Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अध्यात्माची भूमिती

अ — अनन्त्_यात्री, Wed, 04/14/2021 - 13:34
अनादिच्या अलिकडचा "अ" हा नि:संग असा एक बिंदू घेतला. मग अनंताला स्पर्श करू धजणारा, ज्ञानगम्य असा, "ज्ञ" हा दुसरा बिंदू घेतला. "अ" ला "ज्ञ"शी जोडणारी "अज्ञ" ही रेषा आखली. ह्या रेषेवर माझ्याच जवळपास कायम घोटाळणारा "हम्" हा बिंदू निवडला. "अज्ञ" या रेषेशी लंबरूप, फटकून असणारे, "सोs" हे प्रतल असे निवडले की ते "अज्ञ" रेषेला "हम्" बिंदूत छेदेल. "सोs" प्रतलावरील १,२,३,.... ∞ या बिंदूंपासून "हम्" बिंदूकडे जाणार्‍या रेषाखंडांना अनुक्रमे "सोsहम् १", "सोsहम्२" "सोsहम् ३"....... ....."सोsहम् ∞" अशी नावे दिली. मग या लंबरेषाखंडांची नावे (१,२,३,....∞ हे प्रत्यय वगळून) अविरत उच्चारत राहिलो. अध्यात्माची भूमिती (की भूमितीचे अध्यात्म?) मग रोमारोमात भिनत असताना अचानक लक्षात आलं- "अज्ञ" रेषेवरच्या "अहम्" या रेषाखंडाची लांबी हळूहळू शून्यवत् होतेय.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5109 views

💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन Tue, 04/27/2021 - 11:54 नवीन
वाह! सुंदर रचना!
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 04/27/2021 - 14:36 नवीन
झक्कास! - (अज्ञ) सोकाजी
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 04/27/2021 - 18:38 नवीन
असे आमचे बाबा महाराज कल्याणकरांचे मत आहे...
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 04/30/2021 - 11:48 नवीन
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 04/30/2021 - 12:38 नवीन
अध्यात्ममिती आवडली
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 04/30/2021 - 12:52 नवीन
एकदम मस्त आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 04/30/2021 - 13:59 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा