Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

फॅक्टर इन्व्हेस्टिंग ... गुंतवणुकीचा एक वेगळा मार्ग

अ
अमर विश्वास
Sat, 05/08/2021 - 12:58
💬 67 प्रतिसाद
लेखाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो ... म्युच्युअल फंडावर लिहिताना मला १२ वर्षांचा अनुभव होता. फॅक्टर इन्व्हेस्टिंग ही माझ्यासाठी सुरुवात आहे. त्यामुळे हे "संकल्पना" (Concept) य स्वरूपात आहे. मिपा वरच्या तज्ञ आणि अनुभवी लोकांचे प्रतिसाद मला या स्ट्रॅटेजी मध्ये मदत करतील म्हणूनच हा लेखनप्रपंच _____________________________________________________________________________________________________________________________ सुरुवात ...... अशाच एका आळसावलेल्या शनिवारी (सध्या लॉकडाऊन मुळे घरातच विश्रांती घ्यावी लागते), म्युच्यअल फंड्स चा रिव्ह्यू करीत असताना एक गोष्ट लक्षात आली कि गेल्या वर्षभरात फोकस फंड्स नी उत्तम रिटर्न्स दिले आहेत. कुतूहल चाळवले कि कुठल्या ह्या पंचवीस कंपन्या ज्यामध्ये हे फंड्स पैसे गुंतवतात ? (फोकस २५ या नावामुळे पंचवीस कंपन्या ) खालच्या तक्त्यामध्ये टॉप ३ फोकस फंड्स आणि त्त्यांनी पॆसा गुंतवलेल्या कंपन्या (टॉप १०) . या तक्त्यात काही कंपन्या किमान दोन फंडात आहेत . HDFC Ltd. तिन्ही फंडात आहे. तसेच या कंपन्या प्रामुख्याने बँक / IT आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातल्या आहेत . मग विचार आला ..आपण या फंडात पैसे गुंतवतो ... मग फंड मॅनेजर या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात .. मग आपणच या पंचवीस कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले तर ? __________________________________________________________________________________________________________________ कल्पना तर एकदम भारी होती .. पण मग शंकेची पाल चुकचुकली ... हे इतकं सोपं असेल तर यापूर्वी कोणी कधी केलं का नाही ? आपले काही चुकतंय का ? मग गुगल बाबाला शरण गेलो. बरीच शोधाशोध केल्यावर कळलं की याला Factor Investing Strategy म्हणतात. गुंतवणुकीच्या ३ प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात १. Passive Strategy : मुख्यतः बाजाराच्या कार्यक्षमतेवर भरवसा ठेवून गुंतवणूक करायची. इंडेक्स फंडस् तसेच ETF या प्रकारात येतात. या मध्ये अर्थातच गुंतवणुकीचा खर्च कमी असतो. कारण विश्लेषण , पोर्टफोलिओ बदलणे वगैरे गोष्टी कमी असतात / जवळजवळ नसतातच २. Active Strategy : बरेचसे फंड्स आणि सामान्य गुंतवणूकदार या प्रकारात येतात. विश्लेषण व इतर माध्यमातून मिळणाऱ्या माहिती नुसार पोर्टफोलिओची पुनर्रचना (restructure) करणे हा याचा मूळ गाभा आहे. ही पुनर्रचना daily / monthly / quarterly / yearly / ad-hoc कशीही असू शकते याचा मुख्य उद्देश हा निर्देशांकावर मात करणे (Outperform Market Index ) हाच आहे. ३. Factor Strategy : वरील दोन्ही स्ट्रॅटेजीज चा माध्यम मार्ग म्हणजे फॅक्टर स्ट्रॅटेजी . यात मार्केट वर परिणाम करणारे इतर फॅक्टर जसे (Govt. Policies , technology वगैरे यांचाही विचार करायचा आणि फक्त Market analysis वर विसंबून वारंवार पोर्टफोलिओची पुनर्रचना करायची नाही जसे कि : . _____________________________________________________________________________________________________________ माझी स्ट्रॅटेजी फॅक्टर इन्वेस्टींगशी साम्य दाखवणारी असली तरी त्यात थाडेसे बदल आहेत आता मी जी गुंतवणूक करायची ठरवली आहे (या महिन्यात गुंतवणूक करण्याचा मानस आहे ) त्याची रूपरेखा खालील प्रमाणे १. एकूण २५ कंपन्या निवडणार २. प्रत्येक कंपनीत सामान गुंतवणूक करणार. सध्या दहा लाख गुंतवायचे ठरवले आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनीत ४० हजार. (प्रती शेअर किंमतीनुसार ४० हजारात जेव्हडे शेअर्स येतील तेव्हडे) एखादी कंपनी आवडते म्हणून जास्त गुंतवणूक असे नाही ३. २५ पैकी २० लार्ज कॅप आणि ५ मिड कॅप कंपन्या निवडणार ३. दर तीन महिन्यांनी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार. अर्थात (लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स चा लाभ घेण्यासाठी आणि शॉर्ट टर्म गेन्स टाळण्यासाठी पुनर्रचना एका वर्षानंतरच करणार ४. या एक वर्षाच्या कालावधीत जर रक्कम गुंतवलेल्या कंपनी बद्दल काही विशेष बातमी तरच त्याचे शेअर्स विकून त्याच किमतीचे दुसऱ्या कंपनीचे शेअर्स घेणार (Event based changes only ) ______________________________________________________________________________________________________________ आता मुख्य मुद्दा : २५ कंपन्या कुठल्या ? तर टॉप परफॉर्मिंग म्युच्युअल फंडांना आधारभूत मानून कंपन्या शॉर्टलिस्ट करणार (याचा अर्थ : या फंडांनी चांगली कामगिरी केली. अर्थात या फंडांच्या मॅनेजर ने केलेले विश्लेषण बरोबर आहे. त्यामुळे त्यांना पैकी च्या पैकी मार्क देऊन त्यांचे विश्लेषण आपले म्हणणार. अर्थात शोरलिस्ट केलेल्या प्रत्येक कंपनीचा डिटेल अभ्यास करूनच फायनल २५ ठरवणार आहे. फक्त फोकस फंड्स वर “फोकस” न ठेवता लार्ज कॅप आणि मिड कॅप पण विचारात घेणार आहे, खालचा तक्ता बघा ३ फोकस्ड, २ लार्ज कॅप आणि २ opportunity फंड्स यांचा एकत्रित विचार केला (टॉप १० कंपनीज) इंडस्ट्री सेक्टर प्रमाणे कलर कोडींग केले आहे . यात बँकिंग / फायनान्स आणि IT / Software कंपन्यांचे प्राबल्य आढळते. तसेच अशा काही कंपन्या आहेत ज्यांचा बहुतेक सर्वच फंडात समावेश होतो उदाहरणार्थ HDFC Infosys TCS Axis back ICIC Bajaj Finance L&T __________________________________________________________________________________________________________ समारोप वरील माहितीच्या आधारे सध्या २५ कंपन्या शॉर्टलिस्ट करायचे काम चालू आहे. एकंदरीत हा कन्सेप्ट आणि विचारधारा याविषयी तुमची मते जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तसेच काही चुकत असेल तर जरूर सांगा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 28734 views

💬 प्रतिसाद (67)
च
चौकस२१२ Wed, 05/12/2021 - 15:01 नवीन
आपण असे करू शकता - स्टॉप लॉस घेणे आणि अजून खाली गेलं तर ती गॅप होऊ देणे आणि मग परत घेणे - किंवा कॉस्ट अवरेजींग ( १० ला घेणे खाली गेला ८ ला अजून घेणे असे ) - "इन्शुरन्स" म्हणून पूट ऑप्शन विकत घेणे - दुसऱ्या अकाउंट मध्ये शेअर शॉर्ट कराणे ( हे भारतात करता येते कि नाही माहित नाही , शेअर वरील फ्युचर वापरून शॉर्ट करता येते असावे? ) - शांत बसने काह्ही ना करणे वरील पद्धती चे फायदे तोटे वेगळे आहेत पण हे जर सर्व तुम्हाला खात्रीने वाटत असेल कि आपण घेतलेले शेअर हा लांब पल्याचा ठेवण्यासारखा आहे या शिवाय मुळातच विविध शेअर घेणे हा हि उपयाय असू शकतो किंवा काही शेअर + काही कमोडिटी फ्युचर+ काही लिस्टेड रिअल इस्टेट ट्रस्ट असे वेग वेगळे असेट क्लास यात ठेवणे असे हि उपाय आहेत
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/13/2021 - 04:43 नवीन
Long term shares पुर्ण analysis करून घेतल्यावर.. Stop loss ची गरज नाहि.. उलट ज्या ज्या वेळेस shares ची किंमत deep येईल त्या त्यावेळी पुन्हा त्यात खरेदि करत रहायची.. जर stop loss लावायाचा असेल आणि विकायचा असेल तर त्याला long term म्हणायचंच का?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/13/2021 - 05:00 नवीन
Long term shares पुर्ण analysis करून घेतल्यावर.. Stop loss ची गरज नाहि..
यावर थोडा अधिक प्रकाश टाकता येईल का? पूर्ण अ‍ॅनॅलिसिस म्हणजे नक्की काय? तो कोणत्या आधारावर करायचा? एकेकाळी काही शेअर्स असेच लाँग टर्म गुंतवणुकदारांच्या गळ्यातले ताईत होते. पण त्याचे काय झाले हे पुढील चार्टवरून समजेल-- सुझलॉन Image removed. जयप्रकाश असोसिएट्स Image removed. रिलायन्स कम्युनिकेशन्स Image removed. तेव्हा हे शेअर्स खाली येत असताना पण आणखी घेत राहायचे?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/13/2021 - 06:03 नवीन
आपण https://misalpav.com/node/48578 हा धागा पाहिला आहेच.. त्यात बरेचसे लिहिलेले आहेच.. आता तुम्हाला असे वाटत असले कि आपण shares घेण्यात काही चूक झाली आहे किंवा share घेतल्या नंतर त्या कंपनीची वाटचाल अधोगती कडे चालू असल्यास त्या कंपनीला आपल्या long term portfolio मधून काढून टाकावी.. पण जर stop loss लावायचा असल्यास ते long term कसे होईल.. आणि फेक कुठला तरी stop loss खुप लांबचा लावायचा झाल्यास त्याचा काहीच अर्थ नाही.. आता आपला portfolio किंवा त्यातील shares पुन्हा जोखून पाहता यावा यासाठीच आपण long term मध्ये जास्तीत जास्त १२-१५ shares घ्यावेत असे सुचवले आहे.. जर आपण long term मध्ये खुप सारे stocks घेतले तर मात्र त्याचा वेळोवेळी आढावा घेणे अवघड जाऊ शकते.. किंवा तुम्ही वरती उदाहरण दिले त्या प्रमाणे shares खुप खाली पडल्यावर कळेल.. दोन्ही बाजूची उदा देतो.. माझ्या long term portfolio मध्ये (आता १३ shares आहेत ) Itc हा १५१ रुपया पासून मी घेतो आहे.. Fmcg चा हा stock खुप slow आहे, analyis मध्ये त्याच्या वर शून्य कर्ज आणि diverse business यामुळे colgate बरोबर हा share मी माझ्या portfolio मध्ये घेतला आहे.. तरी वर्षे झाले तरी तो share २०० च्या आसपास आहे, अगदी गेल्या आठवड्यात तो पुन्हा २३० वरून २०० वर आला तरी मी तो आणखिन add केला. याला कारण कंपनी अजूनही debt free आहे, आणि चांगली परफॉर्म करेलच.. आणि diversification मध्ये उलट demerge होऊ शकते.. Demerge होताना पुन्हा याचा अभ्यास करावा लागेल.. जर मी याचा stop loss २०० लावला असता तर मी माझ्याकडे गेल्या वर्षांपासून केलेली गुंतवणूक (avg १७५ rs ) २५ रुपये profit ने विकली असती.. मग असेच करायचे असते तर माझे short term shares महिना दोन महिन्यात इतका profit देत असतील तर मग long term चे उद्दिष्ट वेगळे आहे हे मला माहित पाहिजे.. २. मी pharma चे दोन shares long term साठी निवडले होते, एक auro pharma जो मी ३९५ पासून घेतो आणि आता १००० रुपयाला आहे.. पण त्याच बरोबर abbot india सारखा उत्क्रुष्ट share मला,जास्त महाग असल्याने ना avg करता येत आहे ना त्याची किंमत वाढत आहे, त्यामुळे तो share चुकला असे म्हणुन मी तो share माझ्या portfolio मधून काढून टाकला आणि त्या बदल्यात sbi cards हा share ८०१ रुपयापासुन add केला.. यामध्ये मला हे सारे पाहता येते आहे कारण माझी share संख्या कमी आहे, पर्यायाने त्याला लागनारा अभ्यास मला easy पणे करता येतोय.. मी abbot आणि auro बरोबर आणखिन १-२ कंपनी त्यावेळेस final केल्या होत्या. cipla त्यातील एक. Abbot ऐवजी मी त्यावेळेस cipla घेतली असती तर मी जास्त बरोबर असतो.. But माणुस चुका मधून आणखिन शिकतच जातो..
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/13/2021 - 08:42 नवीन
पण जर stop loss लावायचा असल्यास ते long term कसे होईल..
याविषयी माझे मत लिहित आहे. मार्केटमध्ये प्रत्येक माणसाची पध्दत वेगळी असते त्यामुळे कोणी एक माणूस लिहित आहे तेच प्रमाण असेल असे अजिबात नाही. प्रत्येकाने आपल्याला काय भावते/जमते/आवडते त्याप्रमाणे निर्णय घ्यावेत. लाँग टर्म असल्यास स्टॉपलॉस लावायचा नाही असे मी तरी करत नाही. स्टॉप लॉस न लावता खाली जाणारी गाढवे विकत घेत राहिल्यास मोठा गाढवांचा कळप गोळा होईल पण आपल्याला ज्या कारणासाठी हे सगळे करायचे असते- पैसे कमावणे ते काही साध्य होणार नाही. वर दिलेल्या तीन चार्टवरून ते समजेलच. स्टॉप लॉस लावला आहे की नाही यावरून लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्म हे न ठरविता आपण नक्की कोणत्या टाईम फ्रेमवर काम करत आहोत यावर लाँग टर्म की शॉर्ट टर्म हे ठरेल असे वाटते. माझ्या मते लाँग टर्म म्हणजे मंथली कँडलवर काम करणारे. आपण ज्या टाईमफ्रेमवर काम करत आहोत त्या टाईमफ्रेमवर बाहेर पडायचा सिग्नल आला की बाहेर पडायचे. हा सिग्नल कोणता तरी रिव्हर्सल पॅटर्न (हेड अ‍ॅन्ड शोल्डर, डबल टॉप, ईव्हिनिंग स्टार वगैरे) असेल किंवा ट्रेन्डलाईन ब्रेकडाऊन असेल. मी इन्ट्राडे करत असेन तर हे सगळे १५ मिनिटांच्या चार्टवर दिसले तर बाहेर पडेन पण लाँग टर्म करत असेन तर मंथली चार्टवर दिसले तर बाहेर पडेन. म्हणजेच तो स्टॉप लॉस झाला. काही काळासाठी एखादा शेअर खाली आला तर तो कायमच खाली जाईल असे नाही. पण खाली पडणारा शेअर बरोबर ठेवायची पण काही गरज नाही. तो एखादा हायर लो करून परत उलटा फिरेल तिथे त्याला उचलायचा. आणि ते पण चार्टवरून पकडता येते. हे कोणत्याही टाईमफ्रेमला लागू आहे. अर्थात हा माझा मार्ग झाला. सध्या मी इक्विटीत काही करतच नाहीये. सध्या डॉलर आणि कमोडिटी त्यातही चांदी यात काम चालू आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 05/13/2021 - 05:48 नवीन
मुळात स्टॉप लॉस ची व्हॅलिडिटी १ वर्ष असते (जास्तीतजास्त ) तर आपण लॉन्ग टर्म म्हणतो तेंव्हा किमान ३ वर्षे कालावधी गृहीत धरलेला असतो ... त्यामुळे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ला स्टॉप लॉस हे विरोधाभासी (dichotomy) वाटू शकते त्यामुळे अशा दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला स्टॉप लॉस लावावा का ? याचे उत्तर तुम्ही पोर्टफोलिओ किती actively review करता त्यावर अवलंबून आहे. जर Fill it ... shut it ... forget it असा प्रकार असेल तर स्टॉप लॉस उपयोगी आहे. फक्त स्टॉप लॉस मध्ये selling price कमी ठेवावी. उदाहरणार्थ तुम्ही २०० रुपयाला शेअर खरेदी केला तर १९८ किंवा १९५ लास स्टॉपलॉस न लावता १७५ किंवा १५० ला लावावा .. अर्थात हे एक उदाहरण म्ह्णून दिले आहे ... थोड्याक्यात दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला स्टॉप लॉस लावताना normal volatility च्या बाहेर स्टॉक क्रॅश झाला तर सेफ्टी म्ह्णून स्टॉप लॉस वापरणे योग्य .. त्याचबरोबर वारंवार स्टॉप लॉस ट्रिगर झाला तर दीर्घ मुदत साधता येणार नाही .. त्यामुळे तारतम्य / बॅलन्स महत्वाचा
  • Log in or register to post comments
M
MipaPremiYogesh गुरुवार, 05/13/2021 - 11:44 नवीन
धन्यवाद ह्या चर्चे बद्दल , बरीच मते कळली . धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Wed, 05/19/2021 - 18:24 नवीन
सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वर लिहिल्या प्रमाणे २५ शेअर्स चा पोर्टफोलिओ बनवला आहे ... बघूया वर्षभरात काय प्रगती होते. शेअर्स निवडताना Contra investment theory चा ही उपयोग केला आहे. एक क्वार्टर नंतर (क्वार्टर म्हणजे ३ महिने गैरसमज नसावा) प्रगती काय होते याचा लेखाजोखा देईनच All the best ... to me
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी गुरुवार, 05/20/2021 - 08:21 नवीन
रुल बेस्ड स्ट्रेटीजी संबंधी चर्चा. https://www.youtube.com/watch?v=CZh0ixEgibw
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले गुरुवार, 05/20/2021 - 08:43 नवीन
उत्तम चर्चा चालली आहे, बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Tue, 10/05/2021 - 12:02 नवीन
मित्रहो या लेखात लिहिल्याप्रमाणे २५ स्क्रिप्ट्स खरेदी केले .. आज चार महिने झाले. चार महिन्यांचा लेखाजोखा : - २५ पैकी २४ स्क्रिप्ट्स पॉसिटीव्ह .. एकच निगेटिव्ह रिटर्न्स देत आहे - चार महिन्यांचे रिटर्न्स बघितले तर (equated yearly नाहीत ... Absolute for four months ) Image removed. Overall returns : 29.33% (in four months) म्हणजे वर्षाचे नव्वद टक्के झाले कि हो .. जवळजवळ दामदुप्पट अर्थात हाच ग्रोथ रेट राहणार नाही .. वर्षभरात ५० ते ६०% रिटर्न मिळाला तर ... एकदम हॅपी happy investing
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Tue, 10/05/2021 - 17:43 नवीन
सध्या घेतलेल्या २५ स्क्रिप्ट्स चे अलोकेशन आहे : Large cap : 67.63% Mid cap : 32.37% इंडस्ट्री अलोकशान : IT 29.77% Consumer Staples 19.31% Materials 16.16% Health Care .. 14.01% Communication .. 4.55% Consumer Discretionary 4.48% Industrial 4.18% Energy 4.14% Financials 3.40% healthcare is lowest yielding while consumer segments are giving maximum gains
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 10/07/2021 - 15:46 नवीन
मी ही तुनळी वाहिनी बर्‍यापैकी बघत असतो आणि तिकडले काही सल्ले मलातरी चांगले वाटले. शिवाय समजवायची पद्धतही सोपी वाटली. https://www.youtube.com/channel/UCzt5N2zaewxnKxCkOzEZVLg या वाहिनीवरील अ‍ॅनालिसिस ऐकुन(आणि थोडाफार अभ्यास करुन) घेतलेले काही शेअर्स असे ईंडियामार्ट ईंटरमेश बजाज फायनान्स ब्लॅक रोझ/दीपक नायट्रेट प्रिन्स/प्रकाश पाईप्स/अ‍ॅस्ट्राल डिक्सन(हा आत्ताच १:५ स्प्लिट झाला आहे)/हॅपिएस्ट माईड आय आर सी टी सी अमरजी--आपली लिस्ट सांगाल का?
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 10/07/2021 - 18:41 नवीन
राजेंद्रजी ... काही महत्वाचे स्क्रिप्ट्स (सेक्टर अनुसार ) जरूर लक्ष ठेवा / खरेदी करा बँकिंग आणि IT हे तर सदाबहार सेक्टर्स आहेत. बँकांपैकी ICICI / HDFC हे जायंट्स आहेतच .. पण IDFC वर नक्की लक्ष ठेवा IT सेक्टर मधले बिग फोर (TCS / Infy / Wipro / HCL) हे तर "संग्रही" (long term) हवेतच पण त्याच बरोबर Mphasis / L&T infotech हे जोरदार रिटर्न्स देणाराच रिटेल सेक्टर हा अजून एक फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर ... त्याच बरोबर consumer products ही कायम डिमांड मध्ये असणार .. त्यामुळे D Mart, tata consumer products, jubilant foods (आपला dominos pizza हो ), Nestle. Hindustan liver, VBL हे नक्की पोटफोलिओत ऍड करा बाकी मग नेहेमीचेच यशस्वी :Asian Paints आणि Pidilite Industries (फेविकॉल का मजबूत जोड) असायलाच पाहिजेत तसेच नोकरी सर्वांनाच हवी असते त्यामुळे naukari.com जोरदार घोडदौड करत आहे बाकी सध्याच्या परिस्थितीत pharma sector जोर पकडेल असे वाटले होते पण त्यामानाने प्रगती धीमी आहे, Dr. Reddy's lab, Torrent pharma, Divis lab हे भविष्यात चांगला परतावा देतील असे वाटते अर्थात हा माझा analysis आहे ... जाणकारांच्या मतांच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 10/08/2021 - 07:12 नवीन
तुम्ही सुचवलेले शेअर्स वॉचलिस्ट मध्ये अ‍ॅड्वले आहेत.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 10/07/2021 - 15:55 नवीन
आय आर सी टी सी कधी घेतला? बजाज चे सगळे शेअर माझे आवडते. फारसा लिक्वीड नसणारा बजाज स्टील ही घेतला होता. सगळ्यांनी चांगला परतावा दिला.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 10/07/2021 - 16:14 नवीन
आय पी ओ लागला नाही, नंतर १४०० ला घेतला होता तेव्हा २००० वर अडकला होता. मग विकुन टाकला. आता ३७०० ला पुन्हा एंट्री घेतली आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा