Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

फाल्गुन शु. १३ शिवरायांची वाढती सत्ता ! शके १५१६ च्या फाल्गुन शु. १३ रोजी मराठ्यांच्या सैन्याने दंडाराजपुरीस वेढा घातला.

A
Ashutosh badave
Fri, 04/09/2021 - 07:49
💬 1 प्रतिसाद
आज काय घडले... फाल्गुन शु. १३ शिवरायांची वाढती सत्ता ! शके १५१६ च्या फाल्गुन शु. १३ रोजी मराठ्यांच्या सैन्याने दंडाराजपुरीस वेढा घातला. शिवरायांनी स्वराज्याचा उपक्रम केला, त्याचा जाच बऱ्याच लोकांना झाला. औरंगजेब तर जळफळून गेला. पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीझ लोक व्यापार करीत, त्यांनाहि शिवाजी राजांच्या वाढत्या प्रतापापासून त्रासच होऊ लागला. पाश्चात्य.लोक ज्या शस्त्रविद्येत निपुण होते ती विद्या हस्तगत करण्याची योजना शिवाजी राजांची होती. पोर्तुगीझ, इंग्रज, वगैरे व्यापारी शिवाजी राजांच्या शत्रूला दारूगोळा, हत्यारे,.वगैरे साहित्य पुरवून मदत देत असत. याशिवाय लूट, जाळपोळ, इत्यादि प्रकार होऊन धार्मिक जुलूमहि फार होत असे. यामुळे त्यांना धाकांत ठेवणे हे शिवाजी राजांचे कर्तव्यच होऊन बसले होते. याच भागांत राहणारा पीतांबर शेणवी याचा उपयोग करून घेऊन शिवाजी राजांनी पोर्तुगीझांची विद्या आत्मसात् केली. पश्चिम किनाऱ्यावर वावरणाऱ्या इंग्रज, सिद्दी व पोर्तुगीझ यांना धाकांत ठेवून.आपला विजय कायम राखण्यासाठी शिवाजी राजांनी कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, इत्यादि नवीन दर्यावर्दी ठाणी निर्माण केली. सन १६७४ च्या ऑगस्ट महिन्यांत गोव्याच्या हद्दीला लागून असलेला विजापूरचा फोंडा घेण्यासाठी शिवाजी राजांनी अण्णाजी दत्तो यास फौजेसह पाठविले. परंतु त्याचे फारसे चालले नाही. तेव्हां स्वतः शिवाजी राजे राजापुरास येऊन दाखल झाले. त्यांनी फोंड्यास वेढा दिला. किल्ल्यावरील विजापूरचा आधिकारी महंमुदखान जीव बचावण्यासाठी पळून गेला! त्यानंतर अंकोला, शिवेश्वर, काद्रा, वगैरे ठाणीहि काबीज झाली. पुढे कारवार, सदाशिवगड, सोंधे हे प्रदेशहि हस्तगत झाले. त्यांवर चौथाईचा हक्क सुरू होऊन धर्माजी नागनाथ नांवाचा अधिकारी नेमून सर्व व्यवस्था शिवाजी राजांनी त्याकडे सोपविली. येणेप्रमाणे मराठ्यांचा दरारा सर्वत्र वाढल्यामुळे पोर्तुगीझांना चांगलीच दहशत बसली. शिवाजी राजांचा सर्वत्र दरारा निर्माण होऊन अनाथांच्या रक्षणास कोणी वाली आहे, असे सिद्ध झाले. २७ फेब्रुवारी १६७५shivaji maharaj

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1204 views

💬 प्रतिसाद (1)
स
स्वलिखित Fri, 04/09/2021 - 10:28 नवीन
हे कायप्पा वरती स्टेटस ला असतंय रोज बऱ्याच जणांच्या , इथे धागा काढून डकवायची गरज आहे का ,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा