भारतीय राजकारणाची सत्यता
सध्या काँग्रेसचे माजी आणि आभासी अध्यक्ष राहुल गांधी विदेशातील अनेक प्राध्यापक आणि विद्वान व्यक्तींसोबत भारताच्या विविध प्रश्नांवर आपले मत मांडतांना दिसतात. त्यातील काही भाग मी पाहिले आहेत. मुळात मला त्यात रागां भारताची कोणतीही सबळ बाजु मांडतांना दिसत नाही. बहुतांश वेळ भाजपा ला दोष देण्यात जातो. पण काल परवाच्या या भाषणात रागां म्हणतात
To fight elections, I need institutional structures, I need a judicial system that protects me, I need a media that is reasonably free, I need financial parity, I need a whole set of structures that actually allow me to operate a political party. I don't have them: Rahul Gandhi
रागां म्हणतात हे माझ्याजवळ नाही. म्हणजे यावर रागां चा विश्वास असेल तर
१. याशिवाय भारतीय निवडणुक जिंकणे शक्य नाही अशी त्यांची कबुली आहे.
२. हे सर्व असेल तर निवडणुक जिंकणे सोपे आहे.
३. या गरजा कधी निर्माण झाल्या?
४. या कोणी निर्माण केल्या आणि का?
५. ही पुर्वपरीक्षित पध्दत असेल तर काँग्रेस ने यावर किती निवडणुका जिंकल्या?
जरी मी रागां ला खुप महत्व देत नाही, तरी मला वैयक्तिक हे फार महत्वाचे वाटते. यामध्ये भारतीय राजकारणाचा खेळ सांगितला आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर एक दोन निवडणुका सोडल्या तर भारतीय समाजाला आणि मानसिकतेला कश्या प्रकारे हाताळले जाते, याचे चित्रण कळत नकळत रागां यांनी सागितले आहे. तसं पाहता कोणताही देशपातळीवरील नेता इतर देशात आपण आपल्या देशात कसे राजकारण खेळतो ते स्पष्ट करुन सांगत नाही. कारण काही बाबी सतत गोपनीय असतात. जरी जगजाहीर असतील तरी! विषेशतः ईंदिरा गांधी यांचे राजकारण सुरु झाल्यापासुन हा टप्पा सुरु झाल्याचे आपल्याला जाणवेल.
१. संस्थात्मक रचना - भारतीय समाजमनावर बदल घडविणार्या संस्था, आपल्या सोईच्या राजकीय पक्षांच्या मनाप्रमाणे चालतील अश्या प्रकारे त्यांची रचना आणि व्यवस्थापन तत्कालीन सरकारांनी केलेले आपणास दिसुन येईल. यात समांतर राजकीय, अराजकीय संस्था उभारणी करणे, त्यात आपल्या मताच्या आणि भविष्यातील राजकीय फायद्याच्या व्यक्तींना पदभार देणे सामील आहे. अगदी संसदेत सुध्दा आपल्या सोईचे कायदे करुन घेतले जातात.
२. न्यायिक पाठबळ - जे माझ्या आणि माझ्या सहाकार्यांना त्यांच्या सर्व घटनाबाह्य कार्यात कायदेशीर मार्गाने मदत करतील, आवश्यक असेल तिथे दिरंगाई करतील. आठवा आपल्या नेत्यांवरील भ्रष्ट्राचाराचे खटले.
३. माध्यम - भारतात माध्यम हातात असणे किती महत्वाचे आहे ते वेगळे सांगणे न लगे.
४. आर्थिक बाजु - कोणतिही निवडणुक असो त्यात किती पैसा लागतो ते आपणास माहित आहेच. तो कसा आणावा लागतो त्याच्या अनेक सुरस कथा आपण सर्वांनी ऐकल्या आहेत.
५. एक संपुर्ण रचना जी मला माझा राजकीय पक्ष माझ्या मनाप्रमाणे चालवु देईन - यात तर अमर्यादित स्वातंत्र्य आणि अधिकार आहेत.
खरे तर हे भारतीय राजकारणाचे सत्य आहे. हे पाहिल्यावर मला वाटते की मोदी शहा जोडगोळीने काय हिसकावले आहे? काँग्रेस मुक्त भारत म्हणजे काय हे यातुन स्पष्ट होते. बाकी सोशल संस्थळावर आणि माध्यमांवर जे काही चालते तो म्हणजे सावळा गोंधळ आहे.
BJP नी किती तरी वर्ष दहाचा आकडा पण गाठला नव्हता.आपल्या पराकोटीच्या अज्ञानाचे प्रत्येक प्रतिसादात लाजिरवाणे प्रदर्शन करण्याची तुमच्यावर कोणी सक्ती केली आहे का?