Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

फाल्गुन व.३० संभाजी राजांची हत्या!

A
Ashutosh badave
Mon, 04/26/2021 - 07:38
💬 1 प्रतिसाद
आज काय घडले... संभाजी महाराज शके १६१० च्या फाल्गुन व. ३० रोजी छत्रपति संभाजी राजे यांची हत्या वडू (बुद्रुक ) येथे औरंगजेब याने अत्यंत अमानुषपणे केली! सुमारे सव्वा महिन्यापूर्वी म्हणजे माघ व. ७ रोजी मुकर्बखानाने औरंगजेब बादशहाच्या सांगण्यावरून संभाजी राजे व कलुशा या दोघांना संगमेश्वर येथे कैद केले होते. ही बातमी बादशहास कळल्यावर त्याने विजयोत्सव सुरू केला. फार दिवसांची त्यांची मनीषा पूर्ण होणार होती. लागलीच त्याने आनंदाप्रीत्यर्थ गुलबर्गा येथील यवन साधूस दहा हजार रुपयांची भेट पाठविली. बादशहा या वेळी बहादुरगडास होता. संभाजी राजे व कवि कलश येत आहेत असे कळताच त्याने संभाजी राजांचा अपमान करण्यासाठी हुकूम पाठविला, “संभाजी राजांची धिंड काढीत घेऊन या.' आणि हुकुमाप्रमाणे मराठ्यांच्या या राजाला चित्रविचित्र पोषाख चढविण्यांत आला, डोक्यावर विदुषकी टोपी घालून तीस घुंगुरू लावले, आणि संभाजी राजांना उंटावरून मिरवीत वाद्ये वाजवीत हमीदुद्दीवानाने बादशहासमोर आणले. त्यांचा निकाल कसा लावावा याची सल्लामसलत झाली. “मुसलमानी धर्म स्वीकारून बादशहाची सेवा कराल तर जीवदान मिळेल" या औरंगजेबाच्या विचारण्याला संभाजी राजेंच्या अंगी उसळत राहणाऱ्या हिंदु धर्माच्या अभिमानाने उत्तर दिले. “मृत्यु किंवा हालअपेष्टा यांना भिऊन हा शिवाजीचा पुत्र जिवाची पर्वा करणार नाही." याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्याच रात्री संभाजी राजांचे डोळे काढण्यांत आले. कलुशाची जीभ कापण्यांत आली! आणि दोघांनाहि ठार करण्याचा हुकूम बादशहानें. फर्माविला! शेवटी फाल्गुन व. ३० रोजी संभाजीने व कलुशाचे एक एक अवयव तोडून आणि त्यांचे मांस कुत्र्यास देऊन दोघांचा शिरच्छेद करण्यांत आला! उभयतांची शिरें पेंढा भरून कैक दिवस निरनिराळ्या गांवांतून वाद्ये वाजवून मिरवण्यांत आली; पुढे ती फेंकून दिल्यानतर मराठ्यांनी तुळापूर येथे आणून भीमा-इंद्रायणीच्या संगमावर अग्निसात् केली! -११ मार्च १६८९

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1313 views

💬 प्रतिसाद (1)
च
चित्रगुप्त Mon, 04/26/2021 - 16:07 नवीन
अरेरे. काय अमानुष हे घोर कृत्य. म्हणूनच समर्थांना "बुडाला औरंग्या पापी" असे म्हणावे लागले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा