Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आज काय घडले... फाल्गुन व. १३ चितोडचे सौभाग्य गेलें!

A
Ashutosh badave
Sat, 04/10/2021 - 07:30
💬 3 प्रतिसाद
आज काय घडले... फाल्गुन व. १३ चितोडचे सौभाग्य गेलें! शके १४९० च्या फाल्गुन वद्य १३ रोजी सम्राट अकबर बादशहा याने रजपुतांचा प्रचंड पराभव करून चितोडगड आपल्या ताब्यांत आणला. त्या वेळी चित्तोडच्या राज्यावर उदयसिंह राणा होता. अकबर बादशहाने वयांत आल्यावर साम्राज्य-विस्तारास सुरुवात केली होती. आपल्या बापास संकटकाळी ज्यांनी मदत केली नाही त्यांना अकबराने वठणीवर आणले. अनेक रजपूत राजे त्याचे मांडलिक बनले. पण चितोडगडावर जोपर्यंत केशरी आदित्यध्वज फडकत आहे तोपर्यंत अकबराला समाधान नव्हते. मेवाडचा राणा उदयसिंह अकबराचे स्वामित्व कबूल करीत नव्हता. तेव्हां अकबराने शके १४८९ मध्ये तीस हजार सेना व मोठा तोफरखाना यांच्यासह चितोडवर स्वारी केली. गडाचे दरवाजे फोडण्यास शेकडों हत्ती आणले होते. अकबराच्या सैन्याचा विस्तार पांच कोसपर्यंत होता. रजपुतांचे सैन्य आठ हजारांपर्यंत असून जयमल्ल हा कुशल सेनापति होता. अकबर आणि जयमल्ल यांची घनघोर लढाई झाली. त्या वेळी रजपूत स्त्रियांनीहि मोठा पराक्रम केला. चितोड किल्ल्यावरील सूर्यदरवाजावर सोळा वर्षांचा कोवळा पोर वीर पहा अभिमन्यूच्या शौर्याने लढला. हातांत तरवार घेऊन त्याची आई त्यास धीर देत होती "बाळा, चितोडच्या बचावासाठी आपला निर्वश झाला तरी चालेल; पण माघार मात्र नको." परंतु शत्रूचे सामर्थ्य अफाट होते. सहा महिनेपर्यंत रजपुतांनी तग धरला. शेवटी दाणागोटा व मनुष्यबळ संपले. पराजय पावण्यापेक्षा रणांगणावर प्राणार्पण करण्याचा निर्धार रजपूत वीरांनी केला शीलरक्षणार्थ शेकडों स्त्रियांचा जोहार झाल्यावर केशरी पोषाख करून सर्व वीर मोठ्य गर्जनेंत मोंगल सैन्यावर तुटून पडले. पाय तुटला असतांहि जयमल्ल लढत होता. वीर पठ्ठा व पराक्रमी जयमल्ल यांचे शौर्य पाहून अकबर विस्मित झाला. जयमल्लाला तो 'संग्राम' म्हणे आणि ज्या तोफेनें तो मारला गेला तिचे नांवहि पातशहाने 'संग्राम तोफ' असें ठेविलें. शेवटी रजपुतांचा मोड झाला. तीस हजार लोकांची अकबराने कत्तल केली. २५ फेब्रुवारी १५६८ चितोड किल्ला

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1848 views

💬 प्रतिसाद (3)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/10/2021 - 08:40 नवीन
आभार. पुढे काय काय घडले त्या उत्सुकतेत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
A
Ashutosh badave Tue, 04/13/2021 - 07:05 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 04/26/2021 - 16:17 नवीन
थोडक्यात चांगली माहिती देत आहात. लेखांना अगदी कमी प्रतिसाद मिळत असले तरी हतोत्साहित न होता आपले कार्य करत रहावे. लगे रहो. उपयुक्त आणि रोचक लेखमाला आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 6 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा