Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सवय

अ — अनन्त्_यात्री, Fri, 04/30/2021 - 17:13
साखरझोपेच्या डोळेजड सीमेवरून हाकारणार्‍या अनघड कल्पनांची वास्तवाच्या धगीत कापूरवाफ होताना बघण्याची आता सवय करून घेतोय मास्कावगुंठित श्वासात अवकाळी पावसाचा विषण्ण मृद्गंध ऊरफोड भरून पाऊसगाणे गाण्याची आता सवय करून घेतोय हताशेच्या महासाथीची "न"वी लाट सकारात्मक विचारांच्या प्लासिबोने नेस्तनाबूत होईलच हे स्वत:ला वारंवार पटविण्याची आता सवय करून घेतोय

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1595 views

💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन गुरुवार, 08/18/2022 - 14:57 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/18/2022 - 17:12 नवीन
अद्भुत अद्भुत =))))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/19/2022 - 05:45 नवीन
आवडली मास्कावगुंठित श्वासात हा शब्दप्रयोग तर विशेष आवडला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 58 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 10 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 18 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा