Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही

उ
उपयोजक
गुरुवार, 04/15/2021 - 06:00
🗣 101 प्रतिसाद
गेल्या काही महिन्यांपासून फेबुवर मराठी भाषाप्रेम टिपेला पोहचले आहे. विविध ग्रुपांतून मराठी शब्दांची उत्पत्ती, इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द शोधणे हे सुरु आहे. दक्षिण भारतीय भाषांमधे बनणारे सिनेमे हे नेहमीच बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा कथा,पटकथेच्या दृष्टीने कसे दर्जेदार असतात ते पटवून देण्यात बॉलीवूडविरोधक पुढे असतात. महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील महानगरांमधे हिंदी भाषिकांकरवी होणारे हिंदी भाषेचे आक्रमण हे स्थानिक भाषांची गळचेपी करत असल्याबद्दलची अोरड तर नेहमीच होते. हिंदीची दादागिरी थांबवा अशी फेसबुकी आंदोलने बरीच सुरु आहेत. जोडीला सावरकरप्रेमींची भाषाशुद्धी आहेच. तर याच्या अगदी उलट हिंदी ही सगळ्या देशाला व्यवस्थित बोलता आलीच पाहिजे, पूर्ण देशाची स्वत:ची अशी एक भाषा हवीच यापासून ते हिंदीला विरोध म्हणजे देशद्रोह समजण्यापर्यंत काही लोक जातात. दक्षिण भारतीय लोक हिंदीला फारसे महत्व देत नसल्याने तिथल्या महानगरांमधे राहणारे लोक विशेषत: उत्तरभारतीय लोक चिडून असतात. नवीन भाषा ती सुद्धा जी पैसे मिळवायला मदत करत नाही ती 'शिकणे' हे अर्थातच त्यांच्यासाठी 'डोकेदुखी' असते. गायपट्ट्यातले बहुतांश लोक पैसे मिळवणे या एकाच दृष्टीकोनातून महाराष्ट्र ,द.भारतातील महानगरे गाठतात. साहजिकच स्थानिक भाषा, संस्कृती याला बाधा आणण्याला कारणीभूत ठरतात. काही स्थानिक नागरीक मानतात की यामुळे दुसर्‍या भाषेतले शब्द आपल्या भाषेत आल्याने आपली भाषा समृद्ध होते. भाषा पाण्यासारखी असते, हिंदीचा द्वेष करु नका वगैरे वगैरे. अशाचप्रकारे RSS, भाजप आणि मोदी समर्थकांमुळे हिंदू धर्मविषयक समूहांतही वाढ झाली आहे,होते आहे. पैसे घेऊन केली जाणारी धर्मांतरे, मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी, जुनी,वापरात नसलेली मंदिरे चर्चमधे रुपांतरीत करणे किंवा चर्चची बाह्यरचना हिंदू मंदिराप्रमाणे करणे, ख्रिश्चन धर्मात नसूनही हिंदू पद्धतीने येशु किंवा मेरीच्या मुर्तीवर उपचार करणे , हिंदू पुजाविधीसदृश्य पद्धतीने येशुची मुर्ती सजवणे हे प्रकार त्यांच्यादृष्टीने चिंतेचा विषय आहेत. अल्पसंख्यक लोकांची दादागिरी किंवा आक्रमकपणा, विशिष्ट पद्धतीनेच बनवलेला पदार्थ विकत घेईन अशी काही धर्मियांची मागणी किंवा अमुक पदार्थ विशिष्ट धर्मात निषिद्ध असूनही त्याच धर्मातल्या काही लोकांकडून तो खाल्ला जाणे हे काही लोकांच्या दृष्टीने चुकीचे,अस्मिताभंग करणारे,संस्कृतीला हानिकारक मानले जाते. याउलट "संविधानाने आम्हाला हवी ती भाषा बोलण्याचा,हवं ते खाण्याचा अधिकार दिला अाहे,हवा तो धर्म अवलंबण्याचा अधिकार दिला आहे.आमच्यावर दादागिरी करणारे तुम्ही कोण" असा प्रतिरोधही दुसर्‍या बाजूने होत असतो. मातृभाषा, स्वधर्म, मातृभाषेची शुद्धी, भाषेवरील किंवा धर्मावरील आक्रमण,धर्मांतर या अस्मिताविषयक गोष्टींकडे तुम्ही कसे पाहता? यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत? का आहेत? तुमच्या धर्मावर,भाषेवर होणारा अन्याय हा तुमच्यासाठी कितपत दखलपात्र आहे? काही लोक भाषा, उपभाषा,बोली, प्रांत, उपप्रांत, धर्म, भौगोलिक विभाग, स्थानिक संस्कृती हे सगळे बाजूला सारुन 'पैसे कमवणे' या एकाच ध्येयाने प्रेरित असतात. 'पैशाने जितके श्रीमंत असाल तितकी तुमची जगात किंमत जास्त.कुठे या मर्यादा घालणार्‍या भाषिक,धार्मिक अस्मितांमधे अडकून वेळ वाया घालवता?' या विचारांचा अवलंब करणारे असतात. ते तुम्हाला योग्य वाटतात का? भाषिक,धार्मिक अस्मितांना तुम्ही किती महत्त्व देता? का देता?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32831 views

🗣 चर्चा (101)
ग
गॉडजिला Sun, 04/18/2021 - 20:00 नवीन
यावरुन आठवलं... पुनेरी भाशा प्रमाण मानली जावी असा एक मतप्रवाह आहे त्यात कितपत तथ्य आहे ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/18/2021 - 20:18 नवीन
त्याला पुणेरी मराठी म्हणजेच प्रमाणित मराठी म्हणतात.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 04/19/2021 - 04:49 नवीन
?????
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 04/19/2021 - 02:00 नवीन
- भाषिक,धार्मिक अस्मितां महत्वाची आहे पण त्याचा अतिरेक आणि "उर बडवणे " हे होऊ नये एवढेच वाटते - स्वतःची भाषा नक्कीच जोपासणे महत्वाचे आहे .. उगाच अति उदारमतवादी होऊन " कम्युनिकेट झाल्यास कारण " हे सोंग पटत नाही त्यात मातृभाषेची लाज आहे अशा लोकांना असे वाटते ( तसे मान्य कोणी करणार नाही म्हणा ) - यूरोपात देश तशी भाषा आहे ( काही अपवाद सोडले तर म्हणजे स्विसीझरलंड मध्ये ३ भाषिक लोक राहटतात ) जवळ जवळ तसेच भारतातात झाले भाषावार प्रांत रचने मुळे आणि त्यात काही फार गैर झाले असे वाटत नाही सीमा भागात प्रश्न होणार काही इलाज नाही - प्रमाण भाषा काही ठिकाणी असणे महत्वाचे आहे - मुद्दामून स्व भाषेत इतर भाषेतील शब्द घुसडू नयेत विशेष म्हणजे सोपा आणि चांगला शब्द स्व भाषेतउपलब्ध असताना ... - मराठी माध्यमात शिकून काह्ही बिघडले नाही हे खरे , जग फिरलो , राहिलो बऱ्यापैकी यशस्वी झालो पण त्याचा बरोबर उत्तम जगातिक भाषा हि यावी .. मला एवढे वर्षे हे कळले नाही कि भारतातात इंग्रजी माध्यमातील शाळातून १०० गुणांचे मराठी शिकवायाला काय हरकत आहे ? - भाषा कधी कधी धर्मापेक्षा जास्त लोकांना जवळ आणते हे जरी खरे असले तरी पण ते तेवढयापुरतेच असे वाटते ( बांगलादेश स्वतंत्र झाला तेवहा इस्लाम पेकशा त्यांना बंगाली भाषा आणि संस्कृती महत्वाची होती पण आता पहा तू नाली वॉर बरेच बांगलादेशी "पाकिस्तान "उम्मा " चा भाग असल्यामुळे बांगलादेशला जास्त जवळचा असाच "सूर" काढतातत - धर्माबद्दल काय बोलणार टोकाला जाऊ नये एवढेच , आपले २ पैसे म्हणतात " मी मंदिरात जाणार नाही पण बहुसंख्यांकांना मंदिर बांध्यानाचा हक्क आहे त्याला पाठिंबा मात्र नक्की देईन "
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/19/2021 - 05:21 नवीन
अस्तित्व टिकवणयासाठी साठीच सर्व धडपड असते आपल्या परंपरा,संस्कृती, भाषा,हे सर्व टिकले तर च आपले अस्तित्व राहील नाही तर नाही अशी भीती नेहमीच लोकांच्या मनात असते. आपले आदर्श,आपल्या समजुती,आपली श्रद्धा स्थान ह्यांना धक्का लागलेला लोकांना आवडत नाही. त्यांच्या वर आक्रमण म्हणजे स्वतः ला धोका ही भावना तीव्र असतेच. जसे वर सांगितले त्या प्रमाणे Bangladesh ल भारताने किती ही मदत केली तरी त्यांना पाकिस्तान च जवळचा वाटणार. युरोपियन लोक फक्त ज्ञान वाटत असतात पण ते पण कट्टर धार्मिक आणि संस्कृती प्रेमी च असतात. आपल्या साड्या तेथील बायका नसतील का? किंवा आपली ज्वारी ची भाकरी त्यांच्या रोज च्या जेवणात असेल का? आपण पिझ्झा पण स्वीकारला आणि मिनी स्कर्ट पण स्वीकारला. हे घडले फक्त इंग्रजी भाषेच्या आक्रमणं मुळे भाषेचे आक्रमण ही साधी गोष्ट नाही. जपान नी इंगर्जी स्वीकारली नाही म्हणून त्यांनी पिझ्झा पण सर्रास स्वीकारला नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 04/19/2021 - 05:26 नवीन
हा विचारच केला न्हवता कधी, भाषेचे आक्रमण चिन्तादायक प्रकार वाटतोय
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 04/19/2021 - 05:29 नवीन
आपण योग्य बोलता
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 04/19/2021 - 09:00 नवीन
इंग्लंड चे राष्ट्रीय व्यंजन काय असेल बरे ? :)
  • Log in or register to post comments
स
सुरिया Mon, 04/19/2021 - 09:32 नवीन
G B हे असावे किंवा U K, पण U हा तर स्वर झाला. ;)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/19/2021 - 09:37 नवीन
चिकन टिक्का मसाला म्हणत आहात का? तसे तुम्ही म्हणत असाल तर तो अन्न पदार्थ इंडियन,पाकिस्तानी ह्या लोकांनी ब्रिटन मध्ये प्रसिद्ध केला. असा पण भारत त्यांचा गुलाम होता त्या मुळे १५० वर्ष त्यांचा आपला संबंध होता. पण ज्वारी ची भाकरी, डाळ भात,चपाती,त्यांनी स्वीकारली नाही. चिकन टिक्का मसाला अपवाद ठरतो.त्यांनी काही सिद्ध होत नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 04/20/2021 - 01:56 नवीन
भाषेचे आक्रमण ही साधी गोष्ट नाही. सहमत
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 04/19/2021 - 13:35 नवीन
यातील बटाटा भारतीय नाही अन पाव तर नाहीच नाही !
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 04/20/2021 - 04:03 नवीन
+१
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 04/20/2021 - 04:06 नवीन
अस्मितेचा विचार पिझ्झा आणि स्कर्ट पाशी येतो, तसा गाडी, इन्सुलिन, अँटी बायोटिक्स इथे का येत नसावा बरे ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 05:22 नवीन
उलट अस्मिता खूप जास्त आहे .भारतीय लोकांना त्यांचे प्राचीन वास्तू शास्त्र,आयुर्वेद, योग विद्या,मंत्र ची ताकत ह्या विषयी खूप तीव्र अभिमान आहे तीच बाब ज्यांना प्राचीन संस्कृती आहे त्या सर्व देशात आहे. आधुनिक वैद्यक शस्त्र विषयी आज पण एका कोपऱ्यात अविश्वास असतो.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 04/20/2021 - 06:15 नवीन
आधुनिक वैद्यकशास्त्राचा जो कोपर्यातला अविश्वास आहे, त्याचे खऱ्या जीवनात कुठे कुठे फलित झाले आहे ब्रे ? कि फक्त तात्विक अविश्वास आहे ?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 04/20/2021 - 06:57 नवीन
आधुनिक वैद्यक शस्त्र विषयी आज पण एका कोपऱ्यात अविश्वास असतो. डब्लु टी अ‍ॅफ ? शास्त्र,आयुर्वेद, योग विद्या,मंत्र ची ताकत ह्या विषयी आज पण एका कोपऱ्यात अविश्वासच असतो असे म्हणायचे असेल
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 04/20/2021 - 06:57 नवीन
आधुनिक वैद्यक शस्त्र विषयी आज पण एका कोपऱ्यात अविश्वास असतो. डब्लु टी अ‍ॅफ ? शास्त्र,आयुर्वेद, योग विद्या,मंत्र ची ताकत ह्या विषयी आज पण एका कोपऱ्यात अविश्वासच असतो असे म्हणायचे असेल
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 04/20/2021 - 06:52 नवीन
आपले विधान नक्कीच विचार करण्यासारखे आहे .... अश्या विचारांमागे एक कारण असू शकेल ते म्हणजे ... दुसऱ्याचे चांगले ते घयावे ... उगाच अंधानुकरण करू नये .. म्हणजे --- सुटसुटीत म्हणून भारतीयांनी विजार घालायला सुरवात केली हे "चांगले घेणे" तर कारण नसताना ४०° मध्ये टाय घालावे हे अंधानुकरण पिझ्झा खाऊ लागणे यात वाईट काहीच नाही ..एक वेगळा पदार्थ म्हणून ते "चांगले घेणे " या सदरातच मोडते पण "पिझ्झा खाणे म्हणजे उच्चभ्रू आणि भाकरी पिठले म्हणे "डाऊन मार्केट " हि वृत्ती असणे हे चुकीचे / दांभिकतेच माहित नाही मी नीट मांडलाय कि नाही .. यात आपण निदर्शनास आणलेलया विरोधाभासाचे समर्थन करीत नाहीये तर एक त्या मागचा वेगळा अर्थ आणि कदाचित त्यामागचे विचार मांडतोय
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/20/2021 - 06:57 नवीन
In Rome, do as Romans do
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 04/20/2021 - 08:55 नवीन
याचबरोबर In the Rome, do the Roman =))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/20/2021 - 15:37 नवीन
+1
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 04/20/2021 - 18:07 नवीन
आम्ही तर "Be romantic while in Rome." असं शिकलो होतो कॉलेजला असताना! ;)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/21/2021 - 16:13 नवीन
In Rome, do as Romans do But if you are pope, behave as pope, even if you are in rome. हे तत्व मी आयुष्यभर पाळलं
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 04/20/2021 - 07:05 नवीन
सुटसुटीत म्हणून भारतीयांनी विजार घालायला सुरवात केली नाही. स्मार्ट म्हणुन केली. सुट्सूटित तर लुंगी अस्ते पण स्मार्ट म्हणुन पोरं घरात ट्रॅक पॅंट घालतात. ज्या दिवशी पिठलं खाणारे लोक स्मार्ट, यशस्वी, जगावर प्रभुत्व गाजवणारे, यशस्वी आंत्रप्रिन्योर, गो गेटर वगैरे वगैरे मानसिकता बनेल त्या दिवशी पिझ्झा डाउनमार्केट फुकाच वाटेल
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 04/20/2021 - 15:30 नवीन
ह्यात परकीय संस्कृतीचा कितपत प्रभाव आहे ? काही गोष्टी डाऊन मार्केट समजणे हे परकीय संस्कृतीचा शिवाय सुद्धा होत असतेच की. गावरान भाषा, हाणामारीचे बॉलिवुड सिनेमे, ईं गोष्टी काहींकडून डाऊन मार्केट समजल्या जातात ते काय परकीय संस्कृतीमुळे नसावे. आपल्याला आवडणारे जेवण, कला, साहित्य, कपडे इत्यादी श्रेष्ठ आणि बाकी कनिष्ठ हा भाव परकीय ऑर नो परकीय संस्कृती असतोच. स्वतःला उच्चभ्रू समजण्यासाठी काही तरी मार्ग सापडतच असतो. उदाहरणादाखल _ संदीप खरेला डाऊन मार्केट समजणारी कम्युनिटी आहे. ती काय संदीप खरे सोडा आणि रॉबर्ट ब्राऊन वाचा असं नाही म्हणत. संदीप खरे सोडा आणि अरुण कोलटकर वाचा म्हणते. मी सुद्धा नीट मांडले की नाही माहीत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 04/20/2021 - 16:11 नवीन
म्हनुन डाउन मार्केटसुध्दा नेमके ठरवता येणार नाही... घराणेदार शास्त्रिय संगितवाले उडत्या चालीची गाणी म्हननारी नेहा कक्कर डाउनमार्केट म्हणतील मग भलेही वर्षातील सर्व चार्टबस्टर तिने गायले आसोत... पुणेरी भाषा प्रमाण म्हणत तिला अपमार्केट ठरवणारे भेटतील तर कोणी त्या प्रमाणाला मराठीचा संस्कृतसोबतचा व्याभिचार ठरवेल... थोडक्यात काय तर मार्केट बदलत असते.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/21/2021 - 07:22 नवीन
प्लेन पँट घालणारे चुणीची पँट घालणार्‍यांना मागासलेले समजतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 04/21/2021 - 14:45 नवीन
शविकूं नाही कळला आपला मुद्दा
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/21/2021 - 07:18 नवीन
ती नसेल तर एकच भाषा बोलणारे लोक एकमेकांशी नीट संवाद साधू शकतात. विदर्भातला माणूस पुण्यात येऊन अजून वंडी आली नाही म्हणाला तर पुणेरी माणसाला तो गाडीबद्दल बोलतोय हे समजणार नाही. यासाठी प्रमाणभाषा गरजेची असते.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/21/2021 - 07:20 नवीन
ती नसेल तर राज्यसरकार शासकीय कागदपत्रे कोणत्या भाषेत काढणार? मालवणीत शासकीय अध्यादेश काढला तर किती मराठी लोकांना तो समजेल?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/21/2021 - 07:20 नवीन
ती नसेल तर राज्यसरकार शासकीय कागदपत्रे कोणत्या भाषेत काढणार? मालवणीत शासकीय अध्यादेश काढला तर किती मराठी लोकांना तो समजेल?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 07:48 नवीन
मालवणी,कोकणी,राजस्थानी,भोजपुरी,मैथिली,आणि अशा अनेक भाषा ह्या बोली भाषा आहेत त्यांची लिपी नाही त्या लिहल्या जातं नाहीत फक्त बोलल्या जातात तामिळी ही जुनी भाषा आहे असे म्हणतात हिंदी भाषा ही उर्दू भाषेचं पिल्लू आहे. मराठी भाषा हिंदी पेक्षा जुनी आहे. महारष्ट्र मध्ये पाहिले म्हणजे १०० वर्ष पूर्वी मोडी भाषा होती ती मराठीत वाचली जायची की काय हे माहीत नाही. मोडी जर मराठीत वाचली जात असेल तर देवनागरी लिपी महाराष्ट्रात कधी पासून वापरात आली ह्याचा शोध घेतला पाहिजे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/21/2021 - 13:36 नवीन
सध्याचा जो महाराष्ट्र आहे त्या भूभागावर कोणती भाषा बोलली जात होती ते कोणी सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/21/2021 - 13:45 नवीन
टोपे साहेब नाशिकमधे घडलेल्या दुर्घटनेबद्दल हिंदी वाहिन्यांना हिंदीत माहिती सांगत होते. दक्षिणेतल्या चार राज्यांचे मंत्री त्यांच्या राज्यात घडलेल्या अशा मोठ्या घटनांबद्दल हिंदी वाहिन्यांच्या सोयीसाठी हिंदीतून माहिती देतात का? देत नसतील तर महाराष्ट्राचे मंत्री हिंदी वाहिन्यांची आयती सोय का करुन देतात? आपल्याला हिंदीतून सहज बोलता येतं हे आपलं कौशल्य दाखवण्यासाठी ते हिंदीतून बोलतात का? या हिंदी वाहिन्यांना दक्षिण भारतीय मंत्री हिंदीतून बाईट देत नाहीत तेव्हा त्या वाहिन्या काय करतात? जे करतात तेच महाराष्ट्रात का करत नाहीत?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/21/2021 - 13:49 नवीन
हिंदी बोलण्याची खाज महाराष्ट्रातील बहुसंख्य नेत्यांना आहे. यात सर्वात प्रथम क्रमांकावर आहेत फडणवीस. आपले प्रत्येक वाक्य ते मराठी पाठोपाठ हिंदीतही सांगतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 14:28 नवीन
विदर्भात, विशेषतः वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया ह्या भागांत, हिंदी सर्रास बोलली जाते... चलो, आते क्या ठेले पे जाएंगे बहुत बढिया क्या बात है बिलकूल सही घरी मराठी आणि बाहेर जास्त करून हिंदी, हे वैदर्भिय लोकांना नविन नाही...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/21/2021 - 15:13 नवीन
विदर्भ म्हणजे महाराष्ट्र नाही. राज्याचा मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेता या पदावर असताना हिंदीत का बोलतात? वर मखलाशी म्हणजे हिंदी वाहिन्यांसाठी हिंदीत बोलतो असे निर्लज्ज समर्थनही करतात. विदर्भात माडिया किंवा तत्सम भाषासुद्धा बोलली जाते. मग त्या भाषेत हे का बोलत नाहीत? हिंदीभाषिक राज्याचे मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेता मराठी वाहिन्यांसाठी मराठीत बोलतात का? फक्त हिंदी का? इंग्लिश, तामिळ, कन्नड, गुजराती अशा वाहिन्यांसाठी त्या त्या भाषेत का बोलत नाहीत? मुळात फडणवीस व इतर नेते प्रत्येक वाक्य हिंदीत सांगत असतील, तर हिंदी वाहिन्या महाराष्ट्रात एकही मराठी कर्मचारी नोकरीत न घेता सर्व कर्मचारी थेट उत्तर प्रदेश, बिहार वगैरे राज्यातून भरतील कारण कर्मचाऱ्यांना मराठी येण्याची गरजच नाही. उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह वगैरे करताना मराठीत बोलतात. हिंदी वाहिन्या त्याचे थेट प्रक्षेपण करताना प्रत्येक वाक्याचे हिंदी भाषांतर खालील पट्टीत दिसत राहते. म्हणजे हिंदी वाहिन्यांना हिंदीत सांगण्याची अजिबात गरज नाही. ठाकरेंच्या जागी फडणवीस असते तर फेसबुक लाईव्ह आधी मराठीत व नंतर ते जसेच्या तसे हिंदीत सांगितले असते. कोणत्या राज्यात सर्व निवेदने स्थानिक भाषेच्या बरोबरीने हिंदीत सुद्धा सांगितली जातात?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 15:22 नवीन
कारण, तुमच्या आणि माझ्या मैत्रीत, हा वादाचा मुद्दा आहे आणि तो मी तरी टाळलेलाच बरा .... जून किंवा जुलै महिन्यात, पुण्याला येत आहे... मस्त पैकी बियर पिऊ आणि इतर चर्चा करू...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/21/2021 - 16:03 नवीन
चालेल. तुम्ही बिअर प्या. मी कॉफी घेईन.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 17:14 नवीन
पेय महत्वाचे नाही, गप्पा महत्वाच्या
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन गुरुवार, 04/22/2021 - 05:54 नवीन
बाद घालू इच्छित नाही मंजी काय हॉं? १. गाडीभर पुरावे आहेत असे कोण म्हणाले ? २. सकाळी सकाळी शपथविधी कोण उरकला ? ३. कोणाच्या भाच्याला वेळेपूर्वी लस मिळाली ? ह्याची उत्तरे हवी आहेत, नाहीतर गोल गोल राणी.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 04/23/2021 - 14:59 नवीन
खरेच कट्टा होणार असेल तर मलाही यायला आवडेल मिपाकरांना भेटणे म्हनजे देव भेटण्याचा अनुभव आस्तो आसे म्हणतात. बसुच एकदा कट्टा करायला. मला मात्र बडवायजर लागते, हार्ड असेल तर मजाच और.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 16:17 नवीन
तुमच्या मता शी सहमत आहे.कोणताच मुख्यमंत्री स्थानिक भाषे व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत स्टेटमेंट देत नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 04/22/2021 - 08:00 नवीन
हिंदी भाषिकांची आपण अरेरावी सहन करतो म्हणुन ते अरेरावी करत रहातात. एक जुना प्रसंग आठवतोय, TV वर पाहीलेला. आपले एक मुख्यमंत्री पत्रकारांना नुकत्याच घडलेल्या घटने बद्दल माहीती देते होते. सर्व पत्रकार त्यांच्या भवती कोंडाळे करुन प्रश्न विचारत होते. त्यात एका हिंदी चॅनल ची पत्रकार सतत "हिंदी मे बोलिए , हिंदी मे बोलिए " असे म्हणत होती. ते बघुन अतिशय चीड येत होती. पण मुख्यमंत्र्यांनी न चिडता तिला , "बताता हुँ" म्हणत हिंदीतुन उत्तर दिले. विनंती समजु शकतो पण तिच्या बोलण्यात सरळ सरळ उध्दटपणा होता.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/22/2021 - 08:25 नवीन
आपलेच मुख्यमंत्री एक नंबर चे भित्रे आणि आणि दिल्ली ची गुलामी करणारे असतात. हिंदी ही राष्ट भाषा आहे असा ह्यांचा गोड गैर समज असतो. राज ठाकरे ना मुख्यमंत्री करा एका पण हिंदी न्यूज चॅनल चे रिपोर्टर त्यांना हिंदीत बोला असे म्हणणार नाहीत .स्वतःच द्विभाषिक व्यक्ती बरोबर घेवून येतील. मान सन्मान पाहिजे असेल तर कणा ताठ असावा लागतो. छ्त्रपती ना औरंगजेब बादशहा नी चुकीच्या रांगेत उभे करून त्यांचा अपमान केला तेव्हा त्यांनी भर दरबारात बादशाह ला सुनावले होते. शत्रू च्या ताब्यात असून सुद्धा. ही आपली परंपरा आहे. पण मुख्यमंत्री मंडळी खुर्ची साठी किती ही झुकतील.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/21/2021 - 13:53 नवीन
किती जणांना पटते? मराठी भाषेतून अरबी, फार्सी, पोर्तुगीज शब्दांची हकालपट्टी करणे हे जुलमी परकीयांची गुलामगिरी झिडकारुन स्वातंत्र्य मिळवणे आहे का? वैयक्तिक मला तरी ती पटते. आता जरी माझ्या लेखनात जुलमी परकीयांनी लादलेले काही शब्द असले तरी ते माझे मराठी लेखन सर्वांना सहज समजावे म्हणून वापरले आहेत. आपण सर्वांनीच अरबी, फार्सी, पोर्तुगीज शब्द मराठीतून हाकलून लावल्यास मराठी स्वतंत्र होईल. त्यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत एकट्यादुकट्याने हे साध्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 14:30 नवीन
मान्य आहे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/22/2021 - 03:37 नवीन
मिपावर कुणीतरी मराठीत प्रचलित झालेले ऊर्दू -अरबी -फारसी -पोर्तुगीज- इंग्रजी वगैरे शब्द आणि त्यांना सावरकरांनी वा अन्य कुणी सुचवलेले संस्कृतोद्भव /मराठी शब्द यांची एक यादी द्यावी त्यात वाचकांनी भर घालावी असे सुचवतो. असा एकादा धागा यापूर्वी मिपावर आलेला असल्यास कृपया त्याचा दुवा द्यावा.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 04/23/2021 - 14:27 नवीन
http://www.misalpav.com/node/48698
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा