 नवीन
हा नास्टेल्जिया प्रत्येकाच्या आयुष्यात असतो.काहींना ते प्रकर्षाने जाणवते तर काही दुर्लक्ष करतात एवढच!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 06/02/2021 - 15:21 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Wed, 06/02/2021 - 17:41 नवीन
आवडली रचना.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 06/02/2021 - 19:05 नवीन
खुप भारी

+ १

नंबर !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा