Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आज काय घडले ... फाल्गुन शु. १२ दांडी-यात्रेचा प्रारंभ! शके १८५१ च्या फाल्गुन शु. १२ रोजी महात्मा गांधींच्या प्रसिद्ध दांडीयात्रेला प्रारंभ झाला.

A
Ashutosh badave
Fri, 04/09/2021 - 07:46
💬 2 प्रतिसाद
gandhi भारताच्या विस्तृत किनाऱ्यावर अपरंपार मीठ तयार होत असूनहि या रोज लागणाऱ्या वस्तूवर सरकारला कर द्यावा लागत असे. त्याविरुद्ध गाधींजींनी लढा पुकारला. सरकार दाद देत नाहीसे पाहून सत्याग्रह करण्याचे त्यांनी ठरविले. गुजराथमधील दांडी हे क्षेत्र निवडण्यात आले. फाल्गुन शु. १२ रोजी सकाळी साडेसहा वाजतां या अभूतपूर्व यात्रेस प्रारंभ झाला. त्यांच्या कपाळावर कुंकुमतिलक शोभत होता. हातांत आधारासाठी एक काठी होती. अंगावर दोनच खादीची वस्त्रे आणि कमरेला घड्याळ ! तरिही एक वेगळे तेज गांधीजींच्या मुखावर खेळत होते.” सुवासिनींनी पंचारती घेऊन ओवाळल्यानंतर यात्रेतील पहिले पाऊल पडले. या तुकडींत एकूण बहात्तर सत्याग्रही वीर होते. वाटेने प्रत्येक खेडेगांवांत या महात्म्याचे अपूर्व स्वागत झाले. सुरत, नडियाद, आदि शहरांत हजारों रुपयांच्या राशी गांधीजींच्या पायावर अर्पण करण्यांत आल्या. मला पैसा नको. खादी, दारूबंदी व ऐक्य या कार्यावर.शक्ति खर्च करा" असा उपदेश ते देत असत. “मलयगिरीवरील शीतल, सुगंधी व संजीवक अशा वाऱ्याप्रमाणे गांधीजी आपल्या सेनेसह या गांवाहून, त्या गांवास चालले. खेडेगांवांतील गरीब व अडाणी पण साध्याभोळ्या व प्रेमळ शेतकऱ्यांनी त्यांच्या रस्त्यावर पाणी शिंपून व लतापल्लवांची तोरणे उभारून व कोठे कोठे वाजंत्री वाजवून त्यांचे उत्साहाने स्वागत केले." सत्यासाठी, न्यायासाठी गांधींचा हा लढा होता. “राज्यकर्त्यांचा नाश करणे हा आमचा हेतु नव्हे, पण राज्यपद्धतीचा मात्र उच्छेद झाला पाहिजे.” " आतां मला स्पष्ट असे वाटते की, इंग्रजी राज्याचा नाश करण्याप्ताठी माझा जन्म झाला आहे...मला घाण्यांत पिळून काढले तरी मी या राज्याचा नाश करावा असेच सांगत राहीन.” असा त्यांचा संदेश होता. -१२ मार्च १९३०

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1464 views

💬 प्रतिसाद (2)
उ
उपयोजक Fri, 04/09/2021 - 08:45 नवीन
परत सुरु झालं हे!! :(
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/09/2021 - 09:37 नवीन
माहितीपुर्ण !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा