Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

दिवाळी अंक 2020

म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/11/2021 - 05:07
💬 15 प्रतिसाद
1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो. सुरूवातीला काही वर्षे, म्हणजे साधारण 2006 पर्यंत, हवे असलेले सगळे अंक लगेच विकत घेत होतो, पण 2006-07 च्या सुमारास समजले की, डोंबिवली येथे मार्च-एप्रिल मध्ये, हेच दिवाळी अंक, कमी पैशांत मिळतात. त्यामुळे, 2-3 वाचनालयातून हे अंक गोळा करतो. नमनाला, इतके तेल भरपूर झाले. आता मुळ मुद्द्याकडे येतो.... ह्यावर्षी खालील अंक घेतले 1. उत्तमकथा 2. आवाज, पाटकर 3. साप्ताहिक सकाळ 4. लोकमत, दीपोत्सव 5. दीपावली 6. लोकसत्ता 7. जत्रा, मेनका प्रकाशन 8. जत्रा, महाराष्ट्राची 9. किस्त्रीम 10. धनंजय 11. मौज 12. माहेर 13. ऋतुरंग 14. मोहिनी 15. पद्मगंधा 16. मिळून सार्याजणी 17. हंस 18. वसा 19. अक्षरगंध 20. मानिनी 21. थिंक पाॅझीटिव्ह दर वर्षी मी, "शतायुषी" हा अंक घेतोच, पण ह्या वर्षी तो प्रकाशित झाला नाही, असे समजले. अजून कुठले अंक घेऊ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12155 views

💬 प्रतिसाद (15)
स
सरिता बांदेकर गुरुवार, 03/11/2021 - 07:26 नवीन
लक्की आहात. मी अजून लायब्ररीच्या फेऱयाच मारतेय. यावर्षीचं काही खरं नाहीय बरेच अंक ॲानलाईन आहेत.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 03/11/2021 - 07:48 नवीन
1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो
ही खुप चांगली सवय आहे. दिवाळी अंक हा आपल्य संस्क्रूतीचाच एक भाग आहे आणि ती टिकवुन ठेवायची असेल तर प्रत्येकाने यथाशक्ती काही अंक विकत घ्यावेत. दिवाळी अंक काढणार्‍यांना त्यातुन प्रोत्साहन मिळते.
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 03/11/2021 - 20:11 नवीन
सहमत. मी आवर्जुन आवाज / जत्रा / सकाळ चा दिवाळी अंक मागवतो भारतातुन. पार्सल ला पैसे लागतात परंतु त्याला किंमत नाही. माझे बरेच अंक मित्र परीवारात विखुरले गेले आहेत .. आता कोण वाचत असेल माहीत नाही. त्यामुळे संग्रह असा झालाच नाही.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/11/2021 - 08:19 नवीन
मी देखील २-४ अंक घ्यायचो, मग ४-५ महिन्यांनंतर जवळच्या स्टॉलवरुन इतर घ्यायचो. ऑन-लाईन अवांतर वाचन वाढल्याने गेली २-३ वर्षे यात खंड पडलाय. २०२० या कोविड वर्षीची गोष्ट्च वेगळी होती.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर गुरुवार, 03/11/2021 - 12:14 नवीन
नवल किति मधे आहे ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/11/2021 - 12:54 नवीन
महाअनुभव दिवाळी अंक चांगला आहे.
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक गुरुवार, 03/11/2021 - 17:16 नवीन
तुमच्या कडे मग चंद्रकांत खोतांच्या "अबकडई" चे अंक असतील काय? काहीच अंक असावेत.. कारण खोतांनी नंतर ते बंद करून टाकले.. बर्‍याच वर्षांपासून शोधतोय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 02:52 नवीन
अक्षर, अमृत, अबकडई चे काही अंक आहेत...
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 03/16/2021 - 12:07 नवीन
व्यनि करत आहे
  • Log in or register to post comments
N
nutanm गुरुवार, 03/11/2021 - 17:29 नवीन
पुरूषस्पंदन, भटकंती,किल्ले (किल्लयांवरील, नांव नीट आठवत नाही.इतिहासावरील,प्रवासावर, हेरकथांचे असल्यास,युद्ध, किशोर आवडत असल्यास, अमृत व वरील. सर्व. वेगवेगळे विषय, जास्तीत जास्त. विविध विषय वाचण्यास मला आवडतात.हल्ली इतिहास, भूगोल खूप आवडतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 02:55 नवीन
पण, सध्या किशोर ऑनलाईन वाचता येतो. लिंक देतो http://kishor.ebalbharati.in/Archive/ इथे सगळे अंक मिळतील....
  • Log in or register to post comments
N
nutanm गुरुवार, 03/11/2021 - 18:27 नवीन
अंतरनाद पुढील वर्षी बंद होणार.उत्तम अनुवाद, श्री दिपलक्ष्मी.
  • Log in or register to post comments
अ
असा मी असामी Wed, 03/17/2021 - 09:48 नवीन
मस्त आहे.. मागील २५ वर्शे मधले लेख दिले आहेत. एकसो एक लेख आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/19/2021 - 14:14 नवीन
कालनिर्णय मिळाला
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/03/2021 - 15:02 नवीन
अनुराधा श्री दीपलक्ष्मी आवाज, मगदूम नवल प्रपंच
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 11 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा