Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कटितटपीतदुकूलविचित्र.....

आ
आजी
Tue, 05/04/2021 - 10:55
💬 58 प्रतिसाद
"शब्द हे शस्त्र आहेत", हे वचन आपण सगळेच नेहमी ऐकतो. शब्द हे जपून वापरा, ते फार सामर्थ्यवान असतात. त्यांचा अर्थ तर काही वेळा माणसाच्या मनाचा (माझ्या मते जीभेचाही) चेंदामेंदा करतो. मला अनेक शब्द कोड्यात टाकतात. त्यांचे अर्थ तर मला कळत नाहीतच पण त्यांचे उच्चारही कठीण वाटतात. काही शब्द उच्चारताना तर जीभ वळतच नाही."चटईला टाचणी टोचली" किंवा "काळे राळे,गोरे राळे,राळ्यात राळे मिसळले." सारखी अवघड शब्दरचना नाही हं! पण अनेक शब्दांचे उच्चार आणि अर्थ मला गोंधळात टाकतात. माझी एक लहानपणीची मैत्रीण होती. ती खूप सावकाश शब्द उच्चारायची. तिच्या तोंडून 'चें ग रा चें ग री','ग ड ब ड गोंधळ', प ळ वा प ळ वी ' असे शब्द ऐकताना गंमत वाटायची. हसू यायचं. मला अनेक हिंदी गाण्यांचे शब्द समजत नाहीत. अर्थ समजत नाही. "चिलमन, चष्मेबद्दूर, जुस्तजू, इनायत, तहकिकात, तकल्लुफ, मुपलिस,"असे कितीतरी शब्द. "चलो कि चलके सियासी मुकमिरोसे कहो कि हमको जंगो जदल के चलन हे नफरत है" किंवा "गुजिश्ता जंगमें घर ही जले मगर इस बार" किंवा "तसव्वुरात की परछाईयाॅ" असे शब्दप्रयोग केले की मी फाफलते. हिंदी गाण्यात "हिवडा में नाचे मोर" म्हटल्यावर मी मोर नक्की कुठे नाचतोय हे न कळल्यामुळे गोंधळात पडले. मग हिवडा शब्दाचा अर्थ हृदय आहे हे कळले. "जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश बहाले हिजरा तुम्हारा दिल है" हे गाणं इतक्यांदा ऐकूनही आईशप्पथ मला त्याचा उच्चार करता येत नाही, आणि अर्थही कळलेला नाही. आत्ताही लिहीण्यातली चूकभूल देणे घेणे. "बंबईसे आया है बाबूजी नन्हा" असेच गाण्याचे शब्द आहेत असे मला वाटत होतं. आणि एवढा मोठा घोडा देवानंद 'नन्हा' कसा असं मला आश्चर्य वाटत असतानाच एका मैत्रिणीने तो शब्द "चिनोन्ना" असा दाक्षिणात्य आहे असं समजावलं. शाळेतील वयात प्रतिजैविक 'पेनिसिलीन' या साध्या शब्दानं दांडी उडविली होती. नंतर कॉलेज शिकताना "ऑन्थाॅपाॅमार्फालाॅजी"-(मानववंशशास्त्र) हा शब्द जिभेवर घाव घालून गेला होता. संस्कृतमध्ये "भिद्यादुर्यदुदारदर्दुरदरीदीर्घादरिद्रद्रुमाः।" हा श्लोक पाठ करताना जीभेला पक्षाघात झाला. ज्यात"माय सिन"- ऊर्फ "माझे पाप" हा शब्द आहे अशी अनेक ॲंटिबायोटिक्सची नावं उच्चारताना तिरपीट उडते. क्लोरोमायसिटिन की कायसेसे नाव,त्याने दचकवलं होतं. आयुर्वेदातही अशीच औषधींची जीभेला योगासने करायला लावणारी नावे आहेत,"कार्पासमूलासव,मकरध्वज, बृहत् वातचिंतामणी,सारस्वतारिष्ट,त्रयोदशांगगुग्गुळ,खदिरादित्वक्!! कोरोना आला आणि अनेक नवे शब्द कळले. लाॅकडाऊन, जनता कर्फ्यू, पाॅझिटिव्ह, निगेटिव्ह, स्वॅब टेस्ट,क्वारन्टाईन,पॅनडेमिक इ.इ. रेमडेसीवीर हे असंच एक औषध. प्रथम उच्चारणात तो शब्द जिभेवर चढतच नाही. घटवावा लागतो. अनेक रिपोर्टर्सची,न्यूज रीडर्सची,बाईट देणाऱ्या पुढाऱ्यांची, यू ट्यूब वरच्या राजकीय विश्लेषकांची हा शब्द उच्चारताना बोबडी वळल्याचं दर्शकांनी ऐकलेलं आहे. मला तर सुरुवातीला रेमडेसीवीर हे नाव ऐकल्यावर ते "रामदेसीवीर",असं पतंजलिचं औषध आहे असं वाटलं. आणि त्याचा भ्रष्ट इंग्रजी उच्चार रेमडेसीवीर करताहेत अशी खात्री पटली. सुरुवातीच्या काळात ट्रंपसाहेब रागावल्यावर आपण अमेरिकेला हायड्रोक्सिक्लोरोक्विन नावाचं औषध निर्यात केलं होतं. ते नावही लक्षात राहायला कठीण आणि जिभेला व्यायाम करायला लावणारं होतं. "डाॅक्सिसायक्लिन,(सर्व औषधांचे उच्चार माझ्या कुवतीनुसार, आगाऊ क्षमस्व), "डेकथामेथासोन,""टोसिलिझूमॅब" ही औषधांची नावही जीभेला आकर्णधनुरासन करायला लावणारी. कोरोना काळात प्लाझ्मा हे काय प्रकरण आहे ते नव्यानेच कळलं. काॅनव्हालसेंट प्लाझ्मा ट्रिटमेंट हे नाव ऐकल्यावर भीती वाटली. औषधांची नाव कसं सोपं हवं. दुकानात जाऊन दुकानदाराकडे,"अहो जरा एक टोसीलिझूमॅब द्या हो ."असं कसं मागायचं? त्यातून प्रिस्क्रिप्शनवरच्या गिचमिड्या अक्षरातून टोसीलिझूमॅब बरोबर वाचणं केवळ जगन्नियंत्यालाच शक्य आहे. सरळ ,साधे ,सोपे असावेत शब्द. आणि आयुष्यही!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 21627 views

💬 प्रतिसाद (58)
उ
उपयोजक गुरुवार, 05/06/2021 - 19:35 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 05/07/2021 - 08:48 नवीन
गापुची-गापुची गम-गम किशिकी-किशिकी कम-कम चा अर्थ काय असावा ?
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 05/07/2021 - 09:06 नवीन
टेलेफोनधुनमे हसनेवाली मेलबॉर्न मछली मचलनेवाली डिजिटलमे सूर है तराशा मॅडोना है या नताशा झाकीरहुसका तबला तू है क्या ? याचा अभ्यास करा मग तुम्हाला कळेल ... :)
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/07/2021 - 10:11 नवीन
मला वाटलं कायतरी रॅप वैगेरे असेल, व्हीडो पहिला तर काय कमाल. गाणे, पोशाख, नृत्य सगळंच अवर्णनीय. https://youtu.be/EbYfxW6ULGI
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 05/10/2021 - 14:08 नवीन
हा .... हा .... हा .... ! जिसमें सुर हैं तराशा मॅडोना हैं या नताशा जाकिरहुसेन तबला तू हैं क्या ... (मनिषा कोयरालाच्या नितंबावर तबला वाजवतो) लै हसलो या गाण्याला !
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 05/07/2021 - 16:17 नवीन
"कुवलय तव मुख तिला , अजि कमला विनवी तुला मला " या ओळीचा अर्थ काय ?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 05/07/2021 - 17:40 नवीन
आमचा मित्रपरिवार एखाद्या कन्यकेने त्यांना 'दिल' दिला नाहीतर हेच गाणे म्हणत असे ! "जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश बहाले हिजडा तुम्हारा दिल है !"
  • Log in or register to post comments
आ
आजी Fri, 05/14/2021 - 12:19 नवीन
भरपूर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एकामागून एक प्रतिसाद वाचून त्यांना उत्तरे लिहिण्यामुळे काहींना एकाहून अधिक उत्तरे लिहीली असू शकतील. मराठी माणूस-तुम्ही आणि अनेकांनी विचारलं आहे की शीर्षकाचा अर्थ काय?तर सांगते. मूळ महिषासुरमर्दिनी स्तोत्रातली ओळ अशी- "कटितटपीतदुकूलविचित्रमयूखतिरस्कृतचंद्ररुचे" त्याचा अर्थ जिच्या कमरेच्या कडेला परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या रेशमी वस्त्रातून म्हणजे साडीतून निघणाऱ्या विचित्र म्हणजे रंगीबेरंगी किरणांनी चंद्राच्या तेजाला फिके पाडले आहे,अशा हे महिषासुरमर्दिनी तुझा विजय असो. चार ओळींच्या श्लोकातली ही पहिली ओळ आहे. मुक्तविहारी-हो का! श्रीगुरुजी-नाना? हाहाहा.मलाही असे ऐकू यायचे अधुनमधून. प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे-तुमच्या सविस्तर अभिप्रायाबद्दल धन्यवाद. "लिहिती राहेन"असं आश्वासन देते. तुमचाच दुसरा अभिप्राय"विनामास्क फिरणाऱ्यांना 'भिद्यादुद्यदुदारदर्दुरदरी'हा शब्द २५वेळा म्हणायला लावावा. "हा हा हा. स्वलिखित-शीर्षक महिषासुरमर्दिनी स्तोत्रातून घेतलंय.सुरुवातीलाच स्पष्ट केलंय.वाचून बघा. आंद्रे वडापाव-तुमचं उत्तर तुम्हाला मिळाले आहे. स्वलिखित-आता लक्षात आलंच असेल. सुक्या-तुमचा अंदाज चुकला. सर्वात वरची ओळ वाचा. तुषार काळभोर-बरोबर. शाम भागवत-खरंच.बरोबर. चौथा कोनाडा-बोबडी वळली?हाहाहा! टवाळ कार्टा-धन्यवाद. सतीश गावडे-काय माहीत?उर्दू भाषा आहे. तुम्हांला कळलाय की अर्थ! आंद्रे वडापाव-तुम्ही बरोबर अर्थ सांगितला आहे. गवि-तुमचं निरीक्षण बरोबर.मीही चुकभूल देणे घेणे ,म्हटलेच आहे. चौकस-तुमचं म्हणणं पटलं. विजुभाऊ-तुमचं निरीक्षण करेक्ट. वामन देशमुख-ती ओळ उर्दूत आहे. तुमचा जोक आवडला. हसू आले. सर टोबी-मदतीबद्दल धन्यवाद. टोबी, तुम्हाला माझं लिखाण नंदादीपासारखं वाटतं या कौतुकाबद्दल आभार. अमेरिकन त्रिशंकू-धन्यवाद.अर्थाबद्दल. Bhakti-"मस्त, खुमासदार शैलीत लिहिलंय"या तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. गामा पैलवान-लेखन खुसखुशीत"- आभारी आहे. मदनबाण-मी महिषासुरमर्दिनी स्तोत्र वाचत नाही. पण मला ते माहीत आहे. त्याचा नाद मला आवडतो. वामन देशमुख- "खुसखुशीत लिहिण्यात तुम्हाला आणि कुमार १ला मिपावर खरंच तोड नाही."- हा तुमचा अभिप्राय समाधान देणारा. धन्यवाद. स्मिता-खरंय. उपयोजक-बरोबर. तुषार काळभोर-"तुमच्या लेखाची वाट बघत असतो."अभिप्राय वाचून समाधान वाटले. सिरुसेरी-तुम्हीही काही कठीण आणि गमतीदार शब्द दिलेत. करमणूक झाली. हसू आले. मराठी माणूस-खरंच. अमेरिकन त्रिशंकू-बरोबर. सिरुसेरी-शक्यता आहे. तुमचा तर्क! कुमार १-धन्यवाद. अमेरिकन त्रिशंकू-बरोबर. तुमचा अंदाज खरा ठरला. उपयोजक-आंद्रे वडापाव आणि तुषार काळभोर यांनी तुमच्या शब्दांचे अर्थ सांगितले बघा! सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. कंजूस- वाचून आनंद. धन्यवाद. लेख खूप वाचकांनी वाचला.आणि खूप जणांनी प्रतिक्रिया दिल्या. या घसघशीत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 1 minute ago
  • सुंदर !!
    20 hours 3 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 7 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा