Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एक विचार

क
कर्नलतपस्वी
गुरुवार, 03/18/2021 - 02:59
💬 3 प्रतिसाद
आमचे एक निसर्ग प्रेमी मीत्र, यांनी ट्विटर वर गुलबक्षीच्या फुलांबद्दल माहिती दिली. वाचता वाचता सहज एक विचार डोक्यात आला आणी मन पन्नास वर्षे मागे गेल.विचार आला की नाती कशी असावीत, गुलबक्षीच्या वेणीसारखी, सहजपणे एकमेकात गुंफलेली . लहानपणी आमच्या परसदारी गुलबक्षीची रोपे होती. झुडूपवर्गीय, नाजुकशी ,हिरवीगार पाने, नाजुक , रंगबिरंगी फुलांनी बहरलेली. फुलांचे रूपांतर हलक्याफुलक्या काळ्या छोट्या बियां मधे व्हायचे. ती छोटीशी बि बंद ओठांवर ठेवून फुकंरीने जास्तीत जास्तं वर उडवायची आसा आम्हां मुलांचा खेळ. फुले फुलण्याची वेळ साधारण संध्याकाळी चार साडेचार वाजता. नेहमीच संध्याकाळी आजी, काकू, मावशी बहिणी यानां या फुलांची वेणी बनवून केसात माळताना बघीतले. बाकी फुलांची वेणी बनवताना सुई टोचते , दुखापत होते तर दोरा फुलांना बाधूंन ठेवतो म्हणजे जबरदस्तीने एकत्र आणतो. तसच काहीस नात्यांत, थोपलेल्या नात्याची गुंफण घट्ट जरी असली तरीही ती क्लेशदायक तशीच त्याची उकल सुद्धा अवघड. गुलबक्षीची वेणी बनवताना ना दोरा ना सुई याचा वापर होतो.गुलबक्षीची फुलं एकमेकात गुंफली जातात जणू दोन जिवलग मैत्रीणी हातात हात गुंफलेल्या.जशी वेणी विणायला सोपी तशीच उकलायला पण. अवघडपणा नाही तर नुसतीच गुंतागुंत. फुले एकदम नाजूक , नात्यांसारखीच, जास्त हाताळली तर कोमेजतात. यानां कुठल्याही प्रकारचे बंधन लागत नाही. दिवसभर डोक्यात माळली तरी गुंफण काही सुटत नाही. नाते कसं आणी कीती घट्ट आसाव याचं सुंदर उदाहरण.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2068 views

💬 प्रतिसाद (3)
स
सोत्रि गुरुवार, 03/18/2021 - 13:23 नवीन
- (वेणी/हार बनवायची पद्धत आवडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 13:35 नवीन
गुलबक्षीच्या वेणीसारखी, सहजपणे एकमेकात गुंफलेली....... मस्तच ....
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य गुरुवार, 03/18/2021 - 13:55 नवीन
गुलबक्षीला इंग्रजीत 'इव्हनिंग ग्लोरी' असं नाव आहे. नावाप्रमाणेच ती संध्याकाळीच फुलते. आमच्याकडे गुलबक्षीच्या झाडावर गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या रंगांची फुले तर यायचीच तसेच गुलाबी फुलांवर पिवळ्या रेषा, पांढऱ्यावर नाजुकशी गुलाबी रेष, असे विविध प्रकार असायचे. मी ह्युस्टनला असतो, इथे देखील गुलबक्षीची रोपे आहेत. गुलबक्षीच्या गुंफलेल्या वेणीची नात्यांच्या विणीशी केलेली तुलना आवडली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा