Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिपाकरांच्या वाचनखुणा.

ट
टर्मीनेटर
Wed, 03/31/2021 - 16:40
💬 158 प्रतिसाद
नमस्कार मिपाकरांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे. मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे. आपल्यापैकी अनेकांना आवडलेल्या लेखनाची वाचनखूण साठवून ठेवण्याची सवय आहे तेव्हा आपली व्यक्तिगत आवड म्हणून जपून ठेवलेला हा ठेवा प्रतिसादातून लिंक रूपाने अन्य वाचकांबरोबर वाटून त्यांनाही वाचनानंदाची अनुभूती द्यावी अशी सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती सुरुवात म्हणून मी सगळ्या नाही पण माझ्या तींन वाचनखुणा खाली देत आहे. १) इब्न बतूत - भाग १ जयंत कुलकर्णी साहेबांनीं लिहिलेली १२ भागांची लेखमालिका. २) मोसाद - भाग १ कै.बोका-ए-आझम यांनी लिहिलेली १४ भागांची लेखमालिका. ३) मक्केतील उठाव १ हुप्प्या यांनी लिहिलेली ७ भागांची लेखमालिका. वरील तीनही अभ्यासपूर्ण लेख मालिका मला खूप आवडतात. अजूनही बऱ्याच वाचनखुणा आहेत त्या नंतर शेअर करतो! आता तुमची पाळी! चला तर मग आता पटापट तुमच्या वाचनणखुणा शेअर करा 🙂 आपल्या सर्वांनी प्रतिसादातून शेअर केलेल्या वाचनखुणा सूचिबद्ध करून स्वतंत्र धागा रूपाने ('मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांक) ह्या वर्षीच्या मिपा वर्धापनदिनी म्हंणजेच गणेश चतुर्थीला श्री गणेश लेखमालेच्या बरोबर प्रकाशित करावा अशी विंनंती मिपा प्रशासनास करण्याचा मानस आहे, जेणेकरून ह्या वर्धापनदिनी आपल्या सर्वांना श्री गणेश लेखमालेत नवीन लेखन आणि 'मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांकात आत्तापर्यंतचे वाचकांच्या पसंतीस ऊतरलेले जुने पण दर्जेदार लेखन वाचण्याची दुहेरी मेजवानी मिळेल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 58818 views

💬 प्रतिसाद (158)
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/23/2021 - 22:28 नवीन
विमान अपहरणावर माझा हा एक लेख आहे. काठमांडू ते कंदहार.. असे अधिकही असू शकतात.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 09/24/2021 - 07:29 नवीन
मस्त लेख. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
N
nutanm Sat, 09/25/2021 - 01:40 नवीन
कविता व प्रतिक्रिया वाचून हसून हसून जिवंतपणी समाधी मिळाली फक्त थ्रओर ज्ञानेश्र्वरांचेच नांव नको.आमचीही न्वोद होऊदेत. थोडावेळ मिपा वाचायचे ठरवून अजूनी वाचतोच आहे. ही कविता प्रथम वाचताना अस वाटले मुद्दाम बोबडे हे बोल माझे टंकले आहे.व काही विडंबन असेल, पण कविता तर कळलीच नाही पण प्रतिक्रिया बापसे बेटे सवाई होत्या.
  • Log in or register to post comments
N
nutanm Sat, 09/25/2021 - 02:20 नवीन
खरोखर प्रतिक्रिया अफाट छान!! विडंबनामुळे (प्रतिक्रियांमुळे) जेवण झोप लयाला गेले.वाचतच बसलो व झपूर्झा गडे झपूर्झा अवस्था झाली. हसून हसून ठसका, खोकला, शिंका, पोटदुखी, झोप उडाली भूक मेली सर्व सुंदरअनुभव एकदमच सर्व मिपाकरांनी देऊन मरगळलेल्या मनाला तरतरी आणल्या बद्दल सर्व मिपाकर व कविता टंकणार्याचे खूप खूप खूप मनापासूनआभार व कोटी कोटी प्रणाम !!
  • Log in or register to post comments
N
nutanm Sat, 09/25/2021 - 03:38 नवीन
बारा वर्षे,सहा महिने तीन दिवस (खूप खूप जुना, प्राचीन मराठी सिनेमा)होऊनही ताजी, टवटवीत राहिलेली वरील मराठी विनोदी कविता . कविता व अभिप्राय प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर!! मोकलाया दाहि दिश्या. सर्वांनी कायम जरूर वाचावेत अभिप्राय. व टवटवीत रहा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 01/25/2022 - 12:43 नवीन
हा धागा सदोदित वर रहावा.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 01/26/2022 - 05:22 नवीन
सर्वात जास्त वाचनखुणा असलेला धागा कसा शोधायचा?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/26/2022 - 06:38 नवीन
अ‍ॅक्च्युअली जसे फेसबूकवर मेमरीज आहेत तसेच मिपावर मेमरीज काढायला हरकत नाही , दररोज त्या दिवशी पुर्वी कोणते लेखन झाले होते ह्याचा एक कॉलम फ्रंट पेज वर असावा. ह्याने मिपाची पेज एंगेजमेंट देखील वाढेल ! आणि समजा जुन्या काळातील काही उत्तम लेखन नजरचुकीने दुर्लक्शित झाले असेल तर तेही वर येईल अन त्याला योग्य तो न्याय मिळेल !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा