Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आय पी एल - २०२१

श
श्रीगुरुजी
Fri, 04/09/2021 - 11:43
🗣 66 प्रतिसाद
आजपासून आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होतेय. नेहमीचेच ८ संघ आहेत. यावेळी दिल्ली, चेन्नई, पंजाब व राजस्थान या संघाचे कर्णधार नियमित यष्टीरक्षक आहेत. संजू सॅमसन बहुधा प्रथमच नेतृत्व करतोय. नेहमीप्रमाणे मुंबईच संभाव्य विजेता आहे. कोहली कितीही यशस्वी फलंदाज असला तरी या स्पर्धेत त्याच्या संघाला आजतागायत विजेतेपद मिळविता आले नाही. सर्वात पहिल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर राजस्थानला एकदा सुद्धा वरील ४ संघात स्थान मिळविता आले नाही. बहुसंख्य वयस्कर खेळाडूंमुळे चेन्नई संघ हा भाऊसाहेबांचा संघ म्हणून ओळखला जातो. आता त्यांनी कसोटीकुशल पुजाराला संघात घेतलंय. धोनीची ही बहुधा शेवटची स्पर्धा असावी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26469 views

🗣 चर्चा (66)
V
Vichar Manus Fri, 04/09/2021 - 11:47 नवीन
माझा पाठींबा नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स ला, दुसऱ्या नंबरवर दिल्ली. CSK मला अजिबात आवडत नाही, CSK चे social मीडिया वरचे समर्थक खूप इगनोरंट आणि arrogant वाटतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/10/2021 - 11:56 नवीन
माझाही पाठींबा नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्सला. काल हरले, नो प्रॉब्लम. अंतिम सामना जिंकणार मुंबईच. -दिलीप बिरुटे (मुंबईकर)
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sat, 04/10/2021 - 12:04 नवीन
मुंबईचे पण तसेच असतात
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Fri, 04/09/2021 - 11:57 नवीन
मुंबई दिल्ली बंगलोर आणि हैदराबाद हे टॉप ४ मध्ये यावेत हे अपेक्षा ....
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 04/09/2021 - 12:12 नवीन
विथ मुंबई इंडियन्स :) KKR ची टीम कशी आहे?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/09/2021 - 12:55 नवीन
कभी खुषी, कभी गम...
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 04/09/2021 - 12:44 नवीन
सपोर्ट अर्थातच मुंबई इंडियन्स ला! मुंबई कडून ईशान किशन आणि हार्दिक पंड्याची कामगिरी बघण्यास उत्सुक. रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणे मुळे दिल्ली कॅपिटल्स पण hot favorite!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 04/09/2021 - 14:53 नवीन
या वेळेस मी support करेल हैद्राबाद संघाला.. Delhi आणि पंजाब हे संघ सुद्धा कमाल करतील.. मुंबई बद्दल काय बोलावे ती भारीच team आहे.. अय्यर टीम मध्ये नसल्याने delhi ला फटका बसला आहे,, रिषभ मला अजिबात कॅप्टन म्हणुन आवडला नाही.. स्टीव्ह स्मिथ सारखा उत्कृष्ट अनुभवी player असताना अय्यर नंतर त्याच्याकडे नेतृत्व हवे होते.. तरीही यावेळेस मी SRH च्या बाजूने टीम म्हणुन मला सर्वात उत्तम टीम तीच वाटत आहे.. -- यावेळेस आमच्या युरोप सेक्टर मध्ये high level ला competition होते आहे.. मी त्यात भाग घेतलाय..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 04/09/2021 - 14:59 नवीन
Prediction MI VS RCB = RCB माझी team आज RCB आहे. मुंबई जरी उत्तम असली तरी पहिल्याच match ला मी मला जे वाटतेय त्यावरच मत देतोय.. चुकले तर चुकले..(चुकायची शक्यता जास्त आहे) चहल आणि सुंदर आज कमाल करतील अशी अपेक्षा.. DREAM ११ टीम मज्जा म्हणुन share karel.. त्यात काही जास्त जिंकत नाहीच मी
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/09/2021 - 15:21 नवीन
मुंबई उशिरा भरात येणारा संघ आहे. सुरूवातीला बरेच सामने मुंबई हरतात, पण नंतर भरात येतात. त्यामुळे आज बंगळूर जिंकल्यास आश्चर्य नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 04/09/2021 - 16:01 नवीन
Dream ११ https://drive.google.com/file/d/1VjTobisa0H0Q6c2U3Zo3SlZ-3uGTXbjz/view?usp=drivesdk
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 04/09/2021 - 15:04 नवीन
खरं तर आयपीएल अजिबात आवडत नाही. पहिले वर्ष सोडले तर नंतर कधीच बघितली नाही. चॅनल बदलताना एखाद-दोन मिनिट थांबुन बघितले असेल तेवढेच काय ते. पण कोरोनामुळे सगळे मिळमिळीत झाल्यामुळे मागील वर्षी भरपुर सामने पाहिले. यावर्षी पण बघणार आहे. धाग्यावर अधुन मधुन हजेरी लावेनच. हैदराबाद अणि मुंबईला माझा पाठींबा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/10/2021 - 06:59 नवीन
द ग्रेट सर्कस हायलाईट बघतो, पुर्ण मॅच बघायची गरज वाटत नाही...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/09/2021 - 19:11 नवीन
बंगळूरला विजयासाठी ६ षटकांत ५७ हव्या. मुंबई बहुतेक हरणार.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 04/10/2021 - 06:37 नवीन
Csk vs dd दिल्ली जिंकेल आज असे वाटते (W१/L०)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 04/10/2021 - 06:56 नवीन
Just read rabada and nortje are not available.. त्यांनी गेल्या ipl ला दिल्ली ला final ला घेऊन जाण्यात महत्वाचा वाटा उचलला होता.. अवघड आहे, still आज दिल्लीच माझ्याकडून.. पृथ्वी शॉ, हा खरेतर खुप चांगले दिमाखदार shot खेळणारा खेळाडू.. पण त्याचे वर्तन, आणि एकंदरीत careless पणा मुळे अवघड वाटते त्याचे.. Still तो यावेळेस तरी positive गोष्टी घेऊन मैदानात येईल अशी आशा करतो..
  • Log in or register to post comments
म
मोगरा (verified= न पडताळणी केलेला) Sat, 04/10/2021 - 12:03 नवीन
काल आमची मुंबई हारली., आणि आज माही जिंकला पाहिजे. नाही तर पहिला धक्का माहेरची टीम हारली नंतर दूसरा धक्का माझा हिरो पण हारला असा नको.. (मी क्रिकेट जास्त बघत नाही., फक्त मध्ये मध्ये मुलीला आणि नवऱ्याला बिस्कीट - चहा पुरवते :-) )
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/10/2021 - 16:03 नवीन
फक्त मध्ये मध्ये मुलीला आणि नवऱ्याला बिस्कीट - चहा पुरवते... क्रिकेटची मॅच बघतांना, चहा आणि बिस्किट, खाणारा नवरा असेल तर, खरोखरच नशीबवान आहात...(बियर, तेंडूलकर आणि चिकन तंगडी कबाब आणि नंतर कोळंबीचा रस्सा आणि भाकरी, हे सर्वोत्तम काॅम्बिनेशन... आता तेंडूलकर खेळत नसल्याने, उरल्या फक्त आठवणी..) आणि नवर्याला, क्रिकेटची मॅच बघायला देणारी बायको, हे परमभाग्य...(आमच्या बायकोचे आणि क्रिकेटचे वाकडे आहे...) तुमचा संसार, असाच सुखाचा असू दे...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 04/10/2021 - 20:10 नवीन
आणि delhi जिंकली, आणि पृथ्वी शॉ चे shots म्हंटल्या प्रमाणे भारी होते.. (W2/L0) And dream ११ la पण भारी team होती,, ५०० rs won. रैना लगेच खेळेल वाटलं नव्हतं.. Image removed.

  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/10/2021 - 10:56 नवीन
क्रिकेट सारख्या फालतू खेळाला ईतकं महत्व मिळतं ह्यांचं नेहमीच आश्चर्य वाटत आलंय.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 04/10/2021 - 11:50 नवीन
काय हे अमरेंद्र बाहुबली साहेब? तुमच्या आय पी एलविषयक युक्तिवादात क्रिकेटला आणण्याची काही गरज नाही. तुम्ही सुशिक्षित, सभ्य, शहाणे असाल तर क्रिकेटचे अवमान करणारे हे विधान मागे घेऊन क्रिकेट वेड्यांची क्षमा मागाल अशी नम्र अपेक्षा आहे. संपादक मंडळ, अमरेंद्र बाहुबलींचा हा वरील प्रतिसाद संपादित करून त्यातील आक्षेपार्ह भाग काढून टाकावा ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 04/10/2021 - 12:03 नवीन
=))
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 04/10/2021 - 15:58 नवीन
सही पकडे हैं..
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 04/10/2021 - 16:02 नवीन
रहाणे ऐवजी पंत कर्णधार का केला असेल? नुकतंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली च्या अनुपस्थिती मध्ये त्याने चांगलं अन यशस्वी नेतृत्व केलं होतं. की T 20मध्ये पंत हा रहाणे पेक्षा उजवा आहे म्हणून? मला तरीही रहाणे कडून जास्त अपेक्षा आहेत. बाकीी पृथ्वी शॉ चार वर्षांपूर्वी " नेक्स्ट तेंडुलकर" वाटला होता. वाया गेेलं पोरगं.
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Sat, 04/10/2021 - 19:26 नवीन
रहाणे चे playing इलेव्हन मध्ये स्थान निश्चित नाही, त्याला कसे कर्णधार करणार
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/10/2021 - 18:34 नवीन
चेन्नई १८८/६ (२०) दिल्ली ७०/० (७)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 04/11/2021 - 06:38 नवीन
आज srh vs kkr नक्कीच हैद्राबाद जिंकावी असेच वाटते आणि आज माझी team हैद्राबाद आहे.. Srh vs kkr = srh. --- शाकिब हसन ला narine च्या ऐवजी खेळवले पाहिजे असे मला मनापासुन वाटते.. Gill हा एकच भरोसा असलेला batsman वाटतोय kkr कडे. Morgan आहे, पण बऱ्याचदा hitting साठी dk आणि रस्सेल साठी त्याचा बळी दिला जातोच.. हेंद्राबाद वॉर्नर, बेस्ट्रो, रॉय, केन, होल्डर , रशीद, नबी या पैकी कुठलेही चार जण घेऊन खेळू शकतो सगळे भारीच.. तरीही मला आज नटराजन ची bowling पाहण्यात मज्जा आहे.. हरभजन किंवा वरून चक्रवर्ती यापैकी एक आणि कृष्णा हे सुद्धा चांगली bowling करतील अशी आशा. तरीही शाकिब आणि नटराजन या दोघांना सामान्यात पहायला चांगले वाटेल.. बघू या..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 04/11/2021 - 20:11 नवीन
हरलो आज W२/L१
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 04:50 नवीन
कभी खुषी कभी गम...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/12/2021 - 16:06 नवीन
आज पंजाब
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/12/2021 - 20:46 नवीन
पंजाब जींकला पण, Samson ने एक run काढायला हवा होता ५th बॉल वर. Dream ११ ५०० rs won :-) https://drive.google.com/file/d/1VuGXw7j7tkJC0OA7UO1EtrHnAFjvH61t/view?usp=drivesdk ---- W३/L१
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/13/2021 - 09:44 नवीन
पाचव्या चेंडूवर १ धाव नक्की मिळत होती. दुसरी धाव मिळणे खूप अवघड होते. दुसरी धाव घेताना संजू धावबाद झाला असता तर शेवटच्या चेंडूसाठी नवीन फलंदाज आला असता. समजा एकच धाव झाली असती तर मॉरीसने शेवटचा चेंडू खेळला असता व तो आधी ४ चेंडूत फक्त २ धावा काढून चाचपडत होता. संजू पूर्ण सेट असल्याने आपणच शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर राहण्याचा त्याचा निर्णय योग्य होता. त्याचा षटकार फक्त ५-६ यार्डांंने हुकला. असनोडकर, वल्थाटी यांच्याप्रमाणे तेवातिया फक्त एक स्पर्धा गाजविणारा ठरणार बहुतेक.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/13/2021 - 10:29 नवीन
>>>> शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर राहण्याचा त्याचा निर्णय योग्य होता. सहमत. आणि फटका मारल्यावर चेंडू थेट बाहेर जाईल असे क्षणभर वाटून गेले. नॉनस्ट्राइकवरचा तो वेडा, सिंगल रन घेतल्यावर असे तोंड करीत होता जसे काही हा मॅच जिंकून देणार होता. मजा आली. चलो, आज मुंबई जितना है. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 04/13/2021 - 10:45 नवीन
तेवटिया बकवास player वाटतो मला.. Morris हा चांगला striker आहे.. तो काही १० नंबरचा फलंदाज नव्हता. Six पेक्षा चौकार मारणे easy जाते आणि शेवटी ३ रून निघाले तरी सामना टाय होतो.. त्यामुळे एक run काढली पाहिजे होती.. असो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 04/12/2021 - 20:24 नवीन
आजचा सामना थरारक होता.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 04/13/2021 - 10:46 नवीन
आज मी मुंबई बरोबर...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 04/13/2021 - 20:01 नवीन
W४/L१
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/14/2021 - 16:06 नवीन
आज srh may win
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/14/2021 - 20:37 नवीन
हरले आज srh.. W४/L२ विजय शंकर ला बदला राव आता.. आणि kane willamson सारख्या टॉप batsman ला आणा मैदानात.. Middle order महत्वाची आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/15/2021 - 06:23 नवीन
साहाला पण बसवा. बेअरस्टो यष्टीरक्षण करेल.
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Wed, 04/14/2021 - 16:56 नवीन
ते सोडा सट्टा लावणार का , इथेच खोटा खोटा
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/14/2021 - 19:55 नवीन
कालचीच पुनरावृत्ती आज. ४ षटकांत फक्त ३५ धावा हव्या, बेअरस्टो व सेट झालेला मनीष पांडे फलंदाजी करताहेत आणि फक्त २ फलंदाज बाद, अशा अत्यंत भक्कम स्थितीतून हैद्राबादने विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/18/2021 - 04:41 नवीन
सनरायझर्स काल सलग तिसरा सामना हरले. या संघात तीनच फलंदाज आहेत (वॉर्नर, बेअरस्टो आणि मनीष पांडे). पांडे पूर्ण अपयशी असल्याने यांचा पहिला फलंदाज बाद झाला की घसरण सुरू होते. बाकावर जेसन रॉय, विल्यमपुत्र काणे, जेसन होल्डर, महंमद नबी असे चांगले फलंदाज/अष्टपैलू आहेत, परंतु ते परदेशी असल्याने यातील फार तर एकच संघात येऊ शकतो (उर्वरीत तिघे - वॉर्नर, बेअरस्टो व रशीद खान) संघात हवेच. एकंदरीत या संघात चांगले भारतीय फलंदाज नसल्याने संघाचे भवितव्य अवघड आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 04/18/2021 - 05:01 नवीन
हो.. मधली फळी विस्कळीत आहे, kane is must.. Indian bowler चांगले आहेत त्यांच्याकडे. म्हणुन kane घेतल्या शिवाय त्यांना पर्याय नाही.. हि टीम मला पहिल्या चार मध्ये नव्हे २ मध्ये जाईल वाटलेली.. पण अवघड दिसतेय.. Punjab चांगली वाटतेय आता
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/18/2021 - 06:25 नवीन
सनरायझर्सने मुजीब ऐवजी जेसन होल्डर व भुवनेश्वर ऐवजी नटराजन हे बदल करावे. अभिषेक शर्माच्या जागी केदार जाधव, चहाबाज नदीम किंवा प्रियम गर्ग घेता येईल. मधली फळी फारशी चांगली नसल्याने मनीष पांडेला काढतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/25/2021 - 05:26 नवीन
काल कलकत्त्याला राजस्थानने अगदी सहज पराभूत केले. कलकत्त्याचा कर्णधार मॉर्गन आतापर्यंत पूर्ण अपयशी आहे. गोलंदाजी चांगली असूनही फलंदाज अपयशी ठरताहेत. त्यांनी रसेलला चौथ्या क्रमांकावर आणले पाहिजे. स्टोक्स, आर्चर असे महत्त्वाचे खेळाडू संघातून बाहेर गेल्याचा फटका राजस्थानला बसताना दिसतोय. बटलर, व्होरा व जैस्वाल हे सलामीचे फलंदाज बहुतांशी अपयशी झालेत. संजू सॅमसनने ५ पैकी २ सामन्यात चांगली फलंदाजी केली. उर्वरीत सामन्यात त्याने विकेट फेकली. मॉरीस सुद्धा दोनच सामने चांगले खेळला. मुंबई ५ पैकी ३ सामने हरलेत व या तीनही सामन्यात त्यांनी प्रथम फलंदाजी केली होती. अष्टपैलू पोलार्ड व पंड्या बंधू बहुतांशी अपयशी ठरलेत. यावर्षी अजूनपर्यंत चेन्नई, बंगळूर व दिल्ली हे तीनच संघ भरात आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/25/2021 - 05:32 नवीन
आतापर्यंत मुंबईत झालेले बहुतांशी सामने मोठ्या धावसंख्येचे झालेत, तर चेन्नईतील बहुतांश सामने कमी धावसंख्येचे झालेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/25/2021 - 13:07 नवीन
IPL२०२१मधून बाहेर पडल्यानंतर बेन स्टोक्सने भारतीय खेळपट्ट्यांना म्हटले ‘कचरा’! https://www.loksatta.com/krida-news/ben-stokes-calls-indian-pitches-trash-after-ipl-2021-exit-adn-96-2453516/ पैसे मिळेपर्य॔त काही बोलला नाही .... इतके असेल तर, खेळायला येऊ नये...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/03/2021 - 12:06 नवीन
चुकीचं काहीच बोलला नाही, चेन्नईची खेळपट्टी कचराच आहे. स्पोर्टिंग हवी, तशी देखील नाहीच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/03/2021 - 12:16 नवीन
पैसा हजम, बात खतम... (चुकीचे बोलला नाही, ह्याला सहमती आहे...)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा