Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शेअर ट्रेडिंग मध्ये मार्जिनचा वापर - दुधारी तलवार कि विन-विन?

ब
बिटाकाका
Sat, 03/27/2021 - 19:05
🗣 62 प्रतिसाद
गणेशा यांच्या शेअर मार्केटची बाराखडी भाग ० या धाग्यावर मार्जिन या विषयावर थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगानुसार हा मार्जिन प्रकार जरा विस्ताराने उदाहरणासह पाहू म्हणजे मग ठरवता येईल ती दुधारी तलवार आहे की (माझ्या मतानुसार) विन-विन आणि त्यामानाने अतिशय कमी धोकादायक परिस्थिती आहे. मार्जिन समजण्यासाठी त्याबाबतीत वापरल्या जाणाऱ्या अजून काही व्याख्या समजणे आवश्यक आहे. समजा माझ्याकडे २५,००० रु. आहेत आणि मी माझ्या अभ्यासानुसार अबक कंपनीचा शेअर ज्याची किंमत ५०० रु. आहे तो घ्यायचा ठरवलं आहे. आता माझ्याकडे असलेल्या २५,००० रु. त त्या कंपनीचे ५० शेअर्स घेता येतील. पण अबक कंपनीच्या शेअर वर माझा विश्वास असल्याने मला अधिक शेअर्स, समजा १०० शेअर्स, घेण्याची इच्छा आहे परंतु माझ्याकडे तेवढी रक्कम, ५००X१००=५०,००० नाहीयेत. म्हणून मी मार्जिन घेण्याचे ठरवतो. आता मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक कंपनीच्या कामगिरीनुसार ब्रोकरेज हाऊस त्या कंपनीचे इनिशीयल मार्जिन टक्केवारी (initial margin percentage) ठरवतात. समजा आपल्या अबक कंपनीची अशी इनिशीयल मार्जिन टक्केवारी ३५% आहे. याचा अर्थ जर मला १०० शेअर्स घ्यायचे असतील तर मला १००X५००=५०,००० च्या ३५ टक्के, म्हणजेच ५०,०००X०.३५=१७,५००रु. इनिशीयल मार्जिन म्हणून भरावे लागतील. उरलेले ३२,५००रु. ब्रोकरेज हाउस मला मार्जिन म्हणून पुढच्या ३६५ दिवसांसाठी देईल. या मार्जिन रक्कमेवर माझे ब्रोकरेज हाऊस १३% व्याज घेते (इतर ब्रोकरेज हाउसेस चे सध्याचे व्याजदर माहीत नाहीत). म्हणजेच एक लाखाला दिवसाला साधारणपणे ३० ते ३५ रु. म्हणजेच आपल्या वरच्या उदाहरणात ब्रोकरेज हाउस ने दिलेल्या ३२,५००रु. वर दिवसाला साधारणपणे ११ ते १२ रु., महिन्याला साधारणपणे ३२५रु. म्हणजे २ महिने शेअर्स ठेवले तर साधारणपणे ६५०रु. आता ब्रोकरेज हाउस अजून दोन गोष्टी मेंटेन करते. १. मिनिमम मार्जिन टक्केवारी (minimum margin percentage) - हे देखील इनिशीयल मार्जिन टक्केवारी प्रमाणे प्रत्येक शेअर साठी ठरवले जाते. ही टक्केवारी साधारणपणे २० ते ४० टक्के असते. समजा आपल्या अबक शेअर साठी ही टक्केवारी ३०% आहे. ही टक्केवारी वापरून मिनिमम मार्जिन काढले जाते. मिनिमम मार्जिन = ब्रोकरेज हाउस ने दिलेले मार्जिन + त्या रक्कमेच्या ३०% (minimum margin percentage). आपल्या उदाहरणात ब्रोकरेज हाउस ने मला ३२,५०० रु. दिले आहेत. म्हणजेच माझे मिनिमम मार्जिन ३२,५०० + (३२,५००x०.३=९,७५०) = ४२,२५० असेल. २. अवेलेबल मार्जिन (available margin) = मूळ व्यवहाराची रक्कम +/- नफा/तोटा (नफा असेल तर +, तोटा असेल तर -). अवेलेबल मार्जिन आणि मिनिमम मार्जिन मधील अंतर खूप कमी झाले तर ब्रोकरेज हाऊस तुम्हाला अजून स्वतःचे मार्जिन भरण्यासाठी आठवण करून देईल. जर असे अधिकचे मार्जिन भरले नाही आणि जर तुमचे अवेलेबल मार्जिन हे मिनिमम मार्जिनला टच झाले किंवा खाली आले तर ब्रोकरेज हाउस तुमचे शेअर्स उडवून टाकेल. आता या माहितीनुसार आपल्या शेअर्स च्या बाबतीत काय घडू शकते ते पाहू. आपण असे गृहीत धरू की अबक कंपनीच्या बाबतीतला माझा अंदाज घेताना असा होता की हा शेअर पुढील २ महिन्यांत २०% वाढून ६०० ला जाणार आहे. आता २ महिन्यांनी समजा तो तसा ६०० ला पोहोचला आणि माझे लक्ष्य (टार्गेट) साध्य झाले तर मी तो शेअर विकून टाकेन. मग पाहू माझा किती फायदा होईल. (६००x१००=६०,०००(विक्रीची किंमत)) - ३२,५०० (ब्रोकरेज हाऊस चे मार्जिन) = २७,५००. यातून माझी मूळ रक्कम (इनिशीयल मार्जिन) १७,५०० आणि व्याजाचे ६५० वजा केले तर माझा नफा हा २७,५००-१७,५००-६५० = ९,३५०रु. असेल (यात ब्रोकरेज आणि एक्सचेंज टॅक्सेस धरलेले नाहीत.). दोन महिन्यांऐवजी ६ महिन्यांनी लक्ष्य (टार्गेट) साध्य झाले तर व्याज ६५० ऐवजी १९५०रु. जाईल, म्हणजेच फायदा २७,५०० - १७,५०० - १९५० = ८१५० रु. असेल. आता दुसरी शक्यता अशी आहे की तो शेअर वर जाण्याआधी खाली गेला. समजा दोन महिन्यात हा शेअर ५०रु. पडून ४५० ला गेला. आता बघू माझे जास्तीत जास्त नुकसान किती होईल. वर काढल्याप्रमाणे आपले मिनिमम मार्जिन रु. ४२,२५० आहे. शेअर ५० रु. ने पडल्याने माझा सध्याचा तोटा ५०x१००=५,०००रु. आहे. म्हणून वरच्या अवेलेबल मार्जिन च्या सूत्रानुसार माझे अवेलेबल मार्जिन = ५०,०००-५,०००=४५,०००रु. आहे. मी जेव्हा शेअर घेतला होता तेव्हा माझा नफा/तोटा ० होता, म्हणून तेव्हा हेच अवेलेबल मार्जिन ५०,००० - ०=५०,०००रु. होते. शेअर पडत गेला तसे मिनिमम मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन यातील अंतर कमी होत गेले. आता ते २,५०० रु. आहे. म्हणजेच शेअर आणखी २५ रु. ने पडल्यास (२५x१००=२,५००) हे अंतर ० होईल. म्हणून ब्रोकरेज हाउस तुम्हाला सूचना करेल की तुम्हाला हा शेअर ठेवायचा असेल तर अधिकचे मार्जिन भरा. ही रक्कम तुम्ही तुमच्या मनाने कितीही भरू शकता. म्हणजे आपल्या उदाहरणात शेअर ७५रु. ने पडल्यावर अवेलेबल मार्जिन मिनिमम मार्जिन ला जाऊन पोहोचले आहे. पण माझा अंदाज जर असा असेल की हा शेअर अजून १०रु. पेक्षा जास्त ने पडणार नाही आणि तिथून रिकव्हरी करेल, तर मी १०×१०० = १,०००रु. भरेन. जेणेकरून माझे अवेलेबल मार्जिन वाढेल, पर्यायाने मिनिमम मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन मधील अंतर वाढेल आणि आपला शेअर उडणार नाही. थोडक्यात हा आपला महितीपूर्वक निर्णय (informed decision) असेल. या रिकव्हरीची वाट बघण्यासाठी माझ्याकडे एक वर्षातील उरलेले १० महिने असतील. अर्थात प्रत्येक महिन्याला साधारणपणे ३२५रु. व्याज माझ्या अपेक्षित नफ्यातून कमी होत राहील. याउलट जर तुम्ही अधिकचे मार्जिन भरले नाही तर मात्र तुमचा शेअर ७५रु. पडल्यावर (वरील गणितानुसार), ४२५रु. ह्या सध्यकिमतीवर (मार्केट प्राईस वर) ब्रोकरेज हाऊसकडून उडवला जाईल. आता यात किती नुकसान झाले? तर ७५×१०० = ७,५०० रु. (हे थेट नुकसान) + दोन महिन्यांच्या मार्जिनच्या व्याजाचे ६५० = ८, १५०रु. इथे सर्वात अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे, ब्रोकरेज हाउसेसनी मिनिमम मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन च्या माध्यमातून ठरवलेला तुमचा जास्तीत जास्त लॉस (if you don't take informed decision to keep the stock by adding additional margin). म्हणजेच आपण मार्जिन सुविधेने स्वतःच्या २५,००० रु. पैकी १७,५०० + ६५० (व्याज) = १८,१५०रु. वापरून ९,३५० रु. फायदा किंवा ८,१५०रु. तोटा होण्याच्या शक्यता निर्माण केल्या. याव्यतिरिक्त माझ्या मूळ रक्कमेतील उरलेले २५,००० - १८,१५० = ७,८५० रु. इतर शेअर्स मध्ये वापरायला मोकळे राहिले. आता हेच जर, मी मार्जिन नसते वापरले तर काय झाले असते ते बघू. माझ्याकडे २५,००० रु. होते. त्यात अबक कंपनीचे ५००रु. प्रमाणे ५० शेअर्स येतील ( हे शेअर्स डिलिव्हरी मोड मध्ये असतील). जर तो अपेक्षेप्रमाणे १००रु. वर गेला तर फायदा ५०×१००=५,०००रु. होईल. जर तो खाली गेला आणि ब्रोकरेज हाउसप्रमाणे आपणही तो ४२५ रु. सध्यकिमतीवर तो विकून टाकला तर तोटा ७५×१००= ७५००रु. होईल. म्हणजेच मार्जिन न वापरता, स्वतःकडील २५,००० रु. त आपण ५,००० रु. नफा किंवा ७,५०० रु. तोट्याची शक्यता निर्माण केली. मार्जिन न वापरण्यात फायदा असा की तुम्हाला वेळेचे बंधन राहणार नाही. जर एक वर्षापर्यंत तुमचे लक्ष्य साध्य नाही झाले तरी तुम्ही त्याला २, ३ कितीही वर्षे ठेऊ शकता. नुकसान असे की मार्जिन वापरल्यामुळे मोकळे राहिलेले ७,८५०रु. इथे मोकळे राहणार नाहीत. चौकस२१२ यांच्या गणेशा यांच्या धाग्यावरील प्रश्नाचे उत्तर - मी आयसीआयसीआय चे ३ इन १ अकाउंट वापरतोय, निदान त्यात तरी मार्जिन हे एक वर्षासाठी दिले जाते. इतर ब्रोकर्सच्या बाबतीत हा कालावधी मला माहित नाही. वर्षाच्या शेवटी, मार्जिन कॉल आलेला नसेल तरी तुमचे शेअर्स विकले जातील. जर तुम्हाला त्यापुढेही हे शेअर्स ठेवायचे असतील तर अशा मार्जिन शेअर्स ना मार्जिन रक्कम भरून डिलिव्हरी मध्ये रूपांतरित करणे ३६५ व्या दिवसापर्यंत शक्य आहे. म्हणूनच मी वर उल्लेख केला की मार्जिन हे लॉंग टर्म ट्रेडिंग साठी नसून शॉर्ट टर्म आणि इन्ट्राडे ट्रेडिंग साठी आहे. मला अपेक्षा आहे की मी वरील उदाहरणाला न्याय देऊ शकलोय, पण तरीही काही त्रुटी राहिल्या असल्यास जाणकारांनी त्या दुरुस्त केल्या तर आनंदच होईल. माझ्यामते तरी शॉर्ट टर्म साठी मार्जिन ही अतिशय मदतकारक सुविधा आहे. खासकरून बाजारातील प्रत्येक डाउन हा एक संधी असते. चांगल्या कंपन्यांचे शेअर ग्लोबल प्रेशर, नफेखोरी इ. अनेक कारणांमुळे पडतात. पण मुळत: भक्कम (fundamentally strong) असल्यामुळे लगेच रिकव्हरही होतात. अशावेळी मार्जिन वापरून, आपल्याकडील कमीत कमी पैशात जास्ती शेअर्स खरेदी करून, काही दिवसांत बाजार सुधारला की शेअर काढून टाकून नफा घेणे हे खूप फायदेशीर असते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. शिवाय माझे पैसे जास्त दिवस अडकून राहण्याची रिस्क कमी असते. यावर अजून भरपूर चर्चा करता येऊ शकते, माझ्या अल्पमतीने मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक आधीच घेतलेले शेअर्स हेही मार्जिन म्हणून दुसरे शेअर्स घेण्यासाठी वापरता येतात (ज्याला शेअर्स ऍज मार्जिन असे म्हणतात), त्यावर उहापोह पुढील लेखात करता येईल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 33441 views

🗣 चर्चा (62)
च
चौकस२१२ Wed, 03/31/2021 - 08:26 नवीन
मार्जिन ही अतिशय मदतकारक सुविधा आहे. खासकरून बाजारातील प्रत्येक डाउन हा एक संधी असते "संधी" असते जेव्हा एखादयकडे गुंतवयाला पैसे शिल्लक असतात तेव्हा ! दुर्दैवाने सर्व "इन्व्हेस्टमेंट गुरु " हेच नेहमी सांगतांना ऐकलंय... मग असे विचारावेसे वाटते कि "भाऊ माझे पैसे आधीच गुंतवलेले असतील तर हि कशी बरे संधी मला?? स्वानुभव : जि ई आणि इंटेल चे शेअर मार्जिन वर घेतले होते ४०% खाली गेले . लूज लूज झाले होते ....
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/01/2021 - 02:31 नवीन
गणेश / बिताकाकाक आपलं डिव्हर्सिफिकेशन चा मुद्दे मान्यच आहे आणि तो विचार करण्यासारखा आहे पण मूळ मुद्दा असा आहे कि डिव्हर्सिफिकेशन संधी बाजूल ठेवली (परत डिव्हर्सिफिकेशन बाजूल ठेवू कारण त्या उरलेली ५० मधून जे तुम्ही वेगळे बाजारात घालाल त्यातही तोटा होऊ शकतो फक्त नफाच होऊ शकतो असे कसे म्हणणार ) तर समसमान तुलना ( मार्जिन , मार्जिन नाही ) तर यात जसे विन विन असू शकते तसे लूज लूज होऊ शकते हे मांडले कारण सुरवातीला तरी आपण फक्त विन विन असे सुरु केलेत म्हणून .! आणि दुसरी तलवार नसावी असे म्हणालात म्हणून ) आणि परतावा हा जगभर टक्केवारीतच मोजलं जातो भले तुम्ही नसाल मोजत असो हे सर्व वाचून / चर्चेतून ज्याला मार्जिन म्हणजे काय हे माहित नसेल तर त्याला मार्जिन चे फायदे आणि तोटे दोन्ही समजले तर बरेच आहे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/01/2021 - 04:22 नवीन
चौकस जी, मी तुम्हाला रिप्लाय देण्या अगोदर वरती लिहिलेले आहे, हि दुधारी तलवार वाटते .. कारण तुमचे जास्तीचे म्हणजे ३५% नुकसान होते मार्जिन घेतल्यावर, ( जर तुम्ही तुमच्या १००% amount वर ६५ %जे मार्जिन घेतले तर ) मार्जिन न घेता नुकसान २० % च होते. जरी तुम्ही ५०-५०% चे share घेतले तर ४०% नुकसान होईल. आणि मार्जिन न घेता २०% ( म्हणजे ५०० चा share १०० ने पडला तर ) पण जर राहिलेल्या पश्याचा विचार करता त्यात हि नुकसान झाले तर तुम्हाला हे जास्तीचे नुकसान सहन करावेच लागेल..हा मार्जिन चा तोटा आहेच.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/01/2021 - 05:26 नवीन
बरोबर गणेश... म्हणूनच मार्जिन हि दुधारी तलवार हे जग मान्य करत .. (घेणे ना घेणे ज्याचा त्याचा प्रश्न हे बरोबर ) असो चांगली चर्चा झाली ..
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/01/2021 - 07:48 नवीन
मार्जिनच्या बाजूने एकच मुद्दा आहे. बर्‍याच वेळेस मार्जिनवरील ब्रोकरेज कमी असते.
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 06/10/2021 - 20:41 नवीन
मार्जिनबद्दल एवढी माहिती नव्हती. सुरेख माहिती दिलीत. धन्यवाद. मुळ विषय सुरु करणारे गणेशा यांनादेखिल अनेक धन्यवाद. फक्त एक गोष्ट, जी आधी "शाम भागवत" यांनी सुद्धा सांगितली होती-
आता हेच जर, मी मार्जिन नसते वापरले तर काय झाले असते ते बघू. माझ्याकडे २५,००० रु. होते. त्यात अबक कंपनीचे ५००रु. प्रमाणे ५० शेअर्स येतील ( हे शेअर्स डिलिव्हरी मोड मध्ये असतील). जर तो अपेक्षेप्रमाणे १००रु. वर गेला तर फायदा ५०×१००=५,०००रु. होईल. जर तो खाली गेला आणि ब्रोकरेज हाउसप्रमाणे आपणही तो ४२५ रु. सध्यकिमतीवर तो विकून टाकला तर तोटा ७५×१००= ७५००रु. होईल.
१. एकुण समभाग घेतले- ५० २. प्रत्येक समभागाची किमत- ५०० ३. एकुण गुंतवणुक= १. x २. = ५० x ५००= २५,००० घटनाक्रम १- फायदेशीर घटनाक्रम ४. प्रत्येक समभागाची किंमत वाढली इतक्या रकमेने- १०० ५. एकुण समभाग घेतलेले होते- (वरील १. वरुन)- ५० ६. एकुण फायदा= ४. x ५. = १०० x ५०= ५००० घटनाक्रम २- तोट्याचा घटनाक्रम ७. प्रत्येक समभागाची किंमत कमी झाली इतक्या रकमेने- ७५ ८. एकुण समभाग घेतले होते- (वरील १. वरुन)- ५० ९. एकुण तोटा= ७. x ८. = ७५ x ५० = ३,७५०. तोटा होइल ३,७५०/- ७,५००/- नाही. असो. मार्जिनचा फायदा वेगळ्या पद्धतीने होतो, हे बाकी चर्चेतून आपण लक्षात आणून दिलेलेच आहे. पुन्हा एकदा अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 06/11/2021 - 09:57 नवीन
तुलना करायाची तर "फायदेशीर घटनाक्रम" आणि "तोट्याचा" यात वेगवेगळे टक्केवारी का धरली आहे? ते कळले नाही. एकदा १०० आणि एकदा ७५ ? बिना मार्जिन : स्वतःची गुंतवणूक २५,००० ५०० चाय शेअर वर १०० नफा झाला,,, तर २५ वर ५ नफा = २५% नफा ५०० चाय शेअर वर १०० तोटा झाला तर,,, २५ वर ५ तोटा = २५% तोटा ५०% मार्जिन घेतले तर स्वतःची गुंतवणूक १२,५००+ १२,५०० उधार ५०० चाय शेअर वर १०० नफा झाला तर १२,५ वर ५ नफा = ४०% नफा ५०० चाय शेअर वर १०० तोटा झाला तर १२,५ वर ५ नफा = ४०% तोटा सारांश काय मार्जिन हि दुधारी तलवारचआहे , साधे गणित आहे ! हा हे मान्य कि मार्जिन घेतल्यामुळे उरलेले १२.५ इतर ठिकाणी गुंतवता येतात पण याचा अर्थ हा होत नाही कि ते उरलेले १२.५ फक्त नफा कमावतील तिथेही तोटा होऊ शकतो मार्जिन ने भले भले गोत्यात आलेले आहेत .. त्यामुळे पाऊल जपून टाकणे , स्वतःवर विश्वास असेल तर घ्या उडी.. आणि मार्जिन चे "गोडवेच फक्त" गाणारे हे विसरतात कि बुलिश / तेजी असलेल्या बाजारात अर्हताःतच मार्जिन चा फायदा होणार ! आणि शेवटी % वारी मध्येच परतावा मोजला जातो जगभर
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Fri, 06/11/2021 - 11:30 नवीन
पण सेबीच्या नविन नियमांनुसार सप्टेंबर नंतर मार्जिन व्यवहार बंद होणार आहेत हे खरे आहे का? असे झाले तर छोटे गुंतवणुकदार आहेत त्यांच नुकसान आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Fri, 06/11/2021 - 14:10 नवीन
मार्जिन चे व्यवहार पूर्वीप्रमाणेच चालू आहेत. फक्त upfront margin requirement चे percentage बदलले आहे
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 06/12/2021 - 05:52 नवीन
पहिले margin requirement चे percentage २०% होते परंतु सेबी ने वाढवत ७५% केले आहे व सप्टेंबर नंतर १००% होणार आहे. म्हणजे पहिले तुमच्या खात्यात २० रु. असतील तर तुम्हाला १०० ते १२० रु. पर्यंत मार्जीन मिळत असे पण सप्टेंबर नंतर तुम्हाला १०० रु चे शेर व्यवहार करायचे असल्यास तुमच्या खात्यात १०० रु रोख असली पाहीजे. From March 1, 2021, Sebi has hiked the upfront margin requirement to 50 per cent from 25 per cent, and this has impacted trading volumes. In the next two phases, Sebi plans to take this limit to 75 per cent by the end of August and then 100 per cent by September (बदल- लहान गुंतवणुक्दार = छोटे ट्रेडर्स)
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 06/11/2021 - 19:16 नवीन
जर पुरेसा वेळ दिला (-अभ्यास आणि तयारीसाठी) आणि योग्य मार्गदर्शन असेल, तर बाजारामधून एका स्थिर परताव्याची अपेक्षा करता येते. त्या पातळीची तयारी ज्यांची असेल, त्यांच्यासाठी तेजी आणि मंदी सारखीच असते. दोन्ही परीस्थितीत ते उत्पन्न मिळवतात. मार्जिन हे अशा लोकांसाठी फायदेशीर आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 06/11/2021 - 11:45 नवीन
मार्जिनमुळेच छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान होते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा