Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ४)

च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/11/2021 - 05:05
🗣 166 प्रतिसाद
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 54845 views

🗣 चर्चा (166)
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 14:01 नवीन
असे असते तर, मुंबई, ठाणे, कोकण व्यतिरिक्त शिवसेना इतर ठिकाणी वाढली असती....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/11/2021 - 16:21 नवीन
२०१४ मध्ये स्वतंत्र लढून भाजपला अंदाजे २८.५०% मते व सेनेला अंदाजे १८% मते मिळाली होती. २०१९ लोकसभा निवडणुकीत युती करून भाजपला २५ जागा लढवून अंदाजे २८% मते व सेनेला २३ जागा लढवून अंदाजे २४% मते मिळाली होती. युती झाली नसती तर भाजपला स्वबळावर अंदाजे ३०% मते व सेनेला अंदाजे ८-१०% मते मिळाली असती. २०१९ विधानसभा निवडणुकीत सेनेशी युती करून भाजपने १६४ जागा लढवून अंदाजे २५.५% मते मिळविली होती व सेनेने १२४ जागा लढवून अंदाजे १६ % मते मिळविली होती. म्हणजे ५ महिन्यात युतीने १०% मते घालविली. पुढील विधानसभा निवडणुकीत सेना जास्तीत जास्त १०% मते व भाजप जास्तीत जास्त २०% मते मिळविण्याची शक्यता आहे. मुळात सेना व भाजपचा मतदार वर्ग बहुतांशी वेगळा आहे. भाजपला सवर्ण, परप्रांतीय, इतर मागासवर्गीय, काही प्रमाणात दलित अशांचा पाठिंबा आहे. सेनेला प्रामुख्याने मराठा, कुणबी मराठा, मुंबईतील कामगार वर्ग इ. चा पाठिंबा आहे. सेनेचे १८ पैकी १४ खासदार मराठा आहेत. सेनेने हिंदुत्व सोडले किंवा अत्यंत वाईट पद्धतीने सरकार चालविले म्हणून सेनेचे मतदार भाजपकडे वळतील हा गैरसमज आहे कारण सेना हिंदुत्ववादी आहे या भ्रमात फारशी जनता नाही व दोघांचे समर्थक फारसे समान नाहीत.. सेनेला मिळणाऱ्या १५-१८% मतांमध्ये भाजप मतदारांचा मोठा वाटा आहे. २०१४ मध्ये तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरूद्ध प्रचंड असंतोष असल्याने बाय डिफॉल्ट त्याचा फायदा सेनेला झाला होता. पुढील निवडणुकीत सेनेकडे आलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मतदार पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे जातील. भाजपने ब्राह्मण व इतर मागासवर्गीयांना दुखावून ठेवल्याने त्यातील काही जण तटस्थ राहतील किंवा भाजपविरोधात जातील. २०१९ मध्ये युती केल्याने सेना व भाजपची मूठ झाकली राहिली. पुढील निवडणुकीत दोघे वेगळे लढल्यास खरे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत थांबूया.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 11:43 नवीन
उलट भाजपचा अत्यंत पारंपरिक असा एक मतदारवर्ग यामुळे त्या पक्षापासून दुरावला. ------------------- असे अजिबात झालेले नाही.... भाजपचे तळागाळातील कार्यकर्ते, जातीभेद मानत नाहीत.... ------------- कुबेरांनी आता फक्त पुस्तके लिहावीत, असे माझे मत आहे... कुबेर आता, इतरांनी दिलेल्या माहितीवर जास्त अवलंबून रहायला लागले असण्याची शक्यता आहे....
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 03/11/2021 - 15:31 नवीन
तो लेख पुर्ण बुद्धीभेद करणारा आहे.. दुसरे म्हणजे आरक्षणाच्या मागे लपून मोदी सरकारवरती बाण मारायची संधी पण सोडलेली नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 15:56 नवीन
हे माहिती गोळा करून, उत्तम पुस्तके लिहू शकतात, पण, बातमीदाराला स्वतः खपून, बातमी मागचे सत्य शोधावे लागते... महाराष्ट्र राज्यात आता, शोधपत्रकार, कुणीच नाही...असेच वाटते... डाॅ. अवचट, हे स्वतः माहिती गोळा करत असल्याने, त्यांचे लेख सत्य वाटत होते...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 02:58 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/corona-situation-in-maharashtra-is-worrisome-abn-97-2419057/ आता तरी जबाबदारी घेणार का? आले अंगावर तर, ढकलंपंची...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/12/2021 - 10:38 नवीन
महाराष्ट्रात च covid च्या केस जास्त का आहेत? देशातील सर्व राज्यातील लोक मास्क वापरत आहेत,गर्दी करत नाहीत,अगदी दिवसातून पन्नास वेळा हात स्वच्छ करत आहेत. आणि महाराष्ट्र मधील लोक मूर्ख आहेत. गर्दी करत आहेत,मास्क वापरत नाहीत,स्वच्छ ता पाळत नाहीत. असा अर्थ होईल . खरोखर अशी स्थिती आहे? देशातील सर्व राज्यांचा विचार करून मत व्यक्त करा. देशात सर्वात जास्त industrialization झालेले महाराष्ट्र राज्य आहे काबूल आहे सर्वांना? Covid test कोण करते. ज्यांना सर्दी ,खोकला,ताप जास्त प्रमाणात येत आहे ते . हे common aahe पण. ऑफिस मध्ये येताना काही ही लक्षण नसतील तरी टेस्ट करून या अशी सूचना कंपन्या नी दील्या आहेत. सर्वात जास्त कंपन्या असणाऱ्या ह्या राज्यात जबरदस्ती नी टेस्ट केल्या गेल्या . आणि हेच एकमेव कारण आहे इथे जास्त रुग्ण असण्याचे.. विमान प्रवास करण्यात हे राज्य एक नंबर ल आहे देशात.. . त्यांना covid test सक्ती ची आहे. हे दुसरे कारण आहे हे राज्य covid मध्ये पुढे असण्याला. माझे आव्हान आहे प्रतेक घरातील प्रतेक व्यक्ती ची देशभर चाचणी करा महाराष्ट्र सर्वात शेवटच्या नंबर वर असेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 03:02 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/uddhav-thackeray-warns-people-of-maharashtra-about-spreading-of-corona-scsg-91-2418626/ शेवटी जबाबदार कोण?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 04:27 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-may-block-china-huawei-company-over-security-fears-sas-89-2419227/ उत्तम निर्णय, रसद तोडा...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/12/2021 - 06:55 नवीन
गोवा सरकार नी राज्याच्या सचिव ला राज्य निवडणूक आयुक्त च अतिरिक्त कार्यभार सोपवल्या मुळे सर्वोच्य न्यायालयाने सरकार ची खरडपट्टी काढली आहे. राज्य सचिव ल निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती म्हणजे देशाच्या राज्य घटनेची चेष्टा केल्या सारखे आहे. Bjp चे सरकार आल्या पासून देशाच्या विविध घटनात्मक संस्था कमजोर करण्याचे माकड चाळे चालू आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 07:20 नवीन
फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची गरज नाही..... https://www.loksatta.com/desh-videsh-news/now-physics-chemistry-maths-in-class-12-not-mandatory-for-engineering-course-aicte-new-rule-sas-89-2419325/ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, हा तर इंजिनियरिंगचा पाया आहे.... पायाच भुसभुशीत असेल तर, इमारत कशी उभी राहणार?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/12/2021 - 10:24 नवीन
Maths म्हणजे सायन्स ह्या क्षेत्रातील किंग आहे. गणित नाही तर सायन्स ची किंमत झीरो आहे. इंजिनिअर साठी गणित आणि रसायन शास्त्र वगळणे हा महामूर्ख पना चा निर्णय आहे पण राज्यात ह्यांची इंजिनिअर कॉलेज आहेत ते सर्व पक्षीय नेते विरोध बिलकुल करणार नाहीत. अगदी bjp चे राणे पण सोयी नुसार तोंड बंद करून उद्धव साहेबांचे आभार मानण्यात आघाडीवर असतील.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 03/12/2021 - 11:41 नवीन
फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, हा तर इंजिनियरिंगचा पाया आहे.... पायाच भुसभुशीत असेल तर, इमारत कशी उभी राहणार?
आपल्याकडे शिक्षणव्यवस्था बर्‍यापैकी बंदिस्त आहे. म्हणजे १२ वी ला सायन्सला गेल्यास डिग्रीसाठी आर्ट्स-कॉमर्स करणे कर्मकठीण बनते. १२ वीत सायन्स करून मग बी.कॉम झालेले एखाद-दोन विद्यार्थी मी बघितले आहेत पण तो आकडा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने खूपच कमी. तसेच १२ वी ला आर्ट्स-कॉमर्स केल्यास सायन्स साईडचे सगळे दरवाजे बंद होतात. इतकेच नाही तर इंजिनिअरींगला असताना अर्थशास्त्रात मायनर करावे असे म्हटले तर ते आय.आय.टी/बिट्स वगैरे मोठ्या संस्थांमध्येच शक्य आहे. इतर सामान्य कॉलेजांमधून इंजिनिअरींग केलेल्यांना ते शक्य नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्याला १२ वी त सायन्स न करताही इंजिनिअरींगला जायचे असेल तर थोडे प्रिपरेटरी कोर्सेस घेऊन ते करता यायला हवे. तशाही १२ वीत अनेक गोष्टी असतात त्याचा इंजिनिअरींगला फारसा उपयोग नसतो. उदाहरणार्थ ऑरगॅनिक (आणि इनऑरगॅनिक सुध्दा) केमिस्ट्रीचा केमिकल सोडून इतर इंजिनिअरींगमध्ये किती उपयोग असतो? फिजिक्सचा सिव्हिल-मेकॅनिकल आणि इलेक्ट्रीकल-इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपयोग असतो पण केमिकल मध्ये त्याचा किती उपयोग असतो? फिजिक्समधलेही मेकॅनिक्स मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये आणि इलेक्ट्रीसिटीशी संबंधित धडे इलेक्ट्रीकल-इलेक्ट्रॉनिक्समध्ये उपयोगी येतात. पण सगळ्या फिजिक्सचा सगळ्या इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना उपयोग नसतो. गणितातीलही पेपर-१ मधील धडे- एलिप्स/पॅराबोला/हायपरबोला वगैरे जितक्या खोलात जाऊन १२ वी त असतात ते नक्की कोणत्या इंजिनिअरींगला उपयोगी पडतात? तेव्हा ज्या इंजिनिअरींगच्या शाखेला प्रवेश घेतला आहे त्या शाखेला उपयोगी ज्या संज्ञा असतील त्या प्रिपरेटरी कोर्समध्ये करून पुढे जाता आले तर त्यात चुकीचे काय आहे? अमेरिकन विद्यापीठांमध्ये अशी सोय असते. अशी बंदिस्त शिक्षणव्यवस्था मोडून पाहिजे ते करायचे स्वातंत्र्य मिळाले तर त्यात नक्की काय चुकीचे आहे? अर्थात भारतात याची अंमलबजावणी कशी करणार याची कल्पना नाही. अमेरिकेत एकाच विद्यापीठात १००-१२५ डिपार्टमेंट असतात त्यामुळे मायनर करायचे असेल/ प्रिपरेटरी कोर्स घ्यायचे असतील तर ते शक्य होते. पण भारतात ते कसे करणार याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 07:40 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/haribhau-rathod-letter-to-cm-uddhav-thackeray-demanding-to-make-him-forest-minister-scsg-91-2418738/ आता तरी वचन पाळतात का, हे बघणे रोमांचक ठरेल...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/12/2021 - 11:17 नवीन
https://www.google.com/amp/s/theprint.in/india/india-now-as-autocratic-as-pakistan-worse-than-bangladesh-sweden-institutes-democracy-report/619673/%3famp India same as pakistan, worse than bangladesh. आता स्वीडनलाही किडे आलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/12/2021 - 11:26 नवीन
पूर्ण जग मूर्ख ,देशातील विचारवंत मूर्ख,निष्पाप सामान्य लोक मूर्ख आणि. . Bjp भक्त फक्त शहाणे. देशातील सर्व वैधानिक संस्था ची ठरवून वाट लावली जात आहे ह्या सरकार च्या काळात. काही न्यूज चॅनल वर दबाव आणून विरोधी पक्षांचे खच्चीकरण चालू आहे. खोटे आरोप बिन्धास्त केंद्र सरकार च्या इशाऱ्यावर केले जात आहे विरोधी विचारांच्या लोकांवर.. हे सर्व अंध भक्ता ना कधीच दिसणार नाही जो पर्यंत ह्याची आग ह्यांच्या पर्यंत पोचणार नाही
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 03/12/2021 - 11:27 नवीन
थोडे थांबा. आता पुढच्या वर्षी उत्तरप्रदेश आणि गुजरात, आणि नंतर मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान ची निवडणूक लागेल. मागच्या वेळेस 2015पासून आंदोलन उभे करून 2017 पर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते 2019 पर्यंत थकून गेले होते.. या पुढच्या काही निवडणुकीत काँग्रेस आपला असलेला सगळा पैसा लावणार आहे. अजून बरेच काही बघायचे आहे आपल्याला. 2022 पासून खरी मजा सुरू होणार आहे.. 2024मध्ये मात्र जर काँग्रेस हरली तर मग काही खरे नाही..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/12/2021 - 12:09 नवीन
की त्याची झळ काँग्रेस किंवा कोणत्याच राजकीय पक्षांना बसणार नाही. आता पर्यंत १७० काँग्रेस चे लोक प्रतिनिधी bjp मध्ये गेले आहेत. काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची चिंता सोडा. देशाची सर्व system फेल झाली तर त्या मध्ये सामान्य लोक भरडली जातील . तेव्हा पट्टी काढा आणि डोळे उघडे ठेवून राजकारण काय चाललं आहे त्या कडे बघा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 12:20 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/senior-citizen-died-during-vaccinaton-drive-in-vasai-sgy-87-2419509/ आता जबाबदारी कुणाची?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 12:36 नवीन
https://www.esakal.com/sampadakiya/fresh-start-nepal-india-relations-52156?crst=1615548806&wrst=1615548808 हे संबंध सुधारले तर फारच उत्तम...
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 03/12/2021 - 12:58 नवीन
हे खूप जुनं आहे का?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 03/12/2021 - 12:58 नवीन
हे खूप जुनं आहे का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 12:59 नवीन
हो तारीख बघीतलीच नाही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 12:58 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/china-parliament-nod-to-dam-near-arunachal-scsg-91-2419403/ नेहरू म्हणतात, हिंदी-चिनी भाई भाई, भारत मृत्यूच्या खाई,चीन खातोय मलई...
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 03/12/2021 - 13:21 नवीन
तिबेट हे स्वायत्त ठेवायचे १५० वर्षांचे ब्रिटिशांचे धोरण योग्य होते. भारत व चीन मधील तिबेट या बफर स्टेटचे महत्व जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीशांना समजले होते. हे धोरण चालू ठेवले असते तरी अनेक त्रासांतून मुक्तता मिळाली असती. त्या ऐवजी पीएलएला तिबेट ताब्यात घेण्याची मुभा आपण दिली. ही मोठी घोडचूक होती. इतकेच नव्हे तर तिबेटमधे अनेक दशके असलेली आपली सैन्य तुकडीही आपण परत बोलावली. खरं तर आपण त्यावेळेस विरोध केला असता तर ब्रिटन व अमेरिका आपल्या मागे उभे रहायला तयार होते. पण इथूनच भारत हा सॉफ्ट टार्गेट समजायला सुरवात झाली. "ताकदवान पण कचखाऊ" ही आपली प्रतिमा आपण जेव्हां पूर्णपणे पुसून टाकू तो सुदिन असेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 13:30 नवीन
घराणेशाही मोडीत काढायला हवी... आणि सगळ्या प्रकारची प्रार्थनास्थळे बंद करून, व्यायामशाळा उघडायला हव्यात.. आणि किमान 15-20 वर्षे सैन्य दलात काढली असतील, त्यालाच निवडणूक लढवायचा अधिकार हवा...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/12/2021 - 14:10 नवीन
सैन्य दलात नोकरी करणारे उत्तम शासक असतात असे तुम्ही सुचवत आहात का? किंवा ते भ्रष्ट नसतात. सर्रास सर्व प्रामाणिक असतात . असा तुमचा भ्रम झालेला दिसतोय. चांगले प्रतिनिधी निवडणे हे जनतेचे काम आहे. मग निवडणुकीत कोणी ही उभे असू ध्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 14:20 नवीन
ही विनंती
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Fri, 03/12/2021 - 15:15 नवीन
किमान 15-20 वर्षे सैन्य दलात काढली असतील, त्यालाच निवडणूक लढवायचा अधिकार हवा...>>>>>>> खूप हास्यास्पद सूचना आहे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/12/2021 - 16:19 नवीन
मार्मिक असतात असे समजायचं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 18:35 नवीन
कारण, अजून बराच अभ्यास करावा लागेल... मौर्य काळ ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात, तलवार हाती धरणारेच, उत्तम प्रशासक होते... सैन्यातील शिस्त, व्यावहारिक जीवनांत उपयोगी पडतेच...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 18:30 नवीन
दक्षिण कोरियाचा अभ्यास करा
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 03/12/2021 - 15:36 नवीन
अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत.
एक शंका आहे. ही अशी जी बिले आहेत ती मीटर रिडिंग नुसार दिली आहेत कि मीटर रिडींग व प्रत्यक्ष बिल ह्यात तफावत अश्या प्रकारची आहेत.?
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Fri, 03/12/2021 - 16:13 नवीन
मीटर रिडींग प्रमाणेच आहेत पण प्रश्न हां आहे कि कोणताही अतिरिक्त वापर नसताना 8-10 पटीने बिले आलीच कशी.. याची चौकशी व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 03/12/2021 - 16:18 नवीन
मीटर रिडींग प्रमाणेच आहेत
मग प्रश्न असा पडतो कि रिडिंग इतके कसे काय पळाले वा पळवले गेले? म्हणजे जिथे साधारण महिन्याला १०० युनिट्स खर्ची होत असतील तिथे १००० युनिट कसे काय खर्च झाले असावेत. एकजात सगळे मीटर अचानकच फॉल्टी कसे काय झाले?
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Fri, 03/12/2021 - 18:08 नवीन
तोच तर प्रश्न आहे. काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. चौकशी व्हयला हवी.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 03/13/2021 - 05:14 नवीन
याविषयी इतर प्रतिसादांमधून माहिती देण्यात आली आहेच पण त्यात एक मुद्दा राहिलेला दिसत आहे आणि तो म्हणजे विजेच्या बिलांच्या स्लॅबचा. एप्रिल ते जून पर्यंत सरासरी वीजेचा वापर केला असे गृहित धरून बिले दिली गेली आणि माझ्यासारख्या अनेकांनी ती बिले ऑनलाईन भरली पण होती. त्यानंतर जुलै महिन्यात अचानक ७-८ पटींनी जास्त वीजेचा वापर केला असे बिल आले. वीजेच्या बिलांच्या वापराच्या स्लॅब्ज असतात. ३०० युनिट्सच्या वर प्रत्येक युनिटला ११-१२ रूपये इतका दर असतो. त्यामुळे ८०० युनिट्स वापरले असे बिल असेल तर ३०० च्या वरच्या ५०० युनिट्सचे बिलच सुमारे ६ हजार रूपये होते. तसेच इंधन अधिभार, व्हिलिंग चार्जेस वगैरे आणखी हजारेक रूपये त्यात मिळवा. पहिल्या ३०० युनिट्सचे बिल आणखी वेगळे. त्यामुळे बिले भरमसाठ आली. यात लिहिलेले महिने कदाचित थोडेफार पुढेमागे झाले असतील पण जे झाले ती सत्य परिस्थिती होती. मुळात सरासरीप्रमाणे ऑनलाईन आलेले बिल भरून वर मला पण असेच भरमसाठ बिल आले होते. मुळात १०० युनिट्स पेक्षा कमी वापरणार्‍या ग्राहकांना अचानक ७-८ पटींनी जास्त वीजेचा वापर केला आहे असे बिल आले आहे. त्यामागे मीटरमध्ये फेरफार होते का याविषयी कल्पना नाही. झालेला प्रकार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हजारो-लाखो ग्राहकांबरोबर झाला आहे याविषयी बातम्यांमध्ये बघितले आहे. कारण काहीही असले तरी कुठेतरी गफलत नक्कीच आहे आणि याविषयी सरकार नक्की काय चूक आहे हे बघायला पण तयार नाही. त्याउपर ही थकबाकी न भरणार्‍यांची कनेक्शन कट करणे हा निर्लज्जपणाचा कळसच झाला.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Sat, 03/13/2021 - 05:44 नवीन
हेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/12/2021 - 16:17 नवीन
महाराष्ट्रात किती ग्राहकांना अशी जास्त बिल आली आहेत त्याची काही आकडेवारी आहे का? माझ्या इमारती मध्ये असे एक पण उदाहरण नाही. माझ्या गावी असे एक पण उदाहरण नाही.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/12/2021 - 16:57 नवीन
मिटर रिडिंग प्रमाणे बिल पाठवले असेल तर आलेले बिल भरावेच लागेल. फारच शंका वाटत असेल तर मिटर तपासून घ्या.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Fri, 03/12/2021 - 18:13 नवीन
आग्या जी.. तोच विचार करतोय. येत्या सोमवारी जाऊन मीटर चेक करण्यासाठी अर्ज करणार आहे.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Fri, 03/12/2021 - 18:12 नवीन
तुम्ही चष्मा काढून "नीट" पहात चला.. दिसेल... हवं तर माझं इलेकट्रीसिटी बिल पाठवून देतो. गेल्या दोन वर्षात कधीही 200 युनिट क्रॉस केलेले नाही.. पण जुन 2020 मध्ये अचानक 856 युनिट वापर दाखवलाय.. बरं मार्च, एप्रिल, मे चे रिडींग avg नुसार अंदाजे घेतले होते (156 युनिट ).. बॅलन्स करण्यासाठी जून मध्ये जास्त युनिट आले असं समजून घेतले तरी एकदम 856 युनिट कसे काय??? याचाच अर्थ काहीतरी गडबड आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/12/2021 - 18:21 नवीन
काय ती भाषा? मी वीजबिलावरील रिडिंग आणि प्रत्यक्ष मीटरवरील रिडिंग दोन्ही तपासून खात्री करून मिटरची तक्रार करा असे सांगितले.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Fri, 03/12/2021 - 19:19 नवीन
आग्या जी. माझा वरील प्रतिसाद तुमच्यासाठी नव्हे तर राजेश जी यांच्यासाठी होता.. कारण त्यांच्या मते वाढीव वीज बिल ही समस्या च नाहीये.. त्यांना असा कोणी व्यक्ती अजुन दिसलेला नाहीये ज्याला हा प्रॉब्लेम आहे....
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 03/13/2021 - 03:50 नवीन
गैरसमज झाला बापूसाहेब. सॉरी
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 03/12/2021 - 18:39 नवीन
Image removed. हा माझा पुण्याच्या घराचा वीज वापर तक्ता. माझा भाडेकरु लोकडाउन मुळे आपल्या मुळ गावी आहे. तरीही त्याला जुन मधे ६०९ युनीट वापर झाला असे बिल आले आहे. घोळ जुन ते सप्टेबर या महिण्यांमधे आहे. फेब ते मे बिल बरोबर आहे. मी बाहेर असल्यामुळे प्रत्यक्ष रीडिंग काय आहे ते माहीत नाही. पर्ंतु ह्यात संशयाला मोठी जागा आहे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 03/12/2021 - 20:27 नवीन
Month |Current |Previous| Used Mar-20 |13354 |13296 | 58 Apr-20 |NA |13354 | May-20 |NA |13354 | Jun-20 |13963 |13354 | 609 Jul-20 |14330 |13963 | 367 Aug-20 |14620 |14330 | 290 Sep-20 |14913 |14620 | 293 Oct-20 |14978 |14913 | 65 Nov-20 |14978 |14978 | 0 Dec-20 |14978 |14978 | 0 Jan-21 |14980 |14978 | 2 Feb-21 |15071 |14980 | 91 थोडे अजुन अ‍ॅनॅलिसिस केले (खाज दुसरे काय !!). वरील तक्ता हा मीटर रीडिंग सह आहे. चालु बिलात मीटर चा फोटो आहे व त्यातले १५०७१ हे रीडिंग योग्य आहे. वरील तक्ता पाहता वीज मंडळाची यात काहीही चुक दिसत नाही. ज्या काळात प्रत्यक्ष रीडिंग घेता आले नाहीत तेव्हा अंदाजे रीडिंग घेतले आहेत. नंतर (नोव्हें - जानेवारी) च्या काळात जास्तीचे रीडिंग अ‍ॅडजेस्ट केले आहेत. यात मला फक्त व्याज जास्त लावलेले आहे आणी स्थिर आकार दर महिण्याला लावलेला आहे. तस्मात वीज मंडळाचा यात मला तरी घपला वगेरे दिसत नाही. हा माझ्या वरच्या आकडेवारीवरुन काढलेला निष़्कर्ष आहे. ईतरांचा अनुभव वेगळा असु शकतो.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 03/13/2021 - 04:19 नवीन
काहितरी नक्कीच गडबड असणार. वापर नसताना युनिट वाढायलाच नको. माझ्या कृषीपंपाचेबाबतीत वापर नसताना भरमसाठ बिल आले. तक्रार करून मिटर रिडिंग पंचनामा केल्यावर प्रत्यक्ष मिटर रिडिंग पेक्षा बिलावर चौपट रिडिंग दाखवले होते. साइट विजिट रिपोर्ट आणि मीटरचा चालू स्थितीतील फोटो आणि व्हिडिओ अधिकाऱ्याला दाखवल्यावर सरकारी योजनेप्रमाणे सवलत देऊन पैसे भरायला सांगितले. मी SVR मध्ये असलेल्या रिडिंग प्रमाणे फक्त वर्षभरातील दर महिन्याचे स्थिर आकार दंडासकट भरायला तयार आहे असे सांगूनही अधिकारी ते मान्य करत नाहीं. सध्या एकटाच लढत आहे. असे खूप जणांच्या बाबतीत झाले आहे, लोकं तावातावाने सरकार आणि विजमंडळला शिव्या घालतात.मी पुढाकार घेऊनही प्रत्यक्षात कोणीही एकत्र येऊन विरोध करायला तयार होत नाही. सरकार कुठलेही असो, खोटेपणा करत असतील तर विरोध करायलाच हवा हे लोकांच्या पचनी पडत नाही. फालतू लाड मलातरी पटत नाही.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 03/12/2021 - 20:08 नवीन
हवं तर माझं इलेकट्रीसिटी बिल पाठवून देतो. गेल्या दोन वर्षात कधीही 200 युनिट क्रॉस केलेले नाही.. पण जुन 2020 मध्ये अचानक 856 युनिट वापर दाखवलाय..
म्हणजे कागदोपत्री दाखवलेय कि मीटर च्या रिडिंग नुसार ८५६ युनिट वापरले गेले आहेत? मीटरवरच्या आकड्यात बाहेरुन अफरातफर करता येऊ शकते का? म्हणजे लॉकडाऊनमध्ये कुणा कर्मचार्याने परस्पर येऊन रॅण्डमली काही मीटर मध्ये असे फेरफार केले असणे शक्य आहे का?
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Fri, 03/12/2021 - 20:17 नवीन
मीटरवरच्या आकड्यात बाहेरुन अफरातफर करता येऊ शकते का?
याबाबत जाणकार माहिती देऊ शकतील..
म्हणजे लॉकडाऊनमध्ये कुणा कर्मचार्याने परस्पर येऊन रॅण्डमली काही मीटर मध्ये असे फेरफार केले असणे शक्य आहे का?
हो. कारण वीज मिटर अश्या ठिकाणी आहे जिथे जाणे येणे होत नाही.. आणि आम्ही सर्वांनी कडकडीत लोकडाऊन पाळला असल्याने आठवड्यातून एकदाच किंवा दोनदा बाहेर पडायचो.. त्यामुळे जर बाहेरून असे करता येत असेल तर असे झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा