Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आज जरी

अ — अनन्त्_यात्री, Tue, 05/11/2021 - 07:53
चंद्रधगीने रातराणी उत्फुल्लपणे- परिमळेल तेव्हा व्याधविद्ध मृगशीर्ष जरासे मावळतीवर- ढळेल तेव्हा केतकीत नागीण निळी टाकून कात- सळसळेल तेव्हा नि:शब्दांची धून खोलवर रुजून ओठी- रुळेल तेव्हा वास्तवतळिचे अस्फुट अद्भुत कणाकणाने- कळेल तेव्हा... ....वीज शिरी कोसळली तरीही, सावरेन मी अद्भुत अवघे विरून, वास्तव क्षणोक्षणी मग- छळेल तेव्हा... ....आज जरी निष्पर्ण तरी बहरेन उद्या मी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3116 views

💬 प्रतिसाद
र
राघव Tue, 05/11/2021 - 08:34 नवीन
भावना आवडली. तुमचा शब्दसंग्रह नेहमीच व्यासंगाची साक्ष देतो. :-)
....आज जरी निष्पर्ण तरी बहरेन उद्या मी
खासच! अवांतरः स्वप्रसिद्धीचा दोष पत्करून - समान भावना दाखवणारी माझी एक कविता कदाचित आवडेल - ध्येय
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 05/11/2021 - 10:35 नवीन
खासच लिहिली आहे आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/12/2021 - 08:06 नवीन
बहारदार कविता. सुंदर रचना!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/12/2021 - 08:10 नवीन
आवडली कविता. लिहिते राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 05/14/2021 - 11:21 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Fri, 05/14/2021 - 11:24 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा