Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

श्वासांचा बाजार

ख — खिलजि, Wed, 04/28/2021 - 17:33
श्वासांचा बाजार शिगेला पोचलाय करोनाचा विळखा सर्वाना पडलाय लालीपावडर लावून घरात जरी बसला तरी करोनारूपी राक्षस घरात जाऊन डसला वॉट्सऍपवर तर नुसता ऊत आलाय अरे , तिथे जाऊ नका रे त्याला करोना झालाय इस्पितळात तर जायची सोयच राहिली नाही रेमडीसीवीर नाही तर खाट मिळत नाही अरे कुठून आणू मी हे सर्व , जर तो इलाजच अस्तित्वात नाही चांगला ठणठणीत होता तो कुणास ठाऊक कसा गेला ? कुणी म्हणत अटॅक आला तर कुणी म्हणे त्याला करोना झाला खरं खोटं काय ते त्या वैद्याला ठाऊक पण दीडफूट फाटली सर्वांची आपलं काही झालं तर म्हणून सर्वच भावुक सरकार काय करतेय ते देव जाणे काहीतरी करतेय असे त्यांचेच म्हणणे लोकडाऊन हा पर्याय त्यांना परवडतो हातावरचे पोट असलेला मात्र निष्काम भरडतो सर्व बसतात मग माश्या मारत, गप्पा ठोकत करोना मात्र दूरचित्रवाणीवर बेफाम पसरत असतो भीती हळूहळू मनाच्या मातीत मिसळली जाते आणि मग , रंग चढतो , चढतच जातो करोनाच्या सोबतीला भीतीची छाया आता उकळा मदत , मागा भीक जातायत तेव्हढे जाऊन देत आपण जमवुया माया अरे बघा त्या तळपणाऱ्या सूर्याकडे त्याचे निर्भेळ ऊन तुमच्या रेमिडिसीवीर्पेक्षा स्वस्त आहे मग का म्हणून तुमचेच म्हणणे रास्त आहे? सरकारने निदान हुकूम काढावा प्रत्येकजण किमानवेळ उन्हात असावा जागोजागी क जीवनसत्वाचे वाटप करावे जे खरेच आजारी आहेत त्यांनाच इस्पितळात भरावे इथे तर सर्व विचित्र चालू आहे घरोघरी वाईटबातम्यांचं चर्चासत्र चालू आहे सर्वांच्या मनात करोनाने जागा घेतलीय मराठी माणसानेही आता मान टाकलीय महाराष्ट्र मेला तर अख्ख जग बुडेल पण असे कधी होणार नाही कारण ... हि शिवभूमीच याचं कोडं उलगडेल

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4094 views

💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले Wed, 04/28/2021 - 17:35 नवीन
अरे ही कविता आहे की आजच्य ताज्या बातम्या ? दहा पैकी शुन्य गुण ०/१०
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 04/28/2021 - 17:37 नवीन
ताज्या कमी शिळ्या बातम्या
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 04/28/2021 - 17:42 नवीन
चांगलं कधी लिहायला येत नाही ती दौत आपण विकत घेतलीच नाही या शाईने आधी बरेच वार केले आता बसलोय शांत नदीकिनारी म्हणून तुला बातम्यांनी बेजार केले
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/28/2021 - 18:19 नवीन
खिलजी साहेब तुम्ही पुन्हा एकदा लिहीते झालात याचा आनंद झाला.. लिहित रहा आम्ही आहोत वाचणारे. आता थांबू नका. कोसळू द्या धबधबा अविरत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 04/28/2021 - 18:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 04/29/2021 - 08:06 नवीन
थांबू नका लिहित रहा, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/29/2021 - 15:50 नवीन
होऊ द्या ! उंबबबबब
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/29/2021 - 15:50 नवीन
होऊ द्या ! उंबबबबब
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Wed, 04/28/2021 - 18:43 नवीन
अरे बघा त्या तळपणाऱ्या सूर्याकडे त्याचे निर्भेळ ऊन एव्हड कड़़क ऊन असत. पाच मिनिट उभ राहील तर भाजुन निघायला होत.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन गुरुवार, 04/29/2021 - 19:41 नवीन
माफ करा पण नाही आवडली कविता
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 51 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 57 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा