Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ५)

श
श्रीगुरुजी
Sun, 03/14/2021 - 14:58
🗣 163 प्रतिसाद
https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corporations-in-andhra-pradesh/articleshow/81496372.cms#_ga=2.225653400.363988111.1611478902-amp-jYqPLLBLSTAtzk5m0R26KNDoIeqn0_pDb7YPfI0XUkDWAAutIxoPjbVk4R8pO4ue आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 52154 views

🗣 चर्चा (163)
ब
बापूसाहेब Tue, 03/16/2021 - 15:57 नवीन
300 kg म्हणजे काही जास्त नव्हे.. एका फुटीरतावाद्याने 1-2 kg जमा केले तरी 200 -300 kg जमा व्हायला वेळ लागनार नाही..!! आणि सरकारला दोष देण्याआधी तुम्हच्याकडे काही पुरावा आहे का?? कि उगाच आपली कॉन्स्परसी थेअरी ठोकून देताय.. !!! BTW काश्मीर खोऱ्यात जवळपास सर्वच घरात किमान एकतरी व्यक्ती फुटीरतावादी असते. तिथे सैन्याला कोणत्याही एन्काउंटर मध्ये स्थानिक लोकांकडून सपोर्ट मिळत नाही.. उलट सैन्यावर दगडफेक करून आतंकवादी लोकांना पळून जाण्यात मदत केली जाते ( आता हे पाप कोणाचे आणि काश्मीर असे कुणामुळे झाले हे तुम्ही पद्धतशीर पणे झाकून ठेवणार )
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/16/2021 - 16:09 नवीन
ढकलले नेहरू वर.बाकी काही कर्तृत्व तर आहेच नाही. तुमच्या कार्यकाळात घटना घडली असेल तर त्याला कोण नेहरू जबाबदार. काहीच्या काय
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Tue, 03/16/2021 - 16:14 नवीन
काहीही हा राजेश भाऊ... एखाद्या गोष्टीला जो जबाबदार आहे त्यालाच जाब विचारणार.. कारण हे सर्व झाले तेव्हा BJP RSS किंवा इतर पक्ष नव्हते.. आणि जे होते त्यांनाच जाब विचारणार ना... तुम्हाला खरं माहिती असेल तर मग तुम्ही सांगा ते काश्मीर खोर्याचे पाप कोणाचे ते..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/16/2021 - 16:30 नवीन
मारेकरी कोण होते हा आहे.त्या लोकांना अजुन अटक का नाही झाली?. हे एक माणसाचे तर काम नसणार त्या मधील एक तरी पकडला का गेला नाही? कोर्टात ह्या प्रकरणाशी संबंधित आरोप पत्र तरी दाखल केले आहे का? हे सर्व प्रश्न आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Tue, 03/16/2021 - 17:17 नवीन
जरा बातम्या वाचत जा ओ राजेशभाऊ.. सगळं मिपाकरांनीच समजावून द्यायचे का???
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/16/2021 - 17:22 नवीन
त्यांना वेळ मिळत नसेल... कदाचित, ते दक्षिण कोरियाचा अभ्यास करत असतील... किंवा परमपूज्य राहुल गांधी यांचे मौलिक विचार ऐकत असतील...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/16/2021 - 17:32 नवीन
माझ्या प्रश्नांची उत्तरं च नाहीत. कारण तपास झालाच नाही. Surgical strike (तो पण खरा की खोटा माहीत नाही ) च्या आडून सर्व प्रकरण च दबले गेले पण. पण निवडणूक जिंकायला मात्र त्या strike चां खूप फायदा करून घेतला. ३०२ त्या मुळेच आहेत. लोक एकदाच फसतात सारखी नाहीत. आता एवढ्या समस्या देशात आहेत तरी लोकांना वझे ,अंबानी मध्येच गुंतवून ठेवायचे त्या साठी media नी २४ तास तोच फड लावायचा असले प्रकार चालू आहेत. पण आता लोक सावध आहेत . Corona फक्त इथेच का वाढतोय . बाकी देशातील सर्व राज्य शिस्त बद्ध आणि देशातील यूपी,बिहार सारखी राज्य पण शिस्त बद्ध . आणि महाराष्ट्र फक्त बेशिस्त आहे का? बंगाल मध्ये निवडणूक आहे तेथे बिन्धास्त सर्व नियम मोडला जात आहे. ना मास्क ना सोशल distance. तरी तिथे corona नाही. बिहार मध्ये निवडणूक झाली,इथे स्थानिक स्वराज्य संस्था ची निवडणूक झाली तेव्हा बिहार मध्ये corona वाढला नाही पण इथे निवडणुका झाल्या की corona वाढला. तो पण राजकीय झाला आहे. पंजाब,केरळ,महाराष्ट्र येथेच तो अस्तित्वात आहे. आता दीदी जिंकून आल्या तर बंगाल मध्ये corona ची एन्ट्री होईल. आणि BJP आली तर corona तर corona गायब होईल
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/16/2021 - 17:41 नवीन
तुम्ही खरोखरच, परमपूज्य राहुल गांधी यांचे शिष्य शोभता...पाकिस्तानच्या नेत्यांनी, सर्जिकल स्ट्राइक झाला, हे कबूल केले, तरी पण तुम्हाला विश्र्वास वाटत नाही... करोना बाबतीत जबाबदारी राज्य सरकारची आहे, गोव्यात निवडणूका आहेत का? कारण, गोव्यात करोनाची लागण, फारच कमी आहे....
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/17/2021 - 07:47 नवीन
मारेकरी कोण होते हा आहे.त्या लोकांना अजुन अटक का नाही झाली?. आपण ठार बधिर आहात का? मी दिलेल्या दुव्यात याची सर्व माहिती आहे. आपण सुधारायचं नाहीच असं ठरवलंय म्हटल्यावर कोण काय सांगणार?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/16/2021 - 16:37 नवीन
ला इलाही म्हणणारी मॉमता दीदी आता चंडी पाठाच्या ओळी गाउ लागली असुन खुजलीवाल यांनी अयोध्येत मंदीर निर्माण झाल्यावर वृद्ध लोकांना फुकट तिर्थाटन करण्याचे जाहीर केले आहे म्हणे ! अचानक यांना हिंदूंची आठवण आली आहे ! असं कसं झाल ? :))) बादवे बाटला हाउसवर मॉमता दीदी त्याकाळी म्हणाल्या होत्या एनकांउंटर खोटे होते... माझे बोलणे जर खोटे ठरले तर राजकारण सोडुन देइन ! जाता जाता :- हिंदूस्थानी राजकारण्यांना पाहुन खालचा प्राणी चिंतेत पडला आहे, त्याला वाटत होते की तोच वेगात रंग बदलु शकतो ! :)))))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/16/2021 - 16:44 नवीन
इतर वेळी हिंदूंना किंमत शून्य
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/16/2021 - 17:08 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/sharad-pawar-speaks-on-sachin-vaze-case-parambir-singh-anil-deshmukh-pmw-88-2422232/ काही समस्या येतात, त्या सोडवल्या जातील. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असतील तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना सहकार्य करणं. ज्या लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत.... शरद पवार, बोलतात कमी, पण एकाच वेळी, अनेक गोष्टी सांगतात....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/16/2021 - 17:44 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nia-court-reject-sachin-vaze-three-application/articleshow/81533082.cms
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/16/2021 - 17:49 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nia-court-reject-sachin-vaze-three-application/articleshow/81533082.cms
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 03/16/2021 - 17:52 नवीन
https://www.lokmat.com/pune/bjp-film-city-president-rohan-mankani-custody-fraud-billions-taking-information-closed-bank-accounts-a580/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/16/2021 - 17:59 नवीन
शिक्षा व्हायलाच हवी....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/16/2021 - 17:52 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/sharad-pawar-meets-cm-uddhav-thackeray-after-nia-arrest-sachin-vaze/articleshow/81522925.cms
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/16/2021 - 18:16 नवीन
किती लपवाल ? कुठवर लपवाल ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 03/16/2021 - 19:09 नवीन
मॅक्सिमम सिटी ह्या पुस्तकात "नंबर २ आफ्टर स्कॉट्लंड यार्ड' नावाचा लेख मुंबई पोलिसांवर आहे. पकडलेल्या संशियितांच्या बॉसना(दाउद्/शकील वगैरे) फोन पोलिस कमीशनर्/गुन्हे पथकाचे अधिकारी लावतात.. व सौदा केला जातो. व संशयिताची किंमत ठरवली जाते. सौदा यशस्वी झाला की मग हवाला मार्गे पैसा अधिकारी लोकाना व मंत्रालयात पोचवला जातो. सौदा फसला की मग एन्काउंटर स्पेशालिस्ट संशयिताला मध्यरात्री कुठेतरी नेतात व मारून टाकतात. ९०च्या दशकातले हे बहुतांशी एन्काउंटर्स असे सौदेबाजीने झाले होते. दुर्दैवाने आपल्या पत्रकारात/मिडियात ना प्रश्न विचारण्याची धमक होती ना स्वतः संशोधन करण्याचा वकुब होता. आताही तेच.. त्या अर्नब गोस्वामीची पत्रकारिता आक्रस्ताळी खरी पण ज्या पद्धतीने त्याला अटक केली त्यावर ना आमच्या मिडीयाने प्रश्न विचारले ना स्वतःला बुधिमान म्हणवणार्या गिरीश कुबेर्/निखिल वागळ्यानी/कुमार केतकरांनी. आता हे जे काही किळसवाणे समोर येतेय त्यावरही हे स्वयंघोषित बुद्धिमान हाताची घडी तोंडावर बोट ठेउन आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/17/2021 - 17:59 नवीन
चा चेहरा बघितला तरी महाराष्ट्र प्रेमी लोकांचे मस्तक उठते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 18:15 नवीन
म्हणजे? थोडा खुलासा हवा .... साधूंच्या हत्याकांडाचा निषेध, महाराष्ट्रातील जनतेने करायला नको का? तांदूळ घोटाळा झाला, त्याचा निषेध, महाराष्ट्रातील जनतेने करायला नको का? एका स्त्रीला शिवी दिली, त्याचा निषेध महाराष्ट्रातीलजनतेने करायला नको का? मराठी कधीच, अन्यायाला साथ देत नाही...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/16/2021 - 19:41 नवीन
२४ तास देशाच्या सीमेवर सशस्त्र दल पहारा देत असताना सुद्धा अतिरेकी भारतीय सीमेच्या आत येतात कसे. इथे येवून दहशत वादी हल्ले होतातच कसे. भ्रष्टचार विरोधी दल अस्तित्वात असून सुद्धा देशात सर्रास भ्रष्टाचार होतात कसे. देशात न्यायालय अस्तित्वात आहेत तरी लोकांना न्याय मिळत नाही अशी बोंब असते ते कसे. गुन्हेगार,निवडणुकीत उभे राहून जिंकून पण कसे येतात. देशातील सर्वच यंत्रणा ह्या त्यांचे काम योग्य रित्या करत नाहीत. म्हणून च गुंड,टोळी युद्ध आणि बरेच प्रकार होत असतात. फक्त काही पोलिस च देशातील घाण आहे असे नाही कचरा एवढा आहे देशात की तो साफ करणे अशक्य आहे. त्या मुळे कोणालाच तू फक्त दोषी असे म्हणण्याचा अधिकार कोणालाच नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 03/17/2021 - 04:53 नवीन
जागता पहारा , डोळ्यात तेल घालुन वगैरे बोलायला ठीक आहे राजेशा पण भारत-पाकिस्तान सीमेची लांबी ३२०० कि.मी. आहे. जम्मु-काश्मिर सीमा - १२,२२ कि.मी/ आहे. म्हणजे मुंबई-चेन्नई अंतरापेक्षा थोडे कमी.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 03/16/2021 - 20:36 नवीन
त्यानंतर_काय_झालं ? ● फडणवीसांनी विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. पण असं भाषण आणि आरोप करण्याची त्यांची ही पहिली वेळ नव्हती. ● याच सभागृहात ते २०१४ पूर्वी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं. त्यानंतर काय झालं ? ● गावितांची मुलगी २०१४ ला भाजप खासदार झाली आणि ते आमदार झाले. याच सभागृहात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजितदादा आणि तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे दिले होते. त्यानंतर काय झालं ? ● फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट याच अजितदादांसोबत त्यांनी पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर काय झालं ? ● अगदी याच सभागृहात ते मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली. राणेंचा पहाण्यालायक झालेला चेहरा अनेकांना आठवत असेल. (काही भक्तांची भिंत पाहिली तर या आवेशपूर्ण भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल) त्यानंतर काय झालं ? ◆ हेच राणे भाजपचे खासदार झाले आणि त्यांचा मुलगा आमदार झाला. ● याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँकेमध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी केली. त्यानंतर काय झालं ? ● २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच भाजप मध्ये घेतलं. विधानपरिषदेतून आमदार केला आणि आता ते विधानपरिषदमध्ये भाजपचे विरोधीपक्ष नेता आहेत. त्यानंतर काय झालं ? ● मुख्यमंत्री असतांना मामुनीं 'शिक्षकांची वेतन बँक खाती' मुंबई बँकेत वळवली... नंतर आधी हायकोर्ट मग सुप्रीम कोर्टने फटकारल्यावर तोंडावर पडले आणि मग खाती मागे घ्यावी लागली. त्यानंतर काय झालं ? ● याच सभागृहात कृपाशंकर सिंघ यांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दल पण अनेक आरोप केले. त्यानंतर काय झालं ? ● विरोधी पक्षनेता असतांना कृपाशंकरच्या घोटाळ्याची कागदं नाचवली. पण स्वत: मुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाहीये; असं प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिलं आणि त्याला निर्दोष सिद्ध केला. त्यानंतर काय झालं ? अशी अनेक उदाहरण देता येतील. ते मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना राज्यात वाढलेली गुन्हेगारी असो, विशेषतः नागपूरात. हत्या असोत, आत्महत्या असतो... (विशेषतः गोविंद पानसरे, शेतकरी धर्मा पाटील यांना कोण विसरेल)... अनेक उदाहरण. ■ एकंदर ज्या लोकांवर आधी फडणवीसांनी आरोप केले किंवा सभागृहात आवेशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण (?) भाषण केलं त्यांना आपल्याच पक्षात सामावून घेतलं किंवा ज्यांना घेता येणं शक्य नव्हतं (जसे की दादा, तटकरे, कृपाशंकर) त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. ■ २०१४ पूर्वी ठीक होतं पण आता एक पूर्ण टर्म स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे. त्यामुळे दरवेळी प्रत्येक विषयात फडणवीस मी.. मी करत आकांडतांडव करत आहेत; ते लोकांच्या सहज पचनी पडताना दिसत नाहीये. उलट ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होतांना दिसत आहेत, कारण यांच्या हातात सत्तासूत्र असतांना हे आधी ज्यांना गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी म्हणायचे त्यांना शासन करायचं सोडून त्यांना जवळ करत पक्ष वाढवण्यात त्यांनी आपल्या पदाचा वापर केला. मागच्या एक वर्षात विरोधीपक्ष नेता म्हणून करोना महामारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, लॉक डाऊन, सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत, अर्णब गुस्वामी आणि आता सचिन वाझे वगैरे विषयात त्यांनी आणि एकूणच भाजपने केलेला आकांडतांडव पाहता, मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्री नव्हे तर विरोधीपक्ष नेता म्हणून पुन्हा येण्याची संधी मिळाली आहे; याचं जास्तच नैराश्य आलेलं दिसत आहे. असो, अनेक भक्तांना फडणवीस अजूनही अभ्यासू नेते वाटत असले तरी त्यांचा अभ्यास दिवसेंदिवस उघडा पडून त्यांची चिडचिडच जास्त होतांना दिसत आहे.बाकी भक्तांबद्दल तर आपलं ठरलंच आहे,आपण फक्त त्यांची मजा बघायची.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/17/2021 - 04:22 नवीन
गुरूजींनी ही पोस्ट नक्की आवडणार.;) गुरूजी कृहघ्या. अशीच यादी इतरांचीही करता येईल. त्यात काही विशेष नाही. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत नाही. मात्र पद मिळाल्यावर, काम करताना भ्रष्टाचार न करणे. सगे सोयऱ्यांनी सत्तास्थानाचा फायदा न उकळणे, घराणेशाही नसणे याला मी जास्त महत्व देतो. कारण तसे झाले तरच ते सर्वसामान्यांना फायदेशीर ठरेल. या न्यायाने फडणीस नको असतील तर फक्त पृथ्विराज चव्हाण शिल्लक राहतात. पण त्यांना कॉंग्रेस श्रेष्ठी काम करू देतील की नाही ही शंका राहतेच. याच निकषावर मला मोदी आवडतात. फक्त क्रिकेट क्रिडांगणाचे नामकरण खटकलंय. असो
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/17/2021 - 04:55 नवीन
ती, घराणेशाहीला चपराक आहे... त्यामुळेच तर, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, विरोध करत आहेत...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/17/2021 - 05:29 नवीन
ही पोस्ट ३-४ दिवसांपूर्वीच मी पोस्ट केली होती. त्यातील सर्व दावे सत्य असल्याने पोस्ट केली होती. सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत असणारेच निर्णय लक्षात घ्यायचे असतील तर मराठा सर्व क्षेत्रात अत्यंत मागास आहेत असा खोटा अहवाल तयार करून प्रगत मराठा जातीला तब्बल १६ टक्के राखीव जागा देण्याच्या फडणवीसांच्या निर्णयाचा ब्राह्मण विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः या विद्यार्थ्यांना १० वी/१२ वी/पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हव्या त्या शिक्षणसंस्थेत हव्या त्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. माझ्या माहितीतील दोन मिपा सदस्यांच्या मुलांना व नात्यातील काही जणांना या स्वार्थी निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. स्वत:च्या खुर्चीसाठी फडणवीसांनी नाणार, जैतापूर वगैरे प्रकल्प रद्द केल्याने जनतेला निश्चितच फटका बसला आहे. परंतु पद मिळाल्यावर, काम करताना भ्रष्टाचार न करणे. सगे सोयऱ्यांनी सत्तास्थानाचा फायदा न उकळणे, घराणेशाही नसणे या गोष्टींचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत नाही. अर्थात फडणवीस स्वतः घराणेशाहीतूनच पुढे आले आहेत (वडील आमदार, काकू आमदार व मंत्री). काम न करताना भ्रष्टाचार न करणे पण तुरूंगात टाकण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात भ्रष्टांवर कारवाई न करता त्यांना क्लीन चिट देऊन त्यांच्याशीच युती करणे, गुन्हेगारांना अभय देणे यामुळे अशा मुद्द्यांवर सुद्धा फडणवीस अनुत्तीर्ण आहेत. अर्थात ते कायमच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतात यावर अंधविश्वास असणाऱ्यांंना त्यांचे सर्व निर्णय बरोबरच वाटतात.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/17/2021 - 08:29 नवीन
फडणवीस यांचा चाहता असलो तरी वर शाम भागवत आणि कपिलमुनी यांचे मुद्दे आणि प्रश्न रास्त आहेत. फडणवीस आज तावातावाने बोलत असले तरी ते धुतल्या तांदळाचे नाहीत हेच खरे. या निमित्तांने आठवले -- निवडणूक म्हणजे चांगला माणूस निवडणे नव्हे.. तर कमीत कमी खराब माणूस निवडणे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/17/2021 - 09:43 नवीन
निवडणूक म्हणजे चांगला माणूस निवडणे नव्हे.. तर कमीत कमी खराब माणूस निवडणे.
एकदम मनातलं बोललात.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 03/17/2021 - 05:28 नवीन
आता_काय_चाललंय? ओके, हे सगळे आरोप आहेत...भक्त की चमचे ते सोडून देऊ... हे सगळे माहित असताना आताचे सरकार काय करतंय? राणे, दरेकर यांच्या विरोधात ठोस पावले उचलायला यांना काय प्रॉब्लेम आहे? उलट "काय द्या"चे राज्य आहे हा संदेश कॄतीतून देता येईल...पण लक्षात कोण घेतो?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/16/2021 - 21:13 नवीन
भारतीय जनता पक्षाची विचार श्रेणी च चुकीची आहे.आता पर्यंत ज्या गोष्टी घडत नव्हत्या त्या bjp सत्तेवर आल्या पासून घडत आहेत आता पर्यंत थोडी तरी मीडिया निती मान होती पण bjp सत्तेवर आल्या पासून खोट्या बातम्या आणि ठराविक हेतूंनी प्रेरित होवून २४ तास टीव्ही चॅनेल गुऱ्हाळ चालवत असतात सरकार विरोधी बोलणारे एकतर देशद्रोही असतात किंवा पाकिस्तानी प्रेमी असतात. हे नवीन च ह्यांच्या राज्यात चालू झाले आहे . देशापुढे खूप गंभीर प्रश्न आहेत पण bjp च एकच अजेंडा असतो. काही तरी फुटकळ प्रकरण काढायची आणि मीडिया ला २४ तास तेच दाखवा असे सांगायचे. सुशांत नी सहा महिने काढले आता सचिन वझे सहा महिने काढतील. पंतप्रधान तिकडे चुपचाप कायदे बदलायचे उद्योग चालू ठेवतील.. भीती हैयाच गोष्टी च वाटत भारताच्या सवैधानिक संस्था अर्धवट विचारसरणी च्या सरकार मुळे कमजोर होवू नयेत. एकदा व्यवस्था कोलमडली तर ती सावरणे कठीण होवून जाईल Bjp सरकार च्या काम करण्याच्या विचित्र पद्धती मुळे अशी भीती खूप लोकांच्या मनात निर्माण होत आहे
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/17/2021 - 08:31 नवीन
तुम्हाला सचिन वझे हे प्रकरण फुटकळ वाटत असेल तर माझा दंडवत घ्या राजे.. !!!!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 03/17/2021 - 10:25 नवीन
कुबेरी अग्रलेख वाचलात तर तेही हे प्रकरण विशेष नाही म्हणतात . https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-sachin-vaze-case-abn-97-2422291/ पुर्वीचे 'बुद्धिमान' संपादक गोविंद तळवलकरही हेच करायचे. राज्यात असे काही घडले की लगेच मॉस्को/लंडनमध्ये काय चालु आहे ह्यावर अग्रलेख यायचा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/17/2021 - 03:35 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/bjp-leader-dilip-gandhi-passes-away-at-70/articleshow/81541805.cms भाजपचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे वयाच्या ७० व्या वर्षी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते १९९९, २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुक जिंकले होते. जानेवारी २००३ ते मार्च २००४ या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री पद भूषवले होते. निष्ठावतांना झिडकारण्याच्या व आयारामांना लाल गालिचा अंथरण्याच्या फडणवीसांच्या धोरणाचा ते बळी ठरले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना डावलून आदल्या दिवशी पक्षात आलेल्या सुजय विखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर ते फारसे कार्यरत नव्हते.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 03/17/2021 - 05:18 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली! २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना डावलून आदल्या दिवशी पक्षात आलेल्या सुजय विखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली तसे नसते केले तर भाजपाला एक लोकसभा जागा गमवावी लागली असती.आणि सुजय दुसऱ्या पक्षातून निवडून नसता आला. असो..निष्ठावतांना झिडकारण्याच्या व आयारामांना लाल गालिचा अंथरण्याच्या फडणवीसांच्या धोरणाचा ते बळी ठरले लोकसभेत फडणवीसांचा काय संबंध आला? .. पुन्हा एकदा श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/17/2021 - 05:31 नवीन
दिलीप गांधींना श्रध्दांजली.
लोकसभेत फडणवीसांचा काय संबंध आला?
लोकसभा निवडणुकांमध्ये नक्की कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरविण्यात राज्य युनिट्सचा किती सहभाग होता आणि मोदी-शहांचा किती सहभाग होता हे प्रश्न विचारायचे नसतात. काहीही झाले तरी सगळ्या गोष्टींसाठी फडणवीसांना जबाबदार ठरवायची फॅशन आहे. बाकी दिलीप गांधी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते तरीही २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना तिकिट नाकारले गेले होते. मान्य आहे की त्यावेळी प्रा.ना.स.फरांदे या भाजपच्या निष्ठावंत ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी दिली गेली होती तरीही केंद्रीय मंत्र्याला लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारणे हा प्रकार त्यामानाने कमी होतो. या निवडणुकांमध्ये पक्षातर्फे उमेदवारी दिली न गेल्याने दिलीप गांधींनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारायचे २००४ मध्ये होते तसे काही कारण कशावरून नसेल?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/17/2021 - 05:48 नवीन
The state unit of the BJP has forwarded Sujay Vikhe Patil’s name to the central unit to be considered for candidature in the elections, said Devendra Fadnavis. The state unit of the BJP has forwarded his name to the central unit to be considered for candidature in the Lok Sabha elections, Fadnavis said, according to ANI. According to reports, Radhakrishna Vikhe Patil had requested the Nationalist Congress Party to leave aside the Ahmednagar Lok Sabha seat for his son. However, the NCP did not agree, according to NDTV. https://www.google.com/amp/s/amp.scroll.in/latest/916308/maharashtra-senior-congress-mlas-son-joins-ruling-bjp-may-get-lok-sabha-election-ticket
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/17/2021 - 06:05 नवीन
दोन गोष्टी- कोविडकाळात किंवा अन्य वेळीही कर्मचार्‍यांना कामावरून कमी करायचे असेल तर अनेकदा त्यांना स्वतःला राजीनामा द्यायला सांगतात याचा अर्थ ते स्वतः स्वखुषीने राजीनामा देतात असे नक्कीच नाही. त्याप्रमाणे केंद्रीय नेतृत्वाने हे प्रपोजल फडणवीसांकडून मागवले असेल ही शक्यता नाही? दुसरे म्हणजे शेवटी निर्णय केंद्रीय नेतृत्वानेच घेतला असेल तर मग मोदी-शहा यासाठी जबाबदार का नाहीत? एकटे फडणवीस कसे?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/17/2021 - 06:13 नवीन
मोदी-शहांनी ज्या पध्दतीने पूर्ण पक्षसंघटना आपल्या मुठीत ठेवली आहे ते पाहता हा निर्णय घेण्यासाठी फडणवीसांना स्वातंत्र्य दिले असेल ही शक्यता त्यामानाने बरीच कमी.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/17/2021 - 06:39 नवीन
The state unit of the BJP has forwarded Sujay Vikhe Patil’s name to the central unit to be considered for candidature in the elections, said Devendra Fadnavis. स्टेट युनिटने पाठवलंय. स्टेट युनिट म्हणजे फडणवीस? का प्रदेश अध्यक्ष? का आणखी कोणी? याचा अर्थच असा होतो आहे की, देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, स्टेट युनिटने पाठवलंय. (मी काहीही केलेलं नाही आहे.) 😀 मला तर वाटतं, फडणवीसांना हा सगळा प्रकार पसंत नसेल म्हणून हे प्रपोजल मोदी/शहांनी स्टेट युनिटला पाठवायला सांगितलं असेल. 🤣
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/17/2021 - 08:50 नवीन
राज्य संघटनेत फडणवीस व चंपा सोडले तर बाकीचे आहेत कोण? जे बाकीचे कोणी असतील (गिरीश महाजन, मुनगंटीवार, शेलार, दरेकर वगैरे) ते सर्व यांचेच समर्थक असून मम म्हणण्यापुरतेच आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/17/2021 - 08:55 नवीन
मागील ३-४ वर्षातील महाराष्ट्रातील निर्णय पाहिले तर मोदी-शहांनी फडणवीसांना महाराष्ट्रात संपूर्ण रान मोकळे दिले आहे असे दिसून येत आहे. सेनेबरोबरील युती, जागावाटप, उमेदवारी वाटप, आयाराम प्रवेश, अजित पवारांबरोबर युती हे सर्व फडणवीसांच्या आग्रहामुळे झालेले दिसते. या सर्व निर्णयांसाठी फडणवीस अत्यंत आग्रही होते.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/17/2021 - 09:08 नवीन
फडणविसांना मोदींचा पूर्ण पाठिंबा आहे हे मात्र मान्य.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/17/2021 - 05:49 नवीन
काहीही हं! २००४ साली पण फडणवीसच जबाबदार. ;)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/17/2021 - 05:40 नवीन
२०१९ मध्ये दिलीप गांधीच पुन्हा मोठ्या मतांनी निवडून आले असते. त्यांचा पराभव अजिबात झाला नसता. म्हणून तर चंपाने जसा मेधा कुलकर्णींंना हाकलून कोथरूड हा सुरक्षित मतदारसंघ निवडला तसाच सुजय विखे पाटलांनी नगर हा सुरक्षित मतदारसंघ निवडला. हा मतदारसंघ जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होता. राधाकृष्ण विखे पाटीलांनी हा मतदारसंघ कॉंग्रेससाठी मागितला व त्या बदल्यात राष्ट्रवादीला दुसरा मतदारसंघ देण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु विखे पाटील घराणे व पवार यांच्यात शत्रुत्व असल्याने पवारांनी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. त्यामुळे लगेच राधाकृष्ण विखे पाटीलांनी फडणवीसांशी बोलणी करून डील पक्के करून मुलाला भाजपत पाठवून उमेदवारी मिळविली आणि नंतर महिनाभराने स्वत:ही भाजपत डेरेदाखल झाले. फडणवीसांच्या शिफारशीमुळेच हे डील झाले होते.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 03/17/2021 - 06:11 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/17/2021 - 06:01 नवीन
काल निवडणुक आयोगाने विविध राज्यातील लोकसभेच्या २ आणि विधानसभांच्या १४ जागांसाठी पोटनिवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या जागांवर १७ एप्रिलला मतदान होईल आणि २ मे रोजी बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पाँडेचेरी हा केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीबरोबरच या जागांवर मतमोजणी होईल. कर्नाटकात बेळगाव आणि आंध्र प्रदेशात तिरूपती या लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुक होणार आहे. बेळगावचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे तर तिरूपतीचे वाय.एस.आर काँग्रेसचे खासदार बल्ली दुर्गाप्रसाद राव यांचे कोविडमुळे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणुक होणार आहे. पुढील विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक होणार आहे-- १. महाराष्ट्र- पंढरपूर. राष्ट्रवादीचे आमदार भरत भालके यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. २. गुजरात- मोरवा हदाफ. अपक्ष आमदार भुपेंद्रसिंग खंत यांची निवड जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे ही जागा रिकामी आहे. ३. झारखंड- मधुपूर. झामुमोचे आमदार आणि हेमंत सोरेन यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री हाजी हुसेन अन्सारी यांचे कोविड आणि हृदयविकाराने निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. ४. कर्नाटक- बसवकल्याण. काँग्रेसचे आमदार बी. नारायण राव यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. ५. कर्नाटक- मस्की. काँग्रेसचे आमदार प्रतापगौडा पाटील यांनी ऑपरेशन कमल अंतर्गत भाजपत प्रवेश केल्यामुळे राजीनामा दिल्यामुळे जागा रिकामी आहे. ६. मध्य प्रदेश- दमोह. काँग्रेसचे आमदार राहुल सिंग यांनी ऑपरेशन कमल अंतर्गत भाजपत प्रवेश केल्यामुळे राजीनामा दिल्यामुळे जागा रिकामी आहे. ७. मिझोराम- सरछिप. अपक्ष आमदार आणि माजी आय.पी.एस अधिकारी लालदुहोमा यांनी झोराम पीपल्स मूव्हमेंट या पक्षात प्रवेश केल्याने पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्याने ही जागा रिकामी आहे. १९८८ मध्ये हेच लालदुहोमा यांचे पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. ८. नागालँड- नोकसेन. नॅशनल डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे आमदार सी.एम.चँग यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. ९. ओरिसा- पिपली. बिजू जनता दलाचे आमदार प्रदीप महारथी यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. १०. राजस्थान- सहारा. काँग्रेसचे आमदार कैलाशचंद्र द्विवेदी यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. ११. राजस्थान- सुजानगढ. काँग्रेसचे आमदार आणि अशोक गेहलोत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री भंवरलाल मेघवाल यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. १२. राजस्थान- राजसमंद. भाजप आमदार किरण महेश्वरी यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. १३. तेलंगण- नागार्जुन सागर. तेलंगण राष्ट्रसमितीचे आमदार नोमुला नरसिंहय्या यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे. १४. उत्तराखंड- साल्त. भाजप आमदार सुरिंदरसिंग जीना यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 03/17/2021 - 07:29 नवीन
देशाच्या कानाकोपर्‍यात चौदा विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी पोटनिवडणुका , त्यातही नऊ कोविडमुळे निधन. + २ खासदार सुद्धा कोविड मुळे निधन झाल्याने पोटनिवडणुका. दुर्दैवाने पुढील पोटनिवडणुका "दोन खासदारांची आत्महत्या" या कारणाने होतील.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/17/2021 - 09:24 नवीन
पहिल्यांदा इतक्या व्यापक प्रमाणात पोटनिवडनुका होत असतील
नाही. यापेक्षाही जास्त मतदारसंघात पोटनिवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. नोव्हेंबर २०२० मध्येच जवळपास ५० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक झाली होती. त्यात मध्य प्रदेशात २० पेक्षा जास्त, गुजरातमध्ये ६ आणि उत्तर प्रदेशात ७ जागांवर पोटनिवडणुक झाली होती.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/17/2021 - 06:39 नवीन
हिमाचल प्रदेशमधील मंडीचे भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतला मृतदेह त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आढळून आला आहे. Image removed. रामस्वरूप शर्मा हे हृदयविकाराने आजारी होते आणि डिप्रेशनमध्ये होते असे आताच वाचले. महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते तेव्हा त्यांची अवस्था बघून अनेकांना काळजी वाटली होती असेही वाचले. https://www.jagran.com/himachal-pradesh/kangra-himachal-mp-ramswaroop-sharma-passed-away-in-delhi-hospital-early-morning-21471156.html गेल्या महिन्या-दीड महिन्यात दुसर्‍या लोकसभा खासदाराने आत्महत्या केलेली दिसते. हे चांगले लक्षण नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा