शेअरमार्केट ची बाराखडी... भाग ०.१ : आर्थिक नियोजन आणी गुंतवणुक कशी करावी...
आधिचे भाग -
शेअरमार्केट भाग ० : Basics - By गणेशा - https://misalpav.com/node/48553
शेअरमार्केट भाग ०.१: आर्थिक नियोजन आणी गुंतवणुक - By गणेशा (current धागा)
शेअरमार्केट भाग १: Fundamental Analysis - By गणेशा - https://misalpav.com/node/48578
शेअरमार्केट भाग २.१: Technical Analysis -By गणेशा - https://misalpav.com/node/48607
--------------------
शेअरमार्केट भाग अ: मार्जिन - By बिटाकाका - https://misalpav.com/node/48574
--------------------
म्युच्युअल फंड्स भाग १ : By अमर विश्वास - https://misalpav.com/node/48621
------------------------------------------------------------------------------
नोट :
१. प्रथमता मी अमर विश्वास यांना न कळवताच त्यांची धागा लिंक येथे दिली आहे त्या बद्दल दिलगिरी.
२. खरे तर :-) हा धागा मी काढलेला नव्हता, आणि बेसिक धाग्याच्या वेळेस कसी गुंतवणुक असावी हे थोडक्यात सांगितले होते. परंतु डॉ.खरे यांच्या बर्याचस्या प्रतिसादावरुन आणि गाई च्या धाग्यामुळे मला वयक्तीक हा विषय थोडा Divert होतो आहे किंवा थोडा निगीटीव्ह बाजुकडे झुकतो आहे काय ही मला शंका आली.. परंतु प्रत्येकाचे वेगळे लॉजिक असते आणी प्रत्येक जन त्याच्या त्याच्या बाजुला बरोबर असु शकतो..त्यांचे म्हणाणे रास्त असेल पण ते वाचणारे मात्र निगीटीव्ह विचार करतील असे वाटले म्हणुन हा धागा भाग माझ्या भाग २.१ झाल्या नंतर लिहायला घेतो आहे.
काही वेळेस माणसाला व्यवस्थित निर्णय घेता येत नाही.. किंवा काही गोष्टी उशिरा समजतात..
म्हणून हा धागा मी काही संभ्रम असतील तर दूर व्हावेत या साठी लिहायला घेतो आहे.
३. अमर विश्वास झाले , मी झालो ..धाग्यावरुन कळत असेलच की वयक्तीक कुठली ही लालसा आमच्या धाग्यात नाही. खरे तर कोणाला विनाकाराण समजावुन सांगण्याच्या फंदात पडु नये असे बरेच जन म्हणातात, पण या धाग्यांचे स्वरुप कोणाला तरी या मुळे भविष्यात फायदा झाला तर उत्तम असे असल्याने कृपया वेगळे मत बनवु नये.. माझा स्वार्थ हा आहे की मला हे धागे माझ्या साईट साठी इंग्रजी मध्ये हवे आहेत आणि ज्ञानाची उजळणी ही होइलच त्यामुळे इतरांना फायदा झाला तर मस्त आणि माझे ही काम झाले हा निव्वळ हेतु.
यातुन कुठले ही आमिष किंवा अर्थाजन मिळवण्याचा हेतु नाही.. तो मला शेअरमार्केट आणि माझा व्यवसाय देते आहेच.
--------------------------------------------------------------------------
आर्थिक नियोजन कसे असावे हा या धाग्याचा मुळ उद्देश आहे.
ते कसे कारावे ते आपण पाहु
१. आपण आपले उत्पन्न स्त्रोत लिहुन काढावेत
२. उत्पनाची आदर्श गुंतवणुक किंवा विभागणी कशी आसावी.
आपण आपले उत्पन्न स्त्रोत लिहुन काढावेत
आपले स्त्रोत काय काय असु शकते तर
१, आपल्या व्यवसायातुन येणारा नफा
२. किंवा नोकरदार असाल तर येणारा पगार
३. भाड्याचे उत्पन्न ( फ्लॅट्,मशिन किंवा इतर काही)
४. व्याजाचे पैसे ( एफडी किंवा इतर सेवा)
५. Dividend
आता हे आपण लिहुन काढले की आपल्या या उत्पनाची आदर्श विभागणी आणी गुंतवणुक कशी करावी हे ठरवावे ..
उत्पनाची आदर्श गुंतवणुक किंवा विभागणी
१. Tax - सर्वात पहिल्यांदा उत्पन्नावर प्रत्येकाला त्याचा Tax सरकारला द्यावा लागतो..
२. wealth creation-
हा खुप IMP भाग आहे. हा महत्वाचा का आहे तर समजा आताचा व्यवसाय किंवा नोकरी म्हणजे जे काही उत्पन्न असेल तर त्याचा काही भाग तुम्ही बाजुला काढला पाहिजे.. कारण उद्या तुमची नोकरी गेली तर त्या ह्या साठवलेल्या पैश्याने तुमची कमाई चालु राहिली पाहिजे.. हा महत्वाचा भाग आहे, आणि बरेच लोक या भागाकडे खुप उशिरा येतात, बरेच लोक saving आणि investment या दोन्हीमध्ये खुप उशिर करतात किंवा संभ्रमित असतात.
wealth creation मध्ये तुम्ही काय काय केले पाहिजे तर
अ. यात तुम्हाला, असे नाही की डायरेक्ट लाँग टर्म इन्वेस्टमेंटच केली पाहिजे, ना की कोठे तरी चांगले शेअर मध्ये पैसे टाकायचे..
यात तुम्ही पहिल्यांदा तुमच्या महिन्याच्या उत्पन्नाच्या ६ पट रक्कम ( तुमचे सहा पगार असे ही म्हणु शकता) तुम्ही तुमच्या बँकेत fixed deposit म्हणुन ठेवावीच ठेवावी. समजा तुम्ही महिना १ लाख रुपये कमवत असाल तर तुमचे ६ लाख रुपये हे सुरक्षित आणि चांगल्या बँकेत ठेवलेले हवेच हवे.
हे का करायचे तर उद्या तुम्हाला Urgent liquidity लागली किंवा जॉब गेला किंवा इतर कारणे झाली तर तुम्हाला लगेच पैसे हे मिळाले पाहिजेत किंवा सहा महिने तुम्हाला कसलाही धोका निर्माण होणार नाही.
म्हणजे तुम्हाला पैश्याचे टेंशन येणार नाहीत. म्युचअल फंड , शेअर मार्केट हे नंतरच्या गोष्टी आहेत.
ब.
नंतर राहिलेले पैसे हे शेअर्स , म्युचअल फंड, सोने ,जागा इतर ठिकाणी गुंतवणुक करत रहावी.. लक्शात घ्या investment ही Process आहे, आज पैसे टाकले की उद्या लगेच तुम्हाला उत्पन्न मिळाणार नाही. ( हे आपण इतर धाग्यात पहात आहे / पाहणार आहोतच).
३. Personal growth
अ. पुस्तके आणी कोर्सेस
ज्ञान वाढवण्यासाठी आपण गुंतवणुक केलीच पाहिजे.. चांगली चांगली पुस्तके आपण वाचली पाहिजेत, आणि ह्या मध्ये आपण नक्कीच गुंतवणुक केली पाहिजे. तुमचे ज्ञान हे wealth creation चा भाग आहेच आहे, त्यावर नक्कीच तुमचा खर्च पाहिजे.
तुम्ही नव नविन गोष्टी शिकल्या पाहिजेत, नवनिविन तंत्रज्ञान तुम्ही शिकले पाहिजे नविन कोर्सेस लावुन आता काय चालु आहे त्याबद्दल तुमचे स्किल्स तुम्ही Develop केले पाहिजेत.
तुमच्या व्यवसायात सुद्धा याचा उपयोग तुम्ही केला पाहिजे
ब. Gym आणि आरोग्य
तुम्ही न चुकता तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, तुम्हाला त्यासाठी काही खर्च करावा लागला, तर तुम्ही त्यावर तो केलाच पाहिजे.. तुम्ही Gym लावायची असल्यास तय साठी काही पैसे तुम्हाला बाजुला ठेवलीच पाहिजे.
४. घरखर्च
खरे तर ह्या सगळ्या गोष्टी सर्वांना माहीत असतेच, पण तुम्हाला एक स्ट्रक्चर फिक्स व्हावे म्हणुन हे पुन्हा सांगत आहे.
या मध्ये मुलांच्या शाळेच्या फी, इंटरेनेट आणि इतर खर्च आले.
medical आणि term Insurance चे premium ह्या सर्व गोष्टी यात येतात
५. दान
हा आदर्श असा भाग आहे, आपण पैश्या बद्दल बोलतो आहे तर तुम्ही पैसे द्यायला ही शिकले पाहिजे,
ज्ञान दान ही यातच येते, तुम्ही तुमचे ज्ञान मनापासुन पुढच्याला द्या तुम्हाला तुमचे ज्ञान दुप्पट झालेले कळेल..
मी येथे जे लिहितो आहे ते ज्ञानदानच आहे. यातुन नेहमी दुसर्याचा फायदा करायला जा तुमचा फायदा होईलच होईल.
वरती जे Tax, Business, saving, expense, wealth creation जे मी बोललो आहे, त्यात तुमच्याकडे उत्पन्न आले की तुम्ही ते तुम्ही वेगवेगल्या खात्यात टाकुन ठेवु शकता, त्यामुळे तुमच्या due गोष्टी तुम्हाला त्या त्या खात्यातुन भरता येते.
तुम्ही तुमच्या wealth creation साठी एक खाते उघडले असेल समजा मी त्यात महिन्याला १० % टाकतो, तर त्याच खात्यातुन मी माझी पहिले ६ महिने पुरेल येव्हडी सेविंग करावी आणि नंतरच शेअर मार्केट, म्युचअल फंड, गोल्ड यात गुंतवणुक करायची आहे
मला असे नक्की म्हणायचे आहे की ह्या पद्धतीने तुम्ही गुंतवणुक केल्यास कसलेच प्रॉब्लेम येणार नाहीत
मागील काही धाग्यांवर शेअर मार्केट आणि म्युचअल फंड याबाबत थोडी साशंकता मनात आलेली असेल तर मी येथे माझे गुंतवणुक मांडले आहे..
प्रत्येकाची स्वताची एक थेअरी असते, ती चुक नसते, काहींना म्युचअल फंड चांगले वाटतात काहींना नाही.. पण तुम्ही असेआर्थिक नियोजन केल्यास तुम्हाला कसला शंका उरणार नाहीत..
होप मी सर्व प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे देवु शकलो आहे. आता शेअर मार्केट किंवा म्युचअल फंड नको असतील तर तुम्ही तुमच्या धंद्यात तुमची गुंतवणुक वाढवु शकता, प्रत्येक माणुस वेगळाच असतो.
मी आणि अमर जे सांगतो आहे ते ह्या पुर्ण गुंतवणक प्रकारातील फक्त १० ते २० % हिस्स्या बद्दल बोलतोय, आणि त्या पासुन भविष्यात कशी रक्कम निर्माण होईल त्याचे ते ज्ञान आहे.
थोडेसे माझे
थोडेसे माझ्याबद्दल तुम्हा सर्वांशी शेअर करायला मला आवडेल.
१. गेल्या वर्षी मी माझे नविन स्किल्स Spark जे big data मध्ये येते ते शिकुन त्यावर टीम बरोबर काम केले.. त्याचा मोबदला माझे २६ % पगार या महिन्यापासुन वाढला आहे.भले लॉकडाउन होता तरी.
२. मी स्वता खुप अभ्यास केला,शेअर मार्केट चा ही.. नंतर मला माझे मित्र भेटले त्यांना पण मी शेअर मार्केट मध्ये खुप शिकवले.. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी १० लाख ते investment साठी देत असलेली रक्कम नाकारली आहे. मैत्रीत पैसे आले की मैत्री ही मैत्री राहत नाही.. उलट मी त्यांच्याच खात्यात पैसे ठेवुन त्यांना मेन मार्केट स्किल शिकवले , आता ते त्यांचे त्यांचे करत आहेत.ज्ञानदान करा.. तुमचा फायदा होईल, १ लाखाचे माझे तीप्पट पैसे झालेत शिवाय म्युचअल फंड वेगळे, हे सगळे इतरांना शिकवल्या मुळेच..
३. तरीही त्यांच्या खुप आग्रहा खातर आणि माझ्या अभ्यासामुळे त्यांना Insurance आणि medical मध्ये मदत पाहिजे होती ती केली, इतकी की मी स्वताचे लायसन्स घेतले आणि माझीच अकाउंट आणि Insurance कंपणी टाकली.. मला व्यवसाय चांगला करता येत नाही, पण ही आयडीआ मित्रांची आहे. आणि मी स्वता चांगल्या पद्धतीने यात निवड करु शकलो.. आता माझ्याकडे दोन Mechanical production (automation ) च्या कंपन्या बूक किपिंग साठी आहेत.. सुरुवात छोटी आहे पण ती ह्या सर्व गोष्टींमुळे माझ्याकडे आपोआप चालत आली..
४. स्वता माझे वजन मात्र गेल्या वर्षी वाढले आहे, तरी Gym , सायकल हे माझे चालु केले आहे पुन्हा.. लवकरच ट्रेक सुरु होतील. वजन लवकरच कमी होईल. आता या महिन्यात ३ किलो कमी केले आहे.
५, माझ्या पगाराच्या फक्त ७ % मी शेअर मार्केट मध्ये आणी ८% गोल्ड आणि म्युचअल फंड मध्ये टाकतो आहे.
६. क्रेडीट कार्ड बंद करण्याचे प्रयत्न चालुच आहे. लवकर सांगेल..
माझे एकच म्हणणे आहे, तुमच्याकडे ताकद आहे , तुमच्याकडे ज्ञान आहे, फक्त त्याचा वापर करा.. तुम्ही तुमचे जीवन आनंदी जगु शकता..
फक्त एक मनापासुन विनंती कधीच कोणाला पुर्ण चुकीचेच, कींवा फक्त स्वताच्या काही आर्थिक हेतु साठीच सगळे करतोय असे हिनवु नका..
काय माहीत प्रत्येक माणसाच्या मनात वेगळे विचार असतील.
आणि Consistency ही तुमच्या प्रत्येक यशाची चावी आहे, ती जरुर कायम आपल्या जवळ बाळगा..
- गणेशा
काँग्रेसच्या काळात हे 7 , 10 , 12 होते
हि पचपच कुणी आणली आहे?