Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

हाक......

J — Jayagandha Bhatkhande, Fri, 03/26/2021 - 07:23
हाक........ देवा, मारु कशी रे तुजला हाक... किती संबोधने कामी आली.. मम प्रतिभाही इथे निमाली.. तरी म्हणसी मजला तू रे.. अजुनी करुणा भाक... ईश्वरा, मारु कशी रे तुजला हाक.. संग तुझा नित मजला असुनी.. कधी वाटते एकाकी मी.. पसरुनी बाहु पुन्हा मागते.. तुझीच केवळ साथ.. प्रभो, मारु कशी रे तुजला हाक.. आयुष्याच्या अवघड वळणी.. देवदूताची साथ घेऊनी.. पुढती आले कशीबशी मी.. संमुख आहे ही वैतरणी.. गाठू कसा रे काठ.. कृष्णा, मारु कशी रे तुजला हाक.. गुरुरायांनी धरुनी मम कर.. अश्रू पुसुनी दिधला मज धीर.. प्रेमभरे दाखविली त्यांनी.. नामाची ही वाट.. अनंता, मारु कशी रे तुजला हाक... क्षणभंगुर हे मनुष्य जीवन.. निःशेष जळो हे माझे "मी"पण.. हृदयी धरुनी तुझीच शिकवण.. तरुनी जावो क्रोधादिंचे.. अवघड डोंगर घाट... माधवा, मारु कशी रे तुजला हाक.. जयगंधा.‌... ३-७-२०१४.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1357 views

💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन Tue, 04/27/2021 - 12:17 नवीन
क्षणभंगुर हे मनुष्य जीवन.. निःशेष जळो हे माझे "मी"पण.. हृदयी धरुनी तुझीच शिकवण.. तरुनी जावो क्रोधादिंचे.. अवघड डोंगर घाट... झकास!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा