Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

विजयनगर - उदयास्त

ज
जयंत कुलकर्णी
Tue, 05/04/2021 - 17:31
💬 32 प्रतिसाद
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नमस्कार ! गेली कित्येक वर्षं हंपीला वर्षातून एकदा तरी जातोय. अर्थात या वर्षी करोनामुळे जमले नाही. हंपीवर अनेक पुस्तके वाचली आणि अभ्यासही केला. त्याच्यावर एक दीर्घ लेखही लिहिला. बहुतेकांना तो आवडलाही. पण हंपीचे अवशेष पाहतांना जो त्रास होतो तो मात्र सहन होत नाही. हंपीची अवस्था अशी का झाली याचाही अभ्यास केलाय आणि त्यावर लवकरच एक लेख लिहायचा आहे. जर भारताचा हंपी व्हायचा नसेल तर ह्ंपीच्या इतिहासाचा अभ्यास अनिर्वार्य आहे. अर्थात हंपीच्या राजवटींमधे सगळ्या प्रकारचे राजे आपल्याला आढळतील. चांगले, वाईट, अगदी भावाचे मुडदे पाडणारे राजेही आढळतील पण एक विसरता येत नाही या राजांनी हिंदू धर्माची पताका फडकत ठेवली ज्याचा शेवट मराठ्यांचा भगवा फडकण्यात झाला. मी हिंदू धर्मावर कितीही टीका केली तरी भारत एकसंध ठेवण्यात हिंदूंचा आणि हिंदू धर्माचा मोठा वाटा आहे, नव्हे त्यामुळेच भारत अजून एकसंध आहे याची मला खात्री पटली आहे. हिंदूंनी हा लढा कसा लढला याचे उत्तम उदाहरण म्हणजे विजयनगरचा लढा. प्रत्येक इतिहासप्रेमीने वाचले पाहिजे असे हे एक मराठी पुस्तक! या त्यांच्या त्यागाची अल्पशी परतफेड म्हणून मी पुस्तक लिहिण्याचे ठरवले पण नंतर रॉबर्ट सेवेल यांच्या The Forgotten Empire या पुस्तकाचा अनुवाद करण्याचे ठरवले. कारण माझ्या लेखनात आणि या पुस्तकातील मजकूर जवळ जवळ एकच झाला असता. असो. आज या पुस्तकाची घोषणा करण्यात मला अत्यंत आनंद होतो आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हे पुस्तक विक्रीसाठी हातात पडेल अशी अपेक्षा आहे. पुस्तकाचे नाव : विजयनगर - उदयास्त मूळ लेखक : रॉबर्ट सेवेल अनुवाद: जयंत कुलकर्णी. प्रकाशन : कॉफी हाऊस पृष्ठे : २९३ ते ४१० ज्यांना पुस्तक पाहिजे आहे त्यांनी मला मेसेज करावा. म्हणजे मी जूनमधे संपर्क करेन. आपला, जयंत कुलकर्णी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16209 views

💬 प्रतिसाद (32)
स
सुरसंगम Tue, 05/04/2021 - 17:34 नवीन
तूम्ही फक्त स्वतःच्या पुस्तकाच्या जाहिराती करताच मिपा आयडी वापरता काय ?
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 05/04/2021 - 17:46 नवीन
हो !
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 05/04/2021 - 17:49 नवीन
या लेखावर ही प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले. कृपया खालिल दुवा उघडा. जयंत कुलकर्णी यांचे मिपावर प्रकाशित झालेले लेखन माझ्यासह अनेक मिपाकर व मिपावाचक जयंतरावांच्या लेखनाचे चाहते आहेत.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 05/04/2021 - 18:26 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/04/2021 - 18:26 नवीन
त्यांचे लेख वाचल्यामुळेच, The Lonest Day, हा सिनेमा चांगला समजला ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/04/2021 - 18:27 नवीन
The Longest Day
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/04/2021 - 18:29 नवीन
https://misalpav.com/node/29264
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 05/04/2021 - 17:51 नवीन
'विजयनगर - उदयास्त' या नव्या पुस्तकाचे स्वागत. सदर पुस्तकाची किंडल आवृत्ती काढणार आहात का? पुस्तक वाचण्याची उत्कंठा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 05/04/2021 - 18:28 नवीन
एक प्रत अगोदरच राखून ठेवली आहेच. मुखपृष्ठावर तलरीगट्ट प्रवेशद्वार आहे असे दिसते :) सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 05/04/2021 - 19:12 नवीन
गेल्या दिवाळीनंतर हंपीची सहल जवळपास निश्चित होती परंतु करोनाच्या साथीमुळे हुलकावणी मिळाली. बघूया आता या दिवाळीनंतर तरी शक्य होते का ते. सहलीच्या आधी पुस्तक मिळाल्यास खूप उपयोगी ठरेल. पुस्तकाची प्रत राखून ठेवणार आहे. लवकरच मेसेज पाठवते.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 05/04/2021 - 19:27 नवीन
हंपीचं खूप वर्षांपासून कौतुक ऐकलंय. मिपावर सुद्धा हंपी विषयी पुष्कळ दर्जेदार लेखन झालंय. अर्थात हंपीच्या राजवटींमधे सगळ्या प्रकारचे राजे आपल्याला आढळतील. >> विजयनगर राजवट म्हणजे राजा कृष्णदेव राय हेच एक माहिती आहे. म्हणजे पुस्तक अतिशय विस्तृत असणार यात शंका नाही. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 05/04/2021 - 20:28 नवीन
नुकतेच तुमचे सायकॉलॉजी ऑफ मनी घेण्यात आले आहे. अजून वाचले नाही. विजयनगरच्या साम्राज्याबद्दल दुमिंगुश पाईश आणि फेर्नांव नुनिश या दोन पोर्तुगीज समकालीन प्रवाश्याच्या बखरीवरचे (संपादक- वसुंधरा फिलियोझा) एक पुस्तक आमच्या आवडत्या नॅशनल बुक ट्रस्ट ने अनुवादित केले होते, ते काही वर्षांमागे वाचले होते पण फारसे लक्षात राहीले नाही. त्याचे नुकतेच पुनर्वाचन झाल्याने विजयनगर बद्दल विस्तृत माहिती वाचायला आवडेल. पुस्तकाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Wed, 05/05/2021 - 04:03 नवीन
अभिनंदन! हा ही अनुवाद खिळवून ठेवणारा असणार ह्यात शंका नाही -('देरसू'पासून जयंतकाकांचा निस्सीम चाहता) विंजिनेर
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Wed, 05/05/2021 - 04:48 नवीन
... श्री सुरसंगम यांची चूक नाही. बरेच दिवसात मिपावर मी लिहिले नाही हे सत्य आहे. मधे एकदा विचार आला होता की एखादी कथा लिहावी पण गेल्या काही वर्षात मिपाकरांच्या आवडी निवडी बदलल्या आहेत. अर्थात ते नैसर्गिकच आहे. आता माझे लिखाण नवीन पिढीला आवडायलाच पाहिजे असा माझा बिलकूल आग्रह नाही. मी मिपावर पुष्कळ लिखाण केले आणि मी अनेक वेळा सांगितले आहे की मी लिहू शकतो आणि लोकांना माझे लिखाण आवडते हे मला मिपावरच कळले. मला जेव्हा राज्याचा पुरस्कार मिळाला तेव्हाही मी माझ्या माहितीत हे लिहिले होते. मी एक कादंबरीही मिपावर टाकली होती... ती अजूनही तेथे आहे. मला वाटले एवढे लिहिल्यावर मिपाकर एक दोन माहितीचे लेख खपवून घेतील... असो... श्री सुरसंगमसाहेब... मला क्षणभर वाईट वाटले पण क्षणभरच... माझ्या मनात राग नाही... तुम्हीही मिपावर लिहीत चला आणि मिपाचे साहित्य विश्र्व समृद्ध करा...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 05/05/2021 - 05:00 नवीन
जयंतकाका, मिपाकरांच्या आवडीनिवडी जरी काही प्रमाणात बदलल्या असतील तरी तुमचे लेखन वाचायला सर्वांना आवडतेच. तेव्हा येथे अवश्य लिहीत राहा, तुमचे लिखाण आमच्यासारख्याना मेजवानीच असते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/05/2021 - 07:33 नवीन
मिपाकरांना दर्जेदार लिखाण आवडते .... प्रतिसादांच्या संख्येवर, धाग्याचा कस ठरवणे चुकीचे आहे ... नाहीतर, मोकलाया दाही दिश्या, हे कसदार लिखाण ठरले असते किंवा मी पाडलेल्या जिलब्या कसदार ठरल्या असत्या ...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 05/05/2021 - 07:47 नवीन
बदलत्या काळानुसार प्रत्येकाला गुळाची चव समजतेच असे नाही ही देखील असु शकेल...
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Wed, 05/05/2021 - 07:50 नवीन
जयंतकाका, मिपाकरांच्या आवडीनिवडी जरी काही प्रमाणात बदलल्या असतील तरी तुमचे लेखन वाचायला सर्वांना आवडतेच. तेव्हा येथे अवश्य लिहीत राहा, तुमचे लिखाण आमच्यासारख्याना मेजवानीच असते. >>> +१००
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Wed, 05/05/2021 - 05:11 नवीन
साहेब तुम्ही लै चांगले लिहता हो त्यात काही वादच नाही. आणि मी ही तुमचा चाहता आहे. मला एव्हढंच म्हणायचं होते की तुम्ही इतरांच्या नवोदित लेखावर कधी प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. तुमच्या सारख्या सुप्रसिध्द, अनुभवी लेखकांनी जर नवोदित कलाकाराला मार्गदर्शन केले , त्यांना प्रोत्साहन दिले तर मिपावर अधिक चांगले सकस लेखक तयार होतील आणि मिपाकरांना अधिक दर्जेदार साहित्य वाचावयास मिळेल. बाकी तुम्ही दुखावले गेले असल्यास जाहिर माफी मागतो.
संपादित
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 05/05/2021 - 09:50 नवीन
सुरसंगम साहेब! प्रतिसाद वाचला. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेउन गप्प बसतो आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 05/05/2021 - 12:20 नवीन
आज एका मराठी आणि एका हिंदी म्हणीचा अर्थ अनुभवासकट कळला. कोणती म्हण असेल बरे ती?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 05/05/2021 - 05:44 नवीन
जकुंच्या एका निरागस धाग्यावर वाद झाला हे वाचून बरे वाटले ! अलिकडे काही लोक इच्छा असूनही मिपावर लिहित नाहीत याचे कारण हे "बरे" वाटणे असेल काय ?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/05/2021 - 08:27 नवीन
जयंत काका, तुमच्या नव्या पुस्तकासाठी खूप सार्‍या शुभेच्छा ! :) आपण इथे लेखन करत राहा, वाचक वाचत असतातच.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/05/2021 - 09:37 नवीन
आणि योग्य तिथे योग्य ते प्रतिसाद, पण देत असतात ...
  • Log in or register to post comments
स
सौ मृदुला धनंज… Wed, 05/05/2021 - 11:58 नवीन
कुलकर्णी सर नवीन पुस्तकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा....
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 05/11/2021 - 08:51 नवीन
या धाग्यावर सुरसंगम यांचे गार्‍हाणे आणि त्यावर जकु यांचा प्रतिवाद वाचून मिपावरील खिलाडूवृत्तीचा अनुभव आला आणि मिपाकर असल्याचा अभिमान वाटला !
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/11/2021 - 09:27 नवीन
जकु यांचा प्रतिवाद वाचून मिपावरील खिलाडूवृत्तीचा अनुभव आला जकुंनी अक्षरशः मन जिंकलं लोकांचे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 05/12/2021 - 07:40 नवीन
अगदी बरोबर. मत मांडतानाचा जकुंचा प्रांजळपणा वाखणाण्यासारखा आहे. त्यांनी सुर संगम यांना लेखन करायचे आवताण दिले आहे, बघू काय करतात ते.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sat, 06/12/2021 - 20:00 नवीन
आज हातात पडले पुस्तक. आता सुरु करते वाचायला
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 06/12/2021 - 20:16 नवीन
सेम हिअर.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/14/2021 - 13:47 नवीन
आज हातात पडले पुस्तक. आता सुरु करते वाचायला

+१

  • Log in or register to post comments
D
diggi12 Sat, 10/07/2023 - 08:43 नवीन
सर तुम्ही लिहीत रहा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा