Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 05/13/2021 - 07:17
🗣 166 प्रतिसाद
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ नेत्या के.आर.गौरीअम्मा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे. gouriamma गौरीअम्मांचा जन्म २१ जून १९१९ रोजी केरळमध्ये अलापुष्षा जिह्यातील पट्टनकड गावात झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात सक्रीय होत्या. १९५७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये त्या महसूलमंत्री होत्या. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांच्या सरकारने जमिन सुधारणा केल्या याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. पण त्या जमिन सुधारणांमागचा ब्रेन गौरीअम्मा होत्या. पुढे १९६७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली दुसरे सरकार स्थापन झाले त्यात गौरीअम्मा परत एकदा महसूलमंत्री झाल्या आणि त्यांनी जमिन सुधारणांचे मागच्या वेळी अपुरे राहिलेले काम पुरे रेटायचा प्रयत्न केला. गौरीअम्मांनी १९५७ मध्ये कम्युनिस्ट नेते टी.व्ही.थॉमस यांच्याशी विवाह केला. दोघेही पतीपत्नी १९५७ आणि १९६७ या दोन्ही वर्षी स्थापन झालेल्या नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते. मात्र यात एक गुंतागुंत आली. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. टी.व्ही.थॉमस भाकपमध्ये राहिले तर गौरीअम्मा माकपमध्ये गेल्या. त्यातून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही कटुता आली. १९६७ मध्ये दोघेही नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते म्हणून दोघांनाही सरकारी बंगला मिळाला होता. या दोघांना शेजारचे बंगले दिले होते. तोपर्यंत ते विभक्त झाले नव्हते त्यामुळे दोन बंगल्यांमधील भिंत त्यांनी पाडून घेतली आणि एकमेकांकडे जाणेयेणे सुरूच ठेवले. मात्र भाकपने याला आक्षेप घेतला. त्यातून गौरीअम्मांना हृदयविकाराचा झटकाही आला. नंतरच्या काळात भाकप आणि माकप यांच्यात मतभेद वाढले. भाकप काँग्रेसबरोबर गेला तर माकप काँग्रेसविरोधी राहिला. त्यातच गौरीअम्मा आणि टी.व्ही.थॉमस हे विभक्त झाले. टी.व्ही.थॉमस यांचे १९७७ मध्ये निधन झाले तोपर्यंत हे जोडपे परत एकत्र आलेच नाही. १९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुका माकपने गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून लढवल्या. मल्याळम भाषेत केर म्हणजे नारळाचे झाड आणि केरळ म्हणजे नारळाच्या झाडांची भूमी. माकपने 'नारळाच्या झाडाच्या भूमीत गौरीअम्मांना नेता बनवा' या अर्थाची मल्याळम भाषेत यमक बनणारी घोषणा माकपची मुख्य घोषणा होती. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण त्यानंतर मुख्यमंत्री करताना मात्र गौरीअम्मांना बाजूला सारून ई.के.नयनार यांना पक्षाने मुख्यमंत्री केले. त्यामुळे गौरीअम्मा नयनार यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असल्या तरी दुखावल्या गेल्या. १९९४ मध्ये त्यांना केंद्रीय पॉलिट ब्युरोत स्थान मिळाले नाही. खरं तर त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता तसे होणे धक्कादायक होते. इतकेच नाही तर त्यांनी नंबुद्रीपाद यांच्या मंत्रीमंडळात जमिन सुधारणेचे काम केले होते. त्याचे श्रेय वर्षानुवर्षे नंबुद्रिपाद आणि पक्षाला दिले गेले पण ते खरे काम करणार्‍या गौरीअम्मांना मात्र तितके महत्व दिले गेले नाही. त्यामुळे गौरीअम्मांनी केंद्रीय नेतृत्वावर टीका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. आपली नक्की काय चूक झाली म्हणून आपल्याला ही वागणूक मिळाली हा प्रश्न त्यांनी वारंवार विचारला. नंतर त्यांनी जनथिय संरक्षण समिती (जे.एस.एस) नावाने आपला पक्ष काढला. या पक्षाने २००१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणित यु.डी.एफ शी आघाडी केली आणि गौरीअम्मा २००१ ते २००६ या काळात ए.के.अ‍ॅन्टनी आणि ओम्मेन चंडी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्यांनी शेवटची निवडणुक वयाच्या ९२ व्या वर्षी २०११ मध्ये जे.एस.एस उमेदवार म्हणून लढवली पण त्यांचा भाकप उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या. गौरीअम्मांनी ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्यावर नंतरच्या काळात अगदी जहरी टीका केली होती. गौरीअम्मा या एळवा समुदायातील. या समुदायातील वकिलीचे शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. तर नंबुद्रिपाद हे नंबुद्री ब्राह्मण म्हणजे अगदी उच्चवर्णीय नव्हे सर्वोच्चवर्णीय असे म्हटले तरी चालेल. नंबुद्रीपाद यांना केवळ उच्चवर्णीय पुरूषांनाच पुढे आणायचे आहे इतर जातीतील लोकांच्या आणि त्यातही महिलांच्या हिताशी त्यांचे काही घेणेदेणे नाही अशी नेहमी भाजप-संघावर जी टीका करतात नेमकी तीच टीका गौरीअम्मांनी नंबुद्रीपाद यांच्यावर केली. नंतरच्या काळात त्या माकपमध्ये अर्थातच परत आल्या नाहीत. पण त्यांच्या १०० व्या वाढदिवसाला आणि इतर वाढदिवसांनाही केरळचे मुख्यमंत्री विजयन नेहमी त्यांना शुभेच्छा द्यायला जात असत. ११ मे २०२१ रोजी के.आर.गौरीअम्मांचे तिरूवनंतपुरममधील एका खाजगी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 52595 views

🗣 चर्चा (166)
श
शाम भागवत Fri, 05/14/2021 - 08:16 नवीन
अगदी मी सुद्धा यांच्या लॉजिक समोर काही दिवस संमोहित झालो होतो.. पण त्यानंतर हळूहळू त्यांच्या बोलण्यातील फोलपणा लक्षात यायला लागला.
मी हाच मुद्दा मांडतोय. लोकांना जास्त काळ फसवता येत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 05/14/2021 - 08:51 नवीन
सध्या देशभर जे हिंदूंच्या मतांसाठी ध्रुवीकरण करत आहेत त्यांना हे पुढे खूप जड जाणार आहे. ज्या हिंदूंना आज त्याची अजिबात झळ बसत नाही त्यांना पहिले झटका बसणार आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 05/14/2021 - 09:05 नवीन
कसे? ते वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Fri, 05/14/2021 - 07:42 नवीन
काही लोक कायद्याच्या वर झालेत ह्या देशात.>>> हे अनेक वर्शे चालु आहे. गेल्या वर्शी ऐन कोरोना काळात बागबान नावाच्या एका कुटुम्बातल्या २३ जणाना एका आएएस अधिकार्याने परवानगी दिली होती. तो अधिकारी आता पुण्याचा पोलीस अधिकारी आहे. या कुटुम्बाचे व काही नेत्यान्चे जवळचे सम्बन्ध असल्याने हा अधिकारी हे करु शकला कारण त्याला माहित होते त्याच्या विरुद्ध काही कारवाई होणार नाही आणि तसेच झाले. ई पास हा फक्त कॉमन माणसासाठी असतो. व तो त्यन्चाकडे नसल्यास त्याना हजारो रुपये लाच म्हणुन पोलीसाना द्यावे लागतात ही वस्तुस्थिति आहे.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Fri, 05/14/2021 - 08:10 नवीन
तत्कालिन गृहमंत्री साहेबांनी देखिल " माणुसकीच्या नात्याने " एका बड्या कुटुंबास महाबळेश्वर ला फार्महाऊस वर जाण्याची संमती दिली होती..!!!
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 05/14/2021 - 08:19 नवीन
ह्या कुटुंबाच्या व्यवसायात अनेक कुटुंबांनी ठेव ठेवली होती , ती जवळ जवळ बुडल्यात जमा. त्यांच्या कडे " माणुसकीच्या नात्याने " कोण पहाणार
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 05/14/2021 - 08:26 नवीन
https://www.mahamtb.com/Encyc/2021/5/13/Govt-appoints-special-Counsel-in-karmuse-case-per-hearing-fee-is-2-5-lakh.html
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 05/14/2021 - 08:48 नवीन
व्हॅक्सीन घेतल्यावरही त्रिसुत्री पाळावी लागेल असे ऐकले होते https://www.loksatta.com/desh-videsh-news/if-you-are-fully-vaccinated-you-no-longer-need-to-wear-a-mask-says-us-president-biden-sgy-87-2470735/
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/14/2021 - 09:38 नवीन
२०५ वॉर रूम मध्ये काम करणाऱ्यांसाठी नेमणूक केलेल्या लोकांपैकी फक्त सोळा मुसलमान लोकांच्या नावांची यादी नाचवत तेजस्वी सूर्य आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तमाशा केला. म्हणे हे मुसलमान लोक बेड स्कॅम करत आहेत! त्याच्या स्टंट नंतर त्या १६ लोकांना निलंबित करण्यात आलं. पण पुढे तपासात लक्षात आलं की २०५ पैकी या १६ जणांवर फोकस करण्यासारखे काहीच नाही आणि सूर्याचा धांगडधिंगा निराधार होता, मग त्या १६ जणांना पुन्हा कामावर पचारण्यात आले ! त्यातल्या पाच जणांनी आपल्या धर्मावरून आपल्याला लक्ष करण्यात आले म्हणून परतण्यास नकार दिला. त्यापुढे, व्हाट्सऍप वर ह्या सोळा जणांना अतिरेकी म्हणणारे मेसेज लगेच व्हायरल झाले, त्यापेक्षा भयंकर म्हणजे यांचे नंबर सुद्धा लीक केले ! ह्यांना लगेच धमक्यांचे आणि शिवराळ फोन्स आले. म्हणजे, आधीच हेल्थ वर्कर्स ची कमी असताना हा उद्दाम माणूस दंगा करतो, आणि नंतर माफी मागताना सुद्धा कॅमेरा नको आणि रेकॉरडींग नको म्हणतो ? इतक्या संकटाच्या काळात सुद्धा, हेल्थ कर्मचार्यांसोबत कम्युनल खेळ करायचे सुचतात या सूर्याला ! अक्कलशून्य सूर्याचा तीव्र निषेध. https://youtu.be/cC5RRPNhcg4
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 05/14/2021 - 16:28 नवीन
ह्या घटनेविषयी आत जे काही बाहेर येते आहे, ते खरे असेल (आणि तसे ते दिसतेच आहे), तर तेजस्वी सूर्याचा खरोखरीच निषेध केला पाहिजे. खाटांचा काळाबाजार होत होता हे कुणीही अमान्य केलेले दिसत नाही. पण त्याचे सर्व उत्तरदायित्व एका धर्माच्या संबंधित लोकांच्या माथ्यावर फोडणे, अतिशय चुकीचे आहे. आणि त्याच्या ह्या कृतिमुळे मूळ दु:कृत्याकडे आपोआपच दुर्लक्ष झालेले आहे. माझ्या मते तेजस्वी सूर्य॑ अतिशया वाचाळ व मूर्ख माणूस आहे. अर्थात त्याला भाजपामध्ये नितीन गडकरींची ह्याच बाबतीत जोरदार काँपिटीशन आहे. स्वतःच्या तथाकथित 'इनोव्हेटिव्ह'पणाविषयी फुशारक्या मारणारा दुसरा कुणीही नेता माझ्यातरी पहाण्यात नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/14/2021 - 17:27 नवीन
"If you are with Modi you are with India, if you are against Modi you are anti India" असे ट्विटर वरच्या ट्रोल सारखे बोललेला तेव्हा पासूनच सूर्याबद्दल साशंक होतो. ही घटना म्हणजे मात्र कडीच केली त्यानं. नितीन गडकरींबाबत माझे मत आजवर अनुकूल राहिले आहे.त्यामानाने आपले काम सोडून इतर गोष्टींवर सातत्याने बडबड करत नाहीत असे त्यांच्याबद्दल वाटत आले आहे. तुम्ही म्हणता तसं बढाई वैगेरे माझ्या पाहण्यात आलं नाही. त्याबद्दल माहिती मिळाल्यास वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Fri, 05/14/2021 - 18:46 नवीन
च्या टाइपचे लोक बाळगावे लागतात किवा आयात करावे लागतात. दुर्दैव भारतिय लोकशाहिचे..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 05/14/2021 - 09:50 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/covid-crisis-in-india-coronavirus-in-maharashtra-sanjay-raut-keshav-upadhye-tweets-bmh-90-2470956/ प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे, पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. अदृश्यपणे काम करुन चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. हे असं याआधी देशात कधीच झालं नव्हतं,” असं राऊत म्हणाले होते. गंगेत मृतदेह सोडला तर मोक्ष मिळतो अशी खूप जुनी श्रद्धा आहे. लहान मुले, सर्पदंशाने मरण पावलेले, साधु इ. चे दहन न करता नदीत मृतदेह सोडण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. त्यामुळे कोरोना काळात गंगेत मृतदेह सापडणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. १०-१२ मृतदेह गंगेत सापडले म्हणून लगेच गंगेत प्रेतांचा खच पडलाय वगैरे मुर्खासारखे बरळणे हे मुद्दाम वातावरण भडकावणे आहे. https://www.google.com/amp/s/amp.scroll.in/article/700489/why-did-100-decomposed-bodies-float-back-up-in-ganga
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Fri, 05/14/2021 - 19:06 नवीन
कुथुन कुथुन कुठुन कुठुन भारतात त्यातही भाजपा शासीत राज्यात खुप दुरावस्था आहे असे दाखवायचा प्रयत्न करत आहेत. त्याना क्रान्ती आणुन सत्ता पालट घडवायचा आहे. पण आधिच्या सत्ताधार्यानी लोकान्चे खुळ्खुळे करुन ठेवले आहे... लोकाना निमुट बसायची सवय लावली आहे. आहिन्सा, सद्भवना, दुसरा गाल पुढे करणे इत्यादी मार्गे फक्त सहन करायची शक्ती वाढवुन ठेवली आहे. त्यामुळे साठ वर्ष निवान्त निवडुन येता आले. पत्रकार म्यानेज केले की झाले. आणि भारतियाना शिस्त नाही, भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार वाटतो. धर्माचा पगडा. निधर्मी राज्य म्हणताना जास्तच धार्मिक झाले आहेत सगळे.त्यामुळे जे चालले आहे ते बदलायला खुप वर्ष लागणार आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Sun, 05/16/2021 - 02:10 नवीन
त्या ट्विट मध्ये २०१५ चे फोटो वापरण्यात आले आहेत . https://www.thequint.com/news/webqoof/2015-photos-of-dead-bodies-floating-in-the-ganga-shared-as-recent https://www.boomlive.in/fact-check/fake-news-viral-photo-ganga-river-dead-bodies-2015-photo-covid-19-bihar-buxar-factcheck-13126
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 05/14/2021 - 10:17 नवीन
असे मृतदेह गंगेत नेहमीच दिसतात. त्या मृतदेहांचा कोविडची संबंध जोडणे अयोग्यच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 05/14/2021 - 11:55 नवीन
ऑक्सिजनची आवश्यकता असणारे भारतीय जमिनीवर पडले असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याशिवाय, या व्यंगचित्रामध्ये हिंदू दैवतांवर टीका करण्यात आली आहे. ३३ दशलक्ष हिंदू देवही ऑक्सिजन तयार करू शकत नाही असे या व्यंगचित्रात म्हटले आहे. https://maharashtratimes.com/international/international-news/charlie-hebdo-cartoon-mocking-india-and-hindu-gods-amid-coronavirus-crisis/articleshow/82628266.cms
  • Log in or register to post comments
न
निपा Fri, 05/14/2021 - 13:04 नवीन
मग ? आहेच प्रॉब्लेम्स भारतात एवढे . ते फ्रेंच प्रॉब्लेम्स ला पण असेच कुटतात
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 05/14/2021 - 13:33 नवीन
पण भारतवाले त्यांच्या ऑफीसमधे जावुन गळे कापणार नाहीत. हे त्यांना माहित आहे.
  • Log in or register to post comments
न
निपा Fri, 05/14/2021 - 15:00 नवीन
तरी पण त्यांनी ते पैगंबर चे चित्र छापलेच .
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 05/14/2021 - 16:11 नवीन
वर उल्लेख केलेली चित्रे कुठे सापडतील? इथे द्यायची नसल्यास व्य नी करा.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 05/14/2021 - 16:15 नवीन
हो, ह्या बद्द्ल नुसते वाचले आहे , प्रत्यक्षात ते चित्र काय होते हे माहीत नाही.
  • Log in or register to post comments
न
निपा Fri, 05/14/2021 - 16:44 नवीन
ithe bagha
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/14/2021 - 20:35 नवीन
विविध धर्मातील देव देवतांवर टीका केली की प्रसिद्धी मिळतेच शिवाय बुद्धिमंतांकडून कौतुकही होते. उद्या गिरीश कुबेर/कुमार केतकर्/रविश कुमार ह्यांचे कौतुक न करतील तर नवल. आता ३३ कोटी देव मदतीला येणार नाहीत हे सांगायला ह्यांची गरज नाही. ईटली/फ्रांस्/अमेरिकेतही अनेक करोना बळी गेले , तेथे येशू वा आणी कोणी मदतीला आला नाही. पण लोकाना भडकवायचे व सेक्युलरपणाचा आव आणायचा..
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Sat, 05/15/2021 - 04:45 नवीन
विविध धर्मातील देव देवतांवर टीका केली की प्रसिद्धी मिळतेच शिवाय बुद्धिमंतांकडून कौतुकही होते.
चूक. काही धर्मातील देवांवर टीका केल्यावर डायरेक्ट जन्नत चे तिकीट मिळते. एखाद्याचा गळा कापायला त्याधर्मातले धर्मवीर मागे पुढे बघत नाहित..
  • Log in or register to post comments
न
निपा Sun, 05/16/2021 - 11:06 नवीन
म्हणजे कुणी हिंदू देवतांचा अपमान केला मग आपण त्यांना सोडून देतो का ? जर fire पॉवर दिली तर असं आपण नाही करणार ? कि दुखऱ्या जागीची टीका आपल्याला सहन नाही होत ?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 05/18/2021 - 17:19 नवीन
हे समजले नाही. कोण देणार हिंदूंना अशी 'फायर पॉवर'?
  • Log in or register to post comments
न
निपा Sun, 05/16/2021 - 11:00 नवीन
Secular कुठं आलं आता इथे . देव (कुठलाही ) आला कि का बरं सेकयुलरपणा येतो ? इथले लोक Jebus Jesus करत नाही . Jesus चे शेकडो कार्टून्स आहेत . पैगम्बरा चे पण काढले . हिंदू चे पण ... ते कार्टून एक व्यंग आहे , हे पण समजावणे म्हणजे मग अवघडच आहे .
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 05/16/2021 - 17:43 नवीन
नास्तिकांनी हिंदू देवांवर टीका केली म्हणून आम्हाला काहीही त्रास होत नाही. एखादा माणूस हिंदूंच्या देवांसारखीच इतरांच्या देवांवर पण टीका करत असेल तर त्याला त्याचा नास्तिकपणा म्हणून सोडून देण्याइतके हिंदू सहिष्णू नक्कीच आहेत.. त्यात सुद्धा ही टीका तर खूप संयत भाषेत आहे. मला एम एफ हुसेन मिळाला तर त्याचा एक पाय कापायला नक्कीच आवडेल. पण म्हणून सरसकट तोच न्याय मी सगळ्यांवर का लावू? लक्ष्यात ठेवा, गीतेत कृष्ण सांगून गेला आहे, कृती जितकी महत्वाची आहे त्यापेक्षा जास्त त्या कृतीचे परिणाम आणि त्या मागचा हेतू असतो. एखादी गोष्ट पाप किंवा पुण्य अशी सरळ नसते, तर ज्या परिस्थितीत ती होते, ती परिस्थिती पाप पुण्य ठरवते. तेव्हा उगीच तुमचा अजेंडा रेटत इथे बसू नका, आम्हाला या वादात पडायला कोणालाही इंटरेस्ट नाHइ.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 05/18/2021 - 17:45 नवीन
वास्तविक, पाश्चिमात्य देशांत सर्वसाधारण जनता तसेच त्या देशांचे प्रमुख, अगदी निधर्मी आहेत, हे 'भारतीय हिंदू अतिशय धर्मकडवे आहेत' ह्याइतकेच चुकीचे विधान आहे. काही ठळक उदाहरणे: १. डेव्हिड कॅमेरॉन ह्यांनी ते यू. के. चे पंतप्रधान असतांना, 'आमचा देश क्रिश्चियन आहे' असे उघडपणे म्हटले होते. २. अमेरिकेत तर धार्मिक रीतिरीवाज (उदा. गर्भपातावर) मोठा चर्चेचा विषय होतो, विशेषतः निवडणूकांच्या वेळी. ३. अमेरिकन प्रेसिडेंट धर्मगुरूंच्या 'वेक' ला जातात. ४. आयर्लंडमधे एका भारतीय स्त्रीला, तिच्या व बाळाच्या स्वास्थ्यासाठी गर्भपात जरूरीचा होता, तो त्या देशाच्या कॅथॉलिक धर्मरीतींचे उल्लांघन करत असल्या कारणाने, कायद्याने नाकारण्यात आला. शेवटी त्या आजारांत तिचा मृत्यू झाला. आयर्लंड हा देशच कॅथॉलिक आहे, तो निधर्मी नाहीच. ५. जर्मनीच्या सत्तारूढ पक्षाचे नावच मुळी 'क्रिश्चियन डेमॉक्रॅटिक पार्टी' असे आहे. आणि ते दशकांनू दशके, आयर्लण्ड (कॅथॉलिक) व उ. आयर्लण्ड (प्रोटेस्टंट) नक्की काय चालले आहे, बरे? त्यावरून १९६९-१९९८ ह्या सुमारे तीन दशकांच्या काळांत दोन्ही बाजूंमधे धुमश्चक्री होत होती. ह्या कालखंडास तेथे 'द ट्रबल पीरीयड' असे संबोधले जाते. आता, त्या उघड दंगली संपल्या असल्या, तरी मूळ वाद चिघळतोच आहे. परवाच फायनीन्शियल टाईम्सच्या वीकएंड- पुरवणीत, बेलफास्टला रहाणार्‍या मॅरीयन इलियट ह्या कॅथॉलीक धर्माच्या इतिहासकाराचा, तेथे कॅथलिकांची कशी घुसमट होत रहाते, ह्याबद्दलचा अतिशय विस्तृत लेख वाचनांत आला. तेव्हा, युरोपांत तेव्हढाच 'निधर्मी' पणा आहे, जेव्हढा भारतांतील हिंदूंत आहे. 'त्या' व्यंगचित्राची, समाजमाध्यमांतील काहीजणांनी केलेली उठाठेव सोडून, इतर कुणीही कसलीही दखल घेतलेली नाही व ती तशी घेतली नाही, हेच बरोबरही आहे. पण, उगाच युरोपीयन्स अतिशय निधर्मी आहेत व भारतीय हिंदू धर्मनिष्ठ कडवे इत्यादी म्हणणे, हे वास्तवाचे भान नसल्याचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 05/18/2021 - 17:50 नवीन
हिंदू अजिबात कडवे नाहीत. त्यांची मंदिरे पाडून तेथे एखादी वास्तू उभारली तरी ते सहन करतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/19/2021 - 03:01 नवीन
प्रदीप बऱ्यापकी सहमत ... लोकशाही वादी पाश्चिमात्य सरकार आणि प्रथांवर ख्रिस्ती प्रभाव आहेच हे खरे.. कारण साधे आहे येथेख्रिस्ती बहुल आहेत पण त्याचे फार अवडंबर वाटत नाही हा फरक फक्त ( आयर्लंड मधील गर्भपात बंदी सारखी गोष्ट सोडली तर ) पण गंमत म्हणजे भारतात असताना वाटायचं कि प्रत्येक ख्रिश्चियन दार रविवारी इमाने इतबारे चर्च ला जात असेल पाश्चिमात्यदेशात... इकडे आल्यावर कळले कि तसे काही नाही यात युनाइटेड स्टेट्स मध्ये तर गॉड अँड गन हे समीकरण आणि टोकाला जायचे हे जर जास्तच प्रखर पने दिसते त्यामानाने ते कानडा, ऑस्ट्रेलिया आणि नू झीलंड मध्ये कमी
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 05/15/2021 - 06:07 नवीन
म्हणुन एंड रिझल्ट सगळ्या जगासमोर आहे.असो.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/15/2021 - 06:24 नवीन
'द वीक' या नियतकालिकाने २४ जानेवारी २०१६ च्या अंकात निरंजन टकलेने सावरकरांवर ‘Lamb Lionised’ नावाचा लेख लिहून सावरकरांविषयी बरेच खोटेनाटे लिहिले होते. त्यावर न्यायालयीन लढाई झाली आणि शेवटी 'द वीक' ला त्या लेखाबद्दल माफी मागावी लागली. एकीकडे मदर तेरेसावर 'असंतांचे संत' हा लेख लिहिल्यावर दुसर्‍या बाजूकडून त्याविरूध्द काही प्रतिक्रिया उमटायच्या आधीच 'भावना दुखावल्या जातील' या गृहितकातून अख्खा अग्रलेख मागे घेतला जातो. इतकेच नव्हे तर तेच गिकुकाका पदाचा दुरूपयोग करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेल्या आणि सतत जामिनासाठी अर्ज करणार्‍या एका महाभागाचे लेख वरचेवर प्रसिध्द करतात. आणि दुसरीकडे अशाप्रकारचे लेख वारंवार वेगवेगळ्या लेखकांकडून लिहिले जाऊनही ५ वर्षे न्यायालयीन लढाई लढावी लागते. असो. Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/15/2021 - 07:24 नवीन
उत्तम बातमी! हा टकले अत्यंत नॉटी निधर्मांध आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/15/2021 - 07:44 नवीन
बहुतेक हे न्यायालयीन निर्णयाने नाही, तर विक ने स्वतःहून थकून/कंटाळून केले आहे.
  • Log in or register to post comments
श
शलभ Sat, 05/15/2021 - 08:21 नवीन
गिरे तो भी टांग उपर.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/15/2021 - 08:59 नवीन
कशाबद्दल बोलत आहात ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/15/2021 - 08:27 नवीन
याला मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जालावर प्रसिद्धी दिली पाहिजे. असे झाले तरच असल्या हलकटाना थोडा तरी चाप बसेल. ते आपले तोंड बंद करतील अशी माझी फारशी अपेक्षा नाहीच
  • Log in or register to post comments
न
निपा Sat, 05/15/2021 - 16:27 नवीन
हा लेख internet वर उपलब्ध आहे . तो लेख retract नाही केला आहे . https://www.theweek.in/theweek/cover/life-and-legacy-of-veer-savarkar.html काय खोटे नाटे लिहिले आहे त्यावर प्रकाश टाकावा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/15/2021 - 08:31 नवीन
भीषण वास्तव दारू एम आर पी ला/ कितीही किमतीला घ्यायची लोकांची तयारी आहे पण औषधे मात्र स्वस्तात/सवलतीत पाहिजेत आणि लस तर फुकटच पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/15/2021 - 08:39 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 05/15/2021 - 09:43 नवीन
गाफील गोवा https://indianexpress.com/article/india/goa-hospital-covid-death-oxygen-shortage-13-more-die-goa-hospital-says-it-has-fixed-its-oxygen-issues-7315624/
  • Log in or register to post comments
न
निपा Sat, 05/15/2021 - 16:31 नवीन
खूप generalize करू नका . सगळी कडे लस फुकट आहे . लवकर हवी असेल तर पैसे मोजा अस काही होऊ शकते. पूर्ण भारतात टॅक्सेस आहेत . काही लोकांनी लस नाही घेतली कि त्रास सर्वांना होण्याचा धोका आहे . दारू चा आणि याचा काय संबध ?
  • Log in or register to post comments
न
निपा Sat, 05/15/2021 - 16:31 नवीन
खूप generalize करू नका . सगळी कडे लस फुकट आहे . लवकर हवी असेल तर पैसे मोजा अस काही होऊ शकते. पूर्ण भारतात टॅक्सेस आहेत . काही लोकांनी लस नाही घेतली कि त्रास सर्वांना होण्याचा धोका आहे . दारू चा आणि याचा काय संबध ?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/15/2021 - 17:13 नवीन
अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 05/15/2021 - 09:47 नवीन
राज्यसरकार ने 45 वर्षा खालील लोकांचे लसीकरण बंद केले अशी घेषणा केली आहे. तरी पण मुंबई मधील काही लसीकरण केंद्रा वरती 45 पेक्षा कमी वय असणाऱ्यांच लसीकरण चालू आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/15/2021 - 11:45 नवीन
अभिनंदन! पंतप्रधान होण्याच्या दिशेनं तुम्ही पाऊल टाकलं; गोपीचंद पडळकरांचं उद्धव ठाकरेंना पत्र -------- https://www.loksatta.com/maharashtra-news/gopichand-padalkar-letter-to-maharashtra-cm-uddhav-thackeray-slam-over-letter-to-pm-modi-bmh-90-2471830/ ----------- काय बोलावं, ते सुचेना ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/15/2021 - 11:55 नवीन
यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?; फडवीसांचा सोनियांना सवाल ----------- https://www.loksatta.com/maharashtra-news/devendra-fadnavis-letter-to-sonia-gandhi-after-12-opposition-leaders-write-to-pm-modi-bmh-90-2471838/ ------------ काही टक्के जनतेला, फडणवीस यांचे म्हणणे पटणार नाही...
  • Log in or register to post comments
न
निपा Sat, 05/15/2021 - 16:33 नवीन
मोदी ला डिफेन्ड करण्याशिवाय यांच काही काम नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा